Literature

माघ वद्य तृतीया

हा भारतदेश ३५० वर्षांपूर्वी यवनांनी आक्रमिल्यामुळे अतिभयंकर अशा परिस्थितीत होता. त्यांचे राज्य भारतभर पसरल्यामुळे सगळीकडे गोंधळ माजला होता. यवनांच्या अमानुष कृत्यांनी भारतीयजनता त्रस्थ झाली होती. औरंगजेबासारखा करारी, कट्टरधर्माभिमानी राज्यकर्ता आपले अगणित सामर्थ्य व सामूग्री यांचा आपल्या मनाप्रमाणे वापर करून धर्मदिग्विजयासाठी निघाला होता. हिंदू हा शब्द नावालाही राहू नये अशा हिरीरीने तो बाहेर पडला होता. तो आपल्या रूबाबातच वावरत होता. राज्याशासक म्लेंच्छ असल्यामुळे भारतात सर्वत्र अशांतता माजली होती. सनातनधर्मीय भयग्रस्त व त्रस्त झाले होते. सज्जनांच्या हालांना पारावरच नव्हता. धर्मरक्षणासाठी बऱ्याच महात्म्यांनी आत्मसमर्पणाची तयारी केली होती. अशा घोर अशांत परिस्थितीत जनतेला *’ त्राहि भगवान ‘* करणाऱ्या यवनांना वठणीवर आणण्यासाठी त्यांचा निःपात करण्यासाठी व लोकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठीच श्रीसमर्थांनी अवतार घेतला होता. कारण यवनप्रणीत अशा या हाहाःकारास तोंड देण्यास बलिष्ट अशा श्रीसमर्थांच्या अवताराचीच आवश्यकता होती.

आपण सर्व श्रीसमर्थांच्या उत्सवासाठी जमलो आहोत. त्याचे पुजन, मनन, स्मरण करून आपणही त्यांच्या पदाला शोभेल असे वागुन श्रीसमर्थसांप्रदायाचे म्हणवून घेण्यास अधिकारी होण्याचा प्रयत्न करूं !!

*श्रीसद्गुरू समर्थ रामदासस्वामी महाराज की जय !*

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img