Literature

भाद्रपद वद्य पंचमी

मानवबुध्दीला अलौकिक अशा सुखाचे साधन गम्य नाही. त्या साधनाचे पूर्णज्ञान करवुन मनुष्याला
त्याची प्राप्ती करवून देत असल्यामुळे वेदांना ' वेद ' हे नांव प्राप्त झाले आहे. ज्याच्या योगे जगाच्या तत्त्वाचे
पूर्ण ज्ञान होते तेच वेद होत. इष्ट प्राप्ती व निवृत्ती यासाठी लौकिक तसेच अलौकिक उपायांना मनुष्य
ज्यांच्याकडून समजवून घेतो तेच वेद होत. धर्म कोणता, अधर्म कोणता, काम कोणता व मोक्ष म्हणजे काय ?
या गोष्टी ज्याच्याद्वारे योग्यप्रकारे समजतात तोच वेद होय.

ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य व शूद्र हे चार वर्ण, स्वर्ग, मृत्यू व पाताळ हे तीन लोक, ब्रह्मचर्य, गार्हसथ, वानप्रस्थ व
संन्यास हे चार आश्रम, इतकेच नव्हे तर भूत, वर्तमान व भविष्यातील सर्व सृष्टीसुध्दा वेदापासूनच होते असे
भगवान मनुनें म्हटले आहे.

*' शास्त्र योनित्वात् '* या ब्रह्मसुत्रावर भाष्य करतांना भगवत् पूज्यपाद श्रीशंकराचार्यांनी म्हटले आहे की, *'
न हि दृश्यस्य सर्वज्ञत्वादिलक्षणस्य शास्त्रस्य सर्वज्ञादन्यतः सम्भोविऽस्ति | '* सर्वज्ञत्वादि लक्षणान्वित अशा
वेदशास्त्राची उत्पत्ति सर्वज्ञ परमेश्वराशिवाय होऊच शकत नाही. *' वाग्वृताश्च वेदः ' वेद परमात्म्याचीच वाणी
होय. '* वेदोऽखिलो धर्ममूलम् ' परमात्मप्रणीत वेदच धर्माचे मूळ होत.

*' लोकयात्रार्थमेवेह धर्मप्रवचनं कृतम् | '* जीवनयात्रा सुखपूर्वक संपन्न होण्यासाठीच धर्मप्रवचन केले आहे.
यापासून जागतिक व पारमार्थिक उन्नत सुखाची प्राप्ती होते.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img