Literature

परिव्राड हृदयम्

मोक्षानंदैकदेहो निखिलतनुभृतां पूर्णभाग्योदयार्कः ।
तत्वज्ञानाब्धिचंद्रः सकलनिगमवाङ्‌‌मौलिपीयूषपूर्णः ।।
जीवब्रम्हैक्यरुपं निरतिशयसुखं काशयन्वेदवेद्यम ।
सच्चित्सौख्यात्मभूमा जयति निजरुचा शंकरोयस्तमीडे ।। 1।।
अर्थ— मी त्या शंकराची स्तुति करतो, जो आपल्या स्वयंप्रकाशाने चित्सौख्यरुप आत्मरुपामध्यें आनंदाने लीन असतो. मोक्षानंदच एक देहरुप असून सर्वजीवांच्या पूर्ण भाग्याचा उदय करणारा सूर्यच आहे, तत्वज्ञानरुपी सागरास भर्ती आणणारा चंद्रच आहे. पूर्ण वेदवाङमयाचा मूर्धन्य अमृत कलशच आहे. वेदांमुळे विदित होणारा, अनन्त सुखाने परिपूर्ण असा जीवब्रम्हैक्य स्वरुपाचा ब्रम्हानन्द भूमा ! आपला मनःपूर्वक जयजयकार असो. ।।1।।

स्वीयं साम्यं विधत्ते गुरुरिति वचसा चेत आकृष्ययत्नात्‌‌ ।
वत्रे श्रीदासभक्तिं परमखिलमिदं ज्ञातवानस्मि सारम्‌‌ ।।
सत्यं स्पर्शो न कल्प्यो विदितमिति मया सद्‌गुरुर्नोपमेयः ।
दृष्टांतो नैव दृष्टस्त्रिभुवनजठरे सद्‌गुरुस्त्वप्रमेयः ।। 2।।
अर्थ— प्रयत्नपूर्वक शिष्याचे चित्त आकर्षित करुन गुरु त्यास आपल्याप्रमाणेच ”गुरु” घडवितो. मी गुरुभक्तिमुळे परमज्ञान प्राप्त करुन त्यांत न्हाऊन निघालो आहे. सद्‌गुरुच्या कृपेला कोठलीही उपमा योग्य नाहीं. त्यांच्या सत्‌‌‌ (सत्य—ब्रम्हतत्वाचे ज्ञान दान) स्पर्शाला तोड नाही. अर्थात त्याची बरोबरी कुणी करु शकत नाही, हे मला समजले आहे. हे सद्‌‌गुरुराया तुम्हाला योग्य अशी उपमा देण्यास त्रिभुवनात कांहीच नसून आपण अनुपमेय आहात. ।।2।।

ज्योतिःसंस्पर्शयोगाभ्द्‌‌वति खलु यथा वर्तिरेव प्रदीपः ।
आस्ते संलग्नचेता गुरुपदयुगले गौरवं तत्समेत्य।।
अज्ञानवध्वांतनाशे प्रथित तरणिवद्राजतेयं चिदर्चिः ।
पापं तापं च दैन्यं परिहरति नृणां स्वस्य संयोगलाभात्‌‌ ।। 3।।
अर्थ— ज्योतिचा स्पर्श झाल्यावर जसा एक दिव्याने दूसरा दिवा प्रज्वलित होतो त्या प्रमाणे गुरुचरणांशीसेवेनसंयुक्तझाल्यामुळे शिष्यपण तसाच गौरव प्राप्त करतो. अज्ञान अंधःकाराचा नाश करण्यासाठी हे गुरु म्हणजे सूर्यच आहेत. अखंड ज्ञानमय ज्योतिच आहेत. गुरु, माणसांचे पाप, दुःख, दैन्य आपल्या सहयोगाने निवारण करतात. ।।3।।

आदर्शान्ते च दृश्यं सकलमपि मृषा विश्वमेतत्तथैव ।
सच्चित्सौख्यात्मके, यघ्द्यविकृतमनिशं वीक्षते तत्स्वरुपम्‌‌ ।।
आयाते वा प्रयाते जलमुचि खमिव स्वान्तमायाविदूरः ।
आचार्याल्लब्धबोधो भ्रम विधुरमना राजते राजते च ।। 4।।
अर्थ— आरशामध्ये दिसणारे दृश्य ज्या प्रमाणे भ्रामक व खोटे असते, तसेच त्या चित्सौख्यात्मक आत्मस्वरुप दर्शनांत हे सर्व विश्व मिथ्या भासते. ज्या प्रमाणे आकाशांत येणार्‌या जाणार्‌या मेघांमध्ये भ्रामक आकृति क्षणैक दिसतात (आणि आपल्याला हे माहीत असते कीं ह्‌‌या खोट्‌या आणि नश्वर आहेत). त्या प्रमाणे आचार्यांपासून ब्रम्हज्ञान प्राप्त झााल्यावर हे जगत्‌‌ भ्रामक आहे. मिथ्याभासाने शोभत आहे. हे समजते. आणि हे निराधार अशा कल्पनेवर आहे हे समजते.।।4।।

यत्सत्यासत्ययोगादखिल जगदिदं भासते तद्विचिन्त्य ।
क्षीरं हंसो यथा तद्विचिनुत इति यः स्वात्मरुपं स धन्यः।।
दुग्धे गूढं यथोस्ते घृतमिति स यतिर्विश्वरुपे स्वमात्रः।
जीवन्नप्यद्वयो यो गुरुवचनकृपापांगपीयूषदृष्टया ।। 5।।
अर्थ— जो सत्य आणि असत्य अशा मिश्रितसंयोगापासून जगाला समजून घेतो, आणि ज्या प्रमाणे हंस पक्षी नीर—क्षीर विवेकाने दूध हे पाण्यामधून निवडून घेतो, ग्रहण करतो तद्‌‌वत ‌‌‌ह्‌‌या भ्रामक जगामधून स्वात्मरुपाला संंशोधित करुन धन्य होतो. ज्याप्रमाणे दूधामध्ये तूप हे अदृश्यरुपाने असते, त्या प्रमाणे ह्‌‌या विश्वरुपामध्ये आत्मस्वरुपरुपास बरोबर शोधून योगी सुखी होतो अपल्या गुरुकृपेचे अमृतप्राशन करुन अद्वय स्थितीचा आनंद प्राप्त करतो. ।। 5।।

निष्कास्य स्वीयशक्त्या हृदिकृत निलयान्‌‌ कामशङ्‌‌‌‌कूूश्च भूयः।
सेवां कुर्वन्निरीहो विगलितमयतोहंकृतिः साधुवृत्तः।।
भक्त्या श्रुण्वन्मुमुक्षुः स्त्रवदमृतवचः श्रीगुरोर्ज्ञानदातुः ।
बुध्द्वा मत्वा च धन्यो जगति विजयते ब्रम्हरुपः कृतार्थः ।। 6।।
अर्थ— सद्‌‌विचारी मुमुक्षु आपल्या श्रीगुरुची पुन्हा पुनः सेवा करतो आणि त्यांच्या मुखांतून श्रवणार्‌या अमृतवचनांचे भक्तिपूर्वक स्मरण करुन आपल्या हृदयाच्या कुहरामध्यें(पोकळीत) रुतलेल्या कामेच्छारुपी भाल्यांचे स्वतःच्या प्रयत्नांनी निष्कासन (बहिर्गमन) करतो, माया, मोह ,अहंकारापासून मुक्त होवून ज्ञानी होतो आणि जगामध्ये धन्य होवून विजयी होतो, यशस्वी होतो. ।।6।।

आत्मानात्मक्र्रमोैयं प्रथममभिहितःस्वीयदेहे परस्मिन्‌‌।
देहोैनित्यो ह्मनात्मा स्वपरवपुषि यो नित्य आत्मा स्वयं सः।।
स्वस्माद्गिन्नं च दृश्यं स्वपर वपुरपि ज्ञेयमात्रं जडं यत्‌‌।
यच्चैतन्याभियोगाव्द्यवहृतिपटुतां याति तत्स्वीयरुपम्‌‌ ।। 7।।
अर्थ— आत्मअनात्मक्र्रमामध्ये प्रथम स्वतः वरुन आणि नंतर दूसर्‌यावरुन हे तत्व दाखविले जाते. आपला देह अनित्य असून तो चित्‌‌चैतन्यपूर्ण नाहीं, तथा दूसर्‌याच्या शरीरांत जे नित्य तत्व आहे, तेच आपल्या शरीरांत आत्मतत्व आहे. आपल्यामध्ये जे दृश्य आहे, ते जड तत्व आहे, तसेच दूसर्‌याचें सुध्दा दृश्य दिसणारे ते जड शरीर आहे. दूसर्‌यामध्ये सुध्दा आत्मतत्वच आहे. चित्‌‌ चैतन्यरुपाशी संयुक्त झाल्यामुळे आपले शरीर चैतन्यमय दिसते.

यंत्रे विद्युद्यथौहं प्रवहति तनुषु स्वात्मभानं तथैतत्‌‌।
चिन्मात्रं नित्यिंसद्धं विगलितकलुषं देहसंगाद्विमुकतम्‌‌ ।।
तस्मात्‌ सर्वेैपि देहा व्यवहृतिपटवः सर्वसौभाग्यभाजः।
जीवोज्ञात्वा वृथैवं विषयमनुसरन्सर्वदुःखं प्रयातिं।। 8।।
अर्थ— यंत्रामध्ये ज्या प्रमाणे विजेचा प्रवाह वाहतो आणि ते चलायमान होते, तद्वतच सर्वांच्या देहामध्ये अहं तत्वाचे स्वतःचे भान जागृत राहून तो चेष्टा करीत असतो. चित्‌‌ तत्व हे सिध्द आहे की ते देहाच्या विकारांपासून सदा मुक्त असते. त्यामुळेच चैतन्यतत्वामुळेच सर्व प्राणी व्यवहार करीत असतात. परंतु प्राणी अज्ञानवश सर्व विषयांच्या आहारी जाउन दुःखी होत असतो ।।8।।

भुक्तं पीतं च सर्वं प्रभवति तनुतो भिन्नरुपं यदेवं ।
ननाधातुस्वरुपं तदिह मतिमता ज्ञायते देहयंत्रम्‌।।
कर्ता यंत्रस्य बाह्ये व्यवहरति तथा दृश्यते भिन्नेरुपः ।
सामान्याद्वैपरीत्यं सकलमिह यतः सर्वमाश्चर्यमेतत्‌‌ ।।9।।
अर्थ— आपल्या शरीरा पासून खाल्लेल्या आणि प्यायलेल्या सर्व पदार्थातून भिन्न—भिन्न रस उत्पन्न होत असतात. धातु निर्मित होत असतात. बुध्दिमान्‌ लोक शरीर यंत्राला वेगवेगळया रसायनाने निर्मित समजतात. ह्‌या शरीर यंत्राचा कर्ता शरीराच्या बाहेर अस्तित्वांत असतो आणि शरीर भिन्नरुपाने दिसते. सामान्यापासून हे वेगळेच म्हणजे विरुध्दच जाणवते म्हणजे आश्चर्यच. आहे. ।।9।।

यंत्रस्यास्यात्र कर्ता विदितमिदमहो चालयत्यन्तरस्थः।
मत्वौहं यंत्रमेवं वहति दिननिशं याति पुस्त्रीत्वमन्यत्‌‌।।
गच्छत्यायाति भ्ांुक्ते वदति च कुरुते विस्मरन्नामरुपम्‌‌।
दारान्वित्तं च पुत्रं पतिमिह विषयान्कामयन्मूढ आस्ते ।।10।।
अर्थ— शरीर यंत्राचा हा अंतरस्थकर्ता आम्हाला माहीत असतो (चित्‌‌ तत्व) परंतु आम्ही विषयांमुळे अन्ध होवून ”मी पति आहे,” ”मी स्त्री आहे,” ”मी पुत्र आहे”, वगैर विचारांमुळे एक सारखे भ्रमित होवून जन्म मृत्युच्या फेर्‌यामुळे सतत्‌‌ खात पीत भ्रमणच करतो आणि चैतन्य तत्वाला विसरुन जातो. ।।10।।

देहोयं यन्त्रमेवं व्यवहृति विधये दृश्यते नास्य यन्ता।
स्वान्योन्याध्यासतोस्मिन्सकलमपि भवे जायते कर्ममोहात्‌‌।।
गाढं दुःखं च भूयो विविधविषयतो वासनापि प्रवृध्दा ।
कार्यात्तद्वासनास्यात्पुनरपि च तया कार्यमेवाथ जन्म ।।11।।
अर्थ— हा देह यंत्राप्रमाणेच चालतो पण दैववशात्‌ त्याचा चालक आम्हाला दिसत नाही. कर्ममोहामुळे हे सर्व भ्रामक असल्याने देह आणि वासना ह्‌‌यांचा परस्पर अवलम्बनात्मक खेळ चालतो. विविध विषयांच्या प्रगाढ मोहामुळे पुनःपुनः दुःख भोगावे लागते. त्या इच्छांमुळेच पुनर्जन्म उद्‌भवतो. ।।11।।

देहेेहंता तदुत्थात्वतिशयममतापुत्रभार्यादिकेषु ।
द्रव्येेन्यत्रापि भूयो बहुविधविषये दुःखदा नित्यमेव।।
पुस्त्वं वा स्त्रीत्वमन्ये न च भवति यत्‌‌स्तस्य वैकारिकेस्मिन।
देहे स्त्रीत्वं च पुंस्त्वं मनुत इति वृथा मौढयसंस्कारतोज्ञः ।।12।।
अर्थ—— आपल्या देहामध्ये अहंता, त्यापासून उत्पन्न झालेली अतिशय जास्त प्रमाणांतली पुत्र—भार्या—मोहापासून ची ममता धनाकर्षण आणि तसेच इतर बहुविध मायापाश हे सतत दुःखदायक आहेत. पुरुष आणि स्त्री हा भेदविकार ज्यांच्या मनांत होत नाहीं (जो समान दृष्टीनेच त्यांना पाहतो) त्याला वरील अहंतायुक्त दुःख नाहीत. परंतु जो स्त्री आणि पुरुष हा भेद देहामध्ये मानतो त्याने मुंडन संस्कार केला तरी व्यर्थच आहे. ।।12।।

सवर्ं दुःखास्पदं यत्क्षणलवविरसं पूतिगंधंं निष्कृष्टं ।
हन्तात्यंतापवित्रंह्यतिशयकुहकं जातमात्रेण हेयम्‌‌।।
विण्मूत्रश्लेष्मपूर्णं खपरवपुरहो संविदित्वापि भूयः।
सौन्दर्याद्यैश्च भावैरनवरतमिदं मन्यते तोषहेतुम्‌‌।।13।।
अर्थ— शरीर हे सर्व दुःखकारक, क्षणभंगूर, दुर्गंधीयुक्त, निकृष्ट अत्यंत अपवित्र, मायावी, भ्रामक, जन्मतःच हीन आणि जे मल मूत्र—कफ आदिमुळे अमंगळ आहे हे जाणून सुध्दा, अरेरे ! आम्ही त्यांत सुन्दरता आदि भाव चिरस्थायी राहतील, म्हणून संतुष्ट होतो.

