Letters

पत्र.क्र. १८

*© श्रीधर संदेश*

*।।श्रीराम समर्थ।।*

*दि. १२-९-१९६३*

*चि. सिंधूस आशीर्वाद.*

बाळ, तुझ्यावर देवाची आणि श्रीगुरुंची पूर्ण कृपा आहे. तुला झालेले दृष्टांत चांगले आहेत. श्रीजगदंबेचे आणि श्रीसमर्थांचे तुला स्वप्नात दर्शन झाले आहे. जप कर म्हणून म्हणाले. ह्या आज्ञेप्रमाणे खूप जप कर. वत्सा, तुझ्यावर श्रीगुरुंची कृपा आहे. जपाला बसण्यापूर्वी श्रीगुरूंची मानसपूजा करून त्यांना नमस्कार घालून *’नमः शांताय’* या मंत्राचा १०८ वेळा जप करून *’श्रीराम’* जप करण्यास सुरुवात कर, चित्त एकाग्र होईल. मनासही समाधान लाभेल. मी तिकडे आलो म्हणजे दर्शनाला ये. तुझ्यावर श्री गुरुपरमात्म्याची पूर्ण कृपा होऊ दे. श्रीराम फार दयाळू आहेत. श्रीसमर्थांचे तर तुला दर्शन झाले आहे. सर्वहि उत्तम चालते आहे. काळजी करू नको. सुखरूप ऐस. सर्वांस माझा आशीर्वाद. सर्वहि सुखरूप असा.

*इति शिवम्*
*श्रीधरस्वामी*

*(संग्राहक – सरोजिनी आपटे )*

home-last-sec-img