प्रकृतिरिति च ब्रह्मणः सकाशान्नानाविचित्र जगन्निर्माणबुद्धिरूपा ब्रह्मशक्तिरेव प्रकृतिः । (निरालंब) माया नाम अनादिरन्तवती प्रमाणाप्रमाण साधारणा न सती नासती न सदसती स्वयमधिका विकाररहिताऽनिरुप्य माणा सतीतरलक्षणशून्या सा मायेत्युच्यते ॥ ( सर्वसारोपनिषत् ) माया च तमोरूपानुभूतिस्तदेतज्जडं मोहात्मकमनन्तामिदं रूपमस्यास्य व्यंजिका नित्यनिवृत्तापि मूढैरात्मैव दृष्टास्य सत्वमसत्वं च दर्शयति सिद्ध त्वासिद्धत्वाभ्यां स्वतंत्रास्वतंत्रत्वेन सैषा वटबीजसामान्यवदनेकवटशक्ति रेकैव तद्यथा वटबीजसामान्यमे कमनेकान्स्वाव्यतिरिक्तान्वटान्सबजानुत्पाद्य तत्र तत्र पूर्ण स तिष्ठत्येवमेवैषा माया। (नृसिंह उ. ता. खं. ९) स्वातिरि क्तानि पूर्णानि क्षेत्राणि दर्शयित्वा जीवेशावभासेन करोति मायाचाविद्या स्वयमेव भवति सैषा चित्रा सुदृढा बन्दकुरा स्वयंगुणमिन्नांकुरेष्वपि गुणभिन्ना सर्वत्र ब्रह्मविष्णुशिवरूपिणी चैतन्यदीप्ता ।। (नृ. ता. खं. ९) अशी कांही मायेसंबंधी उपनिषद्वचनें आहेत. ब्रह्मस्वरूपाच्या सान्निध्यानें चैतन्ययुक्त होऊन, त्याच्या सत्तेनें नानाविचित्र जगाच्या निर्माणाचे सामर्थ्य असणारी, जीवांच्या बुद्धीप्रमाणे ब्रह्मस्वरूपाची शक्तीच, प्रकृति म्हणून म्हटली जाते. मायां तु प्रकृतिं विद्यात् । मायेलाच प्रकृति असें नांव आहे. ही अनादि असून मलैक्याने नाश पावणारी आहे. प्रमाणभूत तशी ही अप्रमाणहि आहे. सृष्टीच्या नें ही प्रमाणभूत होते व अद्वितीय निष्प्रपंच दृष्टीने ही अप्रमाण होते. ही असणारीहि नव्हे, नसणारीहि नव्हे. कांही भागांनी असणारी व कांही भागांनी नसणारी असेहि हिला म्हणता येत नाही. ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेनें आपोआपच ही फोफावते. बलैक्यप्राप्तीशिवाय कोणत्याहि साधनांनी ही कमी होत नाही. अमक्या एका लक्षणाने ही अशी म्हणून न सांगतां येण्यासारखी आहे.
‘आस्त नास्ति’ याहून विलक्षण असणारी अशी ही माया आहे. हिला अज्ञान म्हणूनहि म्हणतात. ‘तुच्छ’ अथवा ‘तुच्छा’ असेहि म्हणतात. ‘मिथ्या’ नांवानेंहि ही प्रसिद्ध आहे. ज्ञान्यांना ही मिथ्या जरी वाटली, तुच्छ म्हणून जरी त्यांनी हिला लेखले तरी ही अज्ञान्यांना मात्र कालत्रयांतहि सत्यच वाटते. सत्चबुद्धीच्या लौकिकांना कितीहि विचार केला तरी हिचे असे एक लक्षण म्हणून सांगता येत नाही. सत्य म्हणावी तर मिथ्या वाटते, मिथ्या म्हणावी तर सत्य वाटते. एकूण, अशाच्या दृष्टीनें ही अनिर्वचनीय आहे. ‘निरालंब आणि ‘ सर्वसार’ या दोन उपनिषदांतून आढळणाऱ्या मायेच्या विवरणा विपयों आपण विचार केला. आतां ‘नृसिंहोत्तरतापिनी’ उपनिषदाच्या विवरणाकडे वळू. माया च तमोरूपा । माया ही तमोरूप आहे. कांही अंधकारात्मक आवरणात्मक, न समजून येण्यासारखा असा हिचा अनुभव आहे. ही जड आहे. मोहात्मक आहे. अज्ञान्यांना ही अनंत बाट नाम रूपांनीच ही प्रगटते. ही नित्यनिवृत्त असली तरी मूहांना आमरूपमाणेच ही शाश्वत वाटते. ही आपले सत्यमिय्या दाखवून घेते. व्यक्ततेनें, स्वतंत्रास्वतंत्रतेनें, अल्प वटवीज अनेक परंपरागत विविध वि जसे निर्माण करते, एकेका वृक्षांत विविध वृक्ष निर्माण करणाऱ्या अनेक बिया अन जसे ठेवतें, त्याचप्रमाणे ही माया अस असून देखील निर्माण करते, जीवेशभास निर्माण करते. ही माया अथवा अविद्या आपल्या
कल्पनेने आपणच ब्रह्मस्वरूपाच्या आधाराने फोफावते. अशी ही माया विचित्र आहे. हिचे पाश जालासारखे पसरलेले असतात. ब्रह्मज्ञानाच्या एका साधनाशिवाय अन्य साधनांनी या पाशांतून सुटका करून घेण्याकरिता अधिकाधिक प्रयत्न करावा, तसे तसे या पाशांचे अधिकाधिक वेष्टण होते. पाण्यांतल्या कमळाच्या जाळ्याप्रमाणे कांहीसे हे आहे. हत्तीसुद्धा याने बांधला जातो. यांतून सुटण्याकरितां जितकी म्हणून हालचाल करील तितका तो अधिक जखडला जातो. अशाच तऱ्हेचें हें मायेचे जाल आहे.
