Literature

आषाढ शुद्ध तृतीया

मानवास शंभर वर्षाचे आयुष्य आहे तसेच ब्रह्मदेवाचे आयुष्यही शंभर वर्षाचेच असल्याचे पुराणात तरी सांगितले आहे. पण वर्षगणनेचे प्रमाण मात्र भिन्न भिन्न आहे. मानवी हजार चतुर्युगे म्हणजेच ब्रह्माचा एक दिवस. रात्रही तशीच, याप्रमाणे ब्रह्माचे संपुर्ण आयुष्य म्हणजे विष्णुची एक घटका. अशाप्रकारे कालगणना करून शंभर वर्षे पुरी झाली म्हणजे ते विष्णुचे आयुर्मान व त्यावेळी विष्णुप्रलय होतो. अशाचप्रकारे शिवाचाही प्रलय होत असतो व हा शीवप्रलयकाळ म्हणजे शक्तीचा अर्ध घटका होय असे वर्णन आहे. एकंदरीत निर्माण झालेल्या वस्तूस नाश टळत नाही. अशा दृष्टीने या त्रिमुर्तींनाही आपापली कार्ये संपविण्याची वेळ येतेच. त्यांचाच अर्थ त्याचाही नाश आहे. आत्मदृष्ट्या त्यांना मरण नाही. कारण आत्म्यास मरण नाही. देहास मरण आहे. पण आत्म्याला मरण नाही. बाह्य दृश्यवस्तु ह्या सर्व नाशिवंतच. तात्विक दृष्टीने त्रिमुर्ती अविनाशीच. पण त्यांचे ब्रह्मा, विष्णु, ईश्वर स्वरूप मात्र नष्ट होणारे आहे. त्यांची उपाधी नष्ट झाल्यावर गुरूशब्दाने प्रतीत होणारी वस्तु मात्र शाश्वत आहे हे लक्षांत आणूनच ‘ गुरू हे ब्रह्मा, विष्णु, महेश व साक्षात परब्रह्म आहेत ‘ असे वर्णन केले आहे. यावरून निरूपाधिक ब्रह्मचैतन्यच ‘ गुरू ‘ शब्दाने प्रतीत होत नाही काय ?

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img