Literature

ब्रह्मणः परमकारणत्वं नाम प्रकरण द्वितीयम्‌‌

(ब्रह्मतत्वाचे मुख्य कारण, प्रकरण दूसरे)

यतो भूतानि जायन्ते येन जीवन्ति सर्वदा ।
यद्विशन्ति स आनन्दो ब्रह्मैवाहं श्रुतिर्मुदा।।1।।
अर्थ— ज्या मुळे सर्व जीव उत्पन्न होतात, ज्या मुळेच सर्व जीव जीवित राहतात, ज्यामध्येच सर्व जीव शेवटी विलीन होतात, तोच परम आनंद म्हणजे ब्रह्मतत्वच आहे. असे श्रुति म्हणजे वेद सांगतात (ध्वनि करतात)।।1।।

द्विव्याद्यनेकसङ्‌‌ख्यानां पूर्वेका वर्तते यथा।
भिन्नत्वस्य बहुत्वस्य पूर्वमेकं हि कारणम्‌‌।।2।।
अर्थ— दोन तीन आदि अनेक संख्यांच्या पूर्वी एकच संख्या असते, त्याप्रमाणे भिन्नता आणि विविधता ह्‌‌यापूर्वी सुध्दा एकत्व हेच कारण आहे. ।।2।।

ब्रह्मैकानन्दंरुपं यत्‌‌‌तदुपादानकारणम्‌‌।
जगतोस्य जगच्चैबं कार्यं बहुविधं भिदा।।3।।
अर्थ— ब्रह्मानंदरुपाने जे कारण आहे, तेच ह्‌या सर्व जगाचे पूर्वी आणि ह्‌या सर्व जगतांत आता, त्याचे उत्पत्तीकारण म्हणजे उपादान कारण आहे. जे आता बहुविध प्रकारांत विभाजित दिसत आहे. ।।3।।

सर्वपूर्वं भवेद्यत्तत्‌‌ सर्वकारणमीरितम्‌‌।
स्वपूर्णे कारणे कार्य हाटके कटकादिवत्‌‌।।4।।
अर्थ— सर्व चराचराचे जे आद्य कारण परिवर्तित झाले आहे ते ब्रह्मतत्वच आहे. ज्या प्रमाणे एका सुवर्णापासुन कडे (एक हातांतील अलंकार ”कटक”) आदि बनविले जातात जे, ते विविध रुप धारण करतात.

अलङकारे सुवर्ण सदस्तिभातिप्रियत्वतः।
नामरुपादलङकारः सोपि नेैव पृथक्‌‌स्थिति।।5।।
अर्थ— ज्या प्रमाणे अलंकारांमध्ये सोने हा मूळ धातु (अस्ति्‌‌ भाति—प्रियत्वं) ह्‌या मूल तत्वातच विद्यमान असतो आणि केवळ त्याचे नाव आणि रुप ह्‌‌या वरुनच त्यास अलग—अलग मानले जाते, परंतु त्यांत सोने हेच एक विद्यमान असते.।।5।।

अस्ति भाति प्रियत्वेन कारणं लक्ष्यते यतः।
कारणं हि भवेद्‌‌ ग्राह्यं कार्यं स्यान्निष्प्रयोजकम्‌‌।।6।।
अर्थ— असणे प्रकाशित होणे, प्रिय वाटणे (अस्ति्‌‌ भाति—प्रियत्वं) ह्‌या प्रकाराने कारण हेच विद्यमान असते. परंतु त्यांचे जे कार्य असते ते ग्राह्‌य नसून कारण हेच ग्राह्‌य असते, विचार करण्यास योग्य असते.।।6।।

आनन्दाप्तिहिं हेतुःस्यात्‌‌ सर्वेषां कर्मणां यतः।
आनन्दस्तत एवायं जगत्कारणमुच्यते।।7।।
अर्थ— आनंद प्राप्त करणे हाच सर्व कार्यांचा हेतु असतो, त्याच प्रमाणे ह्‌या जगांत निर्मितीचा सुध्दा आनन्द प्राप्ती हाच हेतु असतो. ।।7।।

