Literature

ब्रह्मज्ञानेन परमानन्दप्राप्तिनामि प्रकरणं चतुर्थम्‌

ब्रह्माज्ञानाने आनंदाची प्राप्ती— प्रकरण चौथे

स एष जगतः साक्षी सर्वात्मा विमलाकृतिः ।।
प्रतिष्ठा सर्वभूतानां प्रज्ञानघलक्षणः ।।1।।
अर्थ—तो सर्वात्मा निर्मळ, अश्या शुध्द स्वरुपाचा असून ह्‌या जगाचा साक्षी आहे. सर्वप्राणीमात्रां मधील प्रज्ञारुप असे मोठे प्रतिष्ठापूर्ण लक्षण म्हणजे आपल्या मधील आत्मतत्वेचे भान होवून ”अहं अस्मि“ हे वाटणे जाणवते. ।।1।।

न कर्मणा न प्रजया न चान्येनापि केनचित्‌।।
ब्रह्मवेदनमात्रेण ब्रह्मात्नोत्येव मानवः ।।2।।
अर्थ— कुठल्या ही कर्माने नाहीं, किंवा कुठल्या ही जन्मयोनी मुळे नाहीं, पण केवळ ब्रह्मतत्व जाणल्यामुळे, त्या तत्वाचे ज्ञान अनुभवल्यामुळे तो साधक ब्रह्मतत्व प्राप्त करुन घेतो. ।।2।।

तद्विद्याविषयं ब्रह्म सत्यज्ञानसुखाद्वयम्‌‌।।
संसारे च गुहावाच्ये माया ज्ञानादि संज्ञके।।3।।
अर्थ— त्या ब्रह्मतत्वाचा विषय म्हणजे सत्य आणि अद्वय ज्ञान. आणि हेच अद्वय ज्ञान अर्थात्‌‌ एकमात्र सौख्य आहे. परंतु संसाररुपी गुफे मध्ये भौतिक ज्ञान हे एक ज्ञान म्हटले जाते.।।3।।

निहितं ब्रह्म यो वेद परमे व्योम्निसंज्ञिते।।
सोश्नुते सकरान्कामान्‌ क्रमेणैव द्विजोत्तमः।।4।।
अर्थ—तो द्विजोत्तम म्हणजे, विद्वानांतील, महाविद्वान— हा त्या परमव्योमामधील अदृश्य अशा ब्रह्मतत्वाला जाणतो आणि तोच क्रमाने त्या ब्रह्मतत्वांतील आनंदाचा आस्वाद घेतो. ।।4।।

प्रत्यगात्मानमज्ञान मायाशक्तेश्च साक्षिणम्‌।।
एकं ब्रह्माहमस्मीति ब्रह्मैव भवति स्वयम्‌‌।।5।।
अर्थ—माया शक्तिचे जे साक्षी आहे, ते “अहं” तत्व (जे आमच्यामध्ये ”मी आहे“ असे जे भान ) ते ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार झाल्यावर केवळ एक ब्रह्मतत्वच अस्तित्वांत आहे हे जाणून स्वतः ब्रह्मस्वरुप होतो. ।।5।।

ब्रह्मभूतात्मनस्तस्मादेतस्माच्छक्तिमाश्रिताम्‌।।
अपञचीकृत आकाशः सम्भूतो रज्जुसर्पवत्‌।।6।।
अर्थ—ह्या ब्रह्मभूत अर्थात्‌ ब्रह्मस्वरुप शक्तिपासून हे आकाश निर्माण होते. आणि मग ते सर्फ्रज्जु च्या न्यायाने भ्रामक वाटते. ।।6।।

आकाशाद्वायसंज्ञस्तु स्पर्शोपचिींकृतः पुनः।।
वायोरग्निस्तथा चाग्नेंराप अद्‌भ्यो वसुन्धरा।।7।।
अर्थ—आकाशापासून वायु उत्पन्न होवून त्याच्या स्पर्शाने हे अपंचीकृत रुप उत्पन्न होते. म्हणजे वायु पासून अग्नि, अग्निपासून जल आणि जलापासून पृथ्वीची उत्पत्ती झाली. ।।7।।

तानी सर्वाणि सूक्ष्माणि पञचीकृत्येश्वरस्तदा।।
तेभ्य एव विसृष्टं तत्‌ ब्रह्माण्डादि शिवेन ह।।8।।
अर्थ—त्या वेळेस ईश्वराने (शिव नामक शक्ति ने) पंचीकृत क्रियेने ही सर्वसूक्ष्म महाभूते ब्रह्माण्डाच्या रुपाने निर्मित केली ।

ब्रह्माण्डस्योदरे देवा मानवा यक्षकिन्नराः।।
मनुष्याः पशुपक्ष्याद्यास्तत्तत्कर्मानुसारतः।।9।।
अर्थ—ब्रह्माण्डाच्या उदरामध्ये देव, मानव, यक्ष किन्नर, मनुष्य, पशु, पक्षी आदि त्या—त्या क्रमानुसार निर्माण केले. ।।9।।

अस्थिस्ताय्वादिरुपोयं शरीरं भाति देहिनाम्‌।।
योमन्वमयो ह्यात्मा भाति सर्वशरीरिणः।।10।।
अर्थ—सर्व प्राणीमात्रांमध्ये हे अस्थिर नाशवंत शरीर अवयवादि रुपाने दृश्यमान होते. आत्मतत्व अमन्वमय (अदृश्यरुपाने) प्रकाशित होते.