विस्मृत्यात्मस्वरुपं विषयसुखकृतनेकयत्नान्विधास्यन्‌‌।
स्वीयं महत्वातिहर्षं भजति न सहसा वेत्यहं वंचितोस्मि।।
वस्त्रालंकारतापि स्वपरवरपुरहो सुंदरं भावयित्वा।
जीवोयं वंचितः सन्रमत इति वृथा नारके मुग्धचेताः ।।14।।
अर्थः— आपल्या आत्मस्वरुपाला विसरुन आणि अनेक प्रयत्न करुन विषयसूख संतुष्टीकरिता आम्ही अति आनंदाने ते कार्य करीत असताना खरे तर फसविले जातो. वस्त्रालंकारांनी स्वशरीर सजवून व्यर्थच आम्ही न कळत नारकीय स्थितीला मूदपणे प्राप्त करतो. ।।14।।

श्रृंगारं वर्णयन्ति स्वपरवपुरमे नैव जानन्ति गर्ह्यम्‌‌।
मिथ्या स्त्रीवर्णनं यद्विकृतमिति न किं भाति तेषां कवीनाम्‌‌।।
चाराः कामस्य सर्वे कथमपि च जनान्वंचयन्तोत्र दुष्टाः ।
माद्यन्तो मुग्धचित्ताः प्रथितमलमिदं भूषयन्ति स्ववाग्भिः ।।15।।
अर्थ— घृणास्पद श्रृंगाररसपूर्ण स्व आणि पर ह्‌‌याप्रमाणे सर्वच शरीराचे वर्णन विकृत असे, हे कवि करतात त्यांत त्यांना काहींच वावगे वाटत नाहीं. हे दुष्ट कवि असे मिथ्या विषयी स्त्री वर्णन करुन जनांची वंचना करितात. हे सर्व त्यांचे कामवासनेचे विकृत आचार आहेत. मुग्ध झालेल्या जनांचे विचार असे मादक व विषयी करण्यांत त्यांना आपल्या वाणीची सार्थकता वाटते. ।।15।।

भोगेनात्यंतसौख्यं यदि मतिरुदिता सूर्यते कामपुत्रम्‌‌।
विघ्नंदृष्ट्‌‌वेप्सितार्थ तदनधिगमतः क्रोधआविर्भवेच्च।।
प्राप्तोर्थो नैव नश्येन्मनुत इति यदा मोह एतस्य नाम।
द्वारं स्याद्‌‌दुर्गतेश्च त्रयमिह गदितं वासुदेवेन साक्षात्‌‌.।।16।।
अर्थ—— भोगांचे सेवन केल्यावर अत्यंत आनंद प्राप्त करुन जर कामरुपी पुत्राची प्राप्ती होईल, आणि तदनन्तर इच्छित सौख्य प्राप्त करण्यास अडथळा निर्माण होईल, तर क्रोधाची उत्पत्ति होईल आणि प्राप्त झालेल वैभव कधी नष्टच होणार नाही. असे कल्पित तर ह्‌याचे नांव मोहच होईल, हे दुर्गतीचे तीन द्वारच आहेत, असे वासुदेव अर्थात भगवान श्रीकृष्णांचे (गीतेत) सांगणे आहे. ।।16।।

कामाख्यो दुष्किरातो निजधनुषि यदा मोहबाणान्नियोज्य।
लक्ष्मीकृत्याथ नारीं तरतनुमथवा निक्षिपत्यत्र चित्रम्‌‌।।
एकाविद्वापि युग्मं बत सपदि भवेन्नापि कोपो न हिंसा।
बाणैरन्यैश्च मृत्युर्विघटनमथवा मेलनं वृध्दिरेतैः. ।।17।।
अर्थ—— काम नावाचा एक दुुष्ट पारधी आपल्या धनुष्यावर मोहरुपी बाण धरुन त्याचा नेम एखाद्या स्त्री तनुवर किंवा पुरुष तनुवर धरतो, हे किती आश्चर्य आहे ! आणि त्या पैकी एक जण बाण न लागता सुध्दां त्या दूसर्‌याबरोबर जोडला जातो. आणि मग कुणालच क्रोध किंवा हिंसा न होता त्यांचा मेलमिलाप होवून वृध्दिच होते. एकाच्या बाणाने कुणाचा मृत्यु किंवा विघटण होत नाही तर वृध्दिच होते. ।।17।।

ज्ञात्वाध्यात्माधियोगादरय इति सुधीः काममोहादिकान्वै।
जित्वा हत्वा च भूयो निजनिरतिशयासंगशेस्त्रेण पूर्णः।।
पृथ्वी तस्य प्रभावाद्धरति जगदिदं यौवने यो विरक्तः।
पश्चात्तापादृते किं वयसि विगलिते साधनीयं च पश्चात्‌‌. ।।18।।
अर्थ— सत्वबुध्दिधारी विरक्त पुरुष अध्यात्म ”अधियोगांचा आदर करावा”, हे जाणून काम मोहादी वासनांना जिंकून संयमाने स्वतः सतत त्याचा संग टाकून देउन त्यांचे दमन करतो. जो यौवनावस्थेमध्येच विरक्त असतो, त्याच्या प्रभावानेच ही पृथ्वी जगाला धारण करिते. एकदा आपले वय निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय काय हातात राहणार आणि काय साध्य होणार ? ।।18।।

आदौ मध्ये तथान्ते विषयविषमिदं मोहजं नाशबीजम्‌‌।
कामक्रोधाश्रितं यत्क्षणसुखविरसं पुष्पितं यौवनेन।।
नानापापैश्च पश्चाज्जनिमृतफलदं नारकं दुःखकृच्च।
यक्त्वा जीवन्समुक्तो भ्रमरहितमनाश्चिद्‌धनानन्दधामा.।।19।।
अर्थ— सुरुवातीस मध्ये आणि शेवटी या बहरलेल्या यौवनापासून त्रासच पदरी पडतो. तद्‌‌जन्य विषयापासून आणि मोहापासून उत्पन्न होणारे विषच प्राप्त होते. ते नाशास कारणीभूत होते. काम क्रोध हया पासून उत्पन्न झालेल्या ते क्षणिक सूख असते. अनेक पापकर्मांपासून तेशेवटी पुनर्जन्म आणि मृत्युस कारण बनते व ते नारकीय दुःखच भेागावयास लावते. जीवनमुक्त निर्मोही जो असतो तो ह्‌‌या जीवनाचा संयमीत राहुन त्यागकरुन चित्सस्वरुप आत्मानंदाचा अनुभव घेवून सुखी होतो. ।।19।।

नो देहोनेंद्रियं तन्मन इति न मतिः प्रापयत्यात्मरुपम्‌‌।
किं भूम्या किं च धान्यैरगणित धनतो गेहतो राज्यतोपि
इष्टैमित्रैश्च पुत्रैः पशुभिरिह भवेत्िंक तथा कामिंनीभिः ।
तत्प्राप्य। सर्व यत्नाद्‌‌गृहसुतवनिता क्षेत्र वित्तादि दूरम ।।20।।
अर्थ— तो ब्रम्हानंद प्राप्त आत्मस्वरुपी योगी हया सर्व क्षणभंगूर गोष्टींना म्हणजे देह, इंद्रिय, मन, भूमि, धन धान्य गृहराज्य, इष्टमित्र, पुत्र, कामिनी, ह्यांना काय महत्व देणार ? अर्थात त्याला त्या तुच्छ वाटतात. त्या पासून मिळणारा आनंद त्याला आत्मसुखापुढे तुच्छ वाटतो.।।20।।

विज्ञानज्ञानपूर्णः प्रवचननिपुणो नीतिधर्मप्रवीणः।
सर्वत्रात्मैकदृग्यः सकलनिगमवाग्भूषणः शांतचित्तः।।
तीर्त्वामोहं निरिच्छः सकरुणहृदयः शब्दपीयूषपूर्णः।
यत्सान्निध्यात्प्रशान्तं मन इति च गुरुं संश्रयेद्‌‌‌ ब्राह्मणंतम्‌‌।।21।।
अर्थ— विज्ञान तथा ज्ञान ह्‌‌यांत पूर्ण, प्रवचन देण्यांत निपुण, नीति, आणि धर्मशास्त्रांत तज्ञ, सर्वत्र ब्रह्मदृष्टीने पाहणारा, सर्ववेदविद्याविद्‌‌ शांतचित्त, मोहाला जिंकून संयमी, अमृतमय वाणी असणारा अत्यंत करुणामय प्रशांतमना, अश्या गुरुच्या सान्निध्याचा आश्रय घ्यावा.।।21।।

यद्वद्‌गृधस्य दृष्टिर्नभसि विहरतोधो मृतप्राणीलग्ना।
तद्वद्वेदान्तवक्ता धनकणवनितालाभदृष्टिर्य आस्ते ।।
शाब्दंस्याद्वर्णनं तद्विरति विरहितं तेन लाभो न दृष्टः।
शब्दैर्नस्यात्क्षुधान्तः क्षुधमिह स कथं वारयेदन्नशून्यः।। 22।।
अर्थ— ज्या प्रमाणे गिधाड हेे आकाशांत उडत असतांना आपली दृष्टी पृथ्वीवरील मृतप्राण्यावर ठेवते, त्याप्रमाणे वेदान्तवक्ता जो असतो, त्याच्या दृष्टीला (पृथ्वीवरील) धन, धान्य, वनिता ह्‌‌याविषयींची जी मायावी शाब्दिक वर्णनांमधील मोहीनी आहे, त्यांत कांहीच रस नसून त्याची भूक (जी ब्रम्हानंद अनुभूति ) ती ह्‌‌या अन्नशून्य (वेदान्त विषयहीन अश्या) गोष्टीमुळे कशी भागेल ?।।22।।

नित्यानित्यप्रतीतिर्विर्षयविरमणं षट्‌‌कमेवं शमादेः।
मोक्तं वांछातितीव्रा यदि भवति तदा सोधिकारी च मोक्षे।।
नित्योहं चित्सुखात्मा विदितमिति च यदृश्यमात्रंत्वनित्यम्‌‌।
नित्यानित्यानुभूतिर्विलयति महाजन्मदुःखौघबीजम्‌‌। ।।23।।
अर्थ— नित्य आणि अनित्य वस्तूंमधे ज्ञानी सदा विवेकबुध्दी ठेवून शम दमादि मध्ये लीन राहतो. ज्याची मुक्तीसाठी तिव्र इच्छा असते तो मोक्षाचा अधिकारी होतो. मी चित्सुखात्मा असून नित्य आहे हे जाणून, हे सर्व दृश्यमात्र दिसणारे जग अशाश्वत आहे. हे तो समजतो ह्‌‌या प्रमाणे नित्य आणि अनित्य ह्‌याची अनुभूति प्राप्त होवून त्याच्या पुनर्जन्मरुपी दुःखसागराच्या उद्‌‌गमाचाच (बीजाचा) विलय होतो. ।।23।।

अस्मिंल्लोके यथास्यात्तनुकरणमनः प्राणसाध्यं तथान्ये।
लोके सौख्यंन चान्यद्विषयभवमतः स्वर्गसौख्यं न वांच्छेत्‌।।
नीचोच्यैः साधनैर्नो भवति विषयजं तारतम्यं सुखस्य।
लोकान्निर्वेदमायादकृतमिह न तत्स्यात्कृतेनात्र यस्मात्‌‌ ।।24।।
अर्थ— ह्‌या इहलोकांत ज्या प्रमाणे “मन“ हया कारणामुळे शरीर धारण केले जाते तसे अन्यलोकांत कांहीं विषयसाध्य सुख प्राप्त केले जाईल अशी आशा करुं नये. जेव्हां ही भ्रामक स्थिति माया, विरक्तीने दूर केली जाईल तेव्हांच स्वर्गसुख मिळेल. निम्न किंवा श्रेष्ठ साधनांनी सुखाचा निवाडा केला जाणार नाहीं. ।।24।।

इष्टापूर्ते वरिष्ठं न च भवति ततोेन्यः प्लवः श्रेय एवम्‌‌ ।
मत्वा स्वर्गाच्च कर्मीै पुनरपिजननं मृत्युलोके प्रयाति।।
गत्वा ब्रम्हाणमिन्द्रो विरतियुतइतोवेत्स्वरुपं च तस्मात्‌‌।
धीरा ज्ञात्वामृतत्वं ध्रुवमिह न भवे प्रार्थयन्तध्रुवेषु ।।25।।
अर्थ— इच्छापूर्ति झाल्यावर सुध्दा स्वर्गात ते सुख चिर—श्रेष्ठ म्हटले जात नाहीं. कारण स्वतः इन्द्रसुध्दा ब्रम्हदेवाकडे अमृततत्वाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी जाऊन रहायला होता. (पुण्य क्षीण झााल्यावर साधकाला स्वर्गातून मर्त्यलोकी यावे लागते) नश्वर कारणापासून ध्रुवसुख प्राप्त होत नाही. हे ज्ञानी जाणतो. ।।25।।

श्रेयो धीरो वृणीते विषयमनुसरन्प्रेय एवात्र मन्दः।
काम्यं दुःखैकबीजं क्षणविरसमथो जन्मदं मोहरुपम्‌‌।।
अस्माच्छे्रयश्च भिन्नं सततमिह भवेदाददानस्य साधु।
श्रेयः स्वात्मैव साक्षान्निरतिशयसुखं निर्भयं ब्रम्हसंज्ञम्‌‌।।26।।
अर्थ— मंदबुध्दिवाला विषयापसून प्राप्त होणारे सुख भौतिक आनंदासाठी निवडतो. परंतु धीर अर्थात प्रज्ञावंत जो असतो तो आत्मतत्व निगडित श्रेय सुखंच वरण करतो. मंदबुध्दिवाला प्रेयस्‌‌ सुख जे भणभंगूर, दुःखपर्यवसायी मोहरुपी आणि पुनर्जन्मास कारण असते, तेच वरण करतो. जे साधु आहेत ते श्रेयस्‌ जे आहे ते ह्‌यापासून अगदी वेगळे आणि चिर तथा मुक्तिदायक समजतात. ।।26।।

दुःखान्तान्मोहरुपान्परिणतिविरसानिंद्रियोत्थानशुद्वान।
आमृत्युब्रम्हलोकं शतशतगुणितानस्थिरान्‌‌ कर्मजान्तान्‌‌ ।।
आनन्दान्स्वातिरिक्तान्कुहकसलिलवद्गासमानानसत्यम्‌‌।
त्यक्त्वा सर्वांन्स्वपूर्णं निरवधि विमलं चिंतयेदात्मसौख्यम्‌‌।।27।।
अर्थ— दुखद अंत असणारे मोहक असून शेवटी निराश करणारे इन्द्रियवासनां पासून उत्पन्न होवून अत्यंत अमंगल असणारे मृत्युलोक आणि ब्रम्हलोकांपर्यंन्त शतपटींनी मृगजळासारिखे फसविणारे भंगूर क्षणभंगूर सौख्य त्यजून चिर आणि अत्यंत पवित्र असे आत्मानंदाचे सौख्यच निवडावे.।।27।।

सर्वेषां पातहेतुः प्रथममिह भवेत्कामरुपो विकारः।
दुष्पूरेणानलेन स्वमपनयनतो विव्हलोज्ञोति दुःखी।।
हन्यात्कामारिमेनं भवति खलु यतो विघ्न आत्मप्रतीतौ।
देहस्यैवात्र भानं दृढयति न ततो रुपशून्यात्मदृष्टिः ।।28।।
अर्थ— सर्वांचा हृास आणि अवनति होण्याचे पहिले कारक म्हणजे कारण कामविकार आाहे. त्या कामाग्निने जो अत्यन्त बुभुक्षित (हावरा) असतो अश्याने होरपळून निघाल्यावर जीवदुःखी आणि व्याकुळ होतो. आपल्या आत्मस्वरुपाचे भान होवून त्याचा विश्वास होण्याच्या मार्गांत विघ्न असणारा हा कामरुपी शत्रु आपल्या शरीराचेच ध्यान ठेवून चित्‌तत्वाला आच्छादून टाकतो. ।।28।।

चित्सौख्यं स्वात्मनो यत्तदपनयनतः काम एषोति दुष्टः ।
दौर्गत्यं देहयोनावहह सुखमिति स्वीय शक्त्वा युनक्ति।।
जातो यस्माद्धि पूर्वं तदभिलषति यो जायते तत्र भूयः।
जेतव्योध्यात्मयोगाज्जनिमृततिफलदः कामशत्रुश्च यूना।।29।।
अर्थ— अपल्या आत्म्याचे चिरसौख्य आच्छादित करुन हा दुष्ट काम आपल्या देहाला दुर्गतीस जुंपून अरेरे ! “हेच सुख आहे,“ असे भ्रमित करतो. ह्‌‌‌यांची इच्छा करण्याच्या आतच हा “काम“ तेथे भयंकर प्रकाराने प्रविष्ट होतो. हा जन्ममरणरुपी परिणामकारक कामशत्रु आध्यात्मयोगाने तरुणाने जिंकिला पाहिजे.

