Literature

माघ वद्य पंचमी

पूर्ण विश्रांतीचे स्थळ असेल तर ते श्रीसमर्थच. सर्व लोकांना तारणारा समर्थांचाही समर्थ आपलेच पद आपल्या दासाला देत असतो, हेच श्रीसमर्थ सांप्रदायाचे लक्षण आहे. आराधनेप्रमाणेच प्रकृती बनत असते. रामदासाच्या आराधनेने मोठे सामर्थ्य बाणते. त्यामुळेच *’ रघुनाथभजनें ज्ञान झाले ‘* असे श्रीसमर्थ सांगतात.

गुरूशिष्यांचा संप्रदाय म्हणजे काय ? गुरूंनी आपले स्वरूप आपल्या शिष्यास द्यावयाचे. प्रत्यक्ष श्रीरामच श्रीरामदासरूपाने अवतरले आहेत. उपासना कशाकरता ? ते एक ध्येय आहे. आपले जीवन कसे बनवायचे याचा विचार करून त्याप्रमाणेच करावयाचे ? ज्याची जशी आराधना असेल त्याप्रमाणेच ते होतात. ज्याप्रमाणे ज्याचा निश्चय असतो त्याचप्रमाणे मरणानंतरही त्यांचा लिंगदेह होतो.

श्रीसमर्थ हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या अंगी आपोआप सामर्थ्य बनु लागते. त्या सामर्थ्यात नितांत शांती व अचल समाधान आहे. *’ समर्थे समर्थ करावे ‘* समर्थसंप्रदाय म्हणजे समर्थ होण्याचा संप्रदाय आहे. देवाला शरण जाण्यापूर्वी सर्वच पांगळे दुर्बळ असतात. पण एकदा देवाला शरण गेले की, देवाची कृपा गिरींचे उल्लंघन करू शकते ; संकल्पसिध्दी होते ; देहाचे सोने होते, शाश्वतसुखाचा अनुभव मिळतो अशा तऱ्हेने हा समर्थ होण्याचा सांप्रदाय आहे.

*श्रीसद्गुरू समर्थ रामदासस्वामी महाराज की जय !*

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img