ततः प्राणमयो ह्यात्मा विभिन्नश्चान्तरस्थितः।।
ततो विज्ञान आत्मा तु ततोन्यश्चान्तरस्थितः।।11।।
अर्थ— तेव्हा हा प्राणमय आत्मा विभिन्न अंतरांमध्ये, शरीरांमध्ये प्रकाशित होतो. ज्या प्रमाणे आपण आपल्यांत आत्मतत्व (मी कर्ता मी भोक्ता) अनुभवतो तो तसाच इतर शरीरधारी तत्वांत पण तो तसाच असतो.

आनन्दमय आत्मा तु ततोन्यश्चान्तरस्थितः।।
योयमन्नमयः सोयं पूर्णः प्राणमयेन तु।।12।।
अर्थ— जसा आपला आनन्दमय आत्मा असतो, तसाच तो अन्य धारकांचा पण असतो जो हा अन्नमय आहे, तो प्राणमय पण आहे. ।।12।।

मनोमयेन प्राणोपि तथा पूर्णः स्वभावतः ।।
ततो मनोमयो ह्यात्मा पूर्णो ज्ञानमयेन तु ।।13।।
अर्थ— स्वभावतः नैसर्गिकरीत्या मनोमय कोशामुळेच प्राणमयक्रोश पण पूर्ण भरलेला असतो. तेंव्हा मनोमय आत्मा पण प्राणमय आत्मतत्वामुळे अर्थात्‌ ज्ञानमय आत्म्यामुळे समृध्द असतो. ं।।13।।

आनन्देन सदा पूर्णः सदा ज्ञानमयः सुखम ।।
तथानन्दमयश्चापि ब्रह्मणोन्येन साक्षिणा ।।14।।
अर्थ— जसे ज्ञानमय सुख नित्य आनंदाने ओतप्रोत भरलेले असते. तसेच ब्रह्मतत्वाच्या साक्षीभावाने आनंदमय तत्व ओतप्रोत भरलेले असते.

सर्वान्तरेण पूर्णश्च ब्रह्मनान्येन केनचित्‌।।
यदिदं ब्रह्मपुच्छाख्यं सत्यज्ञानाद्वयात्मकम्‌ ।।15।।
अर्थ— ब्रह्मतत्व आनंदरुपामध्यें संपूर्ण व्याप्त असते आणि जर त्यांत तुम्ही ब्रह्मानंदाचा अंत समजाल, तर ते जे परब्रह्मतत्व आहे, ते द्वैतभावाचे समजले जाईल. (अर्थात्‌ ते तसे नसून एकच एक ब्रह्मतत्व अद्वय रुपाने सर्व अंतकरणात भरलेले आहे.)।।15।।

सारमेव रसं लब्धवा साक्षाद्‌ देही सनातनम
सुखी भवति सर्वत्र अन्यथा सुखता कुतः।।16।।
अर्थ— हा अनादि परमतत्वरुपी आनन्दमय आत्मा आहे, हा सारतत्व प्राप्त करुनच आनंदी होतो. अन्य कोठल्याही बाह्य तत्वामुळे नाही. ।।16।।

असत्यस्मिन्परानन्दे स्वात्मभूतेखिलात्मनाम्‌।।
को जीवति नरो जन्तुः को वा नित्यं विचेष्ट ते।।17।।
अर्थ— हे परमात्मरुप तत्व जर आपल्यांत विद्यमान नसेल तर असा कोण मानव किंवा अन्य प्राणी जीवित राहील ? आणि आपली जीवित चेष्टा करण्यास समर्थ राहील.?

तस्मात्सर्वात्मना चित्ते भासमानो ह्यसो नरः।।
आनन्दयति दुःखाढ्यं जीवात्मानं सदा जनः।।18।।
अर्थ— त्यामुळे सर्वांच्याच मनामध्ये असलेले हे उपस्थित आनंदमय तत्व अर्थात्‌ आत्मतत्व आपणांस नित्य आनंदमय ठेवते, जरी आमचे जीवन दुःखमय असले तरी (मनुष्य पुन्हा आनंदाच्या आशेवर जगतोच) ।।18।।

यदा ह्यवैष एतास्मिन्न दृश्यत्वादि लक्षणें।।
निर्भेदं परमाद्वैतं विन्दते च महायतिः ।।19।।
अर्थ— जरी ह्या आत्मतत्वात दृश्यस्वरुपाची कांही लक्षणे दिसत नसली तरी महानयोगी निर्मलरुपाने त्यांतील अद्वैत आनंदाची प्राप्ती करुन घेतात. ।।19।।

