Literature

आर्याची विभागपद्धति

भारतवीत ह्या वेदोक्त देवपितृकार्ये चालवीत आलेल्या अविच्छिन्न परंपरेंत पित्रार्जित अधिकार पुरुष संततीलाच आहे. पुरुष संततीच्या योगा नेंच परंपरा अविच्छिन्न पुढे चालू राहाते. पुरुष संतति ही स्त्री संततीप्रमाणेंच परगोत्रांत न जातां त्या गोत्रांतच राहाते, आपल्या कुलांतच असते. पुरुष संततीलाच देवपितृकार्ये चालविण्याचा आणि वंशवृद्धीचा अधिकार पोहोचत असल्यामुळे त्यांना पित्रार्जित संपत्तीचा अधिकार असणे ओघानेच प्राप्त होते. पितरांचा उद्धार त्या त्या वंशाच्या पुरुष संततीपासूनच होतो, स्त्री संतती पासून नाही, असें ‘पुत्रः’ या शब्दाच्या व्युत्पत्तीवरून स्पष्ट होते. याचा विचार मार्गे आला आहे. उत्तरक्रियेचा अधिकारहि पुरुष संततीलाच असतो. या सर्व विचाराबरून पूर्वीपासून चालत आलेल्या पुरुष संततीलाच वडिलार्जित ..संपत्तीचा वांटा देण्याची पद्धत शास्त्रीय आणि सयुक्तिक आहे असे कोणास वाटणार नाही ? धर्माच्या पूर्वपरंपरेचा विचार करून, विद्वान पंडितांशी साधक बाधकांचा संपूर्ण उहापोह करून, धर्माला विरोध न येईल अशा रीतीनें समाजाच्या अभ्युदयनिःश्रेयसाकरितां अनुकूल असे कायदे, नियम केले पाहिजेत. असे न करतां अविचाराने कायदे करून विश्वादरणीय संस्कृतीचा नाश करण्यांत एक त्या संस्कृतीचा द्रोहच नव्हे, अखिल विश्वाचा आदर्शच नाहीसा करून विश्वद्रोहालाच पात्र होणें आहे, असे विचारया कोणासह कळून येईल.

तेव्हां माझ्या दृष्टीने असे कोणी आडमार्गानें न जातां परममंगल व अतिपवित्र आनंदघन स्वरूपाच्या साधनांनी आर्य संस्कृतीच्या उच्च वाता वरणांत नांदून सर्वांनींच कृतार्य व्हावें अर्से आहे.

home-last-sec-img