गुरुकृपेने देहाविषयी भ्रान्तज्ञानाचा नाश —
देहध्यावशाच्चित्ते यद्यदाभाति तत्सदा।।
आत्मप्रकाशतः सर्व मृगतोयं यथापते ।।1।।
अर्थ—— देहाध्यास शरीर म्हणजे मी ही पक्की चूक अशी — भ्रॉत समजूत सते आणि त्या मोहामुळे जे—जे भासते ते—ते सर्व आत्मज्ञान झाल्यावर मृगजळा प्रमाणे नाहीसे होते. मृगजळ हे सूर्यतापामुळे भासते. ।।1।।
अहं देहो ममायं वा भावनाज्ञानकल्पिता।।
नाहं देहो ममायं वा भावना ज्ञानकल्पिता।।2।।
अर्थ—— मी म्हणजे माझे शरीर आणि हे माझे ही भावना दृ अज्ञानामुळेच उत्पन्न होते. आणि आत्मज्ञान प्राप्तीनंर हे माझे नाहीं अशी भवना उत्पन्न होते. ।।2।।
अहं ममेति यो भावो देहाध्यासादनात्मनि।।
स भावो बन्ध इत्युक्तः स्तन्मुक्तिर्मुक्तिरुच्यते।।3।।
अर्थ—— मी आणि माझे ही भावना देहाध्यास लागतो तेंव्हा होते. आणि ह्या भावना पासून सूटका झाली की म्हणजे मुक्ति प्राप्त होतें. ।।3।।
देहोहमिति संङकल्पो महत् संसार उच्चते।।
देहोहमिति संङकल्पः स बन्ध इति चोच्यते।।4।।
अर्थ‘—— मी म्हणजे देह ही कल्पना म्हणजेच महान संसार असे म्हटले जाते आणि मी म्हणजे हे शरीर हा संकल्प बंधन उत्पन्न करतों. ।।4।।
देहोहमिति सङकल्पस्तदुःखमिति चोच्यते।।
देहोमिति यद्भान स एव नरक स्मृतः।।5।।
अर्थ—— देह म्हणजे ”मी” हा संकल्प दुःख उत्पन्न करतो आणि देह म्हणजे ”मी” ही संकल्पनाच हे भान होणे म्हनजेच नरकवास होय.।।5।।
देहोमिति संङकल्पो जगत्सर्वमितीयते।।
देहोमिति संङकल्पो हदयग्रन्थिरीरितः।।6।।
अर्थ—— देह म्हणजे मी ही कल्पनाच म्हणजे सर्व जग आणि देह म्हणजे मी ह्यातच हृदयग्रन्थी म्हणटले जाते. ।।6।।
देहोमिति यज्ज्ञानं तदेवाज्ञानमुच्यते।।
देहोमिति यज्ज्ञानं तदसद्भामेव च ।।7।।
अर्थ—— देह म्हणजे ”मी” असे वाटणे हेच अज्ञान आहे. आणि देह म्हणजे ”मी” ही भावनाच ”असत् भावना” म्हटली जाते. ।।7।।
देहोमिति या बुध्दिः सा चाविद्येति भण्यते।।
देहोमिति यज्ज्ञानं तदेव द्वैतमुच्यते।।8।।
अर्थ—— देह म्हणजे ”मी” ही भावनाच अविद्या असे म्हटले जाते. आणि देह म्हणजे ”मी” ह्यासच द्वेत ज्ञान म्हटले जाते. ।।8।।
देहोमिति संकङल्पः सत्यजीवः स एव हि।।
देहोमिति यज्ज्ञानं परिच्छिन्नमितीरितम्।।9।।
अर्थ—— ”देह हाच मी” हा संकल्प म्हणजे खरा जीवभाव म्हटले जाते. देह मी हे ज्ञान परिच्छिन्न ज्ञान म्हटले जाते. ।।9।।
देहोमिति संङकल्पो महापापमिति स्फुटम्।।
देहोमिति या बुध्दि स्तृष्णादोषमया किल ।।10।।
अर्थ—— देह म्हणजेच ”मी हा संकल्प” महापाप म्हटले जाते. देह म्हणजे ”मी ही बुध्दि” तृष्णादोषाने परिपूर्ण म्हटली जाते. ।।10।।
लोकवासनया जन्तोः त्रशास्त्रवासनयापि च ।।
देहवासनाया ज्ञानं यथावन्नैव जायते।। 11।।
अर्थ—— लोकेपण लोकप्रियता आदि मोहामुळे शास्त्रवासना म्हणजे बहुत से ज्ञान प्राप्त करुनच तसेे प्रदर्शन करणे ही इच्छा तसेच देहवासना ह्या मोहामुळे मनुष्याला खरे ज्ञान प्राप्त होत नाहीं. ।।11।।