तदेवाभयमत्यन्तं कल्याणं परमामृतम्‌।।
सद्रूपं परमं ब्रह्म त्रिपरिच्छेदवर्जितम्‌‌।।20।।
अर्थ— तेच परब्रह्मतत्व जे अविनाशी, अनादि, अनन्त ह्यया रुपाने, तीन प्रकारे विद्यमान आहे. (त्रिपरिच्छेद विवर्जित) असे ते अत्यन्त कल्याणप्रद, अभयंकारी, परमअमृतमय आणि सत्‌ तत्व आहे. ।।20।।

यदा ह्येवैष एतास्मिन्नल्पमप्यन्तरं नरः।।
विजानाति तदा तस्य भयं स्यान्नात्र संशयः।।21।।
अर्थ— जेंव्हाही मनुष्य आपणास ह्या आत्मतत्वापासून थोडा जरी विस्मृत करतो तेंव्हां त्यास भय उत्पन्न होईल, हे निश्चित असून ह्यात संशय नाहीं. ।।21।।

अस्यवानन्दकोशेन स्तम्बान्ता विष्णुपूर्वकाः ।।
भवन्ति सुखिनो नित्यं तारतम्य क्रमेण तु।।22।।
अर्थ— ह्या सुखाचा तारतम्य रुपाने विचार केला तर, भ्रम दूर होतो आणि विष्णु तत्वामध्ये मति स्थिर झाल्याने साधक सुखी होतो. ।।22।।

तत्‌त्पदविरक्तस्य श्रोत्रियस्य प्रसादिनः।।
स्वरुपभूत आनन्दः स्वयं भाति परे यथा ।।23।।
अर्थ— त्या—त्या विषयांतून विरक्त झालेल्या श्रोत्रीय अर्थात्‌ मनीषी साधकाच्या कृपाप्रसादाने साधक आनंदीत होतात. आणि स्वतः प्रमाणेच तो मनीषी दूसर्‌यास पण तेजोमय आनन्द प्राप्त करवून देतो. ।।23।।

निमित्त किञिदाश्रित्य खलु शब्दः प्रवर्तते।।
यतो वाचो निवर्तन्ते निमित्‌ानमभावतः ।।24।।
अर्थ— कोण्या निमित्ताचे कारण बनून शब्द परिवर्तित होतात आणि जेंव्हां वाचा त्या शब्दांना बोलल्यानंतर निवर्तित होते तेंव्हा ते कारण निमित्‌‌‌‌‌‌‌‌‌ हे आशीर्वाद स्वरुप (आशीर्वाद देणारा) होते. ।।24।।

निर्विशेषपरानन्दे कथ शब्दः प्रवर्तते।।
तस्मादेतन्मनः सूक्ष्मं व्यावृत्तं सर्व गोचरम्‌‌ ।।25।।
अर्थ—— निर्विशेष अश्या आनंदापासून शब्द कसे परत योतात? तर त्या ठिकाणी हे मन सूक्ष्म रुपाने त्या परम आनंदांत विलीन होवून सर्व दृश्य सृष्टी ही अदृष्य होते. ।।25।।

यस्माच्छ्रीत्रत्वगक्ष्यादि खादिकर्मेन्द्रियाणि च।।
व्यावृतानि परं प्राप्तं न समर्थानि तानि तु।।26।।
अर्थ—त्या परमानंदापासून श्रोेत्र—कर्ण, त्वक्‌—स्पर्श, अक्षी—नेत्र, नांकातील वायु पोकळी वगैर खं आदि इंद्रिय परतून येतात. (अर्थात्‌ ते पंचेन्द्रियांनी आणि वाणीने पण वर्णन केले जात नाहीं.) परमानंद प्राप्त झाल्यावर त्या आनंदांत न्हाऊन निघाल्यावर ते सर्व इंन्द्रिय कुचकामी (निरुपयोगी, असमर्थ) होतात. ।।26।।

तद्‌‌ब्रह्मानन्दद्वन्द्वं निर्गुंण सत्यचिद्‌घनम्‌।।
विदित्वा स्वात्मरुपेण न विभेति कुतश्च न ।।27।।
अर्थ— तो निर्द्वंद्व निर्गुण सत्‌+चित्‌+आनंद घनरुप आनंद प्राप्त झाल्यावर आपल्याला आत्मरुप प्राप्ती झाल्याने तो साधक निर्भय होतो. ।।27।।

एवं यस्तु विजानाति स्वगुरोरुपदेशतः ।।
सं साध्वसाधुकर्मभ्यां सदा न तपति प्रभुः ।।28।।
अर्थ—आपल्या गुरुच्या उपदेशानुसार जो ह्या प्रमाणे ज्ञान प्राप्त करतो तो कोठल्याही सत्‌ असत्‌‌ कर्मामुळे लिप्त होत नाहीं. ।।28।।

ताप्यतापकरुपेण विभातमखिलं जगत्‌‌।।
प्रत्यगात्मतया भाति ज्ञानाद्वेदान्तवाक्यजात्‌‌।।29।।
अर्थ— दुःख आणि दुःखदायक रुपाने हे संपूर्ण जगत्‌ भरलेले आहे. परमात्मतत्वाशी आपले मिलन होण्याने (परमानंदाची प्राप्ती होण्याने) आपल्या मनांतील द्वैत तत्वाची कल्पना नष्ट होते. नंतर अद्वैतानन्द प्राप्त होतो. ।।29।।

