Literature

देवतांची प्रार्थना

सप्तपदीनंतर ब्राह्मण मंगलसूक्त म्हणतात. बंधुवांधव आहेर करतात. सौभाग्यादिप्राप्त्यर्थं महालक्ष्मीशचीगौरीपूजां करिष्ये ॥ सप्तपदीनंतर सौभाग्यादि वृद्धीकरितां महालक्ष्मी, शची, गौरी इत्यादिकांची पूजा करण्याचा विधि आहे. यांतून पातिव्रत्यप्रेम उमटून दिसतें. ‘वैवाहं भाग्यमारोग्यं पुत्र लाभं च देहि मे।’ वैवाहिक भाग्य, आरोग्य व पुत्रलाभ तुझ्या कृपेने मला होऊं दे, अशी प्रार्थना या मंत्रांतून आहे.

त्यानंतर लाजाहोम. सप्तपदी-लाजाहोमकाली म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांनी पतिपत्नींच्या सामरस्याच्या तात्त्विक भावना उद्दीपित होतात. वराने वधूच्या हृदयाला स्पर्श करून म्हणावयाचे हे मंत्र पाहा. मम हृदये हृदयं अस्तु । मम चित्ते चित्तमस्तु ते । मम वाचमेकमेकमनाः श्रुणुमामेवा नुव्रता सहचर्या मया भव इति || ‘ माझ्या हृदयाशी तुझ्या हृदयाचे ऐक्य होवो. माझ्या चित्ताशीं तुझें चित्त) समरसून जावो. माझी आज्ञा एकमनानें पालन करणारी हो. मला अनुव्रत होऊन राहा. माझी सहचारिणी हो. माझ्या साहचर्यांत राहा. असा याचा भावार्थ. यावरून आर्य संस्कृतीचा दांपत्य जीवन क्रम चांगला लक्षांत येईल.

त्यानंतर वधूच्या कानांत वरानें उच्चारण्याचे मंत्र : मां ते मनः प्रविशतु । मां चक्षुर्माम ते भगः । मयि सर्वाणि भूतानि । मयि प्रज्ञानमस्तु ते ।’ तुझें मन माझ्या मनांत प्रवेश करो. ‘तुझे नेत्र माझ्या ठिकाणींन स्थिर होवोत. तुझ्या मनाला व इंद्रियांना मीच एक लक्ष्य असले पाहिजे. तुला प्राप्त होणारे भाग्य, संपत्ति, तप, यश, कामादि प्रवृत्ति, मोक्षसाधन यांचा माझ्या ठिकाणीच अंतर्भाव होवो. तुझ्या देहांत असणारी सर्व पंचभूतें आणि पांच भौतिक देहांत असणारी मीपणाची स्मृति माझ्य समरसून राहो. प्रकृतिपुरुषाच्या दृष्टीनें पतिपत्नींचे ऐक्य प्रगट करून आर्य संस्कृतींची श्रेष्ठता व मूलग्राहित्व हे मंत्र सिद्ध करीत आहेत. यांत शक्ति-शक्ति मंतांचे अभेददर्शन होतें. प्रकृति अथवा पुरुषांचें शक्ति-शक्तिमंताचें म्हणजेच मूळचे ब्रह्मैक्य. हेंच स्थूळदृष्टीनें वधूवरांच्या लग्नांत दिसून येतें व सूक्ष्म दृष्टीने योग्यांत दिसून येतें.

—धू सप्तपदीनंतर परमात्मरूपी वरास देहादिकांचे समर्पण करून प्रवृत्तिरूपानें आत्मनिवेदन करते. त्या निवांत असणाऱ्या स्वरूपभूत परमात्म्यांत प्रकृतिरूप वधू विलीन होते. हा तत्त्वविचार आहे. ही प्रवृत्तिपर स्त्रीपुरुषांतली दृष्टि अशी. याप्रमाणेच योगदृष्टीनें कुंडलिनी ही प्रकृति, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूरक, अनाहत, आज्ञा, ब्रह्मरंध्र या सप्तचत्रांतून पुढे शिशुमार चक्रांतल्या ब्रह्मी (पुरुषस्वरूपी) लीन होते. अष्टप्रकृतिरूपा सा कुंडली मुनिसत्तम । (जाबालि (दर्शन) प्रकृत्यष्टकरूपा च स्थानं गच्छति कुंडली । क्रोडीकृत्य शिवं याति क्रोडीकृत्य विलीयते ॥ (योगकुंडलिनी ३।७४) इत्यादि वाक्यांनी कुंडलिनी प्रकृतिरूप कशी ती लक्षांत येते. हिलाच महाशक्ति असेंहि म्हटले आहे. ज्ञानयोगाच्या दृष्टीनें जीव ही प्रकृतिसुखेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्त्वापत्ति, असंसक्ति, पदार्यभाबना, तुर्यगा या सप्तभूमिका ओलांडून प्रकृतिरूप जीव परमात्मरूपांत विलीन होतो.

home-last-sec-img