Literature

चैत्र शुद्ध नवमी

आज श्रीरामनवमीचा दिवस आहे हें आपणास माहित आहेच.

आज श्रीरामरायांचा जगाच्या उध्दार्थ झालेला दिव्य जन्म, त्यावेळीची ती आनंददायी आठवण तो आपणास प्रतिवर्षी करून देत असतो. अधर्म, अनीती, दृष्टप्रवृत्ती म्हणजे अधिक विषयसुखाचा पेटलेला वणवा व स्वेच्छाचार जगात माजला म्हणजे जगाचे हें दुःख घालविण्यासाठी आणि स्वतःच्या आनंदाचा अविर्भाव सर्वत्र करण्यासाठी परमात्मा अवतार घेत असतो. स्वेच्छारापासून, अनीतीपासून जे दुःख झाले तें नष्ट करून धर्माच्या नीतीच्या सदाचाराच्या स्थापनेसाठी तो आनंदरूप परमात्मा अविर्भूत होत असतो.

दशरथ म्हणजे साधक व कौसल्यारूपी बुद्धी ही त्यांची धर्मपत्नी. साधक जेव्हा श्रध्देने, भक्तीने वैराग्य अंगी
बाणवून आत्मसाक्षात्काराला सर्वतोपरी अनुकूल असें आचरू
लागतो तेव्हा त्याच्या बुद्धीरूपी कौसल्येत आनंदघनरूपाचा अविर्भाव होते. तोच आत्मसाक्षात्कार आणि तोच श्रीरामाचा अवतार. बुद्धीरूपी कौसल्येचा गर्भ म्हणजे मीपणाची स्मृति.
त्या स्मृतीत आत्मसाक्षात्कार व्हावयाचा आहे व त्या आत्मसाक्षात्कारानेंच आपली तृप्ती व्हावयाची आहे. हे मीपणाचे भान देहरूप नसून तें ज्या मंगलमय आनंदमहोदधींपासून निर्माण झाले, तो आनंदमहोदधीच ‘मी’ अशा ख-या आनंदाचा अनुभव येऊन आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला. तो आनंद अखंड स्थिरावून प्रगट झाला म्हणजे श्रीरामरायांचा अवतार झाला.
श्रीसमर्थांचाहि जन्म आजचाच, श्रीसमर्थ व श्रीराम यांच्यामध्ये भेद नाही हेंच आजच्या श्रीरामजन्मकाली सिद्ध होते.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

श्री प.प. सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी

home-last-sec-img