शुद्धमीश्वर चैतन्यं जीवचैतन्यमेव च ।।
प्रमाता च प्रमाणं च प्रमेयञच फलं यथा।।30।।
अर्थ— ईश्वर हे शुद्ध चैतन्य आहे आणि जीव हा चैतन्याचा एक अंश आहे. ज्या प्रमाणे प्रमाण आणि फळ असते, तसेच हे आहे. ।।30।।

इति सप्तविधं प्रोक्तं भिद्यते व्यवहारतः।।
मायोपाधिविनिर्मुक्तं शुद्धमित्यभिधीयते।।31।।
अर्थ— ह्या सात प्रकारांनी हे सांगितले गेले आहे. ते व्यवहार रुपाने भेद केले जाते. माया नामक उपाधि रहित जो असतो तो शुद्ध चैतन्य असे म्हटला जातो. ।।31।।

मायासम्बन्धश्चेशो जीवोविद्यावशस्तथा।।
अन्तःकरणसम्बन्धात्‌‌ प्रमातेत्यभिधीयते।।32।।
अर्थ— हा जीव माया सम्बंधामुळे अविद्याग्रस्त होतो, आणि अंतःकरणाच्या सम्बंधामुळे प्रमाता असे म्हटला जातो. ।।32।।

तथा तद्‌‌वृत्तिसम्बन्धात्‌ प्रमाणमिति कथ्यते।।
अज्ञातमपि चैतन्यं प्रमेयमिति कथ्यते।।33।।
अर्थ— आणि त्या अंतःकरण आणि माया ह्या सम्बंधामुळे प्रमाण म्हटला जातो. आणि अज्ञात असे चैतन्य प्रमेय असे म्हटले जाते.।।33।।

तथा ज्ञातंच. चैतन्यं फलमित्यभिधीयते।।
सर्वोपाधिविनिर्मुक्तं स्वात्मानं भावयेत्सुधीः ।।34।।
अर्थ— ज्ञात झालेले चैतन्य त्याचे फळ म्हटले जाते. सर्व विकार आणि उपाधिरहित आपले आत्मतत्व जे असते त्यामुळे सुधी म्हणजे महान्‌ साधक सुशोभित होतो, तेजाने तळपतो. ।।34।।

ज्ञात्वैवं प्रत्यगात्मानं बुद्धितद्‌‌वृत्ति साक्षिणम्‌‌।।
सोमित्येव तद्‌वृत्या स्वान्यत्रात्ममतिं त्यजेत्‌‌।।35।।
अर्थ— ह्या प्रमाणे आपल्या परमतत्वाला जाणून त्या वृत्तिसाठी आपल्या बुद्धिला साक्षी ठेवून तेच तत्व माझ्‌यात आहे. सोहंम्‌‌ ह्या ज्ञानाने आपली मति अन्यत्र विषयांमध्ये दूषित होवू देवू नयें।।35।।

जन्ममृत्युप्रहाणिः स्याद्‌ब्रह्मरुपात्मवेदनात्‌‌।।
पुनरावर्तते नासौ पुनर्नेवाभिजायते।।36।।
अर्थ—— जन्म—मृत्युचा नाश हा आत्मतत्वाचे ज्ञान झाल्यावर होतो. तो पुन्हा येत नाहीं आणि जन्म घेत नाहीं. ।।36।।

निवृत्तायां वासनायां संसारस्य न कोपि हि।।
संसारयातनां दुःखं जन्म प्राप्नोति कुत्रचित्‌।।37।।
अर्थ—— ह्या संसारिक वासनांपासून जो निवृत्त होतो, त्या पासून सुटतो तो ह्या जगांत पुन्हा वासनामय दुःखाचा ताप सहन करण्यास कोठल्याही योनीत जन्म घेत नाहीं. ।।37।।

विषयाशाविषैर्दग्धः परमार्थेमृतः स्ततः।।
तस्य दुःख भागधेयं किं कृतं स्वात्मवैरिणा।।38।।
अर्थ— जो आपल्यास आत्मसुखाचा वैरी आहे. जो ह्या विषयरुपी विषारी आशामुळे होरपळून दुःखी होतो त्या अभाग्याला आत्मसुखाचे अमृत कोठून मिळणार? ।।38।।

नाहं देहो न बुद्धिश्च न मनो नेन्द्रियाणि च ।।
विषया आपि नैवाहं कर्ता भोक्ता तथैव च ।।39।।
अर्थ— मी देह नाही, मी बुद्धि नाही, मी मन आणि इन्द्रिय पण नाही, आणि मग विषय वासना पण माझ्‌‌याकर्ता आणि भोक्तारुपाला लागणार नाहीं. ।।39।।

न किञिचद्‌ भावनाकारः स्वयमानन्दरुपकः।।
अद्वयब्रह्ममात्रोहं यो विद्यात्स हि मुक्तिभाक्‌‌।।40।।
अर्थ—कोठल्याही प्रकारची भावना नाहीं आणि स्वतःच्याच आत्मरुपांत (दूसर्‌‌या कोठल्याही कारणाशिवाय) आनंदित राहतो, मी अद्वय ब्रह्ममात्र असे समजतो तोच मुक्तिप्राप्त कर्ता आहे. असे समजावे. ।।40।।

