Literature

माघ शुद्ध दशमी

*’ ब्रह्मचर्यादेव प्रवजेद् गृहाद्वा वहाद्वा यदहरेव विरजेत्तदहरेव प्रवजेत् | ‘* ब्रह्मचर्याश्रमामध्ये, गृहास्थाश्रमामध्ये किंवा वानप्रस्थाश्रमामध्ये ज्यावेळी वैराग्य प्राप्त होईल त्यावेळीच संन्यासाश्रम स्विकारण्यास हरकत नाही असा श्रुतिमातेचा आदेश आहे.

श्रुतीत सांगितलेले प्रवृत्ति व निवृत्ती हे दोन्ही मार्ग सोडून पशुजीवन जगून अधोगति प्राप्त करून घेणे हे फक्त मानवी जीवनातच शक्य आहे हे सांगण्याचे प्रयोजन नाही. दिन प्रतिदिन आपली राज्यव्यवस्था सुध्दा वणव्यास वाऱ्याप्रमाणे या पशुजीवनास अनुकूल होत आहे.

इंद्रियांचे दास होऊन पशुप्रमाणे अनिती, दृष्ट आहार-विहार अनुभवुन शेवटी एक दिवस मृत्यूवश होऊन कर्मभोगास योग्य असा हीन जन्म मिळवून दुःखाच्या गर्तेत पडणे अशाप्रकारेनेही या मानवजन्माचा शेवट होऊ शकतो. अथवा या मानवजन्मातच सदुपासना, सत्कार्य, सद्गुरूचा आश्रय यामुळे पाण्यात पाणी मिसळल्याप्रमाणे परमात्मस्वरूपात एकरूप होऊन निर्विषय, सुखरूप असे दिव्यजीवन प्राप्त करून घेणेही शक्य आहे.

ह्या दोन्ही मार्गापैकी आपल्याला कोणता मार्ग आवडेल ?

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img