Literature

भाग ३

ख्रिस्ति धर्माचा जाज्वल्य अभिमान बाळगणाऱ्या, मोनिअर नांवाच्या एकनिष्ठ खिस्तभक्तानें, प्रथम कुतूहलानें सनातन धर्माच्या ग्रंथांचे वरवर अवलोकन केलें. तेवढ्यानेंच तो आकृष्ट झाला. परवशतेनें आर्यधर्माच्या त्या सर्वाति श्रेष्ठतेपुढें विनम्र होऊन, त्या दिव्य आनंदमय प्रकाशापुढें स्वदेहाभिमान, स्वराष्ट्राभिमान, स्वधर्माभिमान, सर्व विसरून त्यानें खालीं गुढघे टेकले व दोन्ही हात जोडून याची अनन्यतेनें स्तुति केली. आपल्या उद्धाराकरितां एकचित्तानें प्रार्थना केली. खोल अभ्यास केला व कायमचा भक्त झाला. त्यांच्या तोंडचे कांहीं उद्गार “Hinduism all-tolerant, all compliant, all absorbing.” हा सनातन हिंदुधर्म सर्वसहिष्णु, अंति थोर विचारांचा, सर्वसम, अतिविनय संपन्न विश्वव्यापक, सर्वसंग्राहक व सर्वांच्या अंतिम गतीचें सर्वाधिक श्रेष्ठ स्थान आहे. ” It is a living religion. It is scientific, carefully elaborated and practically valuable to all extent, not approached by any other religion in the world.” केव्हांहि सजीव असणारा हा सनातन धर्म आहे. हा स्वतः चेतनरुप असून सर्वांनाहि चैतन्य आणतो. याची मांडणी अत्यंत शास्त्रशुद्ध आहे. याची विचारसरणी तात्त्विक आहे. सर्वदृष्टीनेंहि हा परिष्कृत आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रांत जितकें याचे महत्त्व आहे, त्याचे तितकेंच महत्त्व व्यावहारिक क्षेत्रांतहि पण आहे. जीवनाच्या अखिल कार्यक्षेत्रांत याची तितकीच आवश्यकता आहे. ऐहिक तशा पारलौकिक उन्नतीचा हा उच्चतम कळसच आहे. अखिल जीवकोटीलाच अत्युन्नत अशा त्या ब्रह्मपदाची प्राप्ति करवून देण्यांत याचा हातखंडा आहे. याच्याहून उन्नतपद मिळवून देणें याहून इतर कोणत्याहि धर्माला शक्य होत नाहीं व जगांतला कोणताहि धर्म इतक्या उन्नत स्थितीला पोहोचलेलाहि नाहीं. सर्व धर्मांचा तुलनात्मक दृष्टीने संपूर्ण विचार करून व त्यांचा खोलवर अभ्यास करून झाल्यावर शेवटी “I have found Hindusim to be the most satis factory religion in the world.” ” विश्वांतल्या अखिल धर्मांचा विचार आणि अभ्यास करून झाल्यानंतर, हा सनातन हिंदुधर्मच एक मला अतिशय समाधानकारक असा आढळून आला.वैदिक धर्माविषयीं आतांपर्यंत आपण कांहीसे उतारे पाहिले आतां वेदवाङ्मयाविषयीं पाश्चात्य पंडितांचे काय मत आहे तें आपण थोडेसें पाहूं. 

