Literature

माघ शुद्ध त्रयोदशी

स्त्री, पुरुष, ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य, शुद्र, अतिशुद्रसुध्दां भगवंताची भक्ती करून परमगती प्राप्त करून घेतात. पंढरपुरास जाणाऱ्या संतामध्ये, वारकऱ्यामध्ये कोणताच भेद आढळत नाही व आढळणारही नाही.

*’ न मे भक्तः प्रणश्यति | ‘* माझ्या भक्ताला कधीच अधोगति प्राप्त होत नाही. माझ्या ठिकाणी आपले मन स्थिर करून वावरणाऱ्यांचा कोणताही विलंब न लावता मृत्युरूपी संसार महासमुद्रापासून मी उद्धार करतो असे भगवंताचे अभयवचन आहे. परंतु या सर्व गोष्टींवर आपला विश्वास हवा. आजच्या समाजामध्ये ही परमेश्वरी वचने नष्टप्रय समजली जातात.

सावकाराकडून मिळणारे कर्ज, धार्मिकवृत्तीच्या राजाकडून मिळणारे दान आणि परमात्म्याच्या कृपेने प्राप्त होणारा महान लाभ या तिन्हीमध्ये आकाशपाताळा एवढे अंतर आहे. जगतांत लोकांकडून मिळणाऱ्या वैभवाच्यामुळे *’ अनन्त गुणमैश्वर्य लभते यत्प्रसादतः | ‘* ज्याच्या कृपेमुळे अनंतानंत ऐश्वर्य प्राप्त होते भगवंताला आपण विसरलो आहोत असे पाहून कोणालाही वाईटच वाटेल. परमात्म्याची कृपा अगाध, अपरिमित व अक्षयशक्तींनी युक्त अशीच आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img