इन्द्रियाभ्यां ह्यजय्याभ्यां द्वाभ्यामेव हृतं जगत।।
अहो उपस्थ जिव्हाभ्यां दुःखं समनुभूयते।।12।।
अर्थ—— अजेय अश्या दोन इन्द्रियांकडून ह्या जगाचे संपूर्णपणे अपहरण केले गेले आहे. ते दोन इन्द्रिय (की ज्यांना कोणी जिंकू च शकत नाही) म्हणजे एक तर रसेनेन्द्रिेय अर्थात कामवासना (हयांस अयोग्यरीति ने मोकट सोडल्यामुळे) ह्यापासून परिणामी दुःखाचीच प्राप्ती होते. ।।12।।
विश्वं सर्वभ्रमापन्नं कान्तासु कनकेषु च ।।
तासु तेष्वप्यनासक्तो धीरो वीरः सुखीकृती।।13।।
अर्थ—— कान्ता आणि कनके अर्थात स्त्री आणि सोने (धन) ह्यामुळेच सर्व जगत हे भ्रमित होवून दुःखाप्रत पोहोचले आहे. ह्या दोन्हीं मध्ये जो कोणी निःस्पृह राहील तोच खरा धीर आणि वीर आहे. ।।13।।
जनितवा पूर्णतां यान्ति विकारा यौवने पुनः।।
तारुण्यं त्वब्धिवत् घोरं तत्र सत्सङगतिर्हिनो।।14।।
अर्थ—— यौवनावस्थेत विकार हे पूर्णपणे विकसित होवून उत्पन्न होतात. तारुण्य हे एकाद्या सागरा सारखे अथांग असून सत्संगति शिवाय (मोकाट सुटलेले) असते. ।।14।।
दुर्लभो विषयत्यागो दुर्लभं तत्वदर्शनम्।।
दुर्लभा सहजावस्था सद्गुरोः करुणां विना।।15।।
अर्थ—— विषयवासनेचा त्याग हा अत्यंत दुर्मिळ असून तत्वदर्शन अर्थात् तत्वज्ञानाविषयी इच्छा पण क्वचितच आहे आणि सहज अवस्थापण दुर्लभ (मनुष्य म्हणून आपण काय केले पाहिजे असे वाटणे म्हणजे सहज अवस्था) ही सुध्दा सद्गुरु कृपेवाचुन कठीण आहे. ।।15।।
गुरुरेव परंब्रह्म गुरुरेव परा गतिः।।
गुरुरेव परा विद्या गुरुरेव परायणम्।।16।।
अर्थ—— गुरु हेच परब्रह्म आहे. गुरु हिच परमगति आहे. गुरु हिच पराविद्या आहे आणि गुरु हेच शरण जाण्यास योग्य असे स्थान आहे. ।।16।।
गुरुदेव पराकाष्ठा गुरुदेव परं धनम्।।
यस्मात्त्वोपदेष्टासी तस्माद्गुरुत्रो गुरुः।।17।।
अर्थ——गुरु ही सर्वांत उच्च अशी स्थिती आहे. गुरु हेच परमधन आहे. गुरु हेच तत्वाचे उपदेशक असल्यामुळे श्रेष्ठ आहे. गुरु हेच सर्वश्रेष्ठ आहे. ।।17।।
गुकारश्चान्धकारो हि रुकारस्तेज उच्यते।।
अज्ञानग्रार्स ब्रह्म गुरुरेव न संशयः।।18।।
अर्थ—— गुरुशब्दांतील पहिल अक्षर जे ”गु” ह्याचा अर्थ ”अंधःकार” असा आहे आणि दूसरे अक्षर ”रु” ह्याचा अर्थ ”तेज” असे आहे, अज्ञानाचा (अंधःकाराचा) नाशक गुरु आहे. कारण अज्ञानाने ब्रह्मतत्व हे ग्रासले गेले आहे. आणि गुरु हेच त्या अज्ञानाचे निवारण करतात. करु शकतात. ।।18।।
गुकारस्याद् गुणातीतो रुपातीती रुकारकः।।
गुणरुपविहीनत्वाद गुरुरित्यभिधीयते ।।19।।
अर्थ—गुकार हा गुणांच्याही पलीकडे म्हणजे अतीत असतो आणि रुकार हा रुपाच्या ही पलीकडे रुपातीत असतो. अर्थात त्याला कोठलेही रुप सांगता येणार नाहीं. आणि गुण—रुप विहीनत्वमुळे म्हणजे हे दोन्ही ही ज्यास नाही, त्या पलीकडील गुरु हे आहेत. त्यांचे आपण एकच लक्षण सांगू शकत नाहीं ।।19।।
गुकारः प्रथमोवर्णी मायादिगुणभसकः।।
रुकारोस्ति परब्रह्ममायाभ्रान्तिविमोचकः ।।20।।
