Literature

तपाचे महत्त्व

ऋतं तपः सत्यं तपः श्रुतं तपः शान्तं तपो दमस्तपः । 

शमस्तपो दानं तपो यज्ञं तपो भूर्भुवस्सुर्ब्रह्मैतदुपास्यैतत्तपः ॥ (म. ना. उ. १-१०)

– पारमार्थिक सत्य बोलणें म्हणजे ब्रह्मनिरूपण करणे. व्यावहारिक सत्य बोलणें म्हणजे जसेच्या तसें सांगणें. श्रीगुरुमुखानें श्रवण करणें, कोणत्याहि प्रसंगी शांत राहणें, बाह्य देहेंद्रियांचा निग्रह करणें, अंतर्मनो बुद्धयादिकांचा निग्रह करणें, सत्पात्री यथाशक्ति दान देणें, होमहवनादि करणें ( देवपूजा करणें, लोकांत ऐक्य निर्माण करणें ), सच्चिदानंदात्मक ब्रह्मस्वरूपाची उपासना चालविणें, हें सर्वहि तपच होय.

विद्याभ्यास, गुरुशुश्रूषा व ब्रह्मचर्य हें ब्रह्मचर्याश्रमाचें तप ; दान, दया, विध्युक्त कर्म, उपासना, पातिव्रत्य व एकपत्नीव्रत हें गृहस्थाश्रमीयांचें तपः देहदंडनपूर्वक कर्म-उपासना चालवून मुक्त होण्याकरितां ज्ञानविचार करणें हें वानप्रस्यांचे तप; व सर्वत्यागपुरःसर केवल ब्रह्मानुसंधानपर असणें हें संन्याश्यांचे तप होय.

ब्राह्मणस्य तपो ज्ञानं तपः क्षत्रस्य रक्षणं । 

वैश्यस्य तु तपो वार्ता तपः शूद्रस्य सेवनम् ॥ ३३५ ॥ 

यद्दुस्तरं यद्दुरापं यद्दुर्गे यच्च दुष्करम् ।

ऋषयः संयतात्मानः फलमूलानिलाशनाः । 

तपसैव प्रपश्यन्ति त्रैलोक्यं सचराचरम् ॥ ३३६ ॥

औषधान्यगदो विद्या दैवी च विविधा स्थितिः । 

तपसैव प्रसिध्यन्ति तपस्तेषां हि साधनम् ॥ ३३७ ॥

यद्दुस्तरं यद्दुरापं यद्दुर्गे यच्च दुष्करम् ।

सर्वे तत्तपसा साध्यं तपो हि दुरतिक्रमम् ॥ ३३८ ॥ ( मनुधर्म अ. ११)

-ज्ञानच ब्राह्मणांचे तप, प्रजारक्षणच क्षत्रियांचे तप, धनार्जनच वैश्यांचें तप व सेवाच शूद्रांचे तप. फलमूलवायुभक्षणशील, मनोजयी, जितेंद्रिय ऋषि तपोबलानें वसल्या ठिकाणींच, सहज साया त्रैलोक्याच्या प्राणि मात्रांना एकदम पाहात असत. सामान्य औषधी, दिव्यौषधि, आरोग्यसाधन, सर्व विद्या, सर्ववेदशास्त्रप्राविण्य, सकलदिव्यसिद्धि, लोकांतरगमन इत्यादि सर्वहि तपानेंच ते संपादन करीत असत. तपच एक त्यांचे सर्वसाधन असे. कष्टानें उल्लंघनीय ठरणारा संसारसमुद्र, कष्टानेंच प्राप्त होणारें ब्रह्मपद, कष्टानें पूर्ण केली जाणारी संसारयात्रा करण्यास अतिकठीण जाणारें मोक्षसाधन हें व असे सर्व एक तपानेंच सुसाध्य होतें. तपःशक्ति ही अत्यंत दुर्दम्य आहे. तपसा चीयते ब्रह्म । ( मुंडक १-८) तपोबलानेंच परमेश्वरानें सृष्टि उत्पन्न फेली. सत्येन लभ्यस्तपसा होष आत्मा सम्यग्ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् ॥ ( मुंडक ३-१ – ५ ) सत्यानें, तपानें, अपरोक्षज्ञानानें व ब्रह्मचर्यानें आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो. ब्रह्मनिरूपण आणि सत्य भाषण, शरीराच्या व मनाच्या शुद्ध्यर्थ केलेलें कृच्छ्रचांद्रायणादिकांचें शारीरिक तप, इतर व्रतनियमांचे पालन, ईश व सद्गुरु यांची सेवा, सत्संग व आत्मविचार, आवरणविक्षेपरहित सदाच चिन्मात्र असणारें केवळ आनंदघन स्वरूपच मी असा निश्चय करून कल्पनाशंका राहत असणे, त्या त्या आश्रम धर्माप्रमाणे उत्कट ब्रह्मचर्य पाळणें, इत्यादिकांच्या अबिरत साधनानें अचूक आत्मसाक्षात्कार होतो.

