Literature

पौष शुद्ध द्वादशी

मीपणाची जाणीव शरीराच्या सर्व अवयवामधून होत असते. तशी ती सृष्टितहि आहे. मीपणाची जाणीव नाहिशी झाल्यास शरीरास व सृष्टीस काय किंमत रहाणार ? अर्थात काहीच रहात नाही. मीपणाची जाणीवच सर्व गोष्टींचा मूळ कारण आहे. मीपणाच्या जाणीवरूपी परमात्म्याने ही विविधरूपी सृष्टी निर्मिली. तूच हे सर्व मीपणाचे स्वरूप, तूच सर्व हे आत्मरूप, ब्रह्मरूपही तूच असल्याने सृष्टी म्हणजे तूं व तूं म्हणजेच सृष्टी होय, असे श्रुती सांगते.

     आपणाला प्रथम जाणीव होते. नंतर सविकल्प ज्ञानास सुरूवात होते. त्यानंतर मी, नंतर माझे काम अशा क्रमाने स्मृतीस सुरूवात होते. मी, माझे यापासून कार्यारंभ होतो. मीपणाची जाणीवच कार्याला स्फूर्ती देते. कार्य हे जडरूप आहे. 

     अॅटमबाॅम्ब, अणुबाॅम्ब हे एक कार्यच होय. ते मनसंकल्पाने उत्पन्न होते. जड पदार्थापेक्षा संकल्पामध्ये जास्त सामर्थ्य आहे. अॅटमबाॅम्बमध्ये मीपणाची जाणीव नाही. तो दुसऱ्याच्या संकल्पाधीन आहे. निरनिराळ्या पदार्थाच्या संयोजाने अॅटमबाॅम्ब तयार होतो. पण पदार्थांचा संयोग न झाल्यास किंवा संयुक्त पदार्थाचे  पृथ्थकरण झाल्यास अॅटमबाॅम्बमध्ये सामर्थ्यच असू शकणार नाही. 

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img