अर्थ—— मायेचा जो पडदा ब्रह्मरुपावर अज्ञानरुपाने आहे त्यांतील प्रथम (आवरण) ”भ्रम” रुपी अंधःकार म्हटले पाहिजे. तो गुकार आहे. रुकार हा ज्ञानस्वरुप म्हणजे ब्रह्मरुपावरी अज्ञान (भ्रमाचा) नाशक आहे. ।।20।।
गुकारञच गुणातीतं रुकारं रुपवर्जितम्।।
गुणातींतमरुपञच योदद्यात्सदगुरुः स्मृतः।।21।।
अर्थ—— ”गुकार” हा गुणतीत असून ”रुकार” हा रुपातीत आहे. जो गुणातीत आणि रुपातील ज्ञान देतो त्याला सद्गुरु असे म्हटले जाते. ।।21।।
ध्यानमूलं गुरोर्मुर्तिः पूजामूलं गुरोःपदम्।
मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मुक्तिमूलं गुरोः कृपा ।।22।।
अर्थ— ध्यान हिच गुरुची मुर्ति आहे. गुरुचरण म्हणजे पूजा करण्यातच आहेत. गुरुमंत्र म्हणजे गुरुवाक्य हेच गुरुमंत्र आहेत. आणि गुरुकृपा ही मुक्ति प्राप्त करण्यास मुख्य आधार (कारणच) आहे. त्या मुळेच मुक्ति मिळते. ।।22।।
शोषण पापपङकस्य दीपनं ज्ञानतेजसः।।
गुरोः पादोदकं सम्यक संसारार्णवतारकम्।।23।।
अर्थ—— पाप रुपी चिखलास दूर करणारे, ज्ञानरुपी तेज प्रज्वलित करणारे असे गुरु पादोदक अर्थात गुरुचे चरणामृत (म्हणजे त्यांची आज्ञा पालन करणे— गुरुवाक्यांवर विश्वास ठेवणे) हे भवसागर तरुन जाण्यास अत्यंत मोठे भक्कम साधन आहे. ।।23।।
यथा खनन्खनित्रेण नरो वार्याधिगच्छति ।।
तथा गुरुगतां विद्या शुश्रुषुरधिगच्छति।।24।।
अर्थ—— ज्या प्रमाणे तहान लागल्यावर मनुष्य खणुन खणुन शेवटी जलप्राप्ती करुन घेतो(श्रम केल्यावरच फलप्राप्ती होणे) त्या प्रमाणे गुरुची सेवा करुन श्रमकरणार्यास विद्या प्राप्त होते. ।।24।।
गुराः परतर नास्ति त्रिषु लोकेषु किञचनः।।
गुरुरेव परबंरह्म मोक्षसाम्राज्य दिक्षितः ।।25।।
अर्थ—— गुरुपेक्षा श्रेष्ठ, असे तिन्ही लोकात कुणीही नाही गुरु हाच परब्रह्मरुप अभिषिक्त सम्राट आहे. ।।25।।
गुरुप्रसादतस्स्वात्मन्यात्माराम निरीक्षणात्।।
गच्छता मुक्तिमार्गेण स्वात्मज्ञानं प्रवर्तते।।26।।
अर्थ—— गुरुप्रसादामुळे स्वतःच्या अंतरंगांत आत्म्याचे निरीक्षण करुन मुक्तिमार्गाने पुढे वाटचाल करीत असतांना स्व आत्मज्ञान प्राप्त होते. ।।26।।
गुरुवाक्याधृते चित्ते ब्रह्मज्ञाने प्रकाशते।
अभ्यासवासनाशक्त्या तरन्ति भवसागरम्।।27।।
अर्थ—— गुरु वचनें हृदयात साठविल्याने ब्रह्मज्ञान प्राप्त होते. आणि त्याचा अभ्यास करण्याची सतत्इच्छा उत्पन्न होवून मनुष्य भवसागर तरुन जातो. ।।27।।
गुरुशिष्यादिभेदेने ब्रह्मैव प्रतिभासते।।
ब्रह्मैंव केवलं शुध्द विद्यते तत्वदर्शने।।28।।
अर्थ—— गुरु शिष्य भेदामधून ब्रह्मतत्वच आभासित होते. तत्वदर्शन म्हणजे एकंदर तत्वज्ञान, वेदान्त, विषयांत ”ब्रह्म” हाच केवळ एक विषय आहे. ।।28।।
मोक्षद्वारे क्षरपालाश्चत्वारः परिकीर्तितः।।
शमो विचारः सन्तोषश्चचतुर्थः साधुसङगम्।।29।।
अर्थ—— मोक्षाच्या द्वारा मधे प्रवेश करावयाचा असल्यास चार द्वारपाल असतात. (1)शम (2) विचार (3) संतोष (4) साधुसंग