अहं ममेति यो भावो देहाध्यासादनात्मनि।।
अध्यायसोयं निरस्तव्यो विदुषा ब्रह्मनिष्ठया।।41।।
अर्थ— जो आत्मा नाही अशा देहावर ‘‘मी‘‘ व माझी अशी भावना ठेवणे हा भ्रम (अध्यास) विद्वान अश्या ब्रह्मनिष्ठ साधकाने न ठेवता त्यास दूर केले पाहिजे.।।41।।

ब्रह्मणो निष्प्रपञचत्वात्‌त्यवक्ता ब्रह्म विन्दते।।
अतो नित्यं श्रुतिर्वक्ति न्यास एवात्परेच यत्‌‌।।42।।
अर्थ— ब्रह्मतत्वाच्या अकर्तृतवाचे ध्यान ठेवून म्हणजे ते तसे नाही अर्थात्‌‌ कर्ता व करविता असे नाही आणि अलिप्तपणा आहे, असे समजल्यावर, असे ज्ञात झाल्यावरच त्याची प्राप्ती होेते. म्हणूनच मुनि आणि वेद नेहमीच सांगतात की ते तत्व सर्व ब्रह्माण्डाच्या पण वरचे सर्वव्यापी आहे. ।।42।।

गृहीभूत्वापि संन्यस्य कार्यं यद्‌ ब्रह्मचिन्तनम्‌‌।।
ब्रह्मचर्याश्रमादेव न्यासः श्रेष्ठो भवेत्‌‌तः ।।43।।
अर्थ— ब्रह्मचिन्तनाचे जे कार्य सन्यास घेवून संन्यसाश्रमांत जे केले जाते ते सर्वांत उत्तम असे मनावर ठसले जाते. त्याचे ज्ञान होते. (न्यास, ठसा, छाप हा अर्थ)।।43।।

प्रक्षालनाद्विपंङकस्य दूरारदस्पर्शनं परम्‌‌।।
किमर्थञच गृहीभृत्वा ततऊर्ध्व न्यसेद्‌बुधः।।44।।
अर्थ— चिखल अंगाला लागल्यानंतर त्यास साफ करण्यापेक्षा धुवून स्वच्छ करीत बसण्यापेक्षा, दुरुनच त्याला टाळणे हे बरे. कश्याकरिता त्यास ग्रहण करुन, नंतर वरपासून शहाण्याने त्याचे प्रक्षालन करावे.।।44।।

यदि प्रवृति्‌‌धौरेयः सन्यस्तुं नेहते क्वचित्‌‌।।
अन्तस्त्यागी भवेत्‌‌स्य कार्य एवं हि मुक्तये।।45।।
अर्थ— जर अशी कठिण घोर प्रवृत्ति नसेल तर आणि संन्यास घेण्याची इच्छा नसेल तर मुक्तिसाठी त्याने अंतस्त्याग करावा.।।45।।

इन्द्रियार्थेषु मूढस्य दृढदेहाभिमानिनः।।
गृहस्थाश्रमस्वीकारो भ्रष्टताया वरो मतः।।46।।
अर्थ— इन्द्रियसंतुष्टिसाठी मूढ अश्या देहाविषयी ममता बाळगणार्‌‌याने गृहस्थाश्रम स्वीकारावा. कारण भ्रष्ट होण्यापेक्षा ते बरे।।46।।

निष्कामकर्मतः सोपि भक्त्या कर्तव्यबुद्धिना ।।
ऋणत्रयमुपाकृत्य तदूर्ध्व न्यस्तुपर्हति।।47।।
अर्थ—— तो गृहस्थाश्रमी सुध्दा निष्काम बुद्धिने कर्म करुन भक्ति संपन्न होवून तिन्ही प्रकारच्या ऋणापासून मुक्त होवू शकतों. ।।47।।

तथा चेद्‌‌देहदौर्बल्यं स्वगृहस्य समीपतः।।
कुटिं बध्वा विरक्तःसन्‌ ब्रह्मज्ञानं समाचरेत्‌‌।।48।।
अर्थ—— ह्या अवस्थेत सुध्दा देह दुर्बल झाल्यावर आपल्याच घराजवळ एक कक्ष उपलब्ध करुन त्याने ब्रह्मज्ञानाचे चिंतन करावे। ।।48।।

श्रुत्वापि न त्यजेद्यस्तु विषपानं सुदूःखदम्‌‌।।
पीत्वा विषं चानुभूय दुःखं पश्चात्यजेद्धि तत्‌‌।।49।।
अर्थ—— जे विषपान केल्यावर अत्यंत दुःखप्राप्ती होते. त्यास तो हे जाणून सुध्दा त्यजू शकत नाहीं तर मग त्या विषपानाने दुःख प्राप्त झाल्यावर ते भोगल्यावर तरी त्यास सोडावे.।।49।।

