Literature

कुलगुरु, राजगुरु व राष्ट्रगुरु

प्रत्येक कुटुंबाचा कुलगुरु, राजगुरु व राष्ट्रगुरु हा ब्राह्मण, सत्कुलप्रसूत जितेंद्रिय, त्यागी, ब्रह्मनिष्ट, सदा स्वधर्मनिरत, धर्माच्या अध्ययन अध्यापनादि स्वकर्मानुष्ठानपर, ब्रह्मवर्चस्त्री, निरहंकारी, बहुश्रुत, असूयारहित, वेदमतानुसारी, होमहवनादिकांत श्रद्धाळु, वेदवेदांगनिष्णात, निखिल शास्त्रकोविद, इतिहास पुराणज्ञ, विमर्षात्मक बुद्धीचा, आचार, विचार, उच्चार यांत एकसूत्रीपणा असणारा, सरल स्वभावाचा, देवगुरुपितृमातृभक्त असा असला पाहिजे. पूर्व कालीन बहुतेक सर्वच ब्राह्मण वर दिलेल्या अखिल लक्षणांनी युक्त होते. नियमाला अपवाद म्हणून कोठें कदाचित् एखादा सांपडला तर सांपडला नाहीं तर नाहीं. अशा पुरोहितांना व ब्राह्मणांना मोठ्या गौरवानेच वागवावें, नाहीं तर त्यांच्या अपमानानें कुटुंबाला व राष्ट्रालाच धक्का पोहोंचतो.

कच्चिदात्मसमाः शूराः श्रुतवंतो जितेंद्रियाः । 

कुलनाश्चेगितज्ञाश्च कृतास्ते तात मंत्रिणः ॥१५॥

मंत्री विजयमूलं हि राज्ञो भवति राघव । 

सुसंवृत्तो मंत्रिधुरैरमात्यैः शास्त्रकोविदः ||१६||

( वा. रा. अ. कां. स. १००) 

-भरता ! तुझ्यासारखेच शुरु, श्रुतिस्मृतिज्ञ, जितेंद्रिय कुलीन, इंगि तज्ञ असे मंत्री केले आहेस ना ? शास्त्र व शास्त्रपारंगत अशा जनहितदक्ष युक्तिबुद्धिसंपन्न अमात्यांनी परिवेष्टित असा शोभायमान होतोस ना ? राजा ब प्रजा यांना सुमंत्र्यांनी यश, कीर्ति व कुमंत्र्यांनी भ्रष्टता आणि अपयश यांची प्राप्ति होते.

कञ्चित्सहस्रान्मूर्खाणामेकमिच्छसि पण्डितम् ।

पण्डितो ह्यर्थकृच्छ्रेषु कुर्यान्निश्रेयसं महत् ||२२|| 

सहस्राण्यपि मूर्खाणां यद्युपास्ते महीपतिः । 

अथवाप्ययुतान्येव नास्ति तेषु सहायता ||२३|| 

एकोऽप्यमात्यो मेधावी शूरो दक्षो विचक्षणः । 

राजानं राजपुत्रं वा प्रापयेन्महतीं श्रियम् ||२४||

हजारों लाखों मूखौंपेक्षां एखाद्या पण्डिताचे साहाय्य अचूक लाभ दायक होतें, मोठेंच फायदेशीर होते. मेधावी, शुरु, दक्ष, विद्वान असा एकच एक अमात्य असला तरी पुरे. तो फार मोठें यश, कीर्ति, वैभव राजाला प्राप्त करून देतो. इथे ‘ एकोऽपि वेदविद्धमै यं व्यवस्येद्विजोत्तमः । स विज्ञेयः परो धर्मो नाज्ञानामुदितोऽयुतैः ।। ‘ (मनु. १२ ११३) या मनूक्त श्लोकाची आठवण होते.

home-last-sec-img