योगी इच्छाशक्तीच्या बळावर एखाद्या पदार्थाविषयी मन केंद्रित करून त्या पदार्थाची शक्ती वाढवू शकतो किंवा ती संपूर्ण शक्तीच नाहीशी करतो. त्याचप्रमाणे अणुबाॅम्बची शक्ती वाढवू शकेल किंवा नष्टही करू शकेल.
चैतन्यामध्ये शक्तिसामर्थ्य आहे. चैतन्य म्हणजेच शक्ती. कोणत्याही पदार्थात शक्ती आहे असे म्हणणे ही एक कल्पना असून ती कल्पनाच त्या पदार्थात शक्ती निर्माण करीत असते. अध्यात्मनिष्ठेने साधना केल्यास मानव भौतिक साधनेने मिळणाऱ्या सामर्थ्यापेक्षा प्रबलतर सामर्थ्य उत्पन्न करू शकेल. अद्यापि यामध्ये थोडा तर तम भाव आहे. खरे पाहिले तर अध्यात्मिक शक्ती आधिभौतिक शक्तीचा नाश करून तिला निष्क्रिय करू शकते. पण आधिभौतिक शक्तीचा अध्यात्मिक शक्तीवर कोणताच परिणाम होत नाही. म्हणूनच ‘ सर्व वर्ज्य करून आत्मरूप जाणून घ्या ! आत्मस्वरूपाचे ज्ञान हे हा भवसागर तरून जाण्यासाठी सेतुरूप आहे. त्यामुळे तुम्हाला अविनाशी तत्त्वाची प्राप्ती होईल ‘ असे श्रुतींनी म्हटले आहे.
‘ मी ‘ असे जे निजस्मृतिलक्ष्य तेंच चैतन्यरूपी परमात्मस्वरूप अज्ञान्यास आपल्या स्वरूपाची जाणीव नसल्यामुळे तो सामर्थ्यहिन असतो पण तो आत्मस्वरूप ज्ञानी झाल्यानंतर महादिव्य शक्तिसंपन्न होते व अंशाच्या शक्तीपुढे अणुबाॅम्बची शक्ती कःपदार्थ होय.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*