कार्यं कारण सापेक्षं मृत्सापेक्षो यथा घटः।
कार्यान्नानन्दलाभः स्यादानन्दाप्तिस्तु कारणात्‌‌।।8।।
अर्थ— कार्य आणि कारण ह्‌यांत ज्या प्रमाणे (उदा0—घट आणि मुत्तिका दिसते, म्हणजे माती हेच कारण आणि घट के कार्य ह्‌यात सुध्दा घट हा नश्वर आणि माती हीच शाश्वत) असा अर्थ आहे. कार्यामध्ये आनंदप्राप्ति नसून कारणातच आनन्द आहे, असे म्हटले आहे.।।8।।

अस्ति भातिप्रियञचैव नामरुपञच पञचकम्‌‌।
आद्यं त्रयं ब्रह्मरुपं कार्यरुपं ततो द्वयम्‌‌।।9।।
अर्थ— अस्ति,भांति,प्रियं,रुपं,नाम ह्‌या पंचकामध्ये पहिले तीन जे आहेत ( अस्ति,भांति,प्रियं ) हे ब्रह्मरुप असून नन्तरचे दोन नाम रुप हे (अर्थात्‌ सर्व प्राणिमात्रांचे नाम रुप हे) कार्यरुप आहेत. ।।9।।

उपेक्ष्य नामरुपे द्वे ह्यधिष्ठानस्य संश्रयात्‌‌।
अस्तिभाति प्रियत्वं तदानन्दब्रह्मणो भवेत्‌‌।।10।।
अर्थ— त्यांतील शेवटचे दोन (नाम, रुपम )हे जर सोडले, बबगळले तर प्रथम भागांतील तीन ( अस्ति,भांति,प्रियं ) हे चैतन्यमय आत्मतत्वच आहे, हे सदा ”अस्ति” ह्‌या रुपांत आहेत. ते जन्माला येते, तेंव्हा त्या रुपात येते. आणि ते ज्याचे त्याला फार प्रिय असते, म्हणून ”प्रियत्व” रुपांत येते. तर हे ब्रह्मतत्वाच्या आनंदांत सम्मिलित होतात, म्हणून हे ब्रह्मानन्दच म्हटले जाईल ।।110।।

उत्पत्तिमभ्यदवेत्कार्यर्मनुत्पन्नं तु कारणम्‌‌।
यज्जन्यं तदनित्यञच दुःखं विकृतिमज्जडम्‌‌।।11।।
अर्थ— उत्पत्ति रुपाने कार्य प्रकट होते आणि कारण रुपाने जे अनुत्पन्न असते ते सद्‌‌रुपाने अस्तित्वातच असते. जे उत्पन्न होणारे असते, ते नाश पण पावतेच, ते अनित्यरुपाने असते, ते दुःख आणि विकृति उत्पन्न करणारे असून त्यांचा तसाच शेवट असतो. ।।11।।

एतत्तदुत्तमं सत्यं यत्र किञिचन्न जायते।
दुःखाभावार्थमेवायं कार्याभावः प्रचक्ष्यते।।12।।
अर्थ— ज्या ठिकाणी कांही उत्पन्न होत नाही ते नित्य विद्यमान असते, ते उत्तम आणि सत्य (सत्‌अर्थात अविनाशी तत्व) असते. जे सत्‌‌‌तत्व असते ते चिर असून त्यांत कांहीही कार्य उत्पन्न होत नसून ते उत्तम आहे. त्यांत दुःखाचा अभाव असून तेथे कोठलेच कार्य उत्पन्न होत नाही. ते केवळ आनन्द रुपच आहे. ।।12।।

यद्यद्वि क्रियते सर्वेशनन्दाप्त्यै तथैव च।
दुःखस्य हि निवृत्यर्थ नान्यो हेतुर्हि कर्मणः।।13।।
अर्थ— जे जे कार्य केले जाते ते केवळ आनंद प्राप्ति साठीच केले जाते. दुःखाची निवृत्ती अर्थात दूर करण्यासाठीच केले जाते. आणि दूसरा कोठलाच हेतु नसतो. ।।13।।