लब्ध्वैकं ब्रम्हचर्य भवतिहि सुतरां नान्यतो ब्रम्हलाभः ।
तेनैवेन्द्रो ह्यवास स्वयमतिनिकटै ब्रम्हणस्तत्ततो वेत्‌‌।।
छान्दोग्येस्पष्ट मुक्तं कथित इति कामनाशाय मंत्रेः।
लिंदुंश्वेतं त्वदत्कं कथमपि न कदा माभिगां तद्यशो ह्‌‌‌म ।।30।।
अर्थ— ह्‌‌या ब्रम्हतत्वाचा लाभ एकमात्र ब्रम्हचर्य प्राप्त करुनच (कामशत्रुवर विजय मिळवूनच) होतो हे निश्चित आहे. दुसर्‌‌या मार्गाने आध्यात्म तत्वाचा लाभ होत नाहीं त्यामुळेच इंद्र बम्हदेवाच्या जवळ (प्रजापति च्या) जवळ ब्रम्हचर्य पालन करुन राहायला आणि ब्रम्हदेवाने ते ब्रम्हतत्व त्यास सांगीतले. छंदोग्य उपनिषदा मध्ये हे स्पष्ट सांगितले आहे कीं कामनाश करण्यासाठी त्या स्त्री चिन्हित (निसरड्‌‌या) गुळगुळीत मार्गावर कधीही जाऊं नकोस ते आपल्या यशाचा नाश करेल. ।।30।।

वेदे शास्त्रेषु पुर्णः कविरपि च तथा ग्रंथकर्तापि भूयो।
यावन्नो कामजेता सततमपि भृणंस्तत्वमेषोति बध्दः।।
शास्त्रं भारोस्य जंतोर्वहति यदि वृषःशर्करां तेन किं स्यात्‌‌।,
स्वादं किं वेत्ति दर्वी मणियुतभुजगोंतर्विपो भीषणोयम्‌‌‌‌ ।।31।।
अर्थ— वेदशास्त्र पारंगत कवि आणि पुन्हा ग्रन्थकर्ता असून सुध्दा जर कामवासनेवर विजय मिळवू शकत नसेल आणि जरी सतत तत्वज्ञानाच्या गोष्ठी करीत असेल तर त्यास केवल भारवाहक बैलच म्हणावा लागेल. साखरेच्या गोण्या वाहणार्‌या बैलाला त्यांतली गोडी काय कळणार ? किंवा मिष्ठान्न वाढणारी पळी तिला त्या पदार्थांतील गोडी कशी समजणार ? ज्याच्या डोक्यावर सुंदर मणि आहे अशा सर्पाला त्याच्या शरीरात केवढे विष आहे, हे समजते काय ?।।31।।

सर्वात्मब्रम्हनित्यंं महदपिमहतो सुक्ष्मरुपा़च्च सूक्ष्मम्‌‌।
तत्वं विश्वस्य साक्षी स्वयमहमिति यत्संस्फूरत्सर्व देहे।।
खल्वेतद्‌‌ब्रम्हसर्वं निरवधिममलं नैव योषित्पुमान्यत्‌‌।
का नारी को नरो वा सुत इह च तथा कुत्र तत्कामजन्म ।।32।।
अर्थ— सूक्ष्मांत सूक्ष्म आणि मोठयांत मोठ्‌या अशा सर्व प्राण्यांमधे साक्षी म्हणून एकच ब्रम्हतत्व आहे. आणि सर्वच खरोखर त्रिकालात्मक सत्य आणि निर्लेप असे ब्रम्हतत्वच भरुन आहे. त्यांत स्त्री पुरुष नर नारी आदि काहीं भेद नाही. हे सगळे भेद स्त्री, पुरुष, पुत्र आदि इहलोकांतच आहेत. ।।32।।

सर्वं पूर्णं श्रुतेर्वागतनुविभवतो निर्गुणोकाय आत्मा।
सवीस्वेतासु भूमा तनुषुजपतियः सर्वदा सोहमेवम्‌‌।।
तस्मित्भूनिम्नस्वरुपे नर इति वनिता मन्यतेत्राविवेकात्‌‌।
यत्तदुःखस्यमूलं जनिमृतिकृदतो भावनां तां विजह्यात।।33।।
अर्थ— सर्वच पूर्ण ब्रम्ह भरलेले असून वेद श्रुति पुराण हंयाचे एकमताने एक वाणीने सांगणे आहे कि, शरीरविहिन तथा गुण (सत्व, रज, तम,) विहीन अलिप्त अश्या आत्मतत्वाच्याच प्रभावाने सर्व प्राणीमात्रांमध्ये चैतन्य विराजमान असते. त्या चेैतन्यरुपी ”भूमा” ह्‌या आत्मतत्वांत अविवेकाने स्त्री व पुरुष असा भेद केला जातो. आणि हीच भेदभावना सुखदुःख आणि जन्म—मृत्यु आदि दुःखाला कारणीभूत आहे. ती सोडली पाहिजे. ।।33।।

दृष्टवा देहं नरो वा युवतिरिति यदा भावनाज्ञानतःस्यात्‌‌।
देहादन्याश्चिदात्मा किल निरवधितो यः स तस्यावमानः।।
एको देवः प्रसिध्दः प्रतितनुषु यदा तस्य कस्यास्त्यपेक्षा ।
जीवो ब्रम्हैव साक्षादयमिति विदिते का च नारी नरः कः।।34।।
अर्थ— अज्ञानवश एखादा देह पाहिल्यावर हा नर आहे किंवा ही युवती आहे, अशी भावना होणे म्हणजे त्यातील चित्‌‌तत्व आत्मा हे न बघता त्यांचा ंघातच करणे आहे. प्रत्येक देहामध्यें एकच देव असतो. तर मग त्यापासून कसली अपेक्षा आहे ? जीव हा साक्षात्‌ब्रम्ह आहे हे समजल्यावर, निश्चित ज्ञान झाल्यावर काय पुरुष आणि कोण नारी असे समजणार ! ।।34।।

स्वात्मन्यद्वैतरुपे निखिलजगदधिष्ठान भूते च भूम्नि।
स्त्रीत्वं वा पुंस्त्वमेतन्मनुत इति यदा देहतः स्वात्मघात्‌‌ः।।
येविद्वांसो न येषां निरवधिममलं स्वात्मरुपं विभाति।
“तसूर्यानंदलोका“ नतिशयतमसा चावृतांस्तान्प्रयन्ति ।।35।।
अर्थ— आपल्या आत्मरुपामध्ये अद्वैत रुपाने उपस्थित असणार्‌या संपूर्ण जगताचे अधिष्ठान असणार्‌या ब्रम्हतत्वाला स्त्री आणि पुरुष ह्‌याभेद दृष्टिने पाहणे, कल्पना करणे ह्‌यामुळे आत्मघातच होतो. जे मूढ असतात त्यांना अमर्याद आणि निर्मल असे आत्मस्वरुप प्रिय वाटत नाहीं. आणि असे ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश कधीच पोहचत नाही आणि ज्या ठिकाणी गाढ अंधकार भरलेला आहे अश्या जगांत पोहचतात।।35।।

यास्मिंस्तत्स्वात्यरुपं निभृतविरतितः प्रस्फुटं स्यात्स्वदेहे ।
न नो नारी स जीवो विधिरपि न तथा श्रूयते कर्मणास्य ।।
संस्कारापीह न स्यात्स्वयमिह शुचितः प्रव्रजेत्स स्वमात्र।
चत्वारो ये कुमाराः सनकमुखकृता जातरुपाश्चरन्ति ।।36।।
अर्थ— स्वतःमध्ये आत्मतत्व ओळखून जो ह्‌या जगाशी विरक्त झाला आहे, त्याला बम्हदेवसुध्दा कर्मफलाचा दोष लागू देत नाहीं. तो संस्कारमुक्त राहून ब्रम्हदेव पुत्र सनकादि चार पुत्रांप्रमाणे पवित्रतेने विहार करतो. स्त्री पुरुष भेद त्यांच्या दृष्टीस रहात नाहीं.

सन्यास्तास्त्रीषु गार्गी व्रजनमिति ततो वेदबाह्यं न तासां।
“तान्येवं वावराणि” श्रुतिरिह तनुते न्यास एवाति भूयान्‌‌।।
“विद्वांसःप्रव्रजन्ते” “यदहरिह तदा प्रव्रजेद“‌‌ यो विरक्तः।
ज्यायान्नो वा कनीयान्प्रभवति महिमा ब्राह्मणस्यैष नित्यः ।।37।।
अर्थ— गार्गी आदि तीन स्त्रियांचे अस्तित्व शास्त्रवेद बाह्‌‌य मानले गेले नाही. श्रुतिसुध्दा त्यांचे जीवन विस्ताराने मानते. विद्वान सतत्‌‌ विरक्त होवून व्रजन करितात. त्यांच्यांत श्रेष्ठ व कनिष्ठ ब्राम्हणत्व नसते. ।।37।।

दिव्ये वा लौकिके वा किमपि न मनसश्चिन्तनं चापि सौख्ये।
स्वप्नेप्येवं जुगुप्सा वमनवदिह तद्गोग्यमात्रे च नित्यम्‌‌।।
भोग्ये पूर्णा विरक्तिः कृतसुकृतभराज्जन्मदुःखादनेकात्‌‌ ।
जन्मन्यस्मिंश्च जाता भवति स मतिमान्नयास एवाधिकारी ।।38।।
अर्थ— जो मतिमान्‌ असतो तो स्वर्गीय व लौकिक कोठल्याही प्रकारच्या सुखाची इच्छा करीत नाही. स्वप्नांत सुध्दा तो त्या भोगांची शिसारी येवून वमन करुन टाकतो. भोग भोगण्यांत त्याची पूर्णविरक्ति असते. अनेक जन्मांत सुखदुःख भोगल्यामुळे ह्‌या जन्मात त्याची फलप्राप्ती एखादी ठेव ठेवल्याप्रमाणे तो वापरतो. आणि अलिप्तपणे ते सुखदुःख भोगतो. ।।38।।

संन्यासो नैव केचिद्विहित इति कलौ ख्यापयन्ते वृथैव ।
संन्यासो भूमिकेयं बहुजननभवोदेति वैराग्यतश्च ।।
यस्मात्स्वाभाविकीयकृतसुकृतफला मुक्तिसोपानमार्गे।
प्रारब्धं तत्तोस्मात्प्रचलति हि कलौ “नैव शक्योपनेतुम“‌‌।।39।।
अर्थ— संन्यास हा विधिलिखित नाही, असे उगीचच ह्‌‌या कलियुगांत म्हटले जाते. अनेक जन्मांमधील संन्यासाच्या भूमिकेसाठी लागणारे वैराग्य एकत्रित होवून पूण्य उदित होते. त्या पासून मुक्तिच्या मार्गासाठी स्वाभाविकच पूर्वसुकृत फलांमुळे प्रवृत्ति निर्माण होते. त्यामुळे त्याचे प्रारब्धच कलियुगा मध्ये त्या विरक्तियुक्त संन्यस्त प्रवृत्तिला दूर करु शकत नाहीं. ।।39।।

दृष्टाः पूंर्व कुमाराःशुक इति च तथा शंकरोन्ये ततोस्मात्‌‌।
जाता बाल्याद्विरक्ता बहव इह यतो ज्ञानविज्ञानपूर्णाः ।।
ज्ञानं वैराग्यमेतत्समुदितमतुलं पूर्वसंस्कारयोगात्‌‌।
सूर्यश्चाहं मनुश्च श्रुतमिदमुदितं वामदेवेन गर्भे।।40।।
अर्थ— शुकदेव आद्यशंकराचार्य आदि बाल्यकालातच विरक्त झाले. बाल्यकालातच त्यांना ज्ञानविज्ञान परिपूर्ण अवगत झाले. पूर्वजन्मींच्या संस्कारांमुळेच त्यांना ज्ञान वैराग्य हे अतुलनीय प्रमाणांत प्राप्त झाले. सूर्यदेवाने ते ज्ञान सांगीतले, मनुने ते श्रुत केले. आणि वामदेवांने तर ते मातेच्या गर्भातच प्राप्त करुन घेतले. ।।40।।

ज्ञात्वा निःसारमेवं जगदखिलमितः प्रव्रजेद्यो विवेकी।
बाल्येशक्यं स गच्छेद्विधिरिति स तदा ह्याश्रमादाश्रमं च ।।
संन्यस्तो याज्ञवल्क्यः श्रुतिशिरसि यतो न्यास एवाति मुख्यः।
संन्यासः सर्वयत्नादधिगत यशसा साधनीयो विमुक्त्यै ।।41।।
अर्थ— जो विवेकी साधक हे सम्पूर्ण जगतच निःसार आहे, हे जाणून भ्रमण करतो आणि बाल्यकालांत जरी अशक्य असले तरी दैववशात्‌‌ तो ह्‌या आश्रमांतून त्या आश्रमांत भ्रमण करतो. याज्ञवल्क्य ऋषिंना पूर्वसुकृतामुळे सर्व वेदज्ञान प्राप्त झाले, आणि मुक्ति प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करुन त्यांना संन्यस्त जीवन लाभले.।।41।

रज्जवज्ञानेन सर्पो जनित इह यथाभाति मंदान्धकारे।
स्वात्माज्ञानात्तथास्याद्विविधविषयिणी वासना मंदबुध्दौ।।
सच्चित्सौख्ये स्वरुपे कथमपि न यतोन्यद्गवेत्स्वप्रतीत्या।
बुध्द्वा सम्यक्स्वरुपं निजसुखकवलास्वादतृप्तः परिव्राट।।42।।
अर्थ— ज्या प्रमाणे अंधारामध्ये दोरीला सर्प म्हणून घाबरावे, त्या प्रमाणे मंदबुध्दि असणार्‌यास हे जग भ्रामक वाटते आणि विविध विषयांमध्ये वासना उत्पन्न होवून आपल्या आत्मज्ञानाच्या मध्ये विसर पाडून मोहमय वाटते. जो परिव्राट म्हणजे संन्यासी असतो त्यास मात्र स्वरुप आत्मज्ञान असल्यामुळे त्या चित्‌‌सौख्या शिवाय कशातच सौख्य वाटत नाही. अर्थात आत्मानंदाची चव कळल्यामुळे तो त्यातच सदा संतुष्ट राहतो.

