Literature

द्वैताद्वैतविवेक

‘सांगितलें जें ऋषि’ यांत केवढा अर्थ भरला आहे पाहा. ते अंतरीं एकात्मतेचें सुख अनुभवीत, बाह्य वर्णाश्रमोक्त कर्मे रागद्वेषरहित होऊन यथोक्त आचरीत असत. सर्व व्यवहार भेदयुक्तच असतो. नहि कश्रित्क्षणमपि जातु तिष्ठत्य

कर्मकृत् । हा भेदव्यवहार सोडून देह असेपर्यंत एक क्षणभरहि राहाणे शक्य नाही. त्या त्या प्रसंगी आपआपल्या परीनें वागावेंच लागते. त्यामुळे भावाद्वैतं सदा कुर्यात क्रियाद्वैतं न कर्हिचित् ॥ अद्वैत धारणेत ठेवून या’ सूत्रे मणिगणा इव’ द्वैत-प्रपंचांत वागावयाला पाहिजे. क्रियाद्वैताने जगाचा निर्वाहच होऊं शकत नाही. म्हणून क्रियाद्वैत म्हणजे सबगोलंकार कोणी करूच नये, असे श्रीशंकराचार्यांनी सांगितलेले आपण पूर्वीच बघितलें आहे. ” एकंकार गोलंकर करूच नये” असा श्रीसमर्थाचाहि उपदेश आहे. द्वैताचा आरंभ वृत्तीपासूनच होतो. तो इंद्रियांमध्येच असतो. प्रथम मनाच्याच व्यापारांत तो दिसून येतो. प्रपंचदर्शक मनइंद्रियांच द्वैत उत्पन्न होऊन सर्व जगभर पसरले व त्यांत अद्वितीय आत्मस्वरूपाची अंतर्वृत्ति झाली. एका समाधीत मात्र केवल चैतन्य असते. एकत्वाचा अनुभव येतो. जीवनक्रमाच्या प्रदेशांत का एकदां प्रवेश झाला की फूल उमजून सुवास बाहेर टाकल्याप्रमाणे हा द्वैत-प्रपंच अद्वैताचे तत्व बाहेरं टाकीत आपोआप विकास पात्रतो. दृश्यभेद व दृष्टिभेद व्यवहाराचे जीवन आहे. व्यावहारिक कार्यक्षेत्रांत तो नाहीसा होत नाही व करणेहि शक्य नाही. भेद आणि विविधता या संकल्पाने उत्पन्न झालेले जग मैदाने व विविधतेनेंच दिसून येते. भेदच विविधतेचा व्यवहार चालवितो. एका उद्यानांतल्या अनेक फुलांच्या जातींप्रमाणे जगांत, मनुष्यांतहि अनेक जाती आहेत. फूल आपली जात कळवून त्याच्या त्या तेवढ्या सुगंधाने दरवळत असल्याप्रमाणे आपापले स्वजातीय कर्तव्य करीत ईशसृष्टचिं सौंदर्य वाढविण्यास काय हरकत आहे ! या विविधता रूपाच्या जगाला प्रकाशविणारें आत्मरूप मात्र प्रतिप्राणि पदार्थादन अद्वितीय आहे. द्वैताद्वैतरूप आत्मजगतांचा प्रीतिसंगम या जगांत झाला आहे. निसर्गच असा असतांना तदनुरूपच क्रिया आंखून या कोंडीतूनकायमचेच बाहेर पडले पाहिजे. वर्णाश्रमोक्त कर्मे आत्मनिश्चयाच्या तृती यथायोग्य बाहेर होत असली पाहिजेत. विवेकविचारशील जनक आपल्या मुलांच्या संगोपनाकरितां व शिक्षणाकरितां त्यांच्याशी भेदबुद्धीनें वागत नाहींत का ! त्याचप्रमाणे जगज्जनक परमात्मस्वरूपहि, स्वतःपासून झालेल्या जगाशी त्याच्या संगोपनार्य व शिक्षणार्थ भेदव्यवहार ठेवते. त्याच्या अंतरंगांत मात्र नेहमीच अविच्छिन एकच स्वभावतःच दृढ असतें. जगांत सर्व असेच चालावयाला पाहिजे की नाही? एकाच देहांत किती अवयवमेद आहेत ! त्या अवयवांचे स्वरूप व कार्ये भिन्न भिन्न आहेत. त्या भिन्न भिन्न अवयवांनी व त्यांच्या भिन्न भिन्न कार्यानींच देहाचा निर्वाह होतो. मस्तक हे उत्तमांग म्हणून मानले जाते. ते सर्वांच्या वर असतें. पाय सर्वांच्या खाली असतात. मांड्या आणि बाहु पायांच्या ऊर्ध्वभाग असतात. यांतहि मांड्यांच्या भागी बाहू असतात. हे सर्व अवयव मिळून जसा सर्व देह एकच असतो, त्याचप्रमाणे जात्यान्वये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे भेद उच्चनीच भावनांनी युक्त असले तरी परमात्म्याचा हा विराट देह एकच म्हणून श्रुति सांगत आहे. अंतस्थ आत्मस्वरूप अद्वितीय आहे, म्हणून श्रुति उपदेश करीत आहे. अवयवांची उपमा देऊन देहाचे अवयव निराळे करणे, त्यांचे स्थलांतर करणें जसें शक्य नाहीं त्याचप्रमाणें विराट देहावयवीभूत वर्णव्यवस्था निराळी करणे व तिचें स्थळांतर करणे म्हणजे ब्राह्मणांना शुद्र अथवा शुद्धांना ब्राह्मण बनविणें इत्यादि हिताच्या दृष्टीनें केव्हांहि इष्ट वा शक्यहि नाही. म्हणून एक अनिवार्य व्यवहार श्रुति दाखवीत आहे; व त्यांतील गंभीर एकात्मक विज्ञानाचा चौध करीत आहे. मस्तक वर आहे म्हणून त्याच्या नाशाकरितां बाकीचे बाहु, मांड्या, पाय हे अवयव उद्युक्त झाल्यास बाकींच्या या अवयवांची जशी स्थिती होईल तशीच ब्राह्मण जात नष्ट करण्यास उद्युक्त झालेल्या क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चणचीहि पण होईल, हें यांतून ध्वनित होतें.

home-last-sec-img