एकमेवाद्वितीयं यद्‌‌ब्रह्मणो लक्ष्यमीयते।
तस्मिन्निस्फूर्तिके नित्ये निष्क्रिये किं प्रजायते ।।14।।
अर्थ— एकच एक ब्रह्मतत्वाने हे सर्व व्याप्त केलेले आहे. त्यांत जर कांहीच स्फुरण उत्पन्न झाले नाहीं, तर कार्य उत्पन्न होणार.।।14।।

यदि दुःखनिवृत्यर्थं कार्यं किमपि चेत्तदा।
आनन्दब्रह्मणा क्वापि दुःखस्य न हि शक्यता।।15।।
आनन्दे दुःखसद्‌‌भावस्तेजसीव तमो यथा।
वन्ध्याकुमारवन्नैव मन्तुं सङ्‌घटते कदा ।।16।।
अर्थ— त्या आनंदमय तत्वातं दुःख कसे उत्पन्न होईल, तर अंधारात्व आणि प्रकाश हे बरोबर सहकार्याने राहतील कां ? किंवा वांझ स्त्रीचा पुत्र हे म्हणजे बरोबर होईल कां? तद्वत्‌च आनंदस्वरुप ब्रह्मतत्वा पासून दुःखनिवृत्तिसाठी कांही कार्य संभवत नाहीं. ।।15—16।।

आनंदरुपं यद्‌‌ब्रह्म तत्कार्यं स्यादसम्भवम्‌‌।
स्वपूर्णानन्दरुपस्य किं कार्येण प्रयोजनम्‌‌।।17।।
अर्थ— नित्य चिर शश्वत आनंदरुप अखण्ड ब्रह्मापासून कांही कार्य उत्पन्न होणे शक्य नाहीं. जो स्वतःच आनंदरुप आहे, त्यापासून कार्य निषत्ति संभवत नाहीं. (कारण कार्य हे नेहमीच आनंद निर्माण व्हावा म्हणून केले जाते )।।17।।

यतः प्रयोजनाभावः कार्योत्पत्ति संभवेत्‌‌।
यदि कार्य विभाव्येत भ्रमपात्रं हि तद्‌‌भवेत।।18।।
अर्थ— जर कार्याचे प्रयोजन नाही, हेतुच नाही तर कार्य संभवत नाहीं. आणि जर आहे असे वाटत असेल तर तो भ्रमच असेल. ।।18।।

स्थाणौ पुरुषभ्रान्तिस्तु नाधिष्ठानात्पृथक्‌‌ स्थिता ।
स्थाणुरेव भवेत्सत्यः पुरुषो रज्जुसर्पवत्‌‌।।19।।
अर्थ— एकाद्या लाकडाच्या खोडावर पुरुषाची भ्रांति उत्पन्न झाली (अंधारांत एकादे शुष्क झाडाचे खोड उभं पाहून तेथे कोणी भूतच उभे आहे असा भ्रम उत्पन्न झाला. ) तर ते त्या ठिाकाणी लाकडाचे खोडच उभे आहे, हे खरे अस्तित्व असते. आणि पुरुष किंवा भूत हे खरे नसते. ते एकाद्या दोरीलाच साप, साप म्हणून भ्रमित व्हावे तसे असते. ।।19।।

रज्जवामसर्पभूतायां रज्जवज्ञानाद्यथा त्वहिः।
कार्यशून्ये तथानन्देतदज्ञानाज्जगस्त्स्थितिः।।20।।
अर्थ— रज्जु म्हणजे एकाद्या दोरी मध्ये सर्वाचा भ्रम होतो. त्यांतील (सत्य) दोरी असणे हे ज्ञान नसल्यामुळे आम्हास ह्‌या कार्यशून्य अश्या जगात त्या (भ्रामक) आनंद आणि जगताची प्रतीती होते. खरा आनंद ब्रह्मतत्व हे समजत नाही. आणि भ्रामक असे हे दुःखपूर्ण जगतच खरे वाटते. ।।20।।

एकमेवाद्वयं ब्रह्म स्वत आनन्दरुपकम्‌‌।
तदज्ञानावशात्तस्मिन्नत्कार्य प्रतीयते।।21।।
अर्थ— एकमेव ब्रह्मतत्वच आनंदरुप आहे. त्याच्या अस्तित्वाच्या अज्ञानानेच त्यातच कार्याचा भास होतो. ।।21।।

