कच्चिन्निद्रावशं नैषि कच्चित्कालेऽवबुद्ध्यसे ।
कच्चिच्चापररात्रेषु चिना यस्यार्थनैपुणम् ।। १७ ।।
फार झोपत नाहींस ना! प्रातःकालींच उठतोस ना ! अपरात्रीच्या शांत वातावरणांत अर्थप्राप्तिविषयक विचार करतोस ना! ‘लौकर निजे लौकर उठे, तथा ज्ञान आरोग्य संपत्ति भेटे रात्री दहा वाजता झोपून तीन चार वाजण्यापूर्वीच उठावें. लौकर निजून लौकर उठ ल्याने आरोग्य वाढतें, अंगांतला उत्साह वाढतो, कामाचा तकवा येतो, थकवा जातो, कोणताहि उद्योग झपाट्याने होतो. प्रातःकाली उठल्यानें बुद्धि तरतरीत असते. प्रातः कालची वेळ व वातावरण नितांत शांत असतें. हवा आरोग्यदायी असते. शरीर उत्साहपुलकित होते. रात्रभर देहाला विश्रांति मिळाल्यामुळे मेदू व शरीर प्रातः काली ताजेतवाने होतात. कोणत्याहि विषयाचा अभ्यास, पाठांतर कसलाहि गहन विचार करण्यास योगाभ्यासाला, ध्यानाला प्रातःकालच अनुकूल असतो. त्यावेळी मनाची एकाप्रतादि अधिक होते. म्हणूनच प्रत्यहं प्रातरुत्थाय चिंतयेदात्मनो हितं “ असे लघुआश्वलायन स्मृतीचे आहे. प्रातःकाल शरीराच्या अतिबाहेर स्वाभाविकच शांतता नांदत असत्यामुळे मनाची धावपळहि कमी असते. शरीराची हालचालहि अधिक नसते. शांत वातावरणांत सूक्ष्म विचार सुचतो. प्रातरुत्थाय यो नित्यं संध्यास्नायी मयेद्विजः । सप्त जन्मकृतं पापं त्रिभिर्वर्षपोहति || ( दक्ष. २०१२) प्रातःकाळी उठून जो प्रातः स्नान करतो तो तीन वर्षांतच सात जन्माचे पाप नष्ट करतो. गुणा दश स्नानपरस्य साधो रूपं व तेज बलं च शौचं आयुष्यमारोग्य मलोलुपत्वं दुःस्वप्नघातश्च तपश्च मेधा ॥ १३ ॥ मनः प्रसादजननं रूपसौभाग्यवर्धनम् । दुःखशोकापडं स्नानमानंदज्ञानदं तथा ॥ १४॥
-रूप, तेज, बल, पावित्र्य, आयुष्य, आरोग्य, अलोलुपत्य, दुःस्वप्नदोषनाश, तप, मेधा हे दहा गुण प्रातः स्नानापासून लाभतात. प्रातःस्नान मन प्रसन्न राखते, सौंदर्य आणि सौभाग्य वाढविते, दुःखशोक नाहीसे करतें, मान आणि ज्ञान देते.
कच्चिम्मंत्र्यसे नैकः कच्चिन बहुभिः सह ।
कच्चित्ते मंत्रितो मंत्रो राष्ट्र न परिधावति ॥
सर्वांनी मिळून विचार करावयाच्या प्रसंगी एकटा विचार करीत नाहीस ना ! एकट्यानेच विचार करावयाच्या वेळी घोळका जमवीत नाहीस ना ! तुझे गुप्त विचार राष्ट्रभर होत नाहीत ना ! कांही प्रसंगी एकट्यालाच विचार करावा लागतो व कांही वेळां समुदायानिशी विचार कराय याचा असतो. गौप्य असलेले दुसन्याला कळविता कामा नये. चार जणांचे मत घेऊन ठरवावयाच्या वेळी व कोणतेंहि कार्य करण्याच्या प्रसंगी आपण एकट्यानेच आपल्या मनाप्रमाणे ते ठरवू नये व करूं नये. असे झाले असतां कदाचित् आपल्या कोत्या विचारांनी व संकुचित वर्तनानें जनांचे नुकसान होण्याचा संभव असतो. स्त्रीय गुणदोषांचा, गृहछिद्राचा व अशाच गुप्त गोष्टीच व मसलतीचा आपण एकट्यानेच विचार करावा लागतो. पदकर्णी झालेलें कार्य व मसलत नासते.
