Literature

प्रस्तावना (विषय प्रवेश)

या जगांत नवजीवन प्राप्त करून देणारी जर कोणची शक्ति नांदत असेल तर ती ही आशाच होय. यंत्रातून खेळणारी विद्युत् शक्ति ज्याप्रमाणे साऱ्या यंत्रांना चालविते त्याचप्रमाणे ही शरीररुपी यंत्रे आंत खेळत असलेल्या आशेनेच अव्याहत कार्यपर आहेत. एखाद्या व्यसनी स्त्रैणपुरुषाला ज्याप्रमाणे एखाद्या वेश्येने आपल्या नादी लावून म्हणेल तसे नाचवावे त्याप्रमाणे ही ही आशा जगाला आपल्या नादी लावून आपल्या म्हणण्याप्रमाणे नाचवीत आहे. या आशेला जगाला भुलविण्याचे सौंदर्य जर कशा मुळे प्राप्त झाले असेल तर ते या विषयसुखेच्छेच्या लालीमुळेच हिचा चेहरा जगाला इतका मोहक झाला आहे. धमन्यातून जसे रक्त वाहते त्याप्रमाणेच सर्व लोकांच्या कार्यातूनही सुखाची आशा अव्याहत प्रवाहरूपाने वाहून सर्व प्राण्यांना जीवनरूप झाली आहे. आपल्या बंधनाने पळविण्यास लावणारी अशी ही आशेची विचित्र शृंखला सर्वांच्या पायांतून जखडली गेल्यामुळेच हे सर्व जग सुखाकडेदृष्टी ठेवून त्याच्या प्राप्तीकरतां सारखे धांवत सुटले आहे

विश्व ही एक प्रयोगशाळा आहे. यांत असलेल्या पदार्थांच्या सहाय्याने यातील सर्व माणसें जर कशाचा शोध करीत असतील तर तो या सुखाचाच. या सुखाच्या भावनेचा उगम इंद्रियांचा साहय पदार्थाशी संयोग होऊन आलेल्या अनुभवापासून जरी प्रत्येकाच्या अंतःकरणात झाला असला तरी विचार दृष्टीने पाहू गेले असतां या उगमाहून कुठे तरी वेगळीकडेच खरे सुख आहे असे वाटून या उगमस्थानाचा, नितांत तृप्तिकर अशा त्या निरंकुश सुखाच्या लाभार्थ शेवटी त्यागच इष्ट होतो. खारे पाणी जसे तहानलेल्याला तृप्तिकारक होत नाही

तसेच हे वैषयिक सुख कोणालाहि तृप्तिकारक ठरत नाही. यदल्पं तन्मर्त्यंम ( छांदो. ७—२४- ) जें अल्प असते तेच मर्त्य म्हणजे नष्ट होणारे असते. जातस्य हि ध्रुवो मृत्युः। उत्पत्तियुक्त असणारा पदार्थच नष्ट होतो म्हणजेच मर्त्य असतो ज्याला जन्म त्यालाच मृत्यु. जन्मले म्हणजे उत्पन्न झाले; झालेले कार्यरूपच असणार. म्हणून कार्यालाच उत्पत्ति नाश. जे अल्पअसते ते नष्ट होते आणि जे नष्ट होते. ते उत्पन्न झालेले असते; म्हणून उत्पन्न झालेले अल्प असे ठरते याचाच नाश होतो. जे उत्पन्न झालेले तेच कार्य. या दृष्टीने अल्प म्हणून म्हटले जाणारे ते हे कार्यच झाले. नाल्पे सुखमस्ति ‘ (छांदो. ७—२३-) अल्पांत सुख नाही म्हणून श्रुति सांगत असल्यामुळे कार्यातच सुख नाही असा श्रुतीचा अभिप्राय ठरतो. या अल्प कार्यात ज्याची अव्याहत सत्ता व्यापून आहे ते याचे त्रिकाला बाधित कारणच पूर्ण आहे असे या कार्याच्या दृष्टीने पाहूं गेले असतां सहजच सिद्ध होते, असे म्हटल्याने पूर्णरूप असे ते कारणच सुख आहे हे स्पष्ट झाले