साधुसंङगतिरेवाय कारणं प्रथमं ततः।।
युक्तिः सम्पाद्यते पुष्ठा दृढा नौरिव नाविकात्।।30।।
अर्थ—— त्यांत साधुसंगति हीच प्रथम मोठे कारण आहे. ज्या प्रमाणे तरुन जाण्यासाठी नाव आणि नाविक दोन्ही लागतात, पण नाविकाची युक्ति (नैपुण्य) पण त्या नावेला दृढ पक्के ताब्यांत ठेवण्यास कारण बनून मार्ग क्रमण करते.
आत्मज्ञानान्न क्षेत्रेण विरक्तिप्रपया पुनः।।
साधवः पालयन्तीह दयया जीवतां कृते।।31।।
अर्थ—— केवळ शरीरभावनेने आत्मज्ञानाशिवाय विरक्ति प्राप्त होत नाही. आणि साधुसंत जीवांच्या कल्याणासाठी हे कार्य करुन त्यांचे पालन करतात. ।।31।।
मरुभूमौ यथोद्यानं संसारे साधवस्तथा।।
शान्तिञच नवचैतन्यं यच्छन्ति हि महात्मनः।।32।।
अर्थ—— वाळवंटांत एखादे उद्यान मिळावे व शीतलता प्राप्त व्हावी तद्वत संसारांत साधुसंतांची संगती ही शांति आणि नवचैतन्य प्रदान करते. ।।32।।
संसारसागरे सन्तः सर्वसमृध्दद्वीपवत्।।
पथिको यत्र गत्वैवं पुनर्दुःख न विन्दति।।33।।
अर्थ—— संसार सागरामध्ये सन्त हे सर्वसमृध्दिने युक्त असे एखादे द्विपच जमीनीचा हिस्सा आहे. ते प्राप्त करुन संसारी मनुष्य पुनः दुख प्राप्त करत नाहीं. ।।33।।
नद्यो यथा परार्थाय फलवृक्षाणि वा यथा।।
परार्थाय हि जीवन्ति साधवो दीनवत्सलाः।।34।।
अर्थ—— ज्या प्रमाणे नद्या परोपकरासाठीच वहात असतात, वृक्ष हे परोपकारासाठीच फळ प्रदान करतात, तद्वत संत हे लोकांसाठीच दीनवत्सल होवून दुःखितांवर प्रेमरुपी छाया घालण्यासाठी असतात. ।।34।
गङगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तथा।।
पापं तापञच दैन्यञच हरति सन्तसमागमः।।35।।
अर्थ—— गंगा नदी ही पापक्षालन करते, चन्द्रमा तापहरण करतो आणि कल्पतरु का दारिद्र्र्य दूर करतो पण संत हे पाप, ताप, दारिद्र्य दूर करतात, तिन्हींचा नाश करतात. ।।35।।
साधवो सुखो नित्यं परं ब्रह्मात्मरुपिणः।।
तत्र गत्वा न भिन्नःस्यात् प्रविष्टाब्धौ नदी यथा।।36।।
अर्थ—— आत्मतत्वरुप ब्रह्मनिरुपण करुन साधुसंत हे सुखरुप करुन टाकतात (अर्थात साधुसंतांजवळ जाऊन त्यांचे ब्रह्मनिरुपण जो समजुन घेईल त्याला). ज्या प्रमाणे नद्या समुद्रांत जाऊन मिळाल्यावर समुद्र रुपच होतात. त्यांचे स्वतःचे वेगळेपण रहात नाहीं. ।।36।।
आत्मज्ञानं ही सम्प्राप्य ब्रह्मैवात्मा सनातनः।।
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भस्वामाम्।।37।।
अर्थ—— आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर हे सनात आत्मतत्वच ब्रह्मच होवून एकरुप होते. ह्या क्षणभंगू सुखहीन अश्या जीवनाला प्राप्त करुन त्या जीवाने माझे ईश्वराचे रुप प्राप्त होते. ।।37।।
अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यते मामबुध्दयः।।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्।।38।।
अर्थ——मला अर्थात ”परं” अखंडरुप अश्या परमतत्वाला जो आनन्दरुप आहे अश्या मला न जाणल्यामुळे अज्ञानी लोक अदृश्य असे समजून (जे व्यक्त आणि दुखःमय आहे, त्यालाच फक्त समजतात.)।।37।।