विषौषधं यथैवस्याद्विषनाशकरं द्रुतम।।
संन्यासोयं मतस्तद्वद्विषयासक्तिनाशकः।।50।।
अर्थ— विषावरील उतरवयाचे जे विषनाशक औषध असते ते जसे त्याचा जलदगतीने नाश करते, त्याच प्रमाणे सन्यास हा त्या विषयासक्तिचा नाश करतों.
।।50।।

न जातुः कामः कामानुपभोगन शाम्यति।।
हविषा कृष्णवत्मैव भूय एवाभिवर्धते।।51।।
अर्थ—— केंव्हांही काम हा कामनांचा उपभोग घेऊन शान्त होत नाही, ज्या प्रमाणे अग्निमध्ये आहूती टाकीत गेल्यावर तो जास्तच भडकतो, पण विझत नाहीं, तसेच हे वासनेचे शान्त होणे आहे. ।।51।।

चित्‌‌मूलो विकल्पोयं चित्ताभवेन कश्चन।।
चित्‌‌निर्मूलनं कार्य प्रत्यग्रूपे चिदात्मनि।।52।।
अर्थ—— चित्ताचे मूळस्थानीच त्यास न्यावे लागते, म्हणजे शान्ति मिळते. आपल्या मूळरुपाशी त्याचे आत्ममिलन झााल्यावर त्यास शान्ति प्राप्त होते. ।।52।।

अखण्डानन्दमात्मानं विज्ञाय स्वस्वरुपतः।।
बहिरन्तः सदानन्दरसास्वादनमात्मनि।।53।।
अर्थ— आपल्या स्वस्वरुपामध्येच अखण्ड आनन्द आहे. बाहेर भोैतिक आनंदाला क्षयच आहे. हे जाणून आपल्या आत्मस्वरुपातच त्या अखण्डआनंदाचा आस्वाद घेता येतों. ।।53।।

वैरागस्य फलं बोधो बोधस्यापरतिः फलम्‌‌।।
स्वानन्दानुभवाच्छान्तिरेषवोपरतेः फलम्‌।।54।।
अर्थ—— वैराग्याचे फलबोध हे आहे. बोधाची समाप्ती ही फळच आहे. स्वानंदाचा अनुभव आल्यावर शान्ति प्राप्त होते. आणि ह्याच अनुभवानंतर साफल्याचा आनंद व शान्ति आहे. ।।54।।

यद्युत्तरोत्तराभावो पूर्वरुपं तु निष्फलम्‌‌ ।।
निवृत्तिः परमा तृप्तिरानन्दोनुपमः स्वतः।।55।।
अर्थ—— उत्तरोत्तर हा भाव एक—एक पायरी वर चढत गेल्यावर मागील सर्व राहयलेल अज्ञानरुप असते, ते निष्फल वाटते. निवृत्ति मध्येच अतिशय तृप्ती प्राप्त होवून त्याच स्थितित अवर्णनीय आनंद प्राप्त होतो. ।।55।।

वाञछाक्षणे तु या तृप्तिस्तत्र वाञछैव कारणम्‌।।
तुष्टिः स्वतुष्टिपर्यन्ता ततो वाञछां परित्यजेत्‌‌।।56।।
अर्थ—— उत्पत्तिच्या वेळेस ती इच्छाच त्या तृप्तीसाठी कारणीभूत वाटते. मात्र तृप्ती ही स्वतःच तृप्त होते, तेंव्हा वाञछा ही त्यागावीच लागते. (ब्रह्मानंदास बाह्य इच्छा ही कारण म्हणून लागत नाहीं ते स्वतःच स्वयंभू असे आनन्दमय तत्व असतें.) ।।56।।

मौर्ख्योन्मेषनिमेषाभ्यां कर्मणां प्रलयोदयौ।।
तन्नाशो यत्नतः कार्यो गुरुशास्त्रार्थसङगहैः ।।57।।
अर्थ— कर्मरुपी महाप्रयलयी लाटा जेंव्हा मूर्खपणाच्या उदयामुळे क्षणार्धात उसळून वर येतात त्यावेळेस गुरु आणि शास्त्रार्थ ह्‌यांचा सहवास करुन त्यास नष्ट करण्याचा प्रयत्न करावा।।57।।

शास्त्रसज्जनसम्पर्केःशमदमादि गुणान्वितैः ।।
आदौ संसारमूक्त्यर्थ प्रज्ञामेवाभिवर्धयेत्‌।।58।।
अर्थ— ह्या संसारापासून मुक्ति मिळावी म्हणून प्रथम सुरुवातीलाच आपली बुध्दि तत्प्रीत्यर्थ विकसित करावी. त्याकरितां शम दमादि गुणांनी आणि शास्त्र चर्चा आणि सज्जनसंगति ह्यांनी त्याला सिंचून त्याची पुष्टी करावी. ।।58।।

गुरुशास्त्रोक्त मार्गेण स्वानुभूत्या च चिद्‌घनम्‌‌।।
ब्रह्मैवाहमिति ज्ञात्वा वीतशोको मवेन्मुनिः।।59।।
अर्थ—— गुरु आणि शास्त्र यांच्या मार्गदर्शनाने त्या रस्त्याने जाऊन आणि स्वानुभूति घेतल्यावर ते अक्षय सुखदायक ब्रह्मतत्वच माझ्‌या आत्मतत्वामधे विद्यमान आहे, हे ज्ञान प्राप्त करुन घेऊन जो महान साधक आहे, त्याने शोकरहित व्हावें. ।।59।।