यदिदं दृष्यते कियिंजगत्स्थावरजङगमम्‌‌।
तत्सुषूप्ताविवस्वप्नः सत्यं नैव कदाचन।।22।।
अर्थ— जे कांही स्थावर जंगम जगत (चर,अचर असे) आम्हास दिसते ते सत्य नसून ज्या प्रमाणे आम्हाला झोपेमध्ये स्वप्नसृष्टी दिसते किंवा गाढ झोपेमध्ये ज्या प्रमाणे आम्हाला आपला विसर पडतो तद्वतच भ्रामक आहे. ।।22।।

आवृत्या ज्ञानविक्षेपैर्भ्रमकार्यस्य संस्थितिः।
आवृत्याज्ञानविक्षेपैर्विहीनं ब्रह्म निष्क्रियम्‌‌।।23।।
अर्थ— अज्ञानाच्या विभ्रमस्थितिची पुनरावृत्ति होत राहून तो एक भ्रामक स्थिती बनते. मात्र त्या स्थितित ब्रह्म हे निष्क्रीयच असते. आणि भ्रमाचा निरास (निष्कासन) होवून गेल्यावर सुध्दा ते ब्रह्मतत्व अविकारीच असते. ।।23।।

सच्चिदानन्दरुपत्वादद्वयत्वाच्च सर्वदा।
आगमापाय्यसत्कार्यमाकाशकुसुमोपमम्‌‌।।24।।
अर्थ— आकाश कुसुम हे ज्याप्रमाणे एक अप्राप्य वस्तु आहे, त्या प्रमाणे सत्‌‌ चित्‌‌‌‌ आनंदमय असे तत्व आहे. त्याचा अनुभव घेणे हे वेदज्ञान प्राप्तीविणा असंभव आहे. (न हि ज्ञानेन बिना पवियमिह विद्यते)।।24।।

अज्ञाने बुध्दिविलये जीवेशजगदादयः।
सूप्तो नैव प्रतीयन्ते किमुतानन्द ब्रह्मणि।।25।।
अर्थ— अज्ञानाचा ज्ञानामध्ये विलय झाल्याशिवाय जीव—ईश्वर ह्‌‌यांतील ब्रह्मानंद कसा प्राप्त होणार ? निद्रित अवस्थेत हा ब्रह्मानंद प्राप्त होणार नाहीं. ।।25।।

असत्कल्पो विकल्पोय विश्वमित्येकवस्तुनि।
निर्विकारे निराकरे व्योमवत्‌‌ कल्पना कुतः ।।26।।
अर्थ— अशाश्वत आणि भ्रमपूर्ण अश्या जगामध्ये निर्विकार गगनसदृश असीम अश्या (अफाट ब्रह्मतत्वाची)कल्पना कशी करणार ? ।।26।।

द्रष्टदर्शन दृष्यादि भावशून्ये निरञजने।
अद्वितीये परे तत्वे निर्विशेषे भिदा कुतः।।27।।
अर्थ— दष्य दृष्टा आणि दर्शन ह्‌या विभाजित तीन गोष्टी (दृष्य बघणारा आणि बघण्याची क्रिया) त्या द्वितीय भावशून्य आणि निर्मल (निरंजन) अश्या ब्रह्मतत्वांत कश्या शक्य आहेत.।।27।।

एकात्मके परे तत्वे भेदकर्ता कथं वसेत्‌‌।
सुषुप्तोै सुखमात्रायं भेदः केनावलोकितः ।।28।।
अर्थ— एकात्मक अश्या परमतत्वामध्ये भेद उत्पन्न करणारा कसा विराजमान होईल ? सुषुप्त अश्या गाढ स्पप्नरहित निद्रेमध्ये दूसरा कोणी अनुभूत होतो कां ?

