Literature

कार्तिक शुद्ध द्वितीया

आपणांस हवीशी वाटणारी वस्तु मिळविण्याकरता आपण मोठ्या प्रेमाने प्रयत्न करीत असतो. प्रीती, प्रयत्न व प्राप्ती याचा एकप्रकारे संबंध आहे. जास्त प्रेम असलेली वस्तू मिळविण्यासाठी समंजसपणे जोराचे प्रयत्न केले असता ती वस्तु मिळणे हेच त्याचे फळ.

आपल्याला परमात्म्याची नेहमीच आवश्यकता आहे. कारण त्याची कृपाच आपले रक्षण करते. परमात्मा सुखसागरच ! तो परम सुखस्वरूपच जगातील अनंत वस्तुत सुखलेश आहे. म्हणून या जगाची उत्पत्ती करणाऱ्या परमात्म्यामध्ये सर्वसुख आहेच. अनंत कोटीब्रह्मांडास कारण असलेल्या परमेश्वराच्या ठिकाणी अगाध व अगम्य सुख असणारच. यावरून सुखाचे मूळ परमेश्वरच होय. निर्माण झालेल्या सर्व पदार्थांना रूप, रस, गंंध व आकर्षकता असून हे सर्व त्यांना जगातील सर्व वस्तूत असणारे सुखलेशाचे मूळ परमात्माच. उत्पत्तिलययुक्त असणारे हे जग तुच्छ होय. ते परमेश्वरी इच्छेनुरूप रहाते. अर्ध्या निमिषांत तो सर्वांचा संहार करू शकतो. तसेच त्यांना निर्माणही करू शकतो असे अगाध सामर्थ्य परमेश्वराचे आहे. आपणांस सुखासाठी प्रयत्न करावयाचा असल्यास परमेश्वराच्या ठिकाणी प्रेम ठेवलेच पाहिजे. पण लाखातून एखादाच भक्त असतो व कोटीतून एखादाच मुक्त होतो. म्हणजेच परमेश्वराच्या ठिकाणी प्रेम असणे कमीच !!

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img