कामस्तद्ग्रे समवर्तताधि मनसो रेतः प्रथमं यदासीत् ।
सतो बंधुमसति निरविन्दन्हृदि प्रतीदक्ष्या कवयो मनीषा ॥ ४ ॥
सृष्टीच्या पूर्वी, सृष्टीचा संकल्प परमात्म्याला झाला. मनाच्या या संकल्पाने सृष्टिकरणाची प्रवृत्ति त्याच्या ठिकाणी उत्पन्न झाली. असद्रूप कार्यात सद्रूप परमात्म्याचा प्रवेश झाला. त्याच्या प्राप्तीची साधनें प्रगटली. जीवांनी ती जाणून परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतला.
संकल्पात्मकं मनः । – संकल्पात्मकच मन आहे. संकल्पो विविधः कर्ता – संकल्पच विविध वैचित्र्यपूर्ण अशा जगाचा कर्ता आहे. मनानेंच संकल्प होतो. त्या त्या वासनेशिवाय तो तो संकल्प होत नाही. एकंदरीत संकल्पास कारण वासना. वासनात्मकं मनः –संकल्पात्मक मन म्हटल्या प्रमाणें वासनात्मक मन म्हणूनहि म्हटले जाते. बासना म्हणजे पूर्वसंस्कारानें होणारी इच्छा. इच्छामनोभवौ कामौ । (अमरकोश)- इच्छेला काम असेंहि म्हणतात. कामः संकल्पो विचिकित्सां श्रद्धाऽश्रद्धा धीमरित्येतत्सर्वं मन एव । काम म्हणजे मैथुनाची अथवा इतर कोणतीहि इच्छा, संकल्प, संदेह, श्रद्धा, अश्रद्धा, बुद्धि, भीति इत्यादिक सर्व मनच आहे. मनालाच हीं नांवें आहेत. संशयात्मकं मनः । असेंहि म्हणतात. स्वरूपाचा संशय म्हणजे अज्ञान आवरणच ‘मन’ म्हणवून घेते आणि यामुळेच वासना, संकल्प, इच्छादिकांची उत्पत्ति होते. नाहं प्रकाशः सर्वत्र योगमायासमावृतः । स्वरूपाला आवरण या मायेमुळे होतें. एकंदरीत आवरणात्मक, अज्ञानात्मक ही माया संकल्पपूर्वक व इच्छापूर्वक जगाला कारणीभूत होते असे धरून चालावयाला हरकत नाही. इच्छामात्रमविद्येयम् । इच्छेला अविद्याच कारणीभूत होते.
क्वचिन्मनः क्वचिद्बुद्धिः कचिज्ज्ञानं कचित्क्रिया ।
क्वचिदेतदहंकारः क्वचिच्चित्तमिति स्मृतम् ॥ १३० ।।
क्वचित्प्रकृतिरित्युक्तं क्वचिन्मायोति कल्पितं ।
कचिन्मलमिति प्रोक्तं क्वचित्कर्मेति संस्मृतम् ।। १३१ ।।
क्वचिद्रंध इति ख्यातं क्वचित्पुर्यष्टकं स्मृतम् ।
प्रोक्तं क्वचिदविद्येति क्वचिदिच्छेति संमतम् ॥ १३२ ।। ( महोपनिषत् अ. ५)
मायेचीच ही सारी नांवें आहेत असे या श्लोकांत सांगितले आहे.
प्रथम परमात्म्याच्या मनापासून जगदुत्पत्तीची वासना निर्माण झाली. तोच ‘ काम ’. सृष्टिकार्याकरितां प्रथम कामाची उत्पत्ति झाली. इथेसुद्धां सृष्टी कारतां म्हणजे प्रजेकरितां प्रथम कामाचीच उत्पत्ति होते. नंतर सतीपतींचा संगम होतो. मम योनिर्महदूद्ब्रह्म तस्मिन्गर्भ दