Literature

जेथें मुरालें मीपण

मी पाहणारा म्हणजे द्रष्टा आहे आणि उत्पन्न झालेले सर्व पाहिले जाणारें दृश्य माझ्याहून वेगळे आहे, असे ठरले म्हणजे त्यांचा अभिमान घेऊन असलेल्या पिंडाचा तसाच ब्रह्मांडाचा त्यांचा अभिमान घेऊन असलेल्या जागृतीतल्या विश्ववैश्वानरांचा, सूक्ष्म देहाचा तसाच महत्तत्त्वाचा– त्यांचा अभिमान घेऊन असलेल्या स्वप्नांतल्या तैजस हिरण्यगर्भाचा कारणदेहाचा तसाच अव्यक्ताचा – त्यांचा अभिमान घेऊन असलेल्या सुषुप्तीतल्या प्राज्ञ ईश्वरांचा, महाकारण देहाचा अ ब्रह्मास्मि रूप मूळमायेचा त्यांच्या या तुर्यावस्थेतल्या साक्षित्वा चाहि मी द्रष्टा आहे, हे ओघानेच प्राप्त होऊन, दृष्टा याचा अर्थ पुढे पाहणारा असा न उरता आनंदघन चिद्रूपाने या पिंडब्रह्मांडाच्या अवस्था, देह, अभिमान्यांचा प्रकाशिता असा होऊं लागतो. आत्मानात्मविवेकाची मजल अहं ब्रह्मास्मि रूप मूळमायेपर्यंतची आहे. यापैकी मी कोणीहि नव्हे, या विवेकाच्या वणव्यांत क्षुद्र देहाभिमान, हिडीस विषयवासना, भ्रामक स्त्रीपुरुषभावना गलिच्छ कामादि विकार, या रूपाचा हा सर्व पाचोळा कुठे जळून बेपत्ता झाला, याचा सुगावाहि लागणार नाही.

‘च्यारी देह निरसावे । साधकें देहातीत व्हावें । देहातीत होता जाणावें । अनन्य भक्त ॥‘ (दा. १०-१०-४७)        च्यारी पिंडी च्यारी ब्रह्मांडी।‘ (दा. ८-७-४१) अशा रीतीने, ‘ जे जे कांहीं देखिलें । तें तें जाणोनि सांडिलें | मूळमायेपरतें देखिलें। आपणासी ॥ मूळमाया चौथा देह जाला पाहिजे विदेह । देहा तीत होऊन राहे । धन्य तो साधु ।। (दा. १७-३-२०) आपुलिया स्वानुभवें । आपणास निवेदावें । आत्मनिवेदनः जाणावें । ऐसें असे ।। (दा. ८-८-८) आठवा देह मूळमाया निर्शोन गेल्या अष्टकाया ।। ।। (दा. १३-२-१९): चौदेहाचा अंत । आणि जन्म मुळाचा प्रांत । अंताप्रांतासी अलिप्त तो तूं आत्मा ॥ (दा. ना ८-८-४९) ‘अहं ब्रह्मास्मिरूप’ मूळमाया ही जन्म पावलेल्या कार्याचा ब्रह्मस्वरूपाकडे निघाले असता- शेवटचा प्रांत आहे. मूळ माया जाणीवेची मुळी सूक्ष्म कल्पनेची ॥ (दा. २०-२-१९) ब्रह्मस्वरूपाकडून निघाले असता मूळ प्रांत आहे. अहं ब्रह्मास्मि हे सूक्ष्म स्फुरण नष्ट झाल्यानंतर या अंताप्रांताशी नित्य असंग असणारे स्वतः सिद्ध आनंदघन असें जें तुझे चिद्रुप प्रकटते, तें आत्मरूपच तुझे सत्य रूप आहे, असा श्रीसमर्थ आम्हाला उपदेश करीत आहेत 

स्थूल सूक्ष्म वोलांडिले । कारण माहाकारण सांडिले । विराट हिरण्यगर्भ खंडिलें। विवेकानें ।। (दा. १३-१-२९) अव्याकृत मूळप्रकृती । तेथे जाऊन बैसली वृत्ती ते वृत्ति व्हावया निवृत्ति । निरूपण ऐका ||३०|| वस्तुतंत्र साक्षात्कार आहे. साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान अथवा दर्शन होणे; हे वस्तुतंत्र असतें. म्हणजे त्या वस्तूवरच अवलंबून असते. मेघाचे आवरण त गेले की सूर्य आपोआप जसा प्रकटतो, त्याप्रमाणे स्फूर्तीचे आवरण परी गेले म्हणजे आनंदघन ब्रह्मस्वरूप आपोआप प्रकटते. त्याकरितां कोणत्याहि प्रयत्नाची आवश्यकता नाहीं. वस्तु येक आपण ऐसी अस्ती वेगळिक । तरी अनुभवाचा विवेक। बोलों येता सुखे ।। (दा. ६-१०-३४) हें न बोलतांच विवरिजे। विवरोन वि राहिजे । मग अ बोलणेंचि साजे । माहापुरुषी ॥ (दा. ९-२-३) सिद्धांतवस्तु लक्षू जातां । सर्वसाक्षी ते अवस्था आत्मा तीहून पर्ता | अवस्थातीत ॥ (दा. ६-१०-१५) पदार्थज्ञान जेव्हां सरे द्रष्टा द्रष्टेपणें नुरे । ते समई उतरे। फुंज मीपणाचा ||१६|| जेथे मुरालें मीपण । तेचि अनुभवाची खूण अनुर्वाच्य समाधान कारणें बोलिजे ||१७।।

सा काष्ठा सा परागतिः ।

दासबोध दशक १२-६, १३-३, १७-८ ९ समास हे वाच म्हणजे पंचीकरण ध्यानांत येऊन पिंडब्रह्मांडांच्या त्या त्या चौदे- हांची ओळख पटेल, वरील विवेचन समजेल. श्रीसमर्थानी ब्रह्मांडी चौथा देह मूळमाया, पिंडी तुर्यावस्था असें वर्गीकरण केले आहे (अहं ब्रह्मास्मि अनुसंधानरूपाची) तुर्या प्रत्यक्ष द्वैत असे म्हटले आहे. अहं आणि ब्रह्म ही अनुसंधानाची दोन रूपें इथे दिसून येतात. आणि प्राप्यप्रापकतेची कल्पना इथे दडून असलेली स्पष्ट होते. पुन्हा चंचळ स्फुरणात्मक असा येथील अनुभव असल्यामुळे निश्चळ ब्रह्मरूप आनंदांत हा तद्भिन्नच वाटतो. तदाकारी ठाव वृत्तीस नाहीं’ म्हणून अहं ब्रह्मास्मि स्मरण वृत्त्यात्मक अथवा स्फुरणात्मक असें चंचळ असल्यामुळे निश्चळ ब्रह्मस्वरूप नव्हें हे सिद्ध होते. अनुभव द्वैतांत आणि कार्यात मोडतो, हे विचाराअंती कळून येते. यामुळे ‘अहं ब्रह्मास्मि’ या स्फुरणापासून द्वैताला अथवा कार्याला प्रारंभ झाला. ‘आत्मा निर्गुण निरंजन । तयासी असावें अनन्य । अनन्य म्हणिजे नाहीं अन्य । आपण । कैंचा तेथें ।। (दा. ४-९-१७) आपण म्हणिजे मीपण मीपण म्हणिजे जीवपण | म्हणिजे अज्ञान | संग जडला ।। (दा. ७-२-२०) सोडितां तया संगासी । ऐक्य होये निःसंगासी कल्पनेविण प्राप्तीसी । अधिकार ऐसा ॥ (दा. ७-२-२१) आत्मा म्हणजे तो अद्वैत । जेथें नाहीं द्वैताद्वैत तेथें मीपणाचा हेत । उरेल कैंचा ‘ ( दा. ४-९-१८) दुसरे काही जेव्हा दिसते तेव्हा त्याहून वेगळा मी असें मीपणाचे भान होते. स्फूर्तिशून्य स्वप्रकाश आनंदघन आपणच एक मी शिल्लक राहिल्यानंतर भिन्न भानानें उत्पन्न होणारें मीपण तिथें अर्थात् उत्पन्नच होत नाही हे स्पष्ट आहे.

