*© श्रीधर संदेश*
*॥ श्रीराम समर्थ ।।*
*श्रीक्षेत्र काशी*
*हेमलंबीनाम संवत्सरे आषाढ शु।। १५ शके १८७९*
*श्रीधर महामंडळाच्या सर्व विश्वस्थांना आशीर्वाद.*
श्री देवांच्या व श्रीगुरूंच्या कृपेनें सज्जन होऊन सज्जनपणाने रहा ! ही संस्था म्हणजेच तुमचा प्राण, या निश्चयाने काम केल्यास ही बालसंस्था वृध्दिगत होईल. एकी व संघशक्ती ह्यांनीच साक्षात्कार होतो. एकीनेच तुम्ही पुढे सरसावल्यास सर्व संकटे नाहिशी होतील. हंगामात प्रयत्नशील राहिल्यास भात, सुपारी इत्यादी पिकें भरघोस येतील.
*तुमचे सर्वांचे इहपरजीवन दिव्य व सुखी करणारी ही एक दिव्य सेवा आहे, असा दृढविश्वास धरा !!*
*’सर्वे जना: सुखिनो भवन्तु ।’*
*इति शिवम् ।*
*- श्रीधरस्वामी*
*(मुळ कन्नड वरुन)*