केषांचित्स्याद्विरक्तिः स्वयमिहविषये संचितादेव बाल्ये।
तेषां ज्ञानं च पश्वाद्‌गुरुचरणकृपा पांगसंगप्रसंगात्‌‌।।
पश्यन्तोन्यन्न किंचिज्जगति निजरुचा जन्मतो ज्ञानिनो ये।
तेषां नो गुर्वपेक्षा, निरतिशयसुखाः पूर्णतृप्ताः स्वसिध्दा।।43।।
अर्थ— कित्यक लोकांची एैहिक विषयांत विरक्ति असते म्हणजे त्यांत रसच नसतो. अर्थात्‌‌ तो पूर्वसंचितामुळे बाल्यकालातच विरक्त असतो. नंतर त्यांना गुरुचरणाचा आश्रय मिळून आत्मज्ञानाची प्राप्ती होते. इतरत्र कोठे असेही दृष्टिस पडते की कोणी ज्ञानी जन्मतःच एैहिक सुखांमध्ये उदासीन असतात. ते स्वयंसिध्दपणे त्या असीम आनंदांत संतृप्त असतात. त्यांना गुरुची सुध्दा अपेक्षा नसते. ।।43।।

बंधायासक्तचित्तं विषयविरहितं स्याच्चचितं विमुक्त्यै।
भोगेच्छा सैव बंधः श्रु़तिशिरसि यतस्तांस्त्यजन्मोक्षभागी।।
इच्छाविद्यैव साक्षात्तदपनयनतो जीवभवस्य नाशः।
दृष्टादृश्याद्वि बध्दो भवति च सुतरां दृश्यशून्ये विमुक्तः।।44।।
अर्थ— ह्‌या बध्द जीवनाकरितां आसक्तिपूर्ण जीवन कारण असते आणि मुक्ति करिता आसक्ती रहित कारणच आवश्यक असते. चित्त आसक्तिरहित हवे. भोग प्राप्त करण्याची इच्छा म्हणजेच बंधन आहे. आणि त्या इच्छेचा त्याग करितो तो मोक्ष प्राप्त करतो. इच्छा आणि अविद्येमुळेच ग्रसित झाल्यामुळेच जीवभाव उत्पन्न होवून मनुष्याचा नाश होतो. दृश्य म्हणजे भौतिक जग आणि ब्रम्हतत्वाचे न दिसणे (अदृश्यत्व) ह्‌यामुळेच जीव हा बध्द होतो. आणि ज्याला हे दिसत नाही अर्थात दृश्य जगताचा भ्रामकपणा भासत नाहीं तो विमुक्त होता. ।।44।।

त्यक्त्या द्वे नामरुपे जगत इह ततः शेषयित्वा स्वरुपम्‌‌।
सच्चित्सौख्याद्वयं यद्गवति स पुरुषो दृश्यशून्यो विमुक्तः।।
रज्जुःसर्पस्य बाधे स्वयमिह विगताशेषभावा यथास्ते।
तद्वत्स्यात्स्वीयरुपं व्यपगतसकलं सच्चिदानंदमात्रम्‌‌।। 45।।
अर्थ— भौतिक जगत्‌‌ आणि (दृश्यशून्य म्हणजे) आत्मस्वरुप हयांची दोन रुपें न बघता जो एकाच अद्वैत रुपांत बघतो त्यास सत्‌‌चित्‌‌ सौख्य ह्‌याच एक रुपाला बघतो तो दृश्यशून्य आणि मुक्त होय. रज्जुमध्ये सर्पाचा भास होता तो ज्या प्रमाणे त्याचे ज्ञान झाल्याने एकच भाव (कीं ही तर दोरी आहे )हा शिल्लक राहतो त्या प्रमाणे आत्मस्वरुपाचे ज्ञान झाल्यावर ह्‌या भ्रामक जगताचे अज्ञान भ्रान्ती दूर होवून फक्त एकमेव “सत्‌‌—चित्‌‌ सुख“ च शिल्लक राहते. ।।45।।

त्यक्त्वा कार्यस्य दृष्टिं सकलजगदधिष्ठानभूतं स्वरुपम्‌‌।
ज्ञात्वा तत्सर्वसाम्याद्‌‌व्रजति च परितः काशयन्सूर्यवद्यः।
नित्यानंदः परात्मा निरवधिरमलोसंगरुपः परिव्राट्‌‌
तस्मिन्सत्यस्य सत्ये जगदुखिलमिदं नाविंरासीन्न नश्येत्‌‌।।46।।
अर्थ— कार्याची दृष्टी सोडून सर्व जगताचे जे पायाभूत आधारस्थान म्हणजेच अविनाशी चिन्मयतत्व ह्‌‌‌याला जाणून, सूर्य ज्या प्रमाणे आपल्याभोवती प्रकाश फैलवून चमकतो तद्वत स्वतः भोवती हा ज्ञानसम्पन्न पण्डित आपल्या तेजाने झळकतो त्या सत्‌‌तत्वामधील सत्य तत्व जे आहे त्यामुळे अत्यंत अमर्याद, निर्मळ आणि मुक्त अश्या अवस्थेत ह्‌या जगतात दूषित होत नाही आणि नष्ट ही होत नाही. (अर्थात्‌ ते ज्ञान ) ।।46।।

त्वङ्‌‌‌निर्मोकात्स्वशक्त्या बहिरहिरिव ये लब्धबोधा व्रजन्ति।
ज्ञानाद्वैराग्यमेषां भवति विरतितो ज्ञानलाभः परेषाम्‌‌।।
पारिव्राज्यं द्विधा स्यान्नियमितमसां ज्ञानवैराग्यपूर्वम्‌‌।
देहाद्गेहात्ततः स्यात्सकलमिदमहं ब्रह्ममात्रैकरुपम्‌‌ ।।47।।
अर्थ— साप ज्या प्रमाणे आपली कात (कातडी) काढून टाकून नव्या रुपानें द्विगुणित तेजस्वी होवून फिरतो, त्याप्रमाणे हा परिव्राजक साधक आत्मतत्वाचा बोध झाल्यावर भ्रमण करतात. ह्‌‌यांच्या त्या ज्ञानाचा दूसर्‌यांना लाभ होतो. आणि हे त्या ज्ञानामुळे वैराग्यास प्राप्त होतात. ज्ञान आणि वैराग्यपूर्वक हे भ्रमण करितात तेंव्हा देहापासून आणि भौतिक मोहापासून त्यांना सर्वत्र “सकलं इंद्र ब्रह्मरुपम्‌‌“ असा बोध होतो. ।।47।।

त्यक्त्वादौ भोगवांच्छा त्यजति स मतिमान्सर्वभेदात्मदृष्टिम्‌‌।
भावाभावौ ततोस्माच्चलति न सुतरां धीर्दृढा निर्विकल्पात्‌‌ ।।
नो सत्यं नाप्यसत्यं किमपि न मनुते स्वात्ममात्रोद्वितीयः।
सर्वस्यैतस्यचात्मा जगति विजयते सच्चिदानंदमात्रः ।।48।।
अर्थ— सर्वांत प्रथम तो स्थिरधी विवेकी सर्व भोगांच्या इच्छेचा त्याग करतो. भाव आणि अभाव ह्‌यांतून त्याची विवेकी बुध्दि विचलित होत नाहीं. सत्य आणि असत्य असे कांहीच न विचार करता तो मात्र एकमेव अद्वितीय चित्‌‌तत्वय जाणतो. ह्‌या सर्वांमध्ये जगतात एक आत्मतत्वच विजयी भावाने विराजमान आहे असे तो जाणतो. ।।49।।

यत्रानन्दाश्च मोदाः प्रमुद इतिमुदा सर्व एते विशन्ति ।
ब्रह्मानन्देत्र सर्वे स्वयममलपदे पूर्णकामा भवन्ति।।
भिन्नं नाप्यभिन्नं किमपि न च ततःकस्यवैशिष्ट्‌‌यमेषाम्‌‌।
स्वीये सच्चिद्‌‌घने यत्सकलमुपशमं याति किं चान्यदस्मात्‌‌।।49।।
अर्थ— ज्या ठिकाणी हे सर्व मोद प्रमोद आनंद एमत्र होवून प्रविष्ट होतात, आणि स्वतःच निर्मलपणे ह्‌‌या ब्रह्मपदामध्ये विलीन होतात. कोणीच भिन्न किंवा अलगपणे भासत नाही, कुणाचेच वेगळे असे अस्तित्व नाही आणि सर्व कांही एकत्र एकमेव असे त्या ठिकाणी आनंदमय अक्षय तत्वच भासते. ।।49।।

जाल्मः कामोति दुष्टो मनुजमनुपदं बाधतेन्तर्निलीनः।
सोढुं शक्तोनुको नो सकृदपि मनुते भोगतोस्माद्विमोकम्‌‌।।
व्याधेर्नाशाय यद्वद्वयुपचरति तथा काममोहस्य तापः।।
शाम्येद्गोगेन मत्वा बत विषयमतः पामरोयोत्र भुङ्‌‌क्ते।।50।।
अर्थ— दुष्ट असा कामविकार मनुष्याला अंतरमनामध्ये क्रुरपणे बाधा पोहोचवितो. सुरुवातीला मनुंष्याला असे वाटते की आपण ह्‌‌याला सोडूं शकू परंतु हा ज्या प्रमाणे औषधोपचार करुं म्हणून एखाधी व्याधी बघावी तो ती वाढतेच तसे उपभोगाने ह्‌याचे शमन न होता हा वृध्दिंगतच होतो. ।।50।।

कामःशाभ्येन्न भोगादितिगदितमतो बुध्दिमेति प्रयत्नात्‌‌ ।
अग्निर्यावांश्च भूयान्घृत इह पतिते कामतृध्दिस्तथा स्यात्‌‌।।
भोगैर्वृध्दश्चकामः पुनरपि च ततो भोग एवात्र भूयान्‌‌।
शाभ्येन्नेैवास्य तृष्णा मृगजलत इतो नैव यत्नोपिपि शान्तः।। 51।।
अर्थ— प्रयत्न केल्यानंतर आपल्याला हे पटते कीं ”कामविकार हा भोग प्राप्त करुन शान्त होत नाहीं”, असे जे म्हणटले जाते ते खरे आहे. अग्निमध्ये तुपाच्या आहुती देत गेल्यावर त्याचे शमन न होता त्या जास्तच भडकत जातात तद्‌‌वतच कामवृध्दि होते. भोग देत गेल्याने कामाची वृध्दि होते आणि भोगेच्छा बळावते आणि ज्या प्रमाणे मृगजळाने तृष्णा शान्त होत नाही त्याप्रमाणे भोगेच्छा यत्नांनी शान्त होत नाहीत. ।।51।।

भुमौ यावध्दिरण्यं पशुयुवतिजना धान्यमेतत्समस्तं ।
क्र्रोडीकृत्यायथ दत्तं निखिलमपि च तन्नालमेकस्य तृप्त्यै।।
मत्वा चित्तस्य शान्त्यै शममतिसुखदं ह्याव्रजेद्यो विवेकी।
वाक्यं निर्दुष्टमेतद्वदति मनुरहोनावमन्येत जातु ।।52।।
अर्थ— मनुष्याला एकट्‌‌याला जरी ह्‌‌या जगांतील जमीनीतल सर्व सोने, घोडे आदि पशु करोडोंच्या संख्येने युवती, नोकर—चाकर, आणि अमाप धान्य जरी दिले तरी त्याला संतुष्टी प्राप्त होणार नाही. परंतु जो विवेकी साधक चित्तशांतिसाठी मनोनियंत्रण (शम) करुन अत्यंत आनंदाने भ्रमण करतो (समाधानी असतो.) हे वाक्य अत्यंत पावन आणि निर्मल असे संन्यासी म्हणतात. आणि सांगतात की कधीही ह्‌यास अवमानू नये. ं।।52।।

यश्वैतान्प्राप्नुयाद्वै जगति च सकलान्केवलान्यस्त्यजेत्तान्‌‌।
भोगानां प्रापणात्स्यान्मनुरिह मनुते त्याग एषां वरिष्ठः।।
यस्यात्कामस्य सौख्यं जगति यदपि तत्स्वर्गसौख्यं च दिव्यं।
सौख्यं तृष्णायक्षयाद्यद्गवति न च कला षोडशी तस्य तत्स्यात्‌‌।।53।।
अर्थ— वरील सांगीतलेले सर्व भौतिक भोग जरी प्राप्त झाले तरी त्यांचा त्याग करावा. कारण विवेकी हे जाणतो की त्यांच्या भोगाचा जो आनंद असतो तो त्यांच्या त्यागाच्या आनंदापेक्षा श्रेष्ठ नसतो. त्यागामुळेच संतोष व आनंद मिळतो. भोगत्यागाच्या आनंदाच्या सोळाव्या कले इतका पण भोग प्राप्तीचा आनंद नसतो. स्वर्ग सुखाचा आनंद पण त्यापेक्षा श्रेष्ठ नसतो।

आस्ते मूर्तिर्यथैकात्वभिनवघटिता सर्व सौन्दर्यरुपा।
जाता मृत्कर्पटाद्यैर्निजकुटिलदृशा मोहयन्ती जनानाम्‌‌।।
निःसारा भोगलब्धौ नयनमतिहरा दूरतोतीव रम्या।
दुर्गन्धद्रव्यपूर्णा ह्यशुभतनुरहो तद्वदेवातिहेया।।54।।
अर्थ— अतिशय सुंदर आणि मोहक अशी एखादी मूर्ति माती, कपडा आदि तुच्छ वस्तुंपासून बनवलेली असते. आणि अतिशय नयन मनोहर असून दुरुनच सुंदर दिसते. मात्र तिच्यापासून खरे सुख खरा भोगलाभ होत नाहीं. त्याच प्रमाणे आपली नरतनु सुध्दा अत्यंत त्याज्य व दुर्गंधीयुक्त पदार्थांनी भरलेली आहे. आणि अत्यंत तिरस्करणीय आहे. ।।54।।

जित्वा सर्वाणियत्नाज्जयति यदि न चेदिंद्रियं चैकमस्मात्‌‌।
प्रज्ञा तेनैव साकं क्षरति निमिषतो वारि यावद्‌‌दृतेर्वेै।।
तस्मादादौ जयेत्तत्परममतियुतो यन्मनः सर्वमुख्यं।
पश्चात्सर्वेंद्रियाणि स्वयमिह हि वशे स्वानुभूत्या भवन्ति। ।।55।।
अर्थ— जर सर्व प्रयत्नांनी इंद्रियांस जिंकता आले नाही तर जसे पाणी चट्‌‌कन आपल्या स्थानावरुन ढळून जाते तशी आपली बुध्दि भ्रष्ट होते म्हणून सर्वप्रथम ते मन कीं जे अतिशय दृढतेने मोहामुळे भौतिक विषयांत गुंतलेले असते, त्यास प्रामुख्याने ताब्यांत ध्यावे म्हणजे तदनंतर बाकी सर्व इंन्द्रिये आपणहूनच आपल्या अनुभूतिमुळे ताब्यांत येतात. ।।55।।