In Rigveda we have poems composed in perfect language, in elaborate meter, telling us about gods and men, about sacrifices and battles, about the varying aspects of nature and the changing condition of society about duty and pleasure, phi losophy and morality. ‘वेदांचे सार्वागिक उच्चपद दाखविणारा हा उतारा ‘History of Anclent Sanskrit Literature’ या ग्रंथांतून घेतला आहे. I maintain that to every body who cares for himself for his ancestors, for his history, for his intellectual development, a study of Vedic literature is indispensible. There is no literary relic full of lessons to the true student of mankind than the Rigveda.’ आपली सार्वागिक उन्नति करून घेऊ इच्छिणाऱ्या खऱ्या विद्यार्थिसाधकाकरतां ऋग्वेद सोडून इतर कोणताहि धर्मग्रंथ मार्गदर्शक होणार नाही असे मॅक्यमुखरचे वाक्य आहे ‘India what It teaches us? ‘ या ग्रंथांतला हा उतारा आहे. याचाच १८५८ सार्डी व्हिक्टोरिया राणीस लिहिलेल्या पत्रांतील उतारा खाली देतो. And if I were asked myself from what literature, we have in Europe, who are nurtured almost exclusively on the thoughts of the Greeks and Romans, and of the semitic Race, the Jewish, may draw the corrective which is most wanted in der to make our inner life more perfect, more universal, infact more truly human, a life not for this life only but a transfigured and eternal life, again I should point to India.’ सर्व पाश्चिमात्य दार्शनिकापेक्षांहि इहपर सुखाचें अचूक मार्गदर्शन करणारे अखिल जागतिक मानवालाच उद्देशून सांगितलेले मूलग्राही तात्त्विक वाङ्मय कोणतें असेल तर ते भारतीय वैदिक वाङ्मय हेच आहे हे तत्व या उताऱ्यांतून उजळमाथ्यानें प्रगट होत आहे.

विक्सर कझन नांवाच्या एका फ्रेंच विद्वान् तत्त्वज्ञानें, एका मोठ्या सभेपुढें वैदिक वाङ्मयाविषयीं जे घंटाघोषानें सांगितलें तें येथें उद्धृत करतो.

“When we read with atten tion in Poetical Philosophical monuments of the East, above all, those of India which are beginning to spread in Europe. we discover many a truth of truths so profound and which we make such a contrast with the meanness of the results at which Europlan genius has some times stopped, that we constrained to kneel before the philosophy of the East and to see in the cradle a the human race the native land of the high est_philosophy.” 

