Literature

चैत्र शुक्ल पंचमी

‘इदं पवित्रं पापघ्नं पुण्यं वेदैश्च सम्मितम् !
य:पठेद्रामचरितं सर्वपापै: प्रमुच्यते !!

‘ हे पवित्र, पापनाशक, पुण्यवान व केवळ वेदतुल्य रामायण जो श्रवण करतो तो सर्व पापापासून मुक्त होतो. अशाप्रकारे नारदांच्या तोंडून श्रीरामायणाची वेदतुल्यता प्रकट झाली आहे. वेदवेद्य पुराणपुरषोत्तम भगवान श्रीरामचंद्रांनी अवतार धारण केल्यावर त्यांचे वर्णन करणारा वेदही अवतरणारच. वेदवेद्य श्रीराम झाल्यानंतर श्रीरामायणच वेद झाला हे समीरकरण सहज सुटते.

‘ सर्व वेदेषु गायत्री ‘ सर्व वेदांत गायत्री मुख्य असल्यामुळे त्याच दृष्टीने वेदप्रामाण्याचया ह्या ग्रंथात गायत्रीची चोवीस अीरे असून श्लोकसंख्याहि चोवीस हजारच ठेविली आहे. गायत्रीच्या आद्य ‘त’ या अक्षरापासून ह्या ग्रंथाचा आरंभ झाला आहे ‘ तप:स्वाध्याय निरतं तपस्वी वाग्विदांवरम् ! ‘ हा श्रीरामायणाचा पहिला श्लाेक वाचतांनाच आढळून येतो. प्राचतेस म्हणजे वाल्मीकी ऋषी हे ब्रह्मदेवाचे अवतार मानिले जातात. ब्रह्मदेवाच्या तोंडून वेद बाहेर पडले, त्याप्रमाणे वाल्मीकींच्या तोंडून वेदतुल्य रामायण बाहेर पडले. अफाट वटवृक्षाच्या कवितारूपी विशाल फांदीवर बसून रामनामाचे मधुर मधुर शब्द कर्णरसायनात्मक सुस्वराने गाणा-या वाल्मीकी ऋषी रूपी दिव्य कोकिलेस माझा नमस्कार असो, हें श्रीरामरक्षेतील ‘ कुजन्तं रामरामेंति ‘ या श्लोकाने वाल्मीकी ऋषींना नमस्कार केल्याचे स्पष्ट होते.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी

home-last-sec-img