यदचिंत्यन्तु तदैवं भूतेष्वपि न हन्यते ।
व्यक्तं मयि च तस्यां च पतितो हि विपर्ययः ॥ २० ॥ कंश्च दैवेन सौमित्रे योध्दुमुत्सद्दते पुमान् ।
यस्य न ग्रहणं किंचित्कर्मणान्येन दृश्यते ॥ २१ ॥ सुखदुःखे भयोक्रोधौ लाभालाभौ भयाभयौ ।
यस्य किंचित्तथाभूतं ननु दैवस्य कर्म तत् ॥ २२ ॥ असंकल्पितमेवेह यदकस्मात्प्रवर्तते ।
निवर्त्यारब्धमारंभैननु दैवस्य कर्म तत् ।। २४ ।।
( वा. रा. अ. स. २२)
-पाहा ! विचार कर ! पूर्वापार कोणतीहि सूचना नसतां एकदमच प्राप्त होणाऱ्या विषम परिस्थितीचे कारण जेव्हां सांगता येत नाही तेव्हां त्याला दैव म्हणण्याची पद्धत आहे. आर्चित्य रचनात्मक असलेलेच दैव म्हणवून घेते. दैवी संकल्प, दैव, ईश्वरेच्छा, पूर्वकर्म, भवितव्यता, प्रारब्ध, योग इत्यादि सर्व शब्द एकार्थीच आहेत. दैव आणि दैवाचा प्रभावहि पण कसलीहि पूर्व कल्पना नसतां एकदम आपल्या घाल्यानेच प्रगट होत असल्यामुळे त्याच्या प्रतिकाराला वेळ मिळत नाही व त्याचे उल्लंघनहि कोणास करवत नाहीं. सर्वांच्या जीवनांत बेसावध स्थितीत अचानक घाला घाढन पराभूत केल्यानंतरच दृष्टोत्पत्तीस येणाऱ्या या मायावी दैवावरोवर कोण झगडूं शकेल? कैकेयीचे वात्सल्य एकाएकी जशा रीतीने नष्ट होऊन पट्टाभिषेकाला मी आंचविण्यास हेच कारण असून दुसरे कोणतेही नाही. अगोदर गुरु असून करावयाचे ते सर्वहि करूनच अगट होणान्या या दैवाविषयी अगोदर जागृत तरी कसें रहते! याचे निवारण तरी कसे करावें! सर्वांनीहि याच्यापुडे हात टेकले आहेत. अनपेक्षित रीतीने येणाऱ्या दुःखशोकादिकांना भयत्रोधादिकांना हानिलाभादिकांना हे दैवच कारण होते. कृतसंकल्पाचा व कृतकार्याचा नाश करूनच त् पुढे येऊन टाकते तेच दैव अथवा भवितव्य समज असंकलितपणे त्याची प्राप्ति एकदम होते असल्यामुळे ते टाळणे कोणासहि शक्य होत नाही. याला माझेच एक उदाहरण. आपलेच उदाहरण पुढे ठेऊन या ठिकाणी श्रीरामाने दुर्दस्य दैवी विलासाचे एक कठोर चित्र रेखाटले आहे. अचानक बिकट परिस्थितींत सांपडून रगडल्या गेलेल्या मानवी विचाराचे हे एक प्रदर्शनच आहे.