युरोपांत अलिकडे झपाट्यानें प्रसृत होण्यास आरंभिलेल्या पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे त्यांतहि मुख्यत्त्वें करून भारतांतील उदात्त व अतिरसमय तत्त्वज्ञानाच्या अतिशय रहस्यपूर्ण बहु महत्त्वाच्या वैदिक ग्रंथभांडाराचे जेव्हां आम्ही सूक्ष्म रीतीनें अवलोकन करतो, तेव्हां वेदवेदांतांनी सुशोभित झालेल्या तात्विक रत्नसागरांत पाश्चात्य पंडितांच्या भेदक दृष्टीलाहि दिपवून टाकणारी व निसर्गरमणीय असणारी अमोलिक अशी अपार सिद्धांतरले आढळतात. त्याचा विस्तार केला असतां आम्हां युरोपियनांची बुद्धि अति मुग्ध व स्तब्ध होते. कांहीं तत्त्वज्ञान्यांच्या प्रमेयांचा विचार करतांना, यापूर्वीहि कांहीं प्रसंगी युरोपियनांची बुद्धि स्तब्ध होण्यासारखें कांहीं प्रसंग आले होते. त्यापेक्षाहि ही भारतीय प्रमेयें आणखी अधिक गहन व महत्त्वपूर्ण आहेत. विश्वाचे मार्गदर्शन करणाऱ्या विश्वभाग्योदयाच्या या अपौरुषेय वैदिक वाङ्मयाच्या पुढे, याच्या त्या दिव्य भव्यतेपुढे किती नाही म्हटले तरी, भावावेशानें शेवटी गुढघे टेकून आम्हा सर्वांनाच मस्तक लवविर्णे भाग पडतें, असा कांही विलक्षण दैवी प्रभाव आहे. आपण कोण हैं समजावून देऊन, सर्वांना मूळ स्वरुपाची अचूक ओळख पटवून देणाऱ्या, आत्मसाक्षात्कार करवून देऊन सर्वांचा उद्धार करणाऱ्या अशा या मूलग्राही सर्वोन्नत तत्त्वज्ञानाचें जन्मस्थानच हा भारतवर्ष असल्यामुळे, अखिल मानवाच्या शुद्ध धर्माची ही केवळ मायभूमि आहे. जेकोलियटनामक एका पाश्चात्य पंडिताकडून विरचित झालेल्या, “The Bible in India” नांवाच्या एका ग्रंथांत सृष्टीच्या उत्पत्तीविषयीं अनेक मतमतांतरांचा उल्लेख करून वैदिक मताचा उल्लेख करतांना त्यानें खालीलप्रमाणे लिहिलेलें आहे- Astonishing fact the Hindu revelation (Veda) is of all revelations, The only one whose ideas are in perfect harmony with modern science as it proclaims the slow and gradual formation of the world.  सर्व धर्माचे लोकहि आपआपला धर्मग्रंथ ईश्वरदत्त आहे असे म्हणतात. त्या सर्व ईश्वरदत्त धर्मग्रंथांत, अपौरुषेय वेदच एक असा ईश्वरदत्त धर्मग्रंथ आहे कीं, ज्याचे विचार यांत सावकाशपर्णे क्रमसृष्टीचा उपदेश असल्यामुळे, आधुनिक विज्ञानाशी जुळतात, आम्हांला समंजस वाटतात आणि पटतात. थक्क करून टाकणारें सोलीव सत्य या एका वेदग्रंथांतून मात्र आढळतें. अमेरिकेच्या व्हिलर बिल्लॉक्स नामक एका विदुषीनेंहि अशाच तऱ्हेनें आपलें मत प्रकट केलें आहे. ” We have all heard and read about the ancient religion of India. It is the land of the great vedas, the most remarkable works containing not only religious ideas on a perfect life, but also facts which all the science has since proved true. Electricity. Radium, Electrones, Airships all seen to have been known to which the seers who found the vedas. ” भारताच्या अतिप्राचीन वैदिक धर्माविषयीं आम्ही संपूर्ण ऐकलें आहे. आणि वाचले आहे. भारत हें त्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि श्रेष्ठ अशा वेदांचें जन्मस्थान आहे, की ज्यांत संपूर्ण दिव्य जीवनाच्या धार्मिक तत्त्वांचेंच एक केवळ विवेचन नसून, आजपर्यंतच्या अखिल विज्ञान शास्त्रांनी सिद्ध करून प्रचारांत आणलेल्या व सत्य म्हणून विश्वासून असणाऱ्या अखिल वैज्ञानिक सिद्धांताचें पण विवेचन आहे. (विद्युत) इलेक्ट्रिसिटी, रेडियम, इलेक्ट्रॉन्स आणि विमाने इत्यादिकांचें ज्ञानहि, तपोवलानें वेदांचा शोध लाविलेल्या त्या वेदद्रष्ट्या ऋषींना होते, असें आढळून येतें. आधुनिक विज्ञान शास्त्र म्हणजे वेदांतील अवाधित सिद्धांतांचें केवळ अनुकरणच होय.

वेदांविषयीं आतांपर्यंत बघितलें. आतां उपनिषदांसंबंधीं; उदाहरणादाखल, कांहीं पाश्चात्य पंडितांची मतें येथें उद्धृत करूं या. “In the whole world there is no study so benificient and so elevating as that of the upanishadas. It has been the solace of my life and it will be solace of my death. Upanishadas are a product of the highest wisdom… it is destined sooner or later to become the faith of the people.” मनुष्याच्या मनोभूमि पराकाष्ठेच्या उन्नतीस पोहचवून, मानवजातीवर आत्मानंदाची प्राप्ति करून देऊन फार मोठा उपकार करणाऱ्या या उपनिषदांच्या अभ्यासाखेरीज सर्व जगांत इतका लाभकारक व उन्नतिकारक असा दुसरा कोणताहि श्रेष्ठ अभ्यास नाहीं. उपनिषदेंच माझ्या आयुष्याचें समाधान. यांच्या आश्रयानेंच मी नितांत सुखसमाधानाचें दिव्य जीवन अनुभवीत आहे. यांच्या छत्राखालींच शेवटीं निरतिशय सुखशांतीनें मी देहत्याग करीन. उपनिषदांचें तत्त्वज्ञान म्हणजे बुद्धीच्या उच्चतम विकासाचे परिपूर्ण फळ आहे. आज ना उद्यां हा वैदिक धर्मच विश्वधर्म होईल असे जगाचे निश्चित भविष्य आहे. या ठिकाणीं धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठाहैं श्रुतिवाक्य आठवर्ते. जगाच्या सर्वागिक उन्नतीचा धर्म जर कोणता असेल तर तो हा आर्यधर्मच म्हणून श्रुतीचें सांगणें आहे. शोपेनहोअरनें हें जें मंगलमय भविष्य वर्तविलें त्याप्रमाणेच होवो आणि विश्व आनंदानें नांदो !