कंडूं कंडूयमानामतिशयसुखदां मन्यमानोपि नेच्छेत्‌‌
तत्प्राप्त्यर्थं न यत्नः कुरुत इति तथा स्यान्न तद्वासनापि ।।
तद्वज्ज्ञात्वेंद्रियोत्थं सुखमपि न च तत्कामयेद्यो विवेकी।
कंडतिग्रस्तचित्तो बत किमुतसुखी धान्य एवं कृती च ।।56।।
अर्थ— खाज येण्यार्‌या जागेवर त्या रोगी माणसाने खाजविल्यामुळे त्या घटकेला जरी सुखद वाटत असेल तरी खाजवू नये. त्या सुखासाठी त्याने प्रयत्न करु नये, त्याच प्रमाणे समजून इन्द्रियवासना उफाळल्यावर विवेकी साधकाने त्याची इच्छा करुं नये. खरुज (चर्मरोग) झालेल्या माणसाला त्या खजविण्याच्या कृतीने कोंडा प्राप्त झाल्यावर कोठून सुख मिळेल ? ।।56।।

त्यक्त्वा लौल्यं च कर्माण्युपरतित इतो भोगशून्यो विरक्तः ।
जित्वा विघ्नानशेषानविकृतमनसा नित्यसौख्यात्मदृष्ट्‌या।।
नित्यं ब्रह्माहमेकं निजगुरुवचसा भावयित्वानुभ्ूात्या।
श्रध्दायुक्तो मुमुक्षुर्निरतिशयसुखस्वात्मतुष्टः कृती स्यात्‌‌।।57।।
अर्थ— भौतिक सुखाचा आनंद घेवून आपल्या इंन्द्रियांचे लाड न पुरविता निर्मोही विरक्त साधक आपल्या नियंत्रित मनाने अक्षयसुखप्रदायक आपल्या आत्मसुखाचीच अभिलाषा धरुन आपल्या गुरुवचनांवर श्रध्दा ठेवतो. “अहं ब्रह्मास्मि“ हे वचन आनंदाने स्वानुभूतिने समजून घेतो. आणि अपरंपार अश्या आत्मसुखाची अनुभूति घेवून गुरुवचन—पालनाची अनुभूति घेतो. ।।57।।

यत्प्रीत्या प्रीतिपात्रं सकलमपि नृणां तद्गवेदात्मरुपं।
आत्मार्थ स्त्री तथा स्यात्पतिरपि च ततो द्रव्यपुत्रादिकं यत्‌‌।।
स्विये देहेपि तद्वन्निजमनसि मतौ प्रीतिरात्मार्थमेव।
प्रोयान्यत्स्वात्मभानं त्वहमिति किमुत स्वात्मरुपं यदस्ति।।58।।
अर्थ—ज्या प्रीतिमुळे पति,पत्नि,पुत्र,द्रव्य, गृह आदि आणि आपला देह सुध्दा इच्छिला जातों ते सर्व आत्मसुखासाठीच आहे. हे सर्व प्रेय म्हणजे ऐहिक सुखासाठी आहे. आणि स्वतःचे भान उत्पन्न झाल्यावर “अहं अस्मि“ मी माझे अस्तित्व वाटते, तर मग हे स्वात्मरुप च असते नाही तर काय ? ।।58।।

यावद्यस्मिन्प्रियत्वं प्रभवति खलु तत्सौख्यदं वस्तुतावत्‌‌।
सर्वस्मात्प्रीतिरात्मन्यधिकविषयिका श्रेष्ठसौख्यं स्वतःस्यात्‌‌।।
दातुं भोक्तुं स्वरुपेैहमि न च किमपि स्वात्मनोन्यद्यतस्तत्‌‌।
सर्वस्माच्छे्रष्ठसौख्यं स्वयमिह निखिले स्वार्चिषैवेति साक्षात्‌‌।।59।।
अर्थ— जो पर्यंत एखाद्या वस्तुपासून सौख्य प्राप्त होते तो पर्यंत ती वस्तु प्रिय वाटते. स्वतःमध्येच सर्वश्रेष्ठ सुख असते जे दूसर्‌‌या सर्व वस्तुंमध्ये नसते. (ते सर्व कनिष्ठच असते) सर्वात श्रेष्ठ सौख्य म्हणजे आपल्या आत्मस्वरुपाची ओळख पटणे आणि तेंव्हा ते आत्मरुप प्रज्वलित होणे हे आहे.।।59।।

दृश्यं यद्‌‌बाह्यसृष्टौ विशदयति निजं मिन्नभिन्नाकृतेस्तत्‌‌।
पश्येश्चक्षुस्तथेदं विदितमिह भवेश्चेतसा तन्मनोपि।।
बुध्दिर्जानाति बुध्द्या चपलमन इदं वेत्ति यत्स्वेन भासा।
बुद्वेःसाक्षी स्वतोर्चिस्तमस इति तथाहं कृतेस्तत्वयं हि।।60।।
अर्थ— हे निरनिराळे रुप घेवून जी सृष्टी आपल्या चर्मचक्षूंना दिसते ते रुप आमचे चित्त व मन ग्रहण करते आणि बुध्दि त्याचा बोध करुन घेते. चपल मन आपल्या भासाने ग्रहण करते. बुध्दि आपल्या साक्षीभावाने तमस आणि अज्ञानान्धकार याचा नाश करुन प्रकाशित होते तेच हे आत्मज्ञान. ।।60।।

अन्यत्स्वस्माद्यदेवं जनितमिति च तन्नाशमभ्येति पश्चात्‌‌।
को वा बुध्येत्स्वनाशं जनमति च यदावेन्न तस्यास्ति नाशः।।
नाशो यस्मान्नमेस्य स्वजनिरपि तथा जातमेवेह नश्येत्‌‌।
नित्यं सश्चित्सुखैकं सकलतनुषु यद्‌‌ब्रह्म तेनाहमद्वा।।61।।
अर्थ— अन्य जे उत्पन्न होते ह्‌या जगांत ते नाश पावते. आणि हे कोण जाणतो कीं आपला जन्म केव्हां होतो ती वेळ आपण स्वतः जाणत नाहीं ।आणि मृत्य केंव्हा येणार हे पण ज्ञान आम्हास होत नाही, ज्यामूळे आमचा नाशपण होत नाहीं आणि जन्म घेऊन उप्तन्नपण होत नाही, ते आम्हास ज्ञात होन नाहीं जे चित्सौख्यआहे जे अविनाशी आहे, आणि सर्व प्राणीमात्रांत उपस्थित असून ते ब्रम्हतत्व चित्सौख्य अविनाशी व निश्चित आहे. ।।61।।

ब्रह्यैवाग्रे सदेकं सकलमिदमहोवेत्तदेवाहमेवं।
स्वात्मानं तत्तोैस्मादभवदिति यतः खल्विदं ब्रह्य तस्मात्‌‌।।
देेवानां वा ऋषीणां तदभवदिति यस्तन्नृणां प्रत्यबुध्यत्‌‌।
तद्‌ब्रह्मैवाहमस्मीत्यनुभवउदिते ब्रह्म सोत्र भुतेर्वाक्‌‌।।62।।
अर्थ— सर्वप्रथम आदितत्व ब्रह्मच होते. सकल प्राणीमात्रांमध्ये जो मी म्हणून अस्तित्वाचा बोध आहे, ते ब्रह्मतत्वच आहे. स्वतःपासून जे उत्पन्न झाले ते आणि आपल्यामध्ये जे अहं तत्व आहे ते सर्व ब्रह्मच आहे. वेदवाणी आम्हास हेच सांगते की ”ब्रह्मैवाहमस्मि” जे कांही आहे त्यांत ब्रह्मतत्वच भरलेले आहे. ऋषि आणि देव ह्‌‌यांना जो बोध झाला, त्यामुळे मानवांना हा बोध झाला. आपल्या अनुभूति मधून ”ब्रह्मच मी आहे असे प्रकाशित झाले अशी वेदवाणी आहे. ।।62।।

नाम्नाहं स्वात्मरुपं यदभवदिति तत्स्वेेच्छया स्वीयशक्त्या।
सर्वास्वेतासु संस्थं त्वहमिति तनुषु स्वेन भासा स्वमात्रम्‌‌।।
यःकोप्यामंत्रितःसन्नहमिति वदति स्वीयनामेति तस्मात्‌‌।
भूमात्मैकोेहमेवं व्यवहृति विधये भिन्नरुपैर्युतोपि ।।63।।
अर्थ— मी माझ्‌या स्वेच्छेने सर्वप्राणी मात्रांमध्ये भिन्न भिन्न रुपाने प्रकट झालो असून निरनिराळ्‌या नावाने त्यांस स्वतःचा आभास निर्माण झाला आहे. जेंव्हा कोणास त्याच्या नावाने हाक मारली जाते, संबोधित केले जाते तेंव्हा त्यास जो बोध होतो तो मीच त्या तत्वामध्ये असतो आणि ब्रह्म अथवा ”भूमा” त्या—त्या शरीराशी एकरुप होवून सुध्दा भिन्न भिन्न रुपांमध्ये व्यवहार करतो. ।।63।।

सर्वेष्वेतेषु देहेष्वहमहमिति यः स्वेन रुपेण भाति।
प्राक्सर्वस्मात्स एकः स्वयमिह न तथान्यन्न किंचित्तदानीम्‌‌।।
एकाकी नैव रेमेपरमति न तथापश्यदत्रात्मनः सः।
वमावामेन भूत्वा स्वयमभवदयं पूरुषो दक्षिणेन ।।64।।
अर्थ— ह्‌‌‌या सर्वभूतमात्रांमध्ये मीच “अहं“ तत्वाने आभासित होत आहे. आदिकालांत मी एकटाच ह्‌‌या सर्वांच्या पूर्वी अस्तित्वांत होतो आणि अन्य कांहींच तत्व नव्हते, आणि मला एकाकी पणांत रममाण झाल्यासारखे वाटले नाहीं. मी दूसरे कांहींच अनुभूत केले नाही. माझ्‌‌या शिवाय सर्व रिक्तच होते. नंतर मीच पुरुष आणि प्रकृति असे दोन बरोबरीचे आणि वेगळ्‌या प्रकारचे तत्वरुप घेतले. ।।64।।

प्रागेकाकी स भूत्वा विषयमनुसरन्काम्यमानोत्र जायां।
पुत्रं वित्तंच सर्वं ह्ययुपकरणमथो कर्म कुर्वंस्तदर्थम्‌‌।।
एका लाभेप्य कृत्स्नो मनुत इति तथा नान्यदस्माद्वरिष्ठं।
क्लेशान्प्राणावशेषान्सहत इति ततो भूय एवात्र मुग्धः।।65।।
अर्थ— पूर्वी तो (ब्रह्मरुप भूमा) एकाकी असे स्वतःला समजून विषयांना अनुसरुन भौतिक आनंद—विषयांसाठी त्या—त्या कल्पनेनुसार पुत्र—दारा—धन आदि ची प्राप्ती साठी तदनुसार ते ते कर्म व तत्प्राप्त्यर्थ ते ते उपकरण निर्माता झाला. एका लाभामध्येच पूर्ण कृतकृत्य मानून दूसरा कोठलाही लाभ ह्‌‌यापेक्षा श्रेष्ठ नाहीं असे समजून मनुष्य त्या मोहांत प्राणांतिक दुःख भोगून सुध्दा पुनः—पुनः ह्‌यातच मोहमय विषयातच मुग्ध होवून राहतो. ।।65।।

अस्मच्छब्दो यथ्ैाव प्रचलति च तथा सर्व लिंगेषु युष्मत्‌‌।
त्वं वाहं भानतोयं सकलवपुषि यो लिंगशून्योद्वयः सः।।
नकारो ना विकारो निजनिरतिशयादात्मरुपं हि सर्वं ।
का नारी को नरः स्यादहह जगदिदं दुःखमूलं विमौैढ्‌‌यात्‌‌।।66।।
अर्थ— अहं म्हणजे “मी“ शब्द जसे आपणासांठी आणि “तू“ म्हणजे इतर सर्वांसाठी तो कल्पितो (अर्थात आप पर हा भाव) हा मूल भाव आहे. आणि जो सर्व प्राणीमात्रांमध्ये “आत्मरुप“ जे आपल्यांत आहे, तेच मानतो त्यास नर, नारी आदि सर्व कांही अद्वय रुपानेच भासते. आणि हा भेदभावच ह्‌‌या अखिल जगताचे दुःख मूल कारण आहे, हे तो जाणतो. ।।66।।

साक्षी सर्वस्य भूमा सकलजगदधिष्ठानरुपोतिविश्वः ।
सर्वास्वेतासु नित्यं ह्ययमिति तनुषु स्वीयरुपेण भाति।।
सर्वत्राद्वैतरुपो जनिमृतिरहितो नामरुपाद्विमुक्तः।
चिद्र्रूपः प्रत्यगात्मा प्रकृतिविकृतिभिर्नानुलिप्तस्त्वसंगः।।67।।
अर्थ— ह्‌या सर्व विश्वाचा तसेच त्याही अति पलिकडचा सर्व अतिविश्वाचा पार्श्वभूमिवरील चालक असा “भूमा“ साक्षी भावाने सर्व प्राणिमात्रांमध्ये विराजतो, शोभून दिसतो, नामरुपापासून विहित, जन्म मृत्यु पासून मुक्त चिरस्वरुप असून प्रकृति—विकृति पासून अलिप्त आणि असंग मुक्त असतो. ।।67।।

जाग्रब्दाल्याद्यवस्थास्वहमिति सततं व्येति तन्नैव यस्मात्‌‌।
भिन्नस्ताभ्योविकारी विलसति सकलेष्वेव देहेषु पूणर्ः।।।
बुद्वेः साक्षी स्वयं यः सद्‌सदिदमहो भासयान्निर्विशेषः ।
सर्वेष्वेतेष्वयोग्निप्रतिम इह सदा स्वेन रुपेण दीप्तः।।68।।
अर्थ—जागृतावस्था, बाल्यावस्था मध्ये “मी“ अहं म्हणून जो असतो, अनुभव घेतो, तो (आत्मतत्वरुप) सतत त्याच विदित अश्या (जाणणे मी आहे असे वाटणे) अवस्थेत निर्लेप आणि चिरपरिचित असतो. सर्व सकल देहरुप प्राण्यांमध्ये तो असाच विराजमान असतो. बुध्दिमुळे तो स्वतः साक्षीरुपाने विदित असतो. चांगला किंवा वाईट भाव स्वतःच जाणतो, आणि अग्नि ज्याप्रमाणे स्वतःच प्रकाशरुपाने प्रकट होतो त्या प्रमाणे आमच्या शरीरांत हा स्वतः. ज्ञानरुपाने प्रकट होतो. ।।68।।