ब्रह्म वा इदमग्र आसीत्तदात्मानमेवावेदहं ब्रह्मास्मिति ततः सर्वमभवत्‘ (बृ. उ. अ. १-४-१०) यापूर्वी एकच एक निर्विकल्प आनंदघन परब्रह्म होते. त्यानेंच स्वतःला ‘अहं ब्रह्मास्मि-मी ब्रह्म आहे’ असे जाणले आणि तेथूनच मग हे सर्व काही झालें, असें श्रुतीचे सांगणे आहे, ‘निर्विकल्पी जें स्फुरण । तेंचि मायेचें लक्षण ।’ असे श्रीसमर्थ म्हणतात. अहं अथवा अहं ब्रह्म स्फुरलें तेचि माया । असे सांगून येथून सृष्टीची उभारणी केली आणि अनात्मरूप हा चौथा देह आहे याचेंहि निराकरण करावें म्हणून उपदेशिलें तेंठीकच आहे. लयाचा अभ्यास सांगतांना, विलाप्य सिकृतिं कृत्स्नां संभवव्यत्ययक्रमात् । परिशिष्टं च चिन्मात्रं चिदानन्दं विचिन्तय ॥’ (मु. उ. ९-५०) असे मुक्तिकोपनिषदांत सांगितले आहे. जें जें जेथून निर्माण झालें । तें तें तेथेंचि निमालें । सर्व निमतां उरलें । तें परब्रह्म । (दा. १२-६-१९) निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा। सकळा पर जो परमात्मा । चैतन्य साक्षी ज्ञानात्मा । षड्गुणैश्वरु ।। (दा. १७-१-१) सकळ जगाचा ईश्वरु। म्हणोन नामे जगदेश्वरु । तयापासून विस्तारु । विस्तारला ॥‘ (दा १७-१-२)सच्छब्दवाच्यमविद्याशबलं ब्रह्म । ब्रह्मणोऽव्यक्तम् । अव्यक्तान्महत। महतोऽहंकारः । अहंकारात्पञ्चतन्मात्राणि । पञ्चत न्मात्रेभ्यः पञ्चमहाभूतानि । पञ्चमहाभूतेभ्योऽखिलं जगत् ॥ (त्रिशिखि बा. उ. १) सृष्टिक्रम पैडग्लोपनिषदांत चांगला दिला आहे तो पहावा. तंत्तिरीयोपनिषदाच्या ब्रह्मवल्लीत पंचमहाभूतांच्या उत्पत्तीचा क्रम असा आहे. (अनु. १): आकाशाद्वायु: । वायोरग्निः । अग्नेरापः। अद्भ्यः पृथिवी । पृथिव्या ओषधयः । ओषधिभ्योऽन्नम् विल अन्नात्पुरुषः । स वा एष पुरुषोऽन्नरसमयः । ( अन्नाद्रेतः रेतस: पुरुषः । ) अहं ब्रह्मास्मि स्फुरण, अव्यक्त, महत्तत्व, अहंकार विराट्, पंचतन्मात्रा (सूक्ष्म पंचहाभूतें), पंच स्थूल भूतें, अखिललम जगत्, या जगदुत्पत्तिक्रमाच्या उलट, तें तें कार्य त्याच्या त्याच्या कारणांत लीन करीत अहं ब्रह्मास्मि स्फुरणापर्यंत जाऊन निःस्फूर्तिक परब्रह्मांत हे विलीन करून, मग स्वप्रकाश, स्वसंवेद्य, नित्य निर्विकल्प, चिन्मात्र आनंदच एक उरव आणि यानंतर कसलाहि विचार करूं नको;  तेंच तूं म्हणून उपनिषत् सांगते. पंचीकृत स्थूलदेह स्थूल पंचभूतांत, स्थूल पंचभूतें सूक्ष्म पंचभूतांत, अपंचीकृत सूक्ष्म देह या सूक्ष्म पंचभूतांत हीं पंचभूतें, पृथ्वीचे मूळ जीवन । जीवनाचें मूळ अग्न । अग्नीचें मूळ पवन ।‘ (दा १६-७-१) आणि पवनाचें नभ, अशा क्रमानें पृथ्वीतन्मात्र जल तन्मात्रांत, जलतन्मात्र अग्नितन्मात्रांत, अग्नितन्मात्र वायुतन्मात्रांत, वायुतन्मात्र आकाशतन्मात्रांत, आकाशतन्मात्र अहंकार अथवा  विराट् यांत, विराट् महत्तत्त्वांत, महतत्त्व अव्यक्तात, अव्यक्त मूळमायेत, मूळमायारूप अहं ब्रह्मास्मि हे स्फुरण आवरणशून्य आनंदघन परब्रह्मांत लीन करून, आनंदच एक शिल्लक उरवून स्वस्थ निर्विकल्प रहावें. पृथिव्यप्सु प्रलीयत (ते) आपो ज्योतिषि प्रलीयते ज्योतिर्वायौ विलीयते वायुकाराश (शे) आकाशमिन्द्रियेष्विन्द्रियाणि तन्मात्रेषु तन्मात्राणि भूतादौ विलीयन्ते भूतादिर्महति विलियते महानव्यक्ते विलियतेऽव्यक्तमक्षरे विलीयतेऽक्षरं तमसि विलीयते तमः परे देव (वे) एकी भवति परस्तान्न सन्नानन्त्र सदसत् ॥ इथें सांगितलेल्या लयक्रमात विराट् यालाच भूतादौ म्हटले आणि पुढे अव्यक्त अक्षररूपी मूळमायेत विलीन होते असे सांगून निःस्फूर्तिक, निश्चल, निर्विकल्प, एक आनंदघन परमात्म्याच्या ठिकाणी अहं ब्रह्मास्मिरूप मूळमायेचे – चंचल स्फुरण झालें कसें ? कारण झाले म्हणणे म्हणजे तेंच एक तमोरूप अज्ञान आहे. तेव्हां अहं ब्रह्मास्मि स्फुरणहि पुढे तमांत विलीन होते व अहं ब्रह्मास्मिस्फुरणाच्या लयानंतर त्याचे कारण असणारे तमोरूप मूलाज्ञानहि त्या स्वयंप्रकाश परब्रह्मांत शेवटीं विलीन होते, असे सांगितले आहे.