प्रोफेसर मॅक्समुल्लर यानेंहि शोपनहोअरच्या यावरील विधानावर आपल्या संमतीची सही केली आहे. आपल्या अनुभवाची याला पुष्टि दिली आहे. या वैदिक तत्त्वाचाच त्यानें अधिक पुरस्कार केला आहे. ” If those words of Schopenhauer required any endorsement I should willingly give it as the result of my own experience during the long life devoted to the study of many philosophies and religions if philosophy is meant to be a preparation for death, I know of no better preparation for it than the vedic philosophy.

शोपेनहोअरनें केलेल्या विधानांच्या दृढतेकरितां माझीहि सही कोणी जर अपेक्षील तर ती मी माझ्या सर्व धर्माच्या व तत्त्वज्ञानाच्या दीर्घ परिश्रमाचा अंतिम निर्णय म्हणून केव्हांहि मोठ्या आनंदाने देण्यास एका पायावर मी तयार आहे. आत्मतृप्तीनें सकाळी मरणाचें स्वागत करण्यास अवश्य असलेल्या सिद्धतेला तत्त्वज्ञानाचा अभ्यासच कारण होतो. असे झाल्यास एका वैदिक तत्त्वज्ञानाखेरीज दुसरें अर्से कोणतेंहि श्रेष्ठ तत्त्वज्ञान सबंध जगांतच मला कुठे आढळत नाहीं, आणि आहेसें वाटतहि पण नाहीं.