अल्प वस्तु पूर्ण होत नाही. तसेच अल्पवस्तूत पूर्ण वस्तूचा समावेशहि पण अशक्यच. अल्प तेंच कार्य. त्यामुळे कार्य हे कारण होऊ शकत नाही. तसेच कार्यांत कारणाचा समावेशहि अशक्यच. कारण हे कार्यामुळे जगत नाही असे झाले की ते स्वतंत्र असणार जे स्वतंत्र असते ते स्वतःपूर्ण असते. त्याला अन्याची अपेक्षा नसते. अन्य निरपेक्ष असणाऱ्या पूर्णकारण स्वरूपाच्या ठिकाणी कार्याची उत्पति सयुक्तिक ठरत नाही. जर कार्य उत्पन्न झाले नाही असे झाले तर हे दिसून येणारे कार्य असत्यच म्हणावे लागते. हे कार्य जर असत्य झाले तर कारणच सत्य होणार. पुन्हा सत्याच्या ठिकाणी असत्याच्या उत्पत्तीचा प्रश्न निरर्थकच ठरून कारणापासून हे कार्य मुळी झालेच नाही असे म्हणावे लागते. सदेव सोम्येदमग्र आसीदेकमेवाद्वितीयम्। (छांदो. ) या श्रुतीच्या आधाराने यापूर्वी सजातीय विजातीय स्वगतभेदरहित एकच एक अद्वितीय सत् स्वरूप होते असे ठरले त्यांत सजातीय विजातीय स्वगतभेदयुक्त असणारे हे अनेक रूपाने नटलेले ततविरुद्धच ठरणार. तत् विरुद्ध म्हणजे सविरुद्ध भासणारे हे कार्य त्रिकालीहि नसणारे म्हणजेअसत्असेच झाले, या दृष्टीने त्या सत स्वरूपाच्या ठिकाणी असद्रुप हे जग नाहीच असे म्हणावे लागते नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः ‘ (. गी. १६) असत्स्वरूप हे केव्हांहि नसते सत् स्वरूप केव्हाहि असते

दोरीच्या ठिकाणी भासणाऱ्या भ्रांतिसिद्ध सर्पाला जरी दोरीचे अज्ञान कारण असले तरी जिचे हे अज्ञान, ती दोरीच जर नसेल तर सर्पभासहि होणार नाही आणि तसेच या भासाला (भ्रांतिसिद्ध अशा या सर्पाला) कारण असणारे अज्ञानहि पण भासणार नाही. यामुळे ही दोरीच सर्पाला  ‘विवर्तोपादान कारणम्हणून म्हटली जाते

कारणाची पूर्वस्थिति असल्याप्रमाणेच कायम असून त्याच्या वर तत् विरुद्ध कार्याचा नुसता भास  जेंव्हां दिसून येतो तेव्हा त्यास विवर्तम्हणतात. आपल्या अविकारी अस्तित्वाने जेव्हां एखादे कारण अशा आपल्यावर भ्रमाने भासलेल्या  विवर्तरूपी कार्याचे मुख्य कारण म्हणुन ठरत पाने त्याचे विवर्तोपादान कारण होते. ‘ ‘ ज्याच्यामुळे कार्य असते त्या कार्याचे उपादान कारण म्हणजे मुख्य कारण.’ 

यतो वा इमानि भूतानि या श्रुतिच्या  वाक्याने अज्ञानाने भासमान होणाऱ्या या भ्रांतिसिद्ध कार्याचे कारण म्हणून ब्रह्मच ठरते. या ठिकाणीब्रह्महे या सर्व कार्याला रज्जु सर्पातल्या रज्जुप्रमाणेचविवर्तोपादानकारणम्हणून समजावें. हेच छांदोग्याच्या सहाव्या सहाव्या अध्यायांत वाचारम्भ्णं विकारो नामधेयम् ‘ (खंड ) या वाक्याने कार्यरूपी हा विकार त्या ब्रह्माच्या ठिकाणी नुसता अर्थशून्य शब्दप्रयोग आहे, म्हणून सांगितले आहे. नसलेल्या सर्पाचा दोरीवर आरोप करून, पुढे मुळी त्या दोरीत झालाच नाहीं, तो त्याच्यावर खोटा आरोपच म्हणून जसा अपवाद सिद्ध करावयाचा, त्याचप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी कार्यरूप विकाराचा आरोप करून शेवटी तें कार्य परब्रह्मात झालेंच नाही म्हणून सिद्ध केले जाते.अध्यारोपापवादाभ्यां निष्प्रपभ्यं प्रपंच्यते।‘ ‘यो वै भूमा तत्सुखम् भूमैव सुखम्” (छांदो २३) भूमा स्वरूपच सुख म्हणून श्रुतीनी सुखाच्या प्रश्नाचा निकाल दिला आहे.यत्र नान्यत्पश्यति नान्यच्छृणोति नान्यद्विजानाति भूमा :’ (छांदो. २४) जिथे पहाण्याला, ऐकण्याला, जाणण्याला दुसरी वस्तु म्हणून उरत नाही तेंच भूमास्वरूप म्हणून म्हणून भूमाया शब्दाची व्याख्या श्रुतीने स्वतःच केली आहे. या दष्टीने सुख म्हणजे आपल्या पूर्णतेकरितां अन्याची अपेक्षा ठेवतां जे स्वत पूर्ण असते ते, हे असें अद्वय भूमास्वरूपच म्हणून जर ठरले तर याहून विलक्षण असेंयत्र अन्यत् पश्यति नान्यच्छृणोति नान्यद्विजानाति स भूमा: ‘ (छांदो. ७।२४।१) या वाक्याने जिथे वेगळे पाहिले जाते, ऐकले जाते, वेगळे समजले जातें ते सर्वहि कार्यजातअल्पया नावाखाली तद्विरुद्ध दुःखरूपच ठरतें हें मागे सांगितलेलेच सिद्ध होते. या भूमा स्वरूपालाच ब्रह्म म्हणून दुसरें नांव आहे

