Literature

पौष वद्य द्वादशी

 एका राज्यामध्ये अनेक विभाग, अनेक अधिकारी, अनेक कारकुन व शिपाई असताना ते सर्व आपापली कामे करीत असतात. परंतु या सर्वांच्या कार्याचा उद्देश एकच असतो व त्या सर्वांना प्रेरक एकटा राजाच असतो. ते सर्व त्याच्या आज्ञेने कार्य करीत असतात. राज्यरक्षणाच्या एकमेव उद्देशाने प्रेरित होऊन राजा त्या सर्वांना कामे वाटून देत असतो. त्याचप्रमाणे सृष्टिकर्ताही आपल्या इच्छेप्रमाणे जगातील सर्व व्यवहार चालवित असतो. यावरून जगातील सर्व व्यवहार मिथ्या आहेत असे कसे म्हणता येईल ? तसेच ते सर्व सत्य आहेत असे समजणेही चुकच. यामुळे कोणता निर्णय घ्यावयाचा याबद्दल शंका निर्माण होते. जगातील सर्व व्यवहार एकत्व संपादन्यासाठीच होत असतात. सर्व गुमास्त्यांची कामे भिन्न भिन्न असली तरी ती एकाच उद्देशाने प्रेरित असतात. त्याप्रमाणेच जगातील सर्व व्यवहार एकत्व साधण्यासाठी आहेत असे उमजून घेतल्यास सत्य व मिथ्या यांनी गुंतागुंत नाहिशी होईल. सर्व प्राणिमात्रामध्ये परमात्मा ‘मी’ या रूपाने असतोच हे सत्य जाणून निवृत्ती किंवा प्रवृत्ति मार्गाने योग्य तो जगव्यवहार केला पाहिजे. निरनिराळी कर्तव्यकर्मे करीत असता त्या सर्वांचे एकमात्र, एकमेव स्वरूप विचारता येणार नाही. जगरूपी नाटकात निरनिराळी पात्रे संदर्भानुरूप निरनिराळ्या भुमिका करीत असतात. त्यावेळेस अनुभवास येणारी सुख-दुःखे भासमान म्हणजेच मिथ्या आहेत हे न विसरल्यास सत्यत्वाचे दर्शन घडेल.

 *श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img