प्रसिद्ध अमेरिकन कवि इमर्सन हा सहज थोरोच्या दर्शनाला एकादां गेला. थोरो तेव्हां घोर आरण्याच्या एका विशाल वृक्षाखाली एका जीर्ण खाटेवर बसला होता. गंमत अशी की त्याच्या भोवताली आनंदानें बरेच लहानमोठे सर्प वावरत होते. जितकी थोरोची निर्भयस्थिति होती, तितकींच सर्पांचीहि स्थिति होती. आनंदानें व प्रसन्नतेनें थोरो बसला होता आणि ते सर्प मात्र स्वच्छंदानें इतस्ततः विहरत होते. दोघांच्याहि ठिकाणीं ब्राह्म प्रसन्नता आणि आनंद सारखाच दिसून येत होता. क्षण एक इमर्सनाचे चित्तहि प्रसन्न झाले. आनंद वाटला. याचे रहस्य जाणण्याचे त्याच्या मनांत आले. कोणत्या तात्त्विक ग्रंथाच्या अभ्यासानें अशी ही थोरोची स्थिति झाली असावी तें समजून घ्यावें असे त्याला वाटले. आश्चर्यानें चकित झालेला इमर्सन विनयान्वित होऊन थोरोला विचारतो, ‘महाराज, आपल्याला या सर्वांची भीति कशी वाटत नाही ? ” इमर्सनच्या या प्रश्नाला थोरोनें जे उत्तर दिलें तें फार मननीय आहे. ” Where is fear when Mother Gita is there to protect. हैं थोरोर्चे उत्तर कोणास आश्चर्यमुग्ध करणार नाहीं. गीतामाताच प्रत्यक्ष रक्षण करण्यास सदैव असतांना भीति ती कोठून वाटणार ? हा या इंग्लिश वाक्याचा अर्थ होतो. गीतेर्चे महत्त्व आणि आर्यतत्त्वज्ञानाची महति कोणाच्या मनांत यामुळे बिंबणार नाहीं ? थोरोच्या या उत्तराचा वाचकांनी विचार करावा. उशाखालची गीता चटकन काढून इमर्सनच्या हातावर ठेविली. आणि या तात्त्विक ग्रंथांच्या अभ्यासाने माझी ही अशी स्थिति झाली म्हणून सांगितले. थोरोचे जसें तसें इमर्सनचेंहि डोळें प्रेमाश्रूंनी भरलें. दोघांच्याहि मुखावर आनंद चमकू लागला, विलक्षण शांति समाधानाची दिव्य छटा उमटली. अहिंसा समता तुष्टिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः ! ज्ञानयोग स्थिति ही. इनें लाभणारी अहिंसा आणि समताहि, गीतेविषयी बोलतांना हिबोहस म्हणतो, The most beautiful, perhaps properly the only true philosophical song that exists in any known tongue. सर्वच दृष्टीने अतिशय सुंदर किंबहुना जगांतल्या सर्व प्रसिद्ध भाषांतल्या साऱ्याच गीतामध्ये खऱ्या तत्त्वज्ञानाचा अचूक ग्रंथ सर्वतोपरी योग्य असा जर कोणता असेल तर ती भगवद्गीता होय. गीतेंत वैदिक तत्त्वज्ञानच ठासून भरलें आहे. वैदिक तत्त्वज्ञानानें थोरो सारखी समता लाभते आणि सर्वत्र आत्मभाव बाणतो. सर्वं भूतस्थमात्मानं सर्व भूतानि चात्मनि । अक्षते योगमुक्तात्मा सर्वत्र समदर्शिनः । या श्लोकाची येथें आठवण होते. वैदिक तत्त्वज्ञानानें सर्व आपल्यांत आहे आणि आपण सर्वांत आहो अशी स्थिति बाणते. अत्युनत समत्वाची ही अंतिम परिसीमा आहे.

या ठिकाण Science of self म्हणजे आत्मविज्ञान या ग्रंथांतला एक उतारा द्यावासा वाटतो.” It is the ancient socialism which some are convinced is truly scientific because based on the science of psycology the most important of all the sciences as is being widly recongized in the West now : while modern socialism (or communism) which calls itself scientific fails to be so, because it ignores and even goes positively against some fundamental facts and laws of human nature and therefore will fail to realize its objective and fail exactly in the degree in and to the extent which those facts and laws. it violates All this world of objects, which is named by the word “This” is made of and by ideation and hence none who knows not the science, of the self can carry action to fruitful issues.

He, who, know the inner purpose of the laws of process and its orders ideated by the self-existant, he alone can rightly ascertain and enjoin the rights and duties of the different classes of human beings, of their social occupations, (Varnas) and vocations and on their Asramas, Stages in life. ” (आर्यसंस्कृती पान ३४६ )

पुष्कळांना निश्चित असा विश्वास आहे कीं, आर्यांचा प्राचीन समाजवाद हा अध्यात्मावर उभारला असलेमुळे खरा शास्त्रीय समाजवाद आहे. अध्यात्मशास्त्र हे सर्व विज्ञान शास्त्रांचेंहि मूळचें मुख्य अर्से महत्त्वाचे शास्त्र आहे म्हणून आतां बहुतेक सर्वहि पाश्चात्य मानतात. आधुनिक समाजवाद अथवा साम्यवाद कितीही शास्त्रीय समजला गेला तरी तो त्या बाबतींत पुष्कळ लंगडा पडतो. त्यांचे सिद्धांत त्रिकालाबाधित निसर्गाच्या मुख्य तत्त्वाविरुद्ध असल्यामुळे व ते मानवी स्वभावाला अथवा धर्मालाहि तितकेसें जुळत पण नसल्यामुळे ते आपल्या ध्येयाला गांठूं शकत नाहींत. जितक्या अंशानें ते मूलग्राही तत्त्वसिद्धांतांना सोडून आहेत, तितक्या अंशानें ते केव्हांही, तत्त्वनिदर्शनाच्या बाबतींत तोकडेच पडतील, अपूर्णच राहतील, तितके ते मानवस्वभावाच्या व प्राकृतिक नियमाच्या विरुद्धच जातील. हा वरील उताऱ्याचा सारांश आहे.