इतर ठिकाणी अव्यक्तापर्यंतच अनात्मरूपाची मर्यादा सांगितली आहे. अव्यक्तयर्यन्तमिदं ह्यनात्मा असे श्रीशंकरा चार्यानी विवेकचूडामणीच्या १२४ व्या श्लोकांत सांगितले आहे. एकात्म प्रत्ययसारं प्रयञ्चोपशमं शान्तं शिवमद्वैतं चतुर्थं मन्यन्ते स आत्मा स विज्ञेयः । (माण्डूक्य उ. ७) माण्डूक्योपनिषदांत तीनच देह सांगून चौथा देह नसून शुद्ध बुद्ध आत्माच आहे, असे सांगितलेले आढळून येतें. कठोपनिषदांतल्या लयक्रमांत देखील,

अव्मक्तात्पुरुषः परः । पुरुषान्न परं किञ्चत्सा काष्ठा सा परागतिः ।(कठ. उ. १-३-११) असेच सांगितले आहे. इतर ठिकाणच्या लयक्रमांतदेखील अव्यक्तापर्यंतचाच लयक्रम दिसून येतो. श्रीसमर्थांनी आणि वरच्या मंत्रांनी पुन्हा सूक्ष्म भेद पाडून साधकाच्या अभ्यासाला सुकर व्हावे म्हणून जे सांगितले तेहि योग्यच झाले. शंका कोणालाहि राहाणार नाही.

home-last-sec-img