Letters

पत्र.क्र. २१

*© श्रीधर संदेश*

*चि. भास्करास आशीर्वाद.*

उत्तमाचें सारेंच सर्वोत्कृष्ट असते. बोट ठेवायला म्हणून ज्याच्या आचरणांत थोडी सुद्धा उणीव शोधून पाहिली तरी कोठे आढळून येत नाही तोच दक्ष. *’सावध साक्षपी आणि दक्ष । त्यासी तात्काळचि मोक्ष।* ध्रुवाचा तारा बघत जसा नावाडी आपली नाव चालवतो त्याप्रमाणे या भवसमुद्रात आपल्या अत्युच्च ध्येयावरची दृष्टी ढळू न देतां आपलें शरीर वागवावे. असो. *’सद्गुरूपदी अनन्यता । तरी तुज कायसी रे चिंता ।।*
सर्वांना आशीर्वाद.

*श्रीधर*
*(संग्राहक व प्रेषक – नीलकंठ रामदासी, सामनगड)*

home-last-sec-img