ईशावास्यं श्रुतेर्वाग्जगदखिलमिदं नेहनानास्ति किंचित्‌‌।
मृत्योराप्नोति मृत्युं जगदखिलमिदं यस्तु नानेव पश्येत्‌‌।।
बह्मैवेदं वरिष्ठं भवति च सकलं विश्वमेतत्स्वयं यत्‌‌।
आंर्त स्याद्यत्ततोन्यच्छ्रतिगदितमिदं भेदतो भीश्चः मृत्युः।।69।।
अर्थ— ईशावास्योपनिषद्‌‌ अर्थात वेद द्वारा हे जगत्‌नानात्वदृष्टया जरी भिन्न दिसत असले तरी ते एकच आत्मतत्वाने गुंफले गेले आहे. सर्वांभूति एकच आत्मतत्व आहे. मृत्यु प्राप्त करुन हे सर्वच प्राणी विनाशी आहेत. जो ब्रह्मतत्व जाणतो तो सर्वतः श्रेष्ठ म्हटला जातो. जो मृत्यु आदि दुःखाने भयभीत असतो तो वेदवाणी द्वारा अज्ञानी घोषित केला गेला आहे. ।।69।।

ज्ञात्वा देवं तथेवं तरति भवमिमं मुच्यते सर्वपाशेैः।
पंथा नान्योतिमृत्यं नयति यत इतो विद्यते नायनाय।।
ज्ञानादेवामृतत्वं भवति न पुनरावर्तते पूर्णकामः।
प्राणाः क्र्रामान्ति नैव क्वचन न गमनं तस्य यः स्याद्विमुक्तः।।70।।
अर्थ— सर्वमोहपाशापासून मुक्त होवून तेच ज्ञानी साधक ह्‌‌या मर्त्य जगतापासून मुक्त होतात, तरुन जातात, त्याच ज्ञानी साधकाला पुनर्जन्माच्या त्या दूसर्‌यामार्गाला ते नेत नाहीं. दूसरा कोठला मार्ग असा नाहीं कीं जो मृत्युपलीकडे परमधामाला नेईल, ज्ञान प्राप्तीनेच अमृतत्व प्राप्त होते. त्यामुळे संतुष्ट झालेला पुनर्जन्माला येत नाहीं. जो सर्वमोहपाशापासून मुक्त झाला त्याचे प्राण कोठेच पुनर्गमन(जन्माला) करीत नाहींत ।।70।।

भोक्तव्यं ज्ञस्य नास्ति स्वयमिहहि यतः पूर्णआनंदरुपः ।
सर्वत्रावस्थितायं स्वयमनतिशयः कुत्र गच्छेत्किमर्थम्‌‌।।
अज्ञो देहात्मबुध्द्या विविध विषयतः कर्तृभोक्तृत्वमेत्य।
कर्माधोध्वर्ंच भोक्तुं जनित इति भवेध्द्यासतः स्वच्छयैव।।71।।
अर्थ— तो ज्ञानी ह्‌या जगांत कोठलाही भोग प्राप्त करुन घेण्याची इच्छा करीत नाहीं कारण तो स्वतःच निरतिशय आनंदात मग्न असतो. आत्मरुपांत आनंदी असतो त्यामुळे तो दूसरे काय शोधणार ? त्याला सर्वत्रच असीम रुपांत आनंद मिळतो. अज्ञ मनुष्य स्वेच्छेनेच विविध वासनांची इच्छा करुन सर्व दिशांना भटकत असतो, आणि देहात्म—बुध्दिने जन्म मरणाच्या फेर्‌यात फिरत राहतो. ।।71।।

क्षीयन्तस्मिंश्च दृष्टे श्रुतमिहहि यतः सर्वकर्माणि चास्य।
कर्मप्राप्तं सुखं यत्तदपनयनतो नित्यसौख्यं हि विद्वान।।
नो शोको जन्मदुःखं मरणमपि तथानन्दमात्रात्मनोस्य।
ज्ञात्वा ब्रह्मैक्यमेत्य स्वयमिति स यतिःकेवलो निर्विकल्पः।।72।।
अर्थ— श्रुति अर्थात्‌ वेद सांगतात कीं तो ज्ञानी कोठल्याच कामनेने ग्रस्त न असल्याने त्यास कर्मफल लिप्त होत नाहीं. कर्मापासून मिळणारे सुख त्यास तितकेसे महत्वपूर्ण वाटत नाहीं. तर केवळ आत्मानंदसुखच तो इच्छितो. त्यामुळे त्यास कोठलेच सुख दुःख आणि जन्ममरणरुपी भय पण वाटत नाहीं. तो केवळ आत्म्याशी एकरुप होवून त्या अनुभूतिचाच आनंद प्राप्त करतों. ।।72।।

मत्वा सौख्यं स्वतोन्यत्तदनधिगमतो दुःखरुपौत्र जीवः।
ज्ञाते तत्वे स भूमा स्वयमितिहि सुखं नैव दुःखं सुखस्य।।
जतं क्षीयेतसाक्षी स्वयमिह सकलं वेत्ति यः सोविनाशी।
सौख्यं यत्स्वात्मनोन्यज्जनिमृतिमदहो स्वात्मसौख्यं नतावत्‌‌।।73।।
अर्थ— स्वात्मसुखाशिवाय अन्य कारणाने सुखप्राप्ती होईल असे समजून जीव दुःखी होतो. सुखाचे जे मुख्य स्त्रोत जो “भूमा“ अर्थात ब्रह्मतत्व ह्‌याचे ज्ञान झााल्यावर सुखा मधून दुःख प्राप्त होत नाहीं. जन्मला तो मरणारच असे तो जाणतो. ते जाणणारा साक्षी (आत्मतत्व) हे पण जाणतो की सकल विश्वसुध्दा नश्वर आहे. तो हे जाणतो की बाकी जन्म मरणपूर्ण हे विनाशी सुख त्या आत्मतत्वाप्रमाणे अविनाशी आणि चिरसौख्य देणारे नाहीं ।।73।।

द्र्रष्टा दृश्याद्विभिन्नः श्रुति शिरसीयताश्चिद्‌‌घनः स्वेन भासा।
द्रष्टुर्दृष्टेर्न लोपो यदि भवति ततः केवले किं ततोन्यत्‌‌।।
यत्रान्यत्स्यात्तदल्पं निजनिरवधितो यत्र नान्यत्स भूमा।
द्र्रष्टत्वे जीव एवं जनिमृतिरहितः शाश्वतानंद एव ।।74।।
अर्थ— ज्या प्रमाणे आकाशांतील विद्युत मेघांमध्ये स्वतः प्रकाशित होते, त्या प्रमाणे हा आत्मा दृष्टा (प्रेक्षक, साक्षी, बघणारा) म्हणून आपल्या आनंदमय हृदयामध्ये प्रकट होतो, आणि जे दृश्य असते, त्यापासून तो वेगळा रहात असतो. दृश्य नसतांना ज्याचा लोप होत नाही ते तत्व ह्‌या ब्र्रह्मतत्वाशिवाय काय बरं असते ? जर दूसरे कांही असले तर ते अल्पकालीन असून जे अक्षय अविनाशी तत्व असते ते “भूमा“ असे आहे. द्र्रष्टा म्हणून जे जीवतत्व आहे ते जन्म मरणरहित अविनाशी तत्व आहे. ।।74।।

ज्ञात्वा बुध्देः परोहं सततमिति च तत्स्वात्मरुपं हि बुध्वा।
जह्यात्कामं स्वदृष्टया वदति यदुपतिः स्वात्मसौख्याय नित्यम्‌‌।।
निर्दोषं ब्रह्म नित्यं सममिहसकलेस्मिन्स्थितास्ते च मुक्ताः।
कस्मातैः प्रेत्यजीवन्निहहि जित इति श्रीपतिः सर्ग आह ।।75।।
अर्थ— “सततच बुध्दिच्या पलीकडील आत्मस्वरुप अश्या मला जाणून काम आदि वासनांचा त्याग करावा“ असे साक्षात्‌‌ भगवान्‌ कृष्ण सांगतात. त्यामुळे आत्मसौख्य प्राप्त होते. जे सतत ह्‌या निष्कलंक ब्र्रह्मतत्वामध्ये स्थित असतात, रममाण होतात ते मुक्त होतात. त्यांना कशासाठी पुन्हा या जगांत यावे असे वाटणार ? ह्‌‌याच जीवनांत ते पुनर्जन्माला जिंकून अमर होतात. हे श्रीकृष्णाच्या महाकाव्यावरुन दिसून येते।।75।।

विक्षेपो नांस्ति यस्मान्मम न तत इह स्यात्समाधिः कदापि ।
विक्षेपो वा समाधिर्मनस इति न मे निर्विकल्पोहमात्मा।।
नो कुर्वे कारयेपि स्वयमिह जगतः साक्ष्यतः स्वस्थ आसे।
स्वात्मानं वेद्यि यस्मादुुपनिषदि मतं चावधूतेन गीतम्‌‌।।76।।
अर्थ— ज्यामध्ये चित्त विभ्रम नसतो तो भाव, आणि ज्या समाधीमध्ये पण विभ्रम नसतो तेंव्हा निर्विकल्प अशा भावाने मी स्थित असतो. तेंव्हां साक्षीरुपाने अहं ह्‌‌या भावाने उपस्थित असतो. मी साक्षी भावाने विराजमान असतो आणि कोठलेही कार्य करीत नाही, किंवा ते करवीत नाहीं. अवधूत गीतेमध्ये हे स्पष्ट केले आहे कीं स्वरुप आत्म्याला ”मी” जाणतो असे उपनिषदात सांगीतले आहे. ।।76।।

ज्ञात्वा स्वात्मानमेवं निजजनवनितावित्तपुत्रैषणायाः।
व्युत्थाय ब्राह्मणास्ते श्रुतिरिह तनुते भैक्षमेवाश्रयन्ते।।
जक्षन्क्र्रीडंश्च यानैर्युवतिभिरथवा न स्मरे तच्छरीरं।
सर्वत्रायकायरुपं विमलसुखधनं वीक्षते ज्ञः स्वरुपम्‌‌।।77।।
अर्थ— स्वात्मज्ञान प्राप्त झाल्यावर ते ब्राम्हण स्वतःचे स्वजन स्त्री,पुत्र वित्त आदि कामनांचा त्याग करुन त्यापासून वर उठतात आणि भिक्षान्नावरच निर्वाह करतात. खात असतांना, क्रीडा करीत असतांना वाहनांमधून भ्रमण करीत असतांना युवती समूहामधून गेले तरी त्यांचे त्यांजकडे लक्ष्य नसते. त्यांच्या शरीराकडे बघून सुध्दां त्यांना सर्वत्र निर्मळ असे आत्मतत्वच दृष्टिस पड़ते. अत्यंत पवित्र असे ज्ञात झालेले स्वरुपच दृष्टिस पडते. ।।77।।

देहात्मज्ञोविवेकी मनुत इह यतोध्यासतो देहदृष्टया।
नामाकारान्गुणान्यः पुरुष इति च वा स्त्री नं तस्यात्मदृष्टीः।।
यद्वन्मूढस्य भायाद्वपुरिति सततं तद्वदेवात्मदृग्यः।
तस्यैकं निर्विकारं निरतिशय सुखं सर्वतश्चित्स्वरुपम्‌‌।।78।।
अर्थ— अविवेकी देहात्मदृष्टीने सर्वकांही देह म्हणूनच विचार करतो. नांव आकार आणि गुणांमुळे सर्वकांही पुरुष किंवा स्त्री असाच विचार करतो. त्या बद्‌‌दल त्याची आत्मबुध्दि नसते. ह्‌या उलट आत्मज्ञानी सर्वकांही आत्मबुध्दिनेच विचार करतो. त्यास सर्वकाही निर्विकार निरतिशयसुखमय सर्वत्र चित्स्वरुपच भासते.।।78।।

प्राक्पश्चादस्ति कुंभाद्‌‌गगनमिदमहोश्लिष्टमेवं पृथग्यत्‌‌।
कुंभोत्पत्तावपीह व्यवहृति समये सर्वदा सर्वतश्च।।
सर्वत्रैवेह तद्वश्च्यलनविरहितं सर्वदा चित्सुखं यत्‌‌।
तिष्ठन्क्र्रीडंश्च गच्छन्मनुत इति सदा स्वीयरुपं परिव्राद्‌‌।।79।।
अर्थ— ज्या प्रमाणे घटामध्ये आकाश हे आंत आणि बाहेर पण आहे, असे दिसते, त्याप्रमाणेच ते त्यापासून अगदी अलिप्तपण दिसते. (तद्वत ते आकाश घट फुटल्यावर सर्वत्र एकरुपच दिसते. अगदी त्याच प्रमाणे परिव्राजक जो आत्मज्ञान संपन्न असतो, त्यास ब्रम्हचैचत्य हे सर्वत्र असीम रुपाने दर्शन देते. उभे असतांना भ्रमण करतांना, जात असतांना सर्वत्र सदाच त्याला आत्मस्वरुपाचे दर्शन होते.।।79।।

तावत्सर्वे तरंगा अतिशयतरला रुपतो भान्ति भिन्नाः।
यावन्न ज्ञातमेतत्सकलमपि जलं भेदशून्यं स्वमात्रम्‌‌।।
ज्ञानी पाथस्तरंगान्वयवदिहसदा सर्वमात्वैव पश्यन्‌‌।
आस्ते ब्रम्हैव भूत्वा ह्यविकृतमनिशं केवलं चित्सुखं यत्‌‌।।80।।
अर्थ— जो पर्यंत सागरांतील सर्व जलराशि एकच आहे हे ज्ञात होत नाही तो पर्यंत हे सर्व तरंग व लाटा पाण्यापेक्षा वेगळया भासतात. त्या प्रमाणे ज्ञानी जलांमधील लाटांप्रमाणेच सर्वांस आत्मबुध्दिने आपल्या सारखेच जाणतो. अत्यंत असीम आणि चित्सुखच त्याला ब्रम्हीभूत अक्षयस्वरुपांत अवस्था प्राप्त झाल्यावर प्राप्त होते. ।।80।।

ज्ञात्वा सर्वेषु भूतेष्वहमिति सततं नो जुगुप्सेत विद्वान।
यस्मिन्सर्वांणि भूतान्यहमिहहि यदाभूत्तदा जानतोस्य।।
पार्थक्यं नापि तेम्यः क्वचिदपि न च तच्चिंतन भिन्नदृष्टया।
स्यात्को मोहश्चशोकः श्रुतिगदितमिदं स्वीयमेकत्वदृष्टेः ।।81।।
अर्थ— विद्वान सर्वत्र पाणीमात्रांमध्ये अहं तत्वच उपस्थित असते असे जाणून कुणाचीही घृणा करीत नाही, आणि सर्वांमध्ये माझ्‌यांतील ब्रह्मांशासारखेच तत्व आहे, हे जाणून त्यापासून कांहीच भेदभाव असणारी दृष्टी न ठेवता त्या बद्‌‌दल वेगळे चिंतन करीत नाही. वेदोक्त एकच आत्मदृष्टी ठेवून त्याला शोक आणि मोह कोठला असणार ?।।81।।

