Letters

पत्र.क्र. ३६

*© श्रीधर संदेश*

*।।श्रीराम समर्थ ।।*

*श्रीक्षेत्र वरदहळ्ळी
रविवार, माघ शुद्ध १०*

*सर्व भक्तांना आशीर्वाद.*

प्राचीन कालापासून श्री व्यास महर्षी आणि श्रीअगस्तिमहर्षीकडून पावन झालेल्या कथामृतांचा परिचय तुम्हा सर्वांना आहेच, हया क्षेत्र महात्म्यानुसार तीर्थस्नान आणि देवता-गुरु-दर्शन करून पुनित होण्यासाठी हयाक्षेत्रांत येणा-या लोकांची संख्या फार मोठी आहे. त्या सर्वांसाठी तीर्थ प्रसादाची व्यवस्था श्रीधरभक्तमहामंडळाकडून केली जाते. ह्या शिवाय या पावनक्षेत्रात आवश्यक असणारी एक वेदशास्त्र पाठशाळा व गोशाळा ह्या सर्वभक्तांच्या सहाय्याने सुरू केल्या आहेत.

ह्या पुण्यक्षेत्राद्वारे लोकांना पावन करण्यासाठी कटिबद्ध झालेले श्रीधरमहामंडळाचे प्रतिनिधि, कार्यकर्ते आपणाकडे सहाय्यासाठी आले असतां आपण मुक्त हस्ताने धन-धान्यादि भक्तिपूर्ण सेवा करून कृतार्थ व्हाल अशी आशा आहे.

*इति शम्*

*- श्रीधरस्वामी*

home-last-sec-img