Literature

अश्विन शुद्ध द्वितीया

कारण अनंतसुखरूप आहे. कार्यामुळे प्राप्त होणारे सर्व सुख, अनंतकोटी ब्रह्मांडात समाधिष्ठित असलेले
सुख, कार्यात समाधिष्ठित असणारे सुख आहे असे म्हणून, या अनंटकोटी ब्रह्मांडात समाधिष्ठित सुख
एकत्रित करून त्याचे लक्षण समजून घेतल्यास ते 'अल्प'च असणार ! आपणास हवे असलेले सुख
कारणरूपात्मक आहे, अनंत आहे असे म्हटल्यानंतर एका जन्मांत प्राप्त होणारे किंवा एका व्यक्तीस काही
अनुकूल अशा व्यक्तिपासून मिळू शकणारे सुखही किती अल्प आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
अनंतकोटीब्रह्मांडातील सुख एकत्रित करूनही ते कार्यरूप, अल्प असल्याने त्याच्या अनुकूलतेनुसार
मिळणारा आनंद कोणत्या दर्जाचा असेल ? त्यापासून त्याला कधीतरी समाधान मिळेल काय ? शांति प्राप्त
होईल काय ? अर्थातच कधीही शक्य नाही. यासाठीच त्या अल्प असणाऱ्या सुखाचा त्याग करून खरेखुरे
सुख प्राप्त करून घ्यावे असे तुम्हास वाटत असेल तर कारणरूप अशा परमात्म्याचा आश्रय घेऊन तृप्त व्हा,
असे श्रुति म्हणते.

अल्पसुखांत स्वत:ला अडकवून घेऊन तुम्ही त्या भोवऱ्यात फिरत राहून जन्म मरणाच्या फेऱ्यात झिजून
झिजून सुख न आढळता आंधळेपणाने कष्टपरंपरेच्या आहारी जाण्यापेक्षा तुम्हाला खरे सुख पाहिजे असेल
तर कारणरूप अशा परमात्म्याची प्राप्ती करून घ्या ! तुम्हाला याच मार्गाने खरी सुखप्राप्ती होईल. स्वत:स
कष्टपरंपरेच्या आहारी देण्यापेक्षा हेच योग्य होईल.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img