Literature

पौष वद्य सप्तमी

 मूळपुरूषाचा डावा भाग म्हणजे स्त्री व उजवा भाग म्हणजे  पुरुष म्हणजेच ते प्रकृती-पुरूष होत. प्रथम अव्यक्त असतो, नंतर त्यांनी व्यक्त स्वरूप धारण केले. प्रकृतीच्या ( स्त्रीच्या ) गर्भात पिंडोत्पत्ती होऊन वाढत असता तो अव्यक्त होता व जगद्ऱूपी बालकाला जन्म दिल्यानंतर तो व्यक्त स्वरूप झाला. *’ गृहिणी गृहमुच्यते ‘* असे म्हटले जाते. गृहास कारण गृहिणी तसेच जगतास प्रकृती कारण आहे. तीच परमात्म्याची सृष्टी होय. सृष्टीमध्ये वृष्टी व समष्टी असे दोनभाग असले तरी ते एकमेकापासून भिन्न नाहीत. संसार म्हणजे समष्टी व त्यातील व्यक्ति म्हणजे वृष्टी होय.

      तत्त्वदृष्टीने विचार करून स्त्री-पुरूषाने परस्परांकडे आत्मरूपतेने पाहून व्यवहार केल्यास ते मोक्षप्रद प्राप्त करू शकतात. म्हणजेच एकरूप होऊ शकतात. 

     ज्यांची जाणीव झाल्यावर इतर काहीही जाणण्यासारखे शिल्लक रहात नाही असे जे आत्मज्ञान आहे ते सर्व गोष्टींचा पाया आहे ते जाणून घेण्यासाठी मानवाने प्रयत्नशील असले पाहिजे. 

     परमात्मसृष्टीकडे भिन्न व अभिन्न या दोन्ही दृष्टींनी पहाणे शक्य आहे. परंतु या दृष्टीत कोणती दृष्टी तात्त्विक आहे याचा विचार करावा लागेल.

 *श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img