मायावरणरुढोयं त्वज्ञानभवपादपः
ईशः प्रकाण्डयुक्तोयं त्वज्ञानभवपादपः।।29।।
अर्थ— अज्ञानरुपी वृक्ष (अहं आणि ब्रह्माचे ज्ञान नसलेले) म्हणजे हे भव म्हणजे अर्थात आम्हाला आमच्या चर्मचक्षूंना जे अनुभवास येते ते जग माया रुपी पडद्याआड जो भ्रामक आहे अश्या पडद्याआड गुंडाळलेले असून तसे भासते. ह्या प्रचण्ड वृक्षाच्या विशाल खोडावर इश्वर जीवरुपाने आवेष्टित होवून विराजित असतो. ।।29।।

बहुभिः पदार्थपर्णेश्च वासनापुष्प सुंदरः।
बहुजन्मफलोत्कीर्णः संसार इति विश्रुतः।।30।।
अर्थ— अनेक पदार्थरुपी पत्र (पाने) अनेक वासनारुपी पुष्प आणि बहुत से जन्म घेणारी जीवयोनी ह्‌यांनी नटलेला हा वृक्ष संसार म्हणून प्रसिध्द आहे. ।।30।।

ईक्षणादि प्रवेशान्ता सृष्टिरीशेन कल्पिता।
जागृदादि विमोक्षान्तः संसारी जीवकल्पिता।।31।।
अर्थ— ईश्वराने ईक्षणाने संकल्पाने ही सृष्टी निर्माण केली. जागृति आदि अवस्थेनंतर मोक्षादि कल्पनांची सृष्टी निर्माण झाली. ही जीवकल्पना म्हणजे संसार आहे. ।।31।

कल्पनामात्रका सृष्टिननिन्दाय कदाचन।
कल्पितान्नेन किं तृप्तिर्भजते कोपि मानवः।।32।।
अर्थ— भ्रामक अशी ही कल्पनामय सृष्टी आनंदप्राप्तीसाठी, शाश्वत्‌‌ आनंद प्रदान करायासाठी समर्थ नाहीं. ह्‌या अशाश्वत अशा कल्पित जगापासून तृप्ती कशी मिळणार ?

अज्ञानोभ्दासितावेतौ जीवेशाविति विभ्रमौ।
निर्विकारेखिलाधारे न स्तस्तौ ब्रह्मणि क्वचित्‌‌।।33।।
अर्थ— अज्ञानांत उत्पन्न होणार्‌या ह्‌या जीवाला आणि संसाराला (जे की भ्रमानेच उत्पन्न झाले आहेत) त्यांत ब्रह्मतत्व सांपडत नाही. (अर्थात्‌‌ ते ब्रह्मतत्वांत बसत नाहीं.) ।।33।।

तस्मान्मुमुक्षुभिर्नेवमतिर्जीवेशवादयोः।
कार्या किन्तु ब्रह्मतत्वं निश्चलेन विचार्यताम्‌‌।।34।।
अर्थ— मुमुक्षुक्ष द्वारे त्या ब्रह्मतत्वाचा निश्चल, अविचल दृष्टीने विचार करावयास हवा। अर्थात्‌ त्यांनी जीव आणि जगत्‌‌ ह्‌या विचारांत गुंतून पडू नये. ।।34।।

अद्वितीय ब्रह्मतत्वं न जानन्ति यथातथा।।
भ्रान्ता एवाखिलास्तेषां क्व मुक्तिः क्वे ह वा सुखम्‌‌।।35।।
अर्थ— अद्वितीय ब्रह्मतत्व जे जाणत नाहीं त्यांना (अर्थात जे शरीर हेच जीव आहे, असे मानतात) सुख व मुक्ति कोठून मिळणार ? ते सर्व जीवनभर ह्‌या संसारांत आणि शरीरांतच भ्रमण करीत राहतात. ।।35।।

कार्याभावः स्वाभावोयं ब्रह्मणः खलु शाश्वतः।
तथापि भाति चेत्कार्यमन्यथा भाव एव सः।।36।।
अर्थ— शाश्वत ब्रह्माचा कार्य न करणारा असा (अकर्तृत्वभाव) नित्यच आहे. तरीही पण त्याचे काय आहे, असा भास होतो. ते एक वेगळेच वाटणे (भाव) आहे. ।।36।।

