Literature

चैत्र वद्य पंचमी

मनुष्यस्वभावास अनुसरूनच मनुष्याचें आचरण असावें व आचरणानुसार त्यास किर्ती वा अपकिर्ती प्राप्त होंते. सत्स्वभावी मनुष्यच सदाचारी असतो. सदाचारी असणारास सत्कीर्ती मिळून तो पुण्यशाली होतो. त्याचप्रमाणें दुष्टस्वभावी मनुष्य अपकिर्ती मिळवून हीनसत्व होतो. एकंदरित मनुष्याच्या उन्नति किंवा अवनतीस त्याची आचरणेंच कारणीभूत असतात. एखाद्या चांगल्या वेलीस सुवासिक फुले येऊन त्यामुळे सर्वांना ती आनंदित करते. त्याचप्रमाणें सदाचारी, सद्गुणी मनुष्य सर्वांकडून शाबासकी मिळवतो. सध्दर्मपरायण असणारे लोक इहलोकांत मान्यता मिळवून परलोकांत चिरसुखी होतात.

मित्रत्व व शत्रुत्व यासाठी ज्याची त्याची वागणूक कारणीभूत असते. दुष्कर्मी लोक दुस-यासाठी एकत्र आले तरीं त्यांचे मित्रत्व कामापुरतेंच असते. थोडेसे जरी बिनसले तरी ते एकमेकांचे शत्रु होतात आणि एवढ्यावरच न थांबता ते एकमेकांच्या विनाशाचीही इच्छा धरतात.

मानवदेहामध्ये उर्ध्वमुख असा उदान वायु आहे व ताे मानवास उर्ध्वगतीकडे नेण्याचा प्रयत्न करीत असताे. तसेंच शरीरस्थ अपान वायु मानवास अधाेगतीस नेण्याचा प्रयत्न करीत असताे असें आपल्या ऋषीमुनींनी सांगितले आहे.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img