भूतस्थात्मानमेवं भ्रमरहितमनाः सर्वभूतानि विद्वान।
स्वात्मन्येवात्र पश्यन्बृहदिति परमं याति नान्येन जातु।।
कैवल्ये दत्तदृष्टीः स हि भवदिति यद्‌‌भूतमेवं भविष्यत्‌‌।
ज्ञात्वा भूमानमेवं सकलमिदमहं मन्यतेसौ परिव्राट्‌‌।।82।।
अर्थ— विद्वान मनुष्य सर्वत्र प्राणीमात्रांमधील आत्मतत्व कधीही चुकुन सुध्दा त्या परमात्म तत्वाहून वेगळे असे मानीत नाहीं. त्या ब्रह्मतत्वावर अर्थात कैवल्य प्राप्तीवर सतत दृष्टी ठेवून तो सन्यासी त्रिकाली तेच एक(कैवल्य) प्राप्तव्य आहे, असे जाणून ह्‌या जीवनाकडे बघतो. ।।82।।

तद्‌‌ब्रह्मैवाहमस्मीत्यनुभव उदिते सर्वभेदप्रमोक्षः।
जीवन्मुक्तस्तुरीयो भ्रमरहित हृदा स्वात्मसौख्यावशिष्टः।।
रागद्वेषौ न कामः क्वचिदपि न तथा भेदबुद्विश्च तस्मिन्‌‌।
भायाद्वाप्यत्र तिष्ठेत्सकलमपि हुतं स्वात्मरुपे चिदग्नौ।।83।।
अर्थ— त्या वेळेस “ब्रह्मैव अहं“ मीच ब्रह्म आहे, असे ज्ञान उदय झाल्यावर भ्रमरहित अशा मनाने जीवन्मुक्त होवून त्या वेगळयाच आनंदांत त्याचे मन तरंगु लागते. (तुरीय अवस्था) आणि केवळ आनंदमयच अवस्था प्राप्त होते. राग, द्वेष, काम आदि कोठलाच विकार मनाला दूषित करीत नाहीं. एकच चित्स्वरुप अनुभूतिचा जणू यज्ञच प्रज्वलित होतो. त्यांत सर्व भौतिक प्रत्यक्ष किंवा प्रतिबिंबित भासणार्‌‌या सर्वत्र भावनांचा स्वाहाकार करुन हवन करतो. ।।83।।

रुपं रुपं च भूत्वा सकल तनुषु यः प्राविशत्सोद्वयः स्यात्‌‌।
“सुक्ते“ दृष्टं च संर्व पुरुष इति ततः का च नारी नरः कः।।
अज्ञानी नैव जानन्विषयसुखकृते प्रेक्षते भेदभावान्‌‌।
ब्रह्मज्ञानी परिव्राट्‌‌ विषयविरंतितो भिन्नभावातिरिक्तः ।।84।।
अर्थ— निरनिराळे रुप आकार घेवून वेगवेगळया प्राणीमात्रांमध्ये तो परमात्मा आत्मरुपाने प्रविष्ट होतो, अर्थात हेच अद्वय तत्व जाणून वेंदांतील सुक्तांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे कोण स्त्री आणि कोण पुरुष हा काय भेद? अर्थात एकच असे समजून ब्रह्मज्ञानी राहतो. त्या उलट अज्ञानी माणूस विषयांपासून सुख प्राप्त करण्यासाठी नर आणि नारी ह्‌‌यांना भेददृष्टीने पाहतो. ब्रह्मज्ञानी संन्यासी विरक्त असल्याने भेदभाव दृष्टी ठेवत नाहीं. ।।84।।

यस्मान्नैवा परं वापरमिति च तथास्तीह किंचिच्छ्रतेर्वाग्‌‌।
ज्यायो नागीय एवं न च भवति ततस्त्वेष रुद्रोत्रै सर्वः।।
श्रेष्ठःको वा कनिष्ठः पुरुष इति तथा स्त्री न कोप्यत्र भेदः।
एको निष्कंप आत्मा श्रुतिमथितमहश्चित्सुखं ब्रह्मभिक्षूः।।85।।
अर्थ— ज्यांत श्रेष्ठ व कनिष्ठ कांहींच नसते असे वेदवाणी सांगते त्याच प्रमाणे वृध्द किंवा नामांकित नसते, सर्वत्र भीषण भयंकरच (दुःखदायक परणामाचे असते) श्रेष्ठ—कनिष्ठ स्त्री पुरुष असा कांहीच भेद नसतो तर त्या ब्रह्म—भिक्षुसाठी सर्ववेदांचे जे सार ते एकच अक्षयसुखरुप असे एकच निश्चल आत्मतत्व असते.।।85।।

सच्चत्यच्चाभवद्यन्नगनगरनरारामतोपि स्वयं तत्‌‌।
यद्‌भूतं यश्च भव्यं भवदिति सकलं नैव भिन्नं यतोस्मात्‌‌।।
वस्त्रे जिज्ञास्यमाने भवति किल यथा सूत्रमात्रावशेषं।
कार्ये जिज्ञास्यमाने श्रुति शिरसिमतं खल्विदं ब्रह्मभिक्षुः।।86।।
अर्थ— पर्वत, नगर, मनुष्य ह्‌‌यांत पाहिल्यास सर्वत्र तसे ब्रह्मरुपच ज्ञात होते. जे होवून गेलेले आहे. जो आहे आणि जे होणार आहे, त्यांत पण त्याच्याशिवाय दूसरे तत्व नाहीं. एकाद्या वस्त्रांमध्ये पाहुं गेल्यास जसे सर्वत्र सूतच दृष्टीस पडते, सूतच विणले गेले आहे, हे दिसते, त्याप्रमाणे ब्रह्मतत्व समजलेल्या भिक्षुला सर्वत्र ब्रह्मचैतन्यच दृष्टीस पडते, असे श्रुति आम्हाला सांगते ।।86।।

एकः सन्भिद्यते यस्तनुकरणमनो धर्मजात्यादि भेदात्‌‌।
भ्रान्त्यैवेत्थं स एकः स्वयमिह बहुधा जायतेजायमानः।।
इन्द्रो मायाभिरेवं भवति निगमावाङ्‌‌नेह नानास्ति किंचित्‌‌।
दृष्टव्योत्रैक धैवत्वज इति सततंनामतो रुपतोपि ।।87।।
अर्थ— शरीर मन धर्म आदि भेदांमुळे तो एकच परमात्मा वेग—वेगळ्‌या रुपांत भ्रांतीमुळे उत्पन्न झालेला दिसतो. आज तो अजन्मा असून सुध्दा जन्मल्याप्रमाणे भासतो. इन्द्र अर्थात्‌‌ जल सुध्दा मायावी रुपामुळे वेगवेगळ्‌‌या रुपांत (मेघ—वर्षा—जल—हिम आदि रुपांत) आपल्या नैपुण्याने धैवत्वज दृष्टीस पडतो. ।।87।।

अग्रे ज्ञानं यदासीत्तदनुगतमिदं सर्वतः स्वेन भासा।
कार्यं तावज्जडं स्यादनुभव इति यो ज्ञानरुपः स सर्वः।।
कार्यं वातावज्जडं वा विदितमिह यतो ज्ञानरुपेण सर्वं।
कार्यं स्यात्कारणं चित्स्वयमिह न ततो भिन्नमेतत्स्वतोस्ति।।।88।।

चिद्वीदं सर्वमेवं श्रुतिषु निगदितं नानृतं तत्कदाचित्‌‌।
न स्याज्ज्ञानातिरिक्तं विदितमिह यतो ज्ञानमात्रं हि कार्यम्‌‌।।
कार्यं यज्ज्ञानरुपं चिदिति लसति तन्नाद्वितीयेत्र तिष्ठेत।
भिन्नत्वं वा बहुत्वं जनिमृतिरथवा भोग्यभोक्तृत्वमन्यत्‌‌।।89।।
अर्थ—पुढे जे ज्ञान सांगीतले आहे ते आपल्या अनुभवानुसार आहे. कार्य तसे जडच म्हाटले जाते, पण अनुभवाने जे ज्ञात होते ते ज्ञानरुप असते. कार्य जड आहे, पण कारण चित्स्वरुप आहे तर कार्य हे भिन्नरुप असते. चित्‌‌ हेच सर्वकाहीं असे वेदांमध्ये म्हटले आहे. ते असत्य नाही. ज्ञानाशिवाय दूसरे कांहीही (पवित्र) नाहीं, तेच एक कार्य आहे. कार्य जे ज्ञानरुप आहे ते चित्‌ म्हणजे अविनाशी असे प्रकाशित होवून शोभीवंत होते. ते दूसर्‌यां कश्यातच स्थित नसे. भिन्नत्व, बहुत्वं म्हणजे निरनिराळ्‌या रुपाने दृष्टीस पडणारे तसेच जन्म—मृत्यु रुपाने तसेच भोग आणि भोक्ता हे द्वैतरुपाने असते. ।।88।।89।।

स्वस्मिन्सर्वस्य पूर्वं सम्रुदितमहमित्येव सर्व ततस्तत्‌‌।
कार्यंचैत्यं जडं वा विदितमिह भवेज्ज्ञेयरुपं च दृश्यम्‌‌।।
पूर्व सर्वस्य यत्स्यात्प्रभवति सुतरां कारणं ह्यद्वयं तत्‌‌।
तप्त्वैकोहं बहुस्यां भवति च सकलं नान्यदेतत्ततोस्मात्‌‌ ।।90।।
अर्थ— सर्वप्रथम “अहं“ हेच एक तत्व माझे माझ्‌यातच होते. जे कांही कार्य जड अथवा जाणले जाणारे आहे, ते जाणणारा (दृष्टा) आणि दृश्य असे नंतर झाले. सर्वांच्या उत्पत्तिच्या पूर्वी “एकोहं बहुस्याम“ असे ब्रह्मत्वांत स्फुरण झाले. आणि अद्वय असे एकच एक चित्स्वरुप हे कारण झाले. ।।90।।

शून्यं न प्रस्फुरेत्तत्वहमिति न तथाज्ञानमेवं जडं वा।
चैतन्यस्यैव भानं प्रविदितमिह तत्सर्वपूर्वं स्वमात्रम्‌‌ ।।
यत्स्यात्सर्वस्य पूर्वं निरतिशयसुखं स्वप्रभं केवलं सत्‌‌।
स्वात्मानं ब्रह्मचावेत्तदहमिति ततः सर्वमेतच्छ्रुतेर्वाक्‌‌।।91।।
अर्थ— शून्यामधून “अहं“ मी आहे असे स्मरण होवू शकत नाहीं. तसेच जड आणि अज्ञान ह्‌याचे पण स्फुरण होवूं शकत नाही. चैतन्यासच सगळ्‌यांत आधी (अहं अस्मि) असे स्फुरण होवू शकते. व हे भान स्वतःचे स्वतःलाच असते. सर्वात पूर्वी आदि समयांत असीम असे आनंदमय असे “सत्‌ तत्व“ स्वयंप्रकाशित होते. आणि असे. आमचे वेद आणि श्रुति सांगतात कीं आपल्या आत्मतत्वाचाच बोध “मी आहे“ हा अहंकार रुपाने विदित झाला. ।।91।।

“तप्त्वा“ शब्देन नासज्जडमिपि न तथा सश्चिदेवात्रं हेतुः।
यस्यस्याज्ज्ञानमेवं तप इति गदितं सर्वकार्यं चितःस्यात्‌‌।।
एकं ज्ञानं विशुध्दं समभवदिति यज्ज्ञानमेवेदमग्रे।
मध्याद्यन्तेषु कार्यं चिदिति तत इदं नैवमस्माद्विभिन्नम्‌‌।।92।।
अर्थ— तप्त्वा अर्थात तापल्यावर गरम झाल्यावर असा अर्थ ”जड असल्या पदार्थाचे आपोआप तापणे” हा होत नाही, तसेच सत्‌‌चित्‌‌ हे केवळ कारण नाही तर तप ह्‌याचा अर्थ केवळ ज्ञान हाच आहे. आणि सर्व कार्य ”चित्‌‌” अविनाशी तत्वापासूनच झाले आहे. सर्वप्रथम अग्रकाले विशुध्द एक ज्ञानच उत्पन्न झाले आणि विदित झाले. आदि मध्य आणि अन्ति हे चित्‌ असेच कार्य असल्याने ते त्या चित्‌‌ तत्वापासून भिन्न म्हणजे वेगळे नाहीं. ते अहं असे ज्ञानच होय. ।।92।।

यस्माज्जातं तदेवं भवित किल ततो भिन्नमीषन्न कार्यं।
कार्यें स्वार्चिः स हेतुस्त्वविकृतमनिशं स्वीयशक्त्या ह्‌‌‌युदेति।।
पूर्णं तत्पूर्णमेतद्‌द्वयरहितमितः पूर्णमादाय पुर्णं।
चिद्रूपं सर्वमेवं यदि भवति तदा निर्विकल्पं स्वयं तत्‌‌ ।।93।।
अर्थ— ज्या पासून उत्पन्न झाले तेच ते (त्याच प्रकारचे) उत्पन्न झाले त्या पासुन तेे कार्य वेगळे नाहीं. ते स्वतःच्या प्रकाशाने तेजाने उत्पन्न झाले. ज्यापासून उत्पन्न झाले ते कारणच स्वतः अविकृत स्वयं सिध्द आहे. ते कारण उत्स्फूर्त स्वतः विकसित झालें आहे. ते स्वतः पूर्ण असून त्यापासून उत्पन्न झालेले कार्य ही पूर्णच आहे, तरीही ते अखण्डच आहे. हे सर्व चिद्रूप अविनाशी असले तरी उद्‌‌गम कारण अखण्ड व अविनाशीच आहे. शुध्द ज्ञान आहे. ।।93।।

कस्मिन्ज्ञाते च सर्वं विदितमिह भवेहृह्म तत्स्वात्मरुपं।
तज्जं तल्लीनमेवं तदनितिसकलं खल्विदं ब्रह्म तस्मात्‌‌।।
एकीकृत्येदमेवं विविधपरिणतं कार्यमात्रं परस्मिन्‌‌।
दृश्यं नीत्वात्वदृश्यं चिदिति सुखघनं पद्यते ब्रह्मभिक्षुः।।94।।
अर्थ— काय जाणल्यामुळे ते आत्मस्वरुप ब्रम्ह आम्ही जाणले असे होईल? त्या पासून निर्माण झाले त्यातच ते लीन होणार आणि ते मात्र कशातच नाहीं. जे त्यापासून आहेत ते मात्र सर्व बम्हतत्वच आहे. ह्‌या सर्व विविध कार्याला एकत्रित दृष्टीने जाणून ब्रम्हसन्यासी ह्‌‌या सर्व भौतिक तत्वांना त्या अदृष्य ब्रम्हतत्वामध्ये परिणत करुन अक्षय सुख प्राप्त करतो. ।।94।।

यश्चित्तस्तन्मयःस्यात्क्र्रतुमयपुरुषो ब्रम्हमत्वा तदेकं।
क्षीरे क्षीरे यथा तज्जलमिति च जले शुध्दमासित्कनेवम्‌‌।।
तहृह्याप्येति विद्वान्‌श्रुतिरिहतनुते स्यन्द्रमानश्चः नद्यः।
हित्वा स्वं नामरुपे जलनिधिसलिलेस्तं प्रयान्तीह यद्वत्‌‌।।95।।
अर्थ— ज्याचे चित्त एकाच संकल्पाने न्हाउन निघाले आहे। (भिजलेले सिक्त झालेले आहे.) सर्वांभूति ब्रम्हतत्व बघण्याची ज्याची दृष्टी झालेली आहे त्याला ज्याप्रमाणे वेगाने वाहणार्‌या सर्व नद्या आपले नीवं रुप समाप्त करुन शेवटी सागरालाच मिळतात व त्यात विलीन होतात। तद्‌‌‌‌‌वत्‌‌ आमचे वेदांमधील ज्ञान ह्‌याच प्रकारे सर्व भैतिक जगतांचा सर्वे जगतांचा लय त्या ब्रम्हतत्वातच आहे असे सांगते.।।।95।।

