Literature

ध्यान

गुरुपरंपरा—
आदिनारायणं विष्णुं ब्रह्माहं च वसिष्ठकम्‌
श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्‌।।1।।
आदिनारायण, विष्णु पासुन प्रारंभ होऊन ब्रम्हा, वसिष्ठ, श्रीराम, श्री मारुती, समर्थ रामदासानंतर श्रीधर स्वामीस मी वंदन करतो.

श्रीश्रीधर—
नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरुपिणे।
स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः ।।2।।
ज्यांचे स्वरुप नित्य शांत, दिव्य व सत्यधर्माचे मूर्तरुप असून जे नित्य स्वानंदात तृप्त राहणारे भगवान श्रीधर स्वामीस मी वारंवार नमन करतो.

श्रीगणेश—
यं नत्वा मुनयः सर्वे निर्विघ्नं यांति तत्पदं।
गणेशोपनिषद्वेद्यं तद्‌ब्रह्मैवास्मि सर्वगम्‌ ।।3।।
गणेश उपनिषदांत जे जाणण्यास योग्य आहे, ते ब्रम्हस्वरुप चैतन्य तत्व सर्व प्राणीमात्रांत असून त्यास मुनीजनांनी ध्यान करुन निर्विघ्नपणें प्राप्त केले आहे.

श्री सरस्वती—
सच्चिदानन्दरुपिण्यै भक्तकारुण्यसिंधवे।
भवसागरतारिण्यै सरस्वत्यै नमो नमः ।।4।।
सत्‌, चित्‌ आनंद स्वरुपीणी भक्तांसाठी करुणासागरच असणारी व भवसागर पार करुन देणारी अश्या सरस्वतीदेवीला माझा त्रिवार नमस्कार.

श्रीशिव—
नमः शिवाय गुरवे सच्चिदानन्दमूर्तये।
निष्प्रपंचाय शांताय निरालंबाय तेजसे।।5।।
गुरुरुपांत श्री शंकरास नमन, जे सच्चिदानंदाची मूर्तीच आहे ज्यांस प्रपंचाचा लेप नाही, शांत स्वरुपी व ज्यांचे तेज कोणावर आश्रित नसून स्वयंच तेजपूर्ण आहे.

श्री भवानी—
चिदानन्दमयीं दिव्यां आदिमध्यान्तवर्जिताम्‌।
आत्मरुपां परां शांतां भवानीं नौमि संततम्‌।।6।।
जी स्वयं प्रकाशाने दैदिप्यमान असून तिला न आदि, मध्य व अंत आहे अशी अक्षय आनंदरुपी भवानी, जी आत्मरुपी परम शांति स्वरुपांत विराजमान आहे तिला मीं नमन करतो.

श्री सूर्य—
सूर्याद्गवन्ति भूतानि सूर्येण पालितानि तु।
सूर्ये लयं प्राप्नुवन्ति यः सूर्यः सोऽहमेव च ।।7।।
सूर्यापासून सर्व भूतांचा उद्‌भव होतो, तोच सर्वांचे पालन करतो व त्यांच्या मुळेच सर्व लय ही पावतात असा जो स्वयंप्रकाशी सूर्य तो मीच आहे.

श्री दत्तात्रेय—
दत्तात्रेयं शिवं शान्तं सच्चिदानन्दमद्वयम्‌।
आत्मरुप परं दिव्यमवधूतमुपास्महे ।।8।।
पवित्र, शांत, सत्‌चित्‌ आनंद, एकमेवा द्वितीय दत्तात्रेय जे आत्मरुप अत्यंत तेजस्वी, अवधूत आहे त्यांची मी उपासना करतो.

श्रीनृसिंह—
सच्चित्सुखस्वरुपाय जगत्कल्याणहेतवे।
आत्मरुपाय शान्ताय श्रीनृसिंहाय ते नमः।।9।।
जे सत्‌ चित्‌ सुखस्वरुप असून जगाच्या कल्याणास्तव अवतरीत झाले असे शांत आत्मरुपी श्रीनृसिंह देवास मी वंदन करतो.