अन्यथा भाव एवं हि भ्रम इत्युच्यते बुधैः।
न भूत्वा भासते यच्च भ्रमकार्यं हि तन्मतम्‌।।37।।
अर्थ— दूसरा जो हा भाव आहे त्याला ज्ञाते लोक भ्रम असे म्हणतात. जे अस्तित्वांत नसून ही भासते, त्यास भ्रम असे म्हणतात. ।।37।।

न भासतेन्यथा कार्यं सत्यस्यावरणं विना।
तस्माद्‌‌ ब्रह्मणोवरणं विश्वकार्यंस्य कारणम्‌‌।।38।।
अर्थ— सत्य अर्थात्‌ जे निश्चितरुपाने आहे, ते ब्रह्मतत्व. त्यावरील आवरणामुळे भ्रमरुपी पडदा पडल्यामुळे जाणवत नाही. आणि विश्व भासण्याचे कारण हा भ्रमरुपी पडदाच आहे. ।।38।।

इदमावरणं केश्चिन्मायेति प्रविभाव्यते।
नावृत्ति ब्रह्मणः काचिदन्याभावादनावृतम्‌‌।।39।।
अर्थ— कुणी ह्‌या आवरणास (कैःचित्‌‌) माया असे म्हणतात. ही ब्रह्मतत्वाची पुनरावृत्ति नसून ते भ्रमरुपी पडद्यया मुळे झांकलेले तत्व म्हणजे ‘‘माया‘‘ च आहे. ।।39।।

तथापि भांति चेदस्य स्यादज्ञानं हि कारणम्‌‌।
विश्वसर्जनसंङल्पे विक्षेपोज्ञानतस्ततः।।40।।
अर्थ— तथापि ते प्रकाशित होते, अर्थात आम्हास दिसते ते अज्ञान, ह्‌या कारणामुळेच ! विश्वउत्पत्तिच्या वेळी (जो निर्मितीस कारण संकल्प होता) तो विक्षेप अज्ञानामुळेच उत्पन्न झाला. ।।40।।

अज्ञान ब्रह्मणश्चैवं जगत्कारणमीर्यते।
इतो दुःखस्य सम्प्राप्तिरानन्देच्छा च जायते।।41।।
अर्थ— ब्रह्मतत्वाचे अज्ञान हेच जगताचे कारण आहे. त्या मुळेच जगामध्ये दुःखप्राप्ती आणि आनंदाची इच्छा उत्पन्न होते. ।।41।।

आनन्दस्य हि सम्प्राप्तिर्जगत्कारण ब्रह्मणः।
कार्यान्नैवेति या बुद्धिस्तज्ज्ञानमिति कथ्यते ।।42।।
अर्थ— जगताचे कारण जे ब्रह्मतत्व तेच आनंदाचे मूळ (स्त्रोत) कारण आहे, आनंदाच्या उत्पत्तिचे उगमस्थान आहे, हे समजले म्हणजे ज्ञान असे म्हटले जाते. कोठल्याही कार्यापासून त्या आनंदाची प्राप्ती होत नाही. (अर्थात्‌ वेदान्त विषयांत महान्‌ मनीषींद्वार असे म्हटले जाते.)।।42।।

कार्यादेव भवेत्प्राप्तिरानन्दस्य न चान्यथा।
मत्वेत्थं भोगबुद्धिर्या सैवाज्ञानमिहोच्यते ।।43।।
अर्थ— कार्यापासूनच आनंदाची प्राप्तीे होते, अन्यथा नाही. अशी जी भोग बुद्धि तिलाच अज्ञान असे म्हटले आहे. ।।43।।

सर्वदुःखनिधानन्तत्कारणाज्ञानमेव हि।
तेनानन्दस्य सम्प्राप्तेर्भ्रमःकार्ये प्रजायते।।44।।
अर्थ— सर्व दुःखाचे घर म्हणजे अज्ञानच आहे. त्यामुळे सर्व आनंद प्राप्तीचे भ्रामक कार्य उत्पन्न होते. अर्थात तसे प्रयत्व केले जातात. ।।44।।