यद्वद्रज्ज्वावशिष्ठो भवति च भुजगो देशिकोक्त्या तथैतत्‌‌।
कार्यं ब्रह्मावशिष्ठं विविधपरिणतं सचितानंदमात्रम्‌‌।।
यस्यैवं नैव कार्यं करणमपि तथा विद्यतेभूद्गविष्यत।
तद्‌ब्रह्मायं परिव्राट्‌‌ निजगुरुवचसा काशते काशतेत्र।।96।।
अर्थ— जो पर्यंत दोरीला पाहून सर्पाचा भ्रम होतो तो पर्यंत तो भास दूर होत नाहीं. जेव्हा उपदेशक आम्हास ज्ञान देवून त्या भ्रमापासून दूर करतो तेव्हांच ते कळते की ही दोरी आहे. त्या प्रमाणे निजगुरुचे वचनानेच ही सर्व भौतिक विविध रुपाने नटलेली सृष्टी केवळ सच्चिदानंद रुप आहे हे संन्यासी साधकाला समजते. भूत काळांत आणि भविष्यकाळांत सुध्दा हे कार्य आणि कारण भ्रामक नाहीं. ।।96।।

सर्पो नैवास्ति रज्जुर्भुजग इति च सा रज्जुरत्रार्थ एकः।
रज्जौ सर्पस्य बाधः क्र्रियत इति ततस्तद्वदेवात्र भून्मि।।
कार्यं ब्रम्हैव वास्मिन्किमपि न च तथा ब्रम्हाणि स्याद्धिकार्यं।
एकोर्थो ब्रम्हचात्र स्वयमिह सततं केवलं नान्यदस्मात्‌‌।।97।।
अर्थ— रज्जु ही सर्प नाहीं. भ्रमाने ती सर्पाप्रमाणे भासत होती. हा एकच अर्थ आहे. दोरीवर सर्पाचा भ्रम उत्पन्न झाला होता तद्वतच इथे “भूमा“ ह्‌या ब्रम्हतत्वावर आम्हाला ह्‌या मिथ्या भौतिक जगताचा भ्रम झालेला आहे. येथे एक चित्‌‌स्वरुपच आहे. दूसरे काही कार्य नाही. येथे त्या एकाच एक ब्रम्हतत्वाशिवाय दूसरे कांही नाहीं ।।97।।

तत्सत्यं यत्त्रिकाले निजनिरतिशयादेकरुपं स्वपूर्णं।
जातं नो वा मृतं यत्क्कचिदपि न कदा नो विकारश्च यस्मिन।
नित्यानंन्दात्मकं यत्स्वयमतिविमलं ज्ञानमात्रं ह्यनन्तं।
भिन्नं यस्मिन्न किंचिज्जनितमथ वसेश्चैकमेवाद्वयं यत्‌‌।।98।।
अर्थ—सत्‌‌ तत्व आहे जे तिन्हीं काळांत अखण्डरुपाने विशाल रुपात स्थित आहे. ते अजन्मा अमर आणि अविकारी आहे. ते नित्य आनंदमय, निर्मल आणि ज्ञानमात्र आहे. ते अनन्त असून त्यापासून दूसरे कांही त्याला खण्डित करुन उत्पन्न झालेले नसून ते स्वतः अद्वयच आहे. ।।98।।

अग्रेैद्वैते न चासीदसदपि न च सन्नेश्वरो वा तदानीं।
नासीद्वैराजरुपं महदपि न तथा भूम्नि जीवो रजो वा।।
नाकाशो वायुरग्निर्जलमपि पृथिवी संसृतिर्नैव विश्वं।
क्वानन्दे कस्य शर्मन्प्रलयजलमहो किं भवेदावरीवः।।99।।
अर्थ— ह्‌या सत्‌ तत्वापूर्वी कांहीही असत्‌ आणि अशाश्वत असे नव्हते. ह्‌या भूमा तत्वामध्यें कांहीही रजोगुणरुप किंवा महत्‌सुध्दा कांहीही नव्हते. पृथ्वी, आप, तेज, वायु आणि संसृति आदि कांहीही नव्हतेे. कशाच्याही वेगवान प्रवाहात कांहीही श्रेष्ठ किंवा वरचढ नव्हते. कोठलाही आनंद वेगळया रुपांत नव्हता. ।।99।।

नो मृत्युर्नोैमृतत्वंं दिनमपि रजनी नो तथा सूर्यचन्द्रौ।
स्वे नैवानीदवांत किमपि न च ततोन्यत्तदेकं तदासीत्‌‌।।
सृष्टेःपूर्व यथा तघ्द्यविकृतमधुना वर्तते तावदेवं।
एतद्‌ब्रह्माविदित्वा कृपण इति भवेत्प्रैति यो मूढबुद्गिः।।100।।
अर्थ— मृत्यु किंवा अमरतत्व तसेच सूर्य—चन्द्र दिवस रात्र असे काहींच नव्हते. स्वात्मरुपानेच ते निर्वात तथा एकमेव ब्रह्म होते. सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी ते जे अविकृत होते, ते आता मात्र मढबुध्दिमुळे ब्रह्मतत्वास न जाणल्यामुळे असहाय्‌य स्थितिस पोहोचले आहे. ।।100।।

ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्याम्यहृमिति च वदत्बंधमोक्षस्य हेतुं।
सन्नौसन्नाषि तद्वद्वदति यदुपतिर्ब्रह्म चानादि मद्यत।।
नाशौ नैवाव्ययस्य क्वचन भवति वा कोपि कर्तुं समर्थः।
स्वाधारं नोपजीव्यं विदलयति यतः काशते काशतेत्र ।।101।।
अर्थ— बन्ध आणि मोक्षाचे जे कारण जाणण्यास योग्य आहे ते मी आता सांगतो. यदुपति भगवान्‌ श्रीकृष्णांनी म्हणटले आहे सत्‌‌ आणि असत्‌ हे माझ्‌‌या अनादि अशा अजन्मापूर्वी काही नव्हते. अव्यय अशा तत्वाचा नाश करण्यास कोण समर्थ आहे ? जे कुणावरही आधारित नाहीं आणि जे कुणावरही उपजीव्य (अवलंबून) नाहीं अश्याचा काय नाश होणार ? ते स्वतःच स्वयं प्रकाशी असून तेजाने झळकत आहे. ।।101।।

अद्वैते कार्यमेतन्मनुत इति यदाध्यस्यते भ्रान्तिरेषा।
मिथ्या भ्रान्तेस्तदानीं ह्यविकृतमनिशं स्यादधिष्ठानमेकम्‌‌।।
ब्रह्मादौ मध्यतोन्ते भवति यत इदं ब्रह्ममात्रं हि कार्यं।
नाधिष्ठानात्कदापि क्वचिदपि च भवेद्गिन्नतातारोपितस्य ।।102।।
अर्थ— जेव्हां भौतिक जड ( अध्यसित वस्तूमये ) भ्रान्तीरुपाने हे भौतिक तत्व वेगळेवेगळे आभासित होत असले तरी त्यांत एकच अद्वैत तत्वच अधिष्ठित असते, असे मानले पाहिजे. ह्‌या भ्रान्तीपासून सुध्दा ते अद्वैत तत्व अविकारीच राहते. ह्‌या सर्व जगत्कार्यामध्ये आदि मध्य आणि अन्त ह्‌या भागांत एकमात्र ब्रह्मकार्यच अंतरभूत असते. ।।102।।

नाभावः स्यात्सतो यत्सहज इति ग ततोभाव एवासतःस्यात्‌‌।
नादित्येस्त्यंधकारोसदपि सति तथा वर्तते नो कदाचित्‌‌।।
कुर्यादद्वैतबुध्दिं द्वयमिह न यतो वेदवाक्यं हिताय।
खल्वेतद्‌ब्रह्म सर्वं तदिहमहमिति ब्रह्म विंदते विद्वान ।।103।।
अर्थ— सत्‌स्वरुपाचा अभाव नसेल आणि सहजपणेच असत्‌ ह्‌ा प्रकारचा पण अभाव असेल. सूर्यप्रकाश असेल तेथे अंधःकार असेल आणि असत्‌ पण तेथे नसेल. एक अद्वैत ज्ञानच (बुध्दि) असेल त्या ठिकाणी द्वैत भाव नसेल. हे वेदवाक्यच हितकर आहे. विद्वानाने हे जाणले पाहिजे कि हे सर्व ब्रम्हच आहे आणि मी ब्रम्हच आहे. सत्‌तत्व जाणल्यावर के सर्व जग त्या परम तत्वावरच अधिष्ठित आहे. हे तो जाणतो. शिंपल्यामध्ये चांदीचा भास होतो तो ज्याप्रमाणे मिथ्या असतो, त्या प्रमाणे हे जग विविध भौतिक रुपांत भ्रमाने भासते, पण ते खरे म्हणजे ब्रम्हरुपच असते. ।।103।।

ज्ञाते सत्येपिधत्ते जगदिति तदधिष्ठानभूवेत्र भूम्नि।
रौप्यं शुक्तौ यथा स्याज्जगदिति न ततः खल्विदं ब्रम्ह सर्वम्‌‌।।
यद्यद्वीक्षेत विद्वान्निजनिरतिशयात्स्वीयरुपं प्रपश्येत्‌‌।
चित्सौख्यात्मस्वरुपे सकल जगदिदं नास्ति नासीद्गवेन्नो।।104।।
अर्थ— विद्ववान जे जे रुप बघतो ते आपल्याच अतिशय विशाल अश्या परब्रम्हस्वरुप आत्मरुपातच बघतो. शाश्वत आत्मसौख्याच्या रुपांत हे सकल जग नाही, नव्हते आणि नसेल. (हे निश्चित आह)े. ।।104।।

स्वाज्ञानज्ञानहेतू जगदुदयलयौ सर्वसाधारणौ स्तः।
आजीव स्वर्णगर्भं श्रुतय इति जगुर्हूयते च प्रबोधे।।
बंधो मोक्षश्च माया जगदिदमखिलं चापि जीवेशभेदः।
रज्ज्वज्ञाने यथाहि स्तदुपरि न तथा रज्जुबोधे च तिष्ठत्‌‌।।105।।
अर्थ— सर्व साधारण माणसाला आपल्या अज्ञानामुळे ह्‌या जगाच्या उदयाचा आधि विलयाचा भास होतो. श्रुति अर्थात वेद हे आपल्या गर्भात जे स्वर्णीम ज्ञान साठवून आहेत ते ज्ञान ह्‌या अज्ञानाला जिंकण्यासाठी आपल्याला पुकारत आहेत. बंध आणि मोक्ष, माया, जगत हे सर्व त्या जीवेशाचेच भेद आहेत. ज्या प्रमाणे रज्जु (दोरी) ही अज्ञानाने सर्प भासते आणि भयभीत करते परंतु जेंव्हा ते भासमात्र अज्ञान दूर होते तेंव्हा ती फक्त ती दोरीच आहे, हे समजते।। 105।।

पश्यन्पूर्णात्मरुपं सकलजगदिदं शोक मोहाद्यतीतः।
शुध्दं ब्रह्माध्यगच्छन्निजनिरतिशयात्पूर्णकामः परिव्राट।।
विस्मृत्य स्थूलसूक्ष्मे निखिलमपि च तत्स्वावृतेः कार्यभूतं।
जीवन्मुक्तस्तुरीयं पदमधिगतवान्‌ शान्तमद्वैतरुपम्‌‌।।106।।
अर्थ— शोक आणि मोहापासून दूर गेलेले अर्थात तदव्यतिरिक्त हे सकल जगत्‌‌ जाणून ब्रह्मज्ञानी सन्यासी आपल्या शुध्द परब्रम्हाला जाणून अत्यंत संतुष्ट होवून राहतो. स्थूल आणि सूक्ष्मरुपाने आपल्या सभोवार कर्मार्पासून उत्पन्न झालेले सर्व काहीं भौतिक जगत विसरुन तो जीवन्मुक्त अवस्था प्राप्त करुन शान्त अद्वैत अश्या आनंदाचा आस्वाद घेत तुरीय अवस्थेत पोहचतो. ।।106।।

सर्वत्रानन्दरुपं प्रसृतमिह सदा निस्तरंगाब्धिवद्यत्‌‌।
सत्तामात्रस्वरुपं चिदमलविभवं सर्वदेवैकरुपम्‌‌।।
सर्वेनन्दन्तु जीवा अधिगतयशसा स्वीयसच्चित्सुखाब्धौ।
पूर्णानन्दाः स्म एवेत्यविरतमधुना सन्तु शान्ताच्च तृप्ताः।।107।।
अर्थ— सर्वत्र आनंद पाझरत आहे आणि लहरीवाचून असा शान्त समुद्र (विशाल रुपात आहे), तद्वत एकरस अत्यन्त निर्मल, विकारहीन फक्त स्वतःचेच अस्तित्व विदित होवून आनंदाच्या सागरांत प्रफुल्लित होवून आणि डुबक्या लावून सर्व जीव प्रमुदित होहोवोत प्रफुल्ल होत्साता असे डुबक्या लावून सर्व जीव प्रमुदित होवोत. स्वतःच्या चिरसुखात्मक आनंदांत सतत अखण्ड उल्हासित होवोत. शान्ति प्राप्त करोत. शांतीने तृप्त होवोत.

सर्वानर्थातिदूरं श्रुतिशिरसि मतं मंगलं मंगलानां।
सर्वत्राद्वैतरुपं सकल जगदधिष्ठानभूतं वरेण्यम्‌‌।।
स्मर्त्रे स्वैक्यं वितन्वन्निरवधिविमल सर्वसौभाग्यरुपं।
मायाविद्यादिहीनं सुखघनमनिशं ब्रह्म तत्सर्वदाहम्‌‌ ।।108।।
अर्थ— सर्व अनर्थापासून अति दूर, वेदांमध्ये जे ”श्रेष्ठ” वर्णिले गेले आहे, ते मंगलामधीलपण अतिमंगल, सकल विश्वाचे आधारभूत, अद्वैतरुपाने जे वरण करण्यास (निवडकरण्यास) अत्यंत योग्य, स्मृति शास्त्रांत स्वयंभू सर्वत्र प्रकाशित झालेले, अत्यंत निर्मल अविकारी, सर्व सौभाग्यस्वरुप माया, अविद्या आदिपासून मुक्त, सुखाने परिपूर्ण जणू मेघच, जे स्वतः परमतत्व आहे ते परब्रम्हतत्व मीच आहे, “अहं ब्रम्हास्मि“ ।।108।।

।। इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यसद्‌‌गुरुभगवता।।
।।श्री श्रीधरस्वामिना विरचितं परिव्राड्‌‌‌ हृदयं सम्पूर्णम्‌‌।।

home-last-sec-img