आर्यसंस्कृतींत विश्वात्मता आहे, आनंदघन परमात्यैक्य आहे, त्या स्वरूपभूत अनंत आनंदाचा आचार, विचार व प्रचार आहे. आर्यसंस्कृतींत दुःखाचा मागमूसहि नाहीं. भेदाचा वारा नाहीं. स्वार्थाचा प्रवेश नाहीं, वैयक्तिक सुखाचा गंध नाहीं. प्राणिमात्रांच्याच सुखाची इच्छा या आर्यसंस्कृतींत आहे. प्राणिमात्राच्या उद्धाराचा इचा संकल्प आहे. प्राणिमात्राच्या दुःख निवृत्तीचें दिव्य- जीवन इर्चे आहे. या आर्यसंस्कृतीचा दुःखसंतप्तांची दुःखें घालविण्याचा जणूं अंगीं मुरलेला जन्मजात स्वभावच आहे. न त्वहं अभये राज्यम् न स्वर्गनापुनर्भवम् । कामये दुःखतप्तानां प्राणिनां आर्तिनाशनम् ॥ मी राज्याची अपेक्षा करीत नाहीं, स्वर्गाची इच्छा बाळगीत नाहीं, मोक्षाचीहि मला अभिलाषा नाहीं पण हताश अशा त्या दुःखी कष्टी जीवांचें तें दुःख कष्ट, नष्ट करावेत हेंच एक माझें इष्ट आहे अर्से तिनें आपल्या कित्येक लेकराकरवी आपलें हृदय व्यक्त केले आहे. यदा न कुरुते भावं सर्वभूतेश्वमंगलम् । समदृष्टे स्तदा पुंसः सर्वाः सुखमया दिशः । जो अखिल प्राण्यांच्या ठिकाणींहि जेव्हां अगर्दी कसलीही अमंगल भावना करीत नाही, त्या समदृष्टीच्या पुरुषाला सर्वहि दिशा सुखमयच असतात, अर्से तिनें आपल्या मुलांना शिकविलें आहे, अहिंसा सत्यमस्तेयं शौचइंद्रयनिग्रहः । दानं दया दमः शान्तिः सर्वेषां धर्मसाधनम् । कोणासहि पीडा न देणे, सत्य भाषण करणे, कसल्याहि परस्वाचा अपहार न करणे, सदैव शारीरिक आणि मानसिक पावित्र्य राखणे, मनोजय करून इंद्रिय दमन करणे, अन्नवस्त्र, द्रव्यदान यथाशक्ति करणे, दयेने दीनांचे रक्षण करणे, दुष्टप्रवृत्तीचे दमन करणे, सदैव शान्त असून कधच मनाचा क्षोभ न होऊ देणे, हा सर्व मानव जातीचा धर्म आहे म्हणून आर्यसंस्कृतीच सांगणे आहे. समानीव आकृतिः समाना हृदयानि वः समानस्तु वो मनो यथा वस्सुसहासनि । अभ्युदय निश्रेयसाच्या प्राप्ति करितां तुम्ही सर्व एकोप्याने प्रयत्न करा, परस्परांस सहाय्य करा, परस्परांविषयीचे तुमर्चे प्रेम वृद्धिंगत होत रहावें, राष्ट्रीय, सामाजिक आर्थिक, लौकिक आणि पारमार्थिक कर्तव्ये तुम्हीं एकमनाने पार पाडावीत असा सर्व मानवांना वैदिक आर्यसंस्कृतीचा उपदेश आहे.

इति शिवम् सर्वे जनाः सुखिनो भवन्तु!

home-last-sec-img