एकमेवाद्वितीयं ब्रह्म।‘ ‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म विज्ञान मानन्दं ब्रह्म अशी ब्रह्माची लक्षणे सांगून यो वै तत्परम ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति या वाक्याने समजणाऱ्याला ते ब्रह्म अभिन्नच आहे असे श्रुति सांगते. जो कोणी त्या परब्रह्माला जाणतो तो ब्रह्मच होतो असा या श्रुतीचा अर्थ

त्रिकालाबाधितं ब्रह्म त्रिकालींहि जें एकरूप असते अशाकेव्हाहि एका स्थितीतच असणाऱ्या त्या ब्रह्माच्या ठिकाणी कार्य रूपानेंमी ब्रह्मम्हणून होणारी स्वरूपाची जाणीवसुद्धां जर भ्रामक ठरते तर आपल्या सर्वथैव अमंगल स्वरूपानें वीट आणणाऱ्या या अति नीच देहाच्या भानाने होणारी ही वैषयिक सूखाची प्रवृति किती भ्रामक म्हणून सांगावी. पराच: कामाननुयन्ति बाला: बालकाप्रमाणे सदसद्विवेकशून्य असणारी अप्रबुद्ध माणसेंच बहिर्मुख इंद्रियांना गोचर होणाऱ्या विषयाची कास धरतात. प्रबुद्ध मनुष्ये अमृतत्वं विदित्वा धृवमधृवेष्विह प्रार्थयत्ने। शाश्वत सुख कोणचे ते जाणून अशाश्वत सुखाकडे कधीहि चुकून सुद्धा ढुंकून बघत नाहीत. शाश्वत सुख कधीहि अशाश्वत होत नाही आणि ते अशाश्वत सुख देणाया दृष्य पदार्थातूनहि कधी लाभत नाही असा त्यांचा ठाम सिद्धांत झालेला असतो

ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते। आद्यन्तवन्तः कौन्तेय तेषु रमते बुधः (.गी.५।२२

बाह्य पदार्थाचा इंद्रियाशी संयोग होऊन लाभणारे हे सारे विषयोपभोगात्मक सुख भामट्याच्या क्षणजीवीं मधुर सहवासा प्रमाणे फसविणारे आहे. दुःखपरंपरेचे जे माहेरघर अशा या उत्पत्तिनाशयुक्त असणाऱ्या विषयोपभोगांत एक क्षणभरसुद्धा खरा बुद्धिमान रमत नाही म्हणून श्रीमद् भगवद्गीतेनेंहि आपली साक्ष पटविली आहे.  

यदेवेह तदमुत्र यदमुत्र तदन्विह मृत्योः मृत्युमाप्नोति इह नानेव पश्यति ‘ (कठ१०) सयश्चायं पुरुषेयश्चा सा वादित्ये एकः ‘ 

