*© श्रीधर संदेश*
*विवेक-वर्धिनी प्राथमिक शाळा, पुतली बावडी, हैद्राबाद या शाळेस श्रीमत् प. प. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामीजींनी दिलेला मंगल आशीर्वाद*
परमात्मपदवीपर्यंत पोहोचविणा-या अत्युच्च अशा परममंगलमय आणि परमपवित्र आर्यसंस्कृति रूप जगाच्या छत्ररूपी महान वृक्षाचे सौंदर्य वाढविणाऱ्या कळ्याच अशी ही मुलें वाटतात. त्यांच्या जीवनाची कळी उमलून त्यांच्या सर्वांगिक थोरवीचा सुगंध जगभर दरवळत राहावा असें मला वाटते. *’विवेकवर्धिनी’ हे नांव माझ्या बाबतींत जसें सार्थ नाव झालें तसेंच सर्वांच्याही बाबतींत ठरो! येथील विद्यार्थीसंघ विवेक-विचार संपन्नच असावा.* माझे बालपण मला आठवते याच इमारतीत ३ री पर्यंतचे माझे शिक्षण झाले होते. ही जागा म्हणजे पूर्वाश्रमाच्या मातेप्रमाणेच वाटते.
*’सर्वे जनाः सुखिनो भवन्तु ।’*
*इति शिवम्*
*-श्रीधरस्वामी*
मार्गशीर्ष वार गुरुवार
शके १८८१
(कृपेचा सागर’ या पुस्तेिकेवरुन)