अव्यक्तोक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम्।।
यंप्राप्य न निवर्तन्ते तध्दाम परमं मम।।39।।
अर्थ—— अव्यक्त जे स्पष्ट रुपाने समजत नाहीं तसेच निराकार आणि निर्गुण आहे ते आणि जे अखण्ड अक्षर आहे असे स्वरुप म्हणजेच परम गति आहे. हे प्राप्त झाल्यावर जाणणारा पुनः जन्ममरणाच्या फेर्यांत अडकत नाही आणि त्या स्थानावरुन परत येत नाही, तेच धाम म्हणजे माझे धाम आहे. ।।39।।
आब्रह्मभूवनाल्लोकाः पुनरावर्तिनोर्जुन।।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते।।40।।
अर्थ—— ब्रह्मलोकापासून तो ह्या मर्त्यलोकापर्यंत सर्व लोकांतील प्राणी पुनर्जन्मप्राप्त करतात. परंतु माझ्या प्रत पोहचणारे जीव पुनर्जन्म घेत नाहींत. ।।40।।
ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि चन्ज्ञात्बामृतमश्नुतें।।
अनादिंमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते।।41।।
अर्थ—— जे जाणण्यास योग्य आहे ते मी तुला आता सांगतो, जे जाणल्यामुळे अमृत ग्रहण केले जाते, जे अनादि म्हणजे ज्याची सुरुवात. कधी केव्हा हे सांगता येत नाही, ते परब्रह्मरुप आहे. ते ”असत्” असे म्हटले जात नाहीं. ”सत्” म्हणजे चिरंतन अक्षर जे नव्हतेच ते आधी होते असे म्हणता येत नाहीं. म्हणून त्याला ”असत्” आधी नव्हते असे म्हटले जाते. ।।41।।
न तद्भासयते सुर्यो न शशाङको न पावकः।।
यद्गत्वा न निवर्तन्ते तध्दाम परमं मम ।।42।।
अर्थ—— त्या परम तत्वाला सूर्य प्रकाशित करीत नाहीं. चन्द्र आणि अग्निपण त्यास प्रकाशित करीत नाहीत. ज्या ठिकाणी पोहोचल्यावर वापस यावे लागत नाहीं (पुनर्जन्म नाहीं) ते माझे धाम आहे, असे समज. ।।42।।
तद्विध्दि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया।।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः।।43।।
अर्थ—— जे तत्वज्ञाी व महाबुध्दिमान मनीषी आहेत त्यांजपााी जाउन त्यास विनम्रतेने नमस्कार करुन, आणि शंका विचारुन (ब्रह्मज्ञान) प्राप्त करावे.
यच्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यासि पाण्डव।।
चैत्र भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मघि ।।44।।
अर्थ—— जे समजून घेतल्यावर मोहप्राप्ती होत नाही, तरी सर्व प्राणी तुला माझ्या अंतरात्म्यांत आता तुला दाखवितो।।44।।
ब्रह्मज्ञानादृतेनस्यान्मोक्षः कस्यापि कुत्रचित्।।
गृही वापि च वृध्दोपि मुक्तःस्याद्ब्रह्मवेदनात्।।45।।
अर्थ—— ब्रह्मज्ञानावाचून मोक्षप्राप्ती कधीही होत नाही. साधक तज्ञ आणि जरी वृध्द असता तरी गुरु उपदेशारहित राहिल्यास त्यास ब्रह्मज्ञान प्राप्ती होत नाहीं. ।।45।।
इति श्रीसमर्थरामदासासानुगृहित श्रीरामपदपंङ्कजभृङगायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे गुरुकृपया देहध्यासनाः नाम दशमं प्रकरणं सम्पूर्णम्।