इथे जे आहे तेंच तिथे आहे, जें तिथं आहे तेच इथे आहे. त्या परब्रह्मांत इथे तिथे असा भेद नसून चोहोकडे असणारे ते एकच आहे. त्या ठिकाणी भिन्नपणाची कल्पना करणारा अनेक मृत्यु परंपरेला बळी पडतो. या देहांत आणि त्या सूर्यबिबांत असणारा एकच आहे असें जो जाणतो तो पंचकोशातीत होतो म्हणजे पंच कोशातीत असणाऱ्या परब्रह्माशी तादात्म्य पावतो असे श्रुति सांगते. मी ते परब्रह्म कसे होईन ही शंका बाधू नये म्हणूनयत्परं ब्रह्मसर्वात्मा विश्वस्यायतनं महत् सूक्ष्मात्सूक्ष्मतरं नित्यं त्वमेव त्वमेव तत्  (कैवल्यो. १६) या आणि इतर तत्त्वमस्यादि महावाक्यानी देखील, कशामुळेहि आकलन होणारे अतिसूक्ष्म असे जे या विश्वाचे शाश्वत अधिष्ठान आहे ते अति थोर सर्वात्मरूप ब्रह्म तूंच आहेस; तूंच ते म्हणून यथार्थ स्वरूपाची जाणीव श्रुति देत आहे. जाग्रत्स्वप्नसुषुप्त्यात्मक या प्रत्यहि अनुभविलेल्या जाणाऱ्या बंधरूप अवस्थांच्या गिरक्यांतून हा जीव सुटणार कसा? या प्रश्नावरजाग्रत्स्वप्नसुषुप्त्यादि प्रपञ्च यत्प्रकाशते। तद् ब्रह्माहमिति ज्ञात्वा सर्वबन्धे: प्रमुच्य ते ।। (कैवल्यो. १७

हें श्रुतीचे उत्तर आहे. जागृतस्वप्न सुषप्त्यादि प्रपंच ज्याच्यामुळे प्रकाशला जातो तें ब्रह्मस्वरूपचमीआहे असे जाणिलें असतां सर्व बंधनातून जीव मुक्त होतो, असा या श्रुतीचा अर्थ आहे

एषोऽस्य परमानन्दः वर्धते कर्मणा नो कनीयान् ‘ 

ब्रह्मविदाप्नोतिपरम् तरति शोकमात्ववित्।‘ ‘तत्र को मोहः कः शोकः। इत्यादि वाक्यानीयाचि जन्में येणेंचि काळे संसारी होइजें निराळे मोक्ष पाविजे निश्चळ स्वरूपाकारें ।। (दास. ६।९।२९) असा हा श्रीसमर्थांचा सिद्धांतच सांगितला गेला आहे.. अवस्थयां त्रिना प्रकाशित करणारे या अवस्थात्रयरहित जें परब्रह्म तेच मी असें जो जाणतो तो यथोदंक शुध्दे शुध्दमासिक्तं तादृगेव भवति ‘ (कठ २।१।१५) _’शुद्ध पाण्यांत शुद्ध पाणी मिसळून गेल्याप्रमाणे त्या पर ब्रह्माशी एकरूप होतो. त्याच्या या परमानंदाला भरती ओहोटी नसते असें हे कर्मानी कमी जास्त होणारे असें श्रेष्ठ सुख ब्रह्म जाणणारा मिळवतो. आत्मस्वरूपच ब्रह्म असल्यामुळे तें शाश्वता नंदरूप ब्रह्मच आपण म्हणून स्वतःला जाणतो तो हा शोकसागर तरून जातो. त्याच्या ठिकाणी शोक मोह कुठला असणार?’ असें हे वर दिलेल्या श्रुतिवाक्याचे तात्पर्य होय. आत्मन्येव सन्तुष्टस्तस्य कार्य विद्यते॥(. गी. ३।१७) चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः।।‘ 

(. गी. ३।१८) ‘कामक्रोधवियुक्तांनां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् (.गी. ५।२६)स्वरूपी संतुष्ट असणारा कृतकृत्य असतो. या जगांत त्याला मिळवावयाचे कांहींच शिल्लक रहात नाही. कामक्रोधरहित होऊन श्रवण, मनन, निदिध्यासानी ज्याने ब्रह्माच्या ठिकाणी मनाला खिळून टाकिले आहे अशा स्वरूपज्ञान्याला चोहोंकडे अखंडित असें एकमेव ब्रह्मस्वरूपच शिल्लक रहाते; ‘ इत्यादि वाक्यानी गीते कडूनहि वर सांगितलेल्या श्रुतिमतांचंच उद्धारण केले गेले आहे