गृञजापुञजो न चाग्निः स्यादन्यारोपित वन्हिना।
तथानन्दो न कार्यं स्यात्तस्मिन्नारोपितेपि च।।45।।
अर्थ— लाल रंगाची कंदमुळे म्हणजे कांही नेहमी अग्निच नसतो. कांही गाजर, लसूण आदि लाल रंगाची कंदमुळे असतात. तो रंग अग्निचा भंरम पण उत्पन्न करु शकतो. त्या प्रमाणे (एखादा कार्याचा परिणाम) हा आपण त्यावर जरी आनंद आहे, असा आरोप केला तरी, म्हणजे चुकुन त्यांत आनंद मानला तरी तो खरा आनंद नसतो. ।।45।। (गीता 18—38)

आनन्दावरणेनैव कार्योत्पत्तिर्यदा भवेत्‌‌।
आनन्दावृत्तिवृद्धिः स्यात्कार्यस्य सुखबुद्धितः।।46।।
अर्थ— वरवर जरी आनंदाचे आवरण असले तरी असे कार्य केल्यावर त्या कार्यापासून सुख वाढेल असे वाटते ।(राजस वृत्ती)।।46।।

आनन्दावरणाद्‌‌दुुखः सहजं भवति ध्रुवम्‌‌।
तस्मादावृत्तिनाशार्थ यत्नः कार्यो मुमुक्षुभिः ।।47।।
अर्थ— वरवर जरी आनंदाचे आवरण असले तरी त्या खालील दुःख हे कार्यानन्तर निश्चितच असते. सुखप्राप्तीच्या बुध्दिने ते कार्य केले जाते. त्या साठी मुमुक्षु साधकाला शाश्वत सुखासाठी त्या भ्रमक आवरणाच्या भेदनाचा प्रयत्न केला पाहिजे. ।।47।।

आनन्दावरणापाये मेघापाये यथा रविः।
प्रत्यक्षं भवति बह्म स्वयमानन्दरुपतः।।48।।
अर्थ— आनंदावरील भ्रामक आवरण दूर झाल्यावर ज्या प्रमाणे मेघांमुळे सूर्य आच्छादित झाल्यावर दिसत नाही. पण त्यावरील ते झांकण अभ्रे दूर झाल्यावर सूर्यदर्शन स्पष्ट होते, (कारण सूर्य हा तेथेच स्थित असतो पण आपल्या दृष्टिसमोर ढगांचा पडदा पडतो.) त्या प्रमाणे खरे सुख म्हणजे ब्रह्मतत्व स्पष्ट व स्वतःच आनंदस्वरुप असते जेव्हां ते अनुभूत होते. जाणवते.।।48।।

आवृत्तेनशिनादूर्ध्वं नो यत्नोज्ञाननाशने।
स्वयं दर्शनिशान्ते तु तत्तमोपि हि नश्यति।।49।।
अर्थ— अज्ञाननाशासाठी केलेला आमचा प्रयत्न जेंव्हा त्या भ्रमरुप पडद्याला वर उचलतो तेंव्हा स्वतः रात्र. समाप्तीनंतर अंधःकार दूर होतो तद्वत अज्ञान लुप्त होवून ज्ञान अवतरते. ।।49।।

तावद्विषयभोगेच्छां यावदज्ञानसंस्थितिः।
नष्टेज्ञाने स्वयं नश्येच्छान्ताग्नौ च यथेन्दनम्‌‌।।50।।
अर्थ— जो पर्यंत अज्ञानाचा पडदा अपल्यावर असतो. तो पर्यत भोगेच्छा (पंचज्ञानेन्द्रियांना खाद्य पुरविण्याची हाव) असते. अज्ञान नष्ट झाल्यावर त्या स्थितित आपोआपच नैसर्गिकरीत्या शांति प्राप्त होते. अर्थात भडकलेल्या अग्नित आपण आहूती (इन्धन, जळण) देणे बन्द केल्यावर तो अग्नि शांतच होतो. (तद्वत आपल्या मलाना शान्ति प्राप्त होते.)।।50।।

इति श्रीसमर्थरामदासासानुगृहित श्रीरामपदपंङ्‌‌कजभृङगायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे ब्रह्मणः परमकारणत्वं नाम द्वितीय प्रकरणं सम्पूर्णम्‌‌।

home-last-sec-img