स्वानुभूतेश्च शास्त्रस्य गुरोश्चैवकवाक्यता।।
यस्नाभ्यासेन तेनेात्मा सतत चावलोवयते।।60।।
अर्थ—— स्वानुभूतिने गुरु आणि शास्त्र ह्यांतील एकवाक्यतेने ज्या साधकाचे मन सतत आभ्यास करुन सज्ज झालेले असते, त्यास आत्मतत्वाचे सतत अवलोकन होते. ।।60।।

रुपस्य ग्रहणार्थाय यथां चक्षुर्हि साधनम्‌‌।।
तथा स्वरुपबोधाय वेद एव हि साधनम्‌।।61।।
अर्थ—— ज्या प्रमाणे कोठलेही रुप आपण डोळयांनीच पाहतो, तसेच आपल्या स्वरुपाचे आत्मतत्वाचे बोधरुपाने दर्शन होण्यास “वेद“ हेच साधन आहे. ।।61।।

वेदानुवचनेनैव विप्रा विविदिषन्तिच ।।
ब्रह्मणः शास्त्रयोनित्वांच्छास्यं वेदात्‌ पर न हि ।।62।।
अर्थ—— वेदांतील अनुवचनाप्रमाणे ब्राह्मण ओळखले जातात. “ब्रह्मं वेत्ति ब्राम्हणः“ ज्यास ब्रह्मतत्वाचे ज्ञान आहे तो ब्राह्मण कुळांत जन्मला म्हणून नव्हें. हेच वेदवचन आहे. आणि वेदांहून दूसरे महान्‌ शास्त्र नाहीं. ।।62।।

द्वे विद्ये वेदितव्ये तु शब्दब्रह्म परं च यत्‌‌।।
शब्दब्रह्माणि निष्णांतः परं ब्रह्माणिगच्छति ।।63।।
अर्थ—— दोन विद्या जाणल्या पाहीजेत. एक शब्दब्रह्मंर हे त्यांत परं म्हणजे मोठे मानले गेले आहे. जो शब्दब्रह्मनिष्णांत असेल तो परब्रह्माची प्राप्ती करुन घेतो. ।।63।।

संन्यस्तसर्वङकल्पः समः शान्तमना मुनिः।।
सन्यासयोगयुक्तात्मा ज्ञानवान्मोक्षवान्भवेत्‌।।64।।
अर्थ—— सर्व संकल्पांचा कामनांचा त्याग करणारा आणि प्रशान्त अश्या मनाचा मुनी सन्यास प्राप्त करुन घेवून आणि ज्ञानी होवून मुक्त होतो. (मोक्ष प्राप्ति करितो)।।64।।

सर्वसंङल्पसंशान्तं प्रशान्तघनवासनम्‌‌।।
न किञिचद्‌‌भानकारं यत्तद्‌ ब्रह्मपरं ।।65।।
अर्थ—— सर्व इच्छा, वासना विरहित, अत्यंत शान्त ज्या ठिकाणी कोठलीही भावना नाहीं, ते परब्रह्म समजावें.।।65।।

ब्रह्मतद्विदितादन्यत्‌‌थैवाविदितादपि।।
यतो वाचो निवर्तन्ते ह्यप्राप्य मनसा सह।।66।।
अर्थ—— मनासहित जेथून वाचा परत फिरते. जे अनर्वचनीय आहे ते परब्रह्म म्हणजे ज्ञान आणि जे प्राप्त न करताच अज्ञान परत फिरते ते परब्रह्म आहे. ।।66।।

यस्यामतं मतं तस्य मतं तस्य न वेद सः।।
अविज्ञात विजानतां विज्ञातमविजानताम्‌‌।।67।।
अर्थ—— त्याचे ज्ञान करुन घ्यावे म्हणावे तर त्या पदावरुन आपले मन परत फिरलेले असते आणि त्याचे अज्ञान म्हटले तर ब्रह्म प्राप्ति नंतर (न जाणणे—नेणीव) हे नष्ट होते कारण ते ज्ञानस्वरुप आहे. ।।67।।

देवदत्तोहमित्येतद्विज्ञानं निरपेक्षकम्‌‌।।
तद्वद्‌‌ ब्रह्मविदोप्यस्य ब्रह्महमिति वेदनम्‌‌।।68।।
अर्थ—— मी परमेश्वराच्याच इच्छेनेच जन्मलो हे ज्ञान निरपेक्ष आहे. त्याचप्रमाणे मी ब्रह्म ब्रह्म आहे (अहं ब्रह्मास्मि) हे पण ज्ञान निरपेक्षच आहे. (निरीच्छ—विरक्त—निरपेक्ष) ।।68।।