श्री व्यकटेश—
कल्याणाद्‌भुतगात्राय मोक्षानन्दप्रदायिने।
श्रीमद्‌व्यंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः।।10।।
कल्याणकारी आपल्या अद्‌भूत गात्रांनी अंग बलाने मोक्षाचा आनंद प्रदान करणारे, ज्यांचा लक्ष्मीच्या हृदयात वास असतो त्या श्रीव्यंकटेशाला मी नमन करतो.

श्रीकृष्ण—
सच्चिदानन्दरुपाय कृष्णाय क्लिष्टकर्मणे।
नमो वेदान्तवेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे।।11।।
सच्चिदानंद सुखाचे कारण, ज्यांनी अनेक क्लिष्ट कर्मे केली असे श्रीकृष्णास नमन वेदांत विद्येचे गुरु बुद्धिला साक्षी ठेवून त्यांस मी नमन करतो.

श्री गोविन्द—
सच्चित्सुखनाकारं आदिमध्यान्तवर्जितम्‌।
वेदगम्यं परं ब्रह्म गोविन्दं प्रणतोस्म्यहं।।12।।
सत्‌, चित्‌ सुखाचे कारण, ज्यांस आदि मध्य अंत नाही वेदांनी जे ब्रह्मस्वरुप जाणूं शकतो त्या गोविंदास मी प्रणाम करतो.

श्री अंजनेय—
जगत्कल्याणकार्याय रामभक्तप्रदायिने।
चिदानन्दाय गुरवे आंजनेयाय ते नमः।।13।।
जगाच्या कल्याणासाठी, रामभक्ती प्रदान करणारे, चिदांनरुपी गुरु, अंजनी पुत्र मारुतीस नमस्कार असो.

श्री समर्थरामदास—
अनन्तबलवीर्याय मोक्षानन्दप्रदायिने।
सच्चित्सुखस्वरुपाय रामदासाय ते नमः।।14।।
अनंत बलशाली, मोक्ष प्रदान करणारे सच्चिदानंद स्वरुपी श्री रामदास स्वामीस नमस्कार असो.

श्रीमल्हारीमार्तण्ड—
दत्तमल्हारिरुपेण राजते यो दिवानिशम्‌।
सच्चिदानन्दमद्वंद्वं श्रीधरं तं नतोस्म्यहम्‌।।15।।
श्री दत्त व मल्हारी मार्तंडरुपाने रात्रंदिवस तेजाने झळकणारे जे द्वंद्वापासुन मुक्त असे सच्चिदानंद त्यास श्रीधरस्वामी नतमस्तक होउन नमन करतात.

श्रीगुरु—
आनन्दघनरुपाय नित्यमंगलरुपिणे।
ममाखंडस्वरुपाय नित्यं श्रीगुरवे नमः।।16।।
जे आनंदरुपी मेघा समान नित्य मंगल वर्षाव करतात, ते माझ्‌या अखंड अद्वैत स्वरुपांत विद्यमान आहे. त्या श्रीगुरुस वंदन करतो.

श्रीरामचन्द्र—
विश्वोद्गवस्थितिलयादिषु हेतुमेकं।
मायाश्रयं विगतमायमचिंत्यमूर्तिम्‌।।
आनन्दसांद्रममलं निजबोधरुपं।
सीतापतिं विदिततत्वमहं नमामि।17।।
विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लयाचे जे कारण आहे व माया ज्याच्या आश्रयाने राहते, पण तिचा ज्यावर परिणाम होत नाही, जे आनंदाने ओतप्रोत , निर्मळ असे जे निजबोधरुपी सितापती श्रीरामाला ते तत्व जाणून मी नमन करतो. या श्लोकापैकीं जे ध्याानाचे श्लोक गुरुमुखाने मिळाले असतील तेवढे श्लोक म्हणावेत.

।।श्री सद्‌गुरुचरणारविंदाभ्यां नमः घ्यायामि।।
श्लोकांचा हा मराठी अनुवादअनुवादकः श्री अनंत काइतवाडे इंदूर

home-last-sec-img