Literature

फाल्गुन वद्य त्रयोदशी

धर्म सोडणारे म्हणजेच अधर्मी. अज्ञ त्यांना नीचयोनी प्राप्त होते, असे भगवंताचे एक वाक्य. श्रुतिस्मृतीच्या आधाराने शास्त्रप्रमाणे ठरविली गेली आहेत. म्हणून शास्त्राचे अध्ययन केले पाहिजे किंवा जाणत्याकडून समजवून घेतले पाहिजे. तसेच शास्त्रांतील वाक्ये प्रमाणभूत आहेत असा दृढविश्वास बाळगला पाहिजे व त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. यालाच धर्माचरण म्हणतात.

जो मनुष्य शास्त्रज्ञेप्रमाणे विधीनिषेधांचे उल्लंघन करील तो पापी, अधम, परमात्म्याच्या अवकृपेस पात्र होऊन नरकास जातो. म्हणजेच त्यास चित्तशांती वा मोक्ष मिळत नाही.

शास्त्रविधीचे परिपालन करणाऱ्यास दैवीसामर्थ्य प्राप्त होते व तोच भगवद्भक्तियुक्त, सदाचरणी होऊन तसेच त्यास मनःशुद्धि प्राप्त होऊन तो परमात्म्याच्या अनुग्रहास पात्र होतो. याविरुद्ध वागल्यास त्यातील एकही गोष्ट साध्य होणार नाही. अर्थात त्याला सुख मिळणार नाही; मनःशांति प्राप्त होणार नाही ; दैवीशक्ती मिळणार नाही व धार्मिकास प्राप्त होणारा पुण्यलोकही प्राप्त होत नाही, धर्माविहीन अशा विषयलंपट मनुष्यास ‘द्विपाद पशु’ असेच म्हणतात.

पापाचरणाने मनुष्य पापी होतो तर पुण्याचरणाने पुण्यवान होतो. पापी किंवा पुण्यवान होणे हे प्रत्येकाच्या आचरणावर अवलंबून आहे. इहलोकांतही श्रेष्ठ- कनिष्ठता ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. कर्माचे फळ प्रत्येकास भोगावे लागते.

*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img