कच्चिदर्थे विनिश्चित्य लघुमूलं महोदयं ।
क्षिप्रमारभसे कर्म न दीर्घयास राघव |
कोणत्याहि महाफलाच्या सत्कार्याची प्रेरणा झाल्याबरोबर अल्प प्रमाणाने का होईना ‘अल्पारंभः क्षेमकरः’ या न्यायानें त्या कार्याला वेळ न लावतां लौकरच प्रारंभ करतोस ना महाफलाच्या संकल्पित सत्कार्याचा अल्पारंभ शीघ्र करून हाती घेतलेलें तें कार्य चिकाटीने शेवटास नेले पाहिजे; तें झपाट्याने यशस्वी रीतीने पार पाडले पाहिजे; त्यांत दीर्घसूत्रीपणा नसावा. श्च:कार्यमधकुर्वीत पूर्वाण्हे चापराण्हिकम् । न हि प्रतीक्षते कालः कृतं वाऽपि न वा कृतम् ॥ निमिपः क्षणशश्चैव विद्यामर्थ च साधयेत् । गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत् ॥ इत्यादि सुभाषितांचे इथे स्मरण होतें. संकल्पित कार्ये आपल्याला वा दुसऱ्याला हितकारी व मंगलप्रद असावीत. आरंभिलेले कार्य शीघ्रफलदायी होण्यासाठी झटावें. शतप्रयत्न करून हाती घेतलेलें सत्कार्य तडीस न्यावें. कोणतेंहि कार्य संपूर्ण होण्यापूर्वीच त्याचा स्फोट करूं नये. मध्येच स्फोट झाल्यास कार्य सिद्धीला जात नाही म्हणून कठीण कार्य गुप्तपणेच साधावें. सर्व विचार धर्मशास्त्राला सोडून केवळ तर्ककर्कश असा असू नये. विचाराच्या बाबतीत एकसूत्रीपणा असावा. विश्वासार्ह कार्यकारी मंडळ असावें. कोणत्याहि रीतीने चाललेल्या गुप्त मसलतीचा कधीं स्फोट होऊं नये. कांहीं क्रियेनेच दर्शवावे लागतें. कांही खुणेनेंच पटवावयाचें असते. कांही लिहूनच कळवावयाचे असतें व कांही उघड बोलूनच दाखवावयाचे असते. हजारों लाखों अप्रबुद्ध लोकांशी उगीच दीर्घकाल घासाघासी करीत बसण्यापेक्षां एखाद्याच खऱ्या पंडिताशी अल्पकालच केलेला विचार धर्मसंकटकाली अथवा कार्याकार्यप्रसंगी अचूक श्रेयस्कर ठरतो. त्या त्या कार्याचा व त्या त्या विषयाचा अनुभव असणाऱ्याशी त्याचा त्याचा विचार केल्यास अल्प द्रव्यांत, अल्पावधीत उत्कृष्ट कार्य होतें व अचूक उपाय सांपडतो. सभासदांची निवड करावयाची झाल्यास ती सद्वृत्त अशा मातापित्यांच्या पोटी आलेल्या उच्च जातींतील घरं अशा सच्छील विद्वानांचीच करावी. वरच्या जातीतील कुलीन घराण्यांत उच्च संस्कारांचे रक्त परंपरागत आल्यामुळे, अधिक पुढें दिलेल्या औषधाप्रमाणे, अशांचा सहयोग अचूक फलदायी होतो. सहवासांत असलेल्या लोकांच्या लक्षणांवरून त्यांचे त्यांचे पूर्व व सांप्रतचे संस्कार समजून येतात. मनुष्याची भूमिका त्याच्या सहजगत्या आचरणांवरून अनायासे दिसून येते. चालरीत, चालचालणूक, आचारविचार, आहारविहार यांच्या योगानें मनुष्याचे लक्षण चटकन् कळून येते. पूर्वार्जित नीचोच्चकर्माप्रमाणें व त्याच्या त्या त्या संस्काराप्रमाणे त्याला त्याला त्या त्या नीचोच्च जातीत जन्म येतो. मनुष्याचे चारित्र्य त्याच्या जन्मावरून, कुलशीलावरून, मातापित्यावरून परिवारावरून, साधनसामुग्रीवरून, अभ्यासावरून, संग-सहवासावरून व विविध कार्यकलापावरून पक्के समजून येते. मनुष्य कायावाचामनें व वर्तनें करून परिशुद्ध असणाराच चारित्र्यसंपन्न असतो. अशाच्या विचारांत, वाणीत क्रियेत सद्भावनांचा उत्कर्ष उठून दिसतो व तो विश्वसनीय वाटतो.