या सर्व आधाराने जिवाला ब्रह्मप्राप्ती होते ब्रह्मप्राप्ती झाल्या वर तेच तो होऊन राहिल्यामुळे त्याच्यांत कामादि विकार नसतात. तो केवळ निर्विकार आनंदरूपच बनतो हे सिद्ध होते. मन मीपणे निर्बुजलें।या देहांमध्ये देहाभिमानाने उद्भवणाऱ्या मीपणाला मन विटले. यालाया देहाला मी म्हणून मानणेकांही केल्या मान्य होईना. देहाचे विकृत स्वरूप बनून, त्याच्या घाणीने विटून या अनिष्ट देहाभिमानाच्या पकडीतून कसे निसटावे म्हणून पुष्कळ विचार झाला. सारे प्रयत्न थकले ! हा देहाभिमान आपापल्या दुष्ट कामादिशत्रूच्चा स्वाधीन करणार, अशी चिन्हे प्रगटण्याची वेळ जवळ जवळ येत आहे असे दिसले मन घाबरले. हे मारेकरी काही केल्या सोडणार नाहीत म्हणून त्यांच्या विषयींची कीर्ति त्या मनाला भेडसावू लागली. इतर कोठेहि त्याला आधार सापडेना. त्या भयाण दृश्याला बधून घाबरलेलें मन आपल्या बचावासाठीयापासून मला सोडविणारा कोणीतरी वाली मला मिळेल काय ? ‘ असे म्हणून आशेने मागल्या पाउलींच पळत सुटले. त्याला इतर कोठेहि आधार मिळाला नसल्यामुळेसमर्थया नांवाचे आकर्षण होऊन स्वामींच्या पदी मिसळलें।आणि आतां तें ऐक्यरूपें स्वयचि झालें पद आपण या ठिकाणी इतर वस्तु आठवण्याला दिसत नसल्यामुळे स्वतःची स्वतःलाच आठवण झाली. झाले तेच हे प्रातःस्मरण ! ! 

या तुमच्या प्रातःस्मरणांतून इतर एखाद्या देवाची स्तुति का केली नाही ?’ या प्रश्नाचे उत्तर मी काय देणार ? याला जसे माझ्याजवळ काही उत्तर नाही त्याचप्रमाणे हे प्रातःस्मरण आणि सर्व तेस्वात्मनिरुपणआदिग्रंथ 

आणि विवरण तरी कशाला पाहिजे हो ? या प्रश्नालाहिस्वामीकृपेचा लोट आला मज सरोवरी समावला पूर्ण जालिया उचंबळला। अनुभव उद्गार (आत्माराम १-९)  

यापेक्षा दुसरे काही वेगळे उत्तर माझ्याजवळ नाही. मला वाटते हा निसर्गच आहे. ‘वेन, गंधर्व, वामदेवआदिकांचे उपनिषदां तून आलेले उद्गार पाहिले म्हणजे तेव्हापासून भरलेले असे हे वाहून जात असावेसे वाटते. अनात्मदृष्टेरविवेकनिद्रामहं मय स्वप्नति गतोऽहम् स्वरुपसूर्येऽभ्युदिते स्फुटोक्तैर्गुरोर्महावाक्यपदैः प्रबुद्ध : (शुक रह. २।९

अनात्मदृष्टीची अविवेकरूपी झोप आली त्यातमी आणि माझेया भानाचे स्वप्न पडले. अनेक जन्मींच्या पूर्वसुकृताने या अज्ञाननिशीच्या अंती मुमुक्षत्वतेचा उषःकाल प्राप्त झाला. निर्दिषय सुखप्रीतिरूप चित्तपरिपक्वतेच्या क्षितिजावर आत्मरूपी हा चिद्भानु उदय पावत असताना श्रीगुरुंच्या महावाक्याचा ध्वनी कानावर पडला आणि मी खडबडून जागा झालो. या प्रबोधरूप प्रातःकाली स्वानुभवस्फूर्तीची वीणा घेऊन त्याच्या मधुरध्वनीत त्या कनवाळु श्रीगुरुंचे उपकार आठवीत या माझ्या आत्मदेवापुढे पराभक्तीन अंतःकरण ओथंबून येऊन त्या लहरीत तत् स्तुतिपर सहज स्वैरा, लापाने ते श्रुतिसिद्ध आत्मगित मी गाइले तेच हेप्रातःस्मरणसर्व गुरुभक्तांची ही पहाट. यात आठवले जाणारे जे गुरुध्यान आणि तत्स्तुति तेच हे प्राप्तःस्मरण, ‘ गुरुभक्तांचा कंठ माझ्याशी मिळेल. माझ्या या स्वैरालापांत तेसुद्धां समरसून जातील. अन्य विसरून स्वानुभवस्फूर्तीच्या या मधूर वीणारवांत ते गुंग होतील! या प्रातःस्मरणातून श्रुतिसिद्ध अनुभव सहजच गोवला गेला आहे हे या विवरणावरून दिसून येईल. यात विषय विवेचन करताना येणाऱ्या  युक्तीने या जगांत खन्या सुखासाठी आत्मनिष्ठा तेवढीच संपादनीय आहे असे असे मुमुक्षूना ठाम ठसेल, मोक्षमार्ग स्पष्ट दिसेल

home-last-sec-img