तैत्तिरीय भृगुवल्लीत “ तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व ” ” तपो ब्रह्मेति ” ‘ तपानें ब्रह्म जाण’, असे सांगितले आहे. तपानेंच ब्रह्म समजून येत असल्यामुळे औपचारिकरील्या तपच ब्रह्म म्हणून येथे म्हटलें आहे. ब्रह्मस्वरूप समजून घेण्यास आवश्यक अशा तात्त्विक तपाचें लक्षणहि इथे सांगितलें आहे. यतो वा इमानि भूतानि जायन्ते । येन जातानि जीवन्ति । यत्प्रयन्त्यभिसंविशन्ति । तद्विजिज्ञासस्व । तद्ब्रह्मेति ॥ जेथून या चराचराची उत्पत्ति होते, ज्याच्यामुळे हे चराचर विश्व जगते व अंत्यसमयीं जिथे जाऊन विलीन होतें, जें या चराचराच्या उत्पत्तिस्थितिलयकाळींहि एकरूप असतें, समुद्रतरंगाप्रमाणे आपल्या उत्पत्तिस्थितिलयकालींहि हें चराचर विश्व, हे सर्व प्राणीपदार्थ ज्याला सोडून राहात नाहीत, असे तें काय व कोणतें याचा छडा लाव. तेंच ब्रह्म आहे. असें वरुणाने आपल्या भृगु नांवाच्या पुत्राला इथे सांगितलें आहे. या ठिकाणी ब्रह्मप्राप्तिकर साधनाचा उल्लेख आहे. ब्रह्मप्रापक तप कोणतें तें या ठिकाणी उघड करून सांगितलें आहे. मृगु एकान्तांत उक्त लक्षणाची ती वस्तु कोणती म्हणून विचार करूं लागला. अन्न, प्राण, मन व विज्ञान अशा क्रमानें त्यानें विचार केला. उक्त लक्षणांचें साम्य त्याला यांतून प्रथम प्रथम भासलें पण पित्याकडे जाऊन त्याचें क्रमाक्रमानें निवेदन केल्यानंतर पुन्हां अधिक खोल विचार करून ‘तें जाण’ म्हणून एकच एक उत्तर प्रत्येक वेळां मिळाल्यामुळे पुनः पुन्हां त्यावर विचार करून ‘ हे नव्हे ‘, ‘ हें नव्हे’, अशा निर्णयाला येऊन शेवटीं, उक्त लक्षणांनी युक्त असणारा एक आनंदच आहे व तें ब्रह्म केवल आनंदरूपच आहे, असें त्यानें निश्चयानें जाणलें. ही आख्यायिका या उपनिषदांतून आली आहे. तपःप्रभावाद्देवप्रसादास्य ब्रह्म ह श्वेताश्वेतरोऽथ विद्वान् ॥ (श्वेताश्वे० ६।२१) — अचूक तपाच्या योगानें व देवाच्या प्रभावी अनुग्रहानें, श्वेताश्वेतर ऋषीनें तें ब्रह्म जाणलें. असा या मंत्राचा अर्थ आहे. ब्रह्मज्ञानाला ईश्वर कृपेचीहि जोड लागते, हें या उपनिषद्प्रमाणावरून स्पष्ट होतें.

जाबालि ऋषिवर्या ! तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तरें देण्याचा हा जो मी उपक्रम चालविला आहे, तो सकल क्लृप्त असणाऱ्या तुम्हांकरितां नव्हे. बनेल त्या मार्गानें कसेंहि करून मला अयोध्येच्या सिंहासनावर बसवावें व मी आनंदपूर्वक न्यायानें चालविलेला राज्यकारभार डोळे भरून पाहून आनंदावें, ही तुमची इच्छा व त्याकरितां हा तुमचा उलटा सुलटा प्रयत्न चाललेला आहे हे मी जाणतों. पण तुम्ही केलेल्या नास्तिकवादाचा दुष्परिणाम लोकांच्या कोवळ्या मनावर होऊं नये म्हणून तुम्ही प्रतिपादिलेल्या एकेका विषयाचें निराकरण मी करीत, आहे. आतांपर्यंत सत्याचे पालन, सदाचार, मातापिताआचार्यादि गुरु जनांवरचा विश्वास, त्यांच्या आज्ञेचे पालन, पितृयज्ञ, देवयज्ञ “ देहो म्रियते न जीव इति ” हें तत्त्व म्हणजे जीवाचें अनश्वरत्व व देहाचे नश्वरत्व, श्राद्ध, तप, आदि विषयांवर श्रुतियुक्तांनी थोडक्यांत विचार केला. आतां अन्नदान व त्याग यांवर जो तुम्ही आक्षेप घेतला आहे त्याच्यावर थोडा विचार करूं.

home-last-sec-img