भानुनेव जगत्सर्वं भास्यते तस्य तेजसा।।
अनात्मकमसत्‌‌ुच्छं किं नु तस्यावभासकम्‌‌।।69।।
अर्थ—— सूर्यामुळेच सर्व जगत तेजोमय वाटते. त्याच प्रमाणे जे आत्म्याशिवाय अचेतन तत्व असते ते तुच्छ निर्जीव नाहीं कां भासत? (अर्थात आत्मतत्वाच्या उपस्थितीचे सर्व कांही चैतन्यमय भासते.) ।।69।।

वेदशास्त्रपुराणानि भूतानि संकलान्यपि।।
येनार्थवन्ति तं किं नु विज्ञातारं प्रकाशयेत्‌‌ ।।70।।
अर्थ—— वेदशास्त्र पुराणे त्याच प्रमाणे सर्व प्राणीमात्र ज्यामुळे अस्तित्वमान्‌ होतात, ज्यामुळे त्यांस अस्तित्वांत असण्याचा मान मिळतो त्या ब्रह्मतत्वामुळे ज्ञाता जो (विज्ञातृ) त्याला पण “अहं ब्रह्मास्मि“ हे ज्ञान कसे प्राप्त होणार नाही. (अर्थात्‌ होइलच) ।।70।।

ग्रन्थमभ्यस्य मेधावी ज्ञानविज्ञानतत्परः।।
पलालमिव धान्यार्थी त्यजेद्‌‌ग्रन्थमशेषतः ।।71।।
अर्थ—— ज्ञान आणि विज्ञान प्राप्त करणारा जो अभ्यासू आहे त्याने ज्या प्रमाणे धान्य गोळाकरणारा त्यांतील काडयाकडबाकोंडा आदि त्याज्य पदार्थ वगळून अस्सल धान्यच गोळा करतो, तद्वत त्या अभ्यासूने ग्रंथातील सारतत्वच ग्रहण करावे बाकी सर्व त्याज्य समजून सोडावें.।।71।।

उल्काहस्तो यथालोके द्रव्यमालोक्य तां त्यजेद्‌‌।।
ज्ञानेन ज्ञेयमालोक्य पश्चात्‌‌त्परिवर्जयेत्‌‌।। 72।।
अर्थ—— उल्का, आकाशांतील तारका तुटल्यावर खाली जमीनीवर येतात तेंव्हा त्या निखार्‌या सारख्या उष्ण असतात म्हणून हातात स्पर्श झाल्या बरोबर ज्या प्रमाणे आपण त्यांना एकदम झटक्याने फेकून देतो तद्वतच (अवैध मार्गाने) येणारे धन हे पाहताच त्याचा अव्हेर त्याग करावा. तसेच साधकाने आपल्या ज्ञानशक्तिने ज्ञेय अर्थात परमतत्वाचे ज्ञान प्राप्त करुन जे अन्य व्यर्थज्ञान आहे, त्याचा त्याग करावा. ।।72।।

शब्दांक्षरं परंब्रह्म यस्मिन्क्षीणे यदक्षरम्‌‌।।
तद्विद्वानक्षरं ध्यायेद्यादिच्छे च्छान्तिमात्मनः।।73।।
अर्थ—— शब्द परब्रम्ह आहे. त्यांतील जे क्षर आहे त्याचा त्याग करुन जे अक्षय तत्व शिल्लक राहते,त्याचा अध्ययनपूर्वक स्वीकार करुन शांति प्राप्त करुन घ्यावी. ।।73।।

श्रीकृष्णो भगवानेव महाभ्यासक्रमो यतः।।
मनसः शमनोपायमेव मेवाभ्यसेद्‌‌ बुधः।।74।।
अर्थ—— ”श्रीकृष्णच भगवान आहे”, हा महाअभ्यास आहे. अभ्यासक्रम आहे. ब्रह्मसंहितेत पहिलेच प्रारंभिक वचन आहेः— ”ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानंद विग्रहः” म्हणून विद्वान पण्डिताने मनाच्या शांतिसाठी ह्‌याच उपायाचा अवलंब करवा. ।।74।।

ज्ञात्‌ज्ञानादिकं त्यक्त्वा न किञिचदपि चिन्तयन्‌‌।।
आनन्दमात्र एवाहमितिमत्वा स्थिरो भवेत्‌‌ ।।75।।
अर्थ——ज्ञाता ज्ञान आदि सगळे सोडून इतर कोठला ही विचार न करिता मी आनंदमात्रच आहे, असे चिन्तन करुन मन शान्त व स्थिर करावें. ।।75।।

अनारोग्यं मनःक्षोभो यथा न स्यात्‌थाविधम्‌‌।।
सम्यगावरणं कृत्वा ध्यानाभ्यासस्थितिं चरेत्‌‌।।76।।
अर्थ—— आरोग्यहीनता मनःक्षोभ आदि प्रतिकूल परिस्थिती नसे, असे चिन्तन करावे, आणि योग्य प्रकारे अनुकूल वातावरण प्राप्त करुन घेवून श्रृयानाभ्यास करावा. ।।76।।

इति श्रीसमर्थरामदासासानुगृहित श्रीरामपदपंङ्‌‌कजभृङगायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे ब्रह्माज्ञानेन परमानन्दप्राप्तिर्नाम चतुर्थं प्रकरणं सम्पूर्णम्‌‌।

home-last-sec-img