Letters

पत्र.क्र. २

© श्रीधर संदेश

पूर्वपीठिका:*- नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करून निवृत्तिमार्गानुयायी असणाऱ्या व प्रस्थानत्रयी झालेल्या श्री. बेनगददे कृष्णा ब्रह्मचारी नांवाच्या साधकाला हे पत्र, त्याच्या पत्राचे उत्तर म्हणून श्रीनी शके १८५८ च्या सुमारास सज्जनगडावरून पाठविले होते.

यतस्त्वयि न वृत्तिर्हि निर्विकल्पे* *चिदात्मनि ॥*
नाह नवं जगन्नेदं सोऽहं भावस्तवास्ति किम् ।।१।।*

निर्विकल्प निदात्म्याच्या ठिकाणी जी वृत्ति ठेवावयास पाहिजे ती वृत्ति तुझ्या ठिकाणी नसताना मी (वस्तुतः) नाहीं, तूं (पण खरोखर) नाहीस; हे जगद् (तस्वत:) नाही, तो (आत्मा) मी आहे ह्या विचारांचा तुला काय । उपयोग?

दासोऽहमिति चाज्ञान तथा* *सोऽहमिति भ्रमम् ।।*
अहं स इति संमोह त्यक्त्वा स्वस्थो भवानघ ।।२।।*

मी दास आहे हे अज्ञान आहे. तोच मी आहे हा भ्रम आहे. मीच तो आहे हा संमोह आहे (तेव्हा जाता व जेय हे भित्र आहेत.) हो भ्रांति टाकून देऊन निश्चयी हो

नि:दे निर्मले नित्ये ब्रह्मरूपे निजात्मके ।
ब्रह्मैवाह तथा सोऽहं दासोऽहं मन्यसे कथम् ।।३।।

निर्भेद, निर्मल नित्य ब्रह्मरूप अशा आत्म्याच्या ठिकाणी ‘मीच ब्रह्म आहे,’ ‘तोच मी आहे’, ‘मी वास आहे’ असें (ज्ञाता व ध्येय यांचे भिन्नरूप) कसें ।। मानतोस?

अखंडैकरसे नित्ये निराधारे* *निरंजने ।
यतः सदा स्थितोऽसि त्वं नेहनानास्ति किंचन ||३||

अखण्ड एकरस, निस्पृह, निराधार, निरंजनामध्ये तू नेहमी आहेस त्यामुळे येथे कोणत्याहि प्रकारचे अनेकत्व असणे शक्य नाहीं.

कर्तव्यं धर्म इत्याहुः सधर्मः* *स्वात्मनास्थितिःl
इत्येवमेव ज्ञानीयान्नह नानास्ति किंचन ||५||

धर्माप्रमाणे आचरण करणे हेच आपले कर्तव्य आहे तसेंच धर्म हीच आपली आत्मस्थिति आहे हे समजणाऱ्यास येथे कोणत्याहि प्रकारचे अनेकत्व असणार नाही. ।।५।।

मिथ्यैष व्यवसायस्ते यदिदं* *पत्रलेखनम् ॥
अनंते परमेव्योम्नि तिष्ठत्वं स्वविचारतः ॥६॥

या पत्रलेखनाचा हा उद्योगहि व्यर्थ आहे तेव्हा तूं आपल्या विचाराप्रमाणे अनंत अशा परमस्थानी (परब्रह्मांत) स्थिर रहा. ॥५॥

न कोऽपि गुरुरस्स्यत्र न वा* *शिष्यः कनीयकः ॥
आत्मैवेदं श्रुतिर्वक्ति द्वितीयाद्वै* *भयः यतः ॥७॥

तत्वतः येथे कोणी गुरुहि नाही व कोणी हलका असा शिष्यहि नाही. दुस-यांपासून भीति असल्याने हा एकच आत्मा सर्वत्र आहे असें श्रुति म्हणते. ||७||

रचनास्थल:- सज्जगिरिः
लेखनकाल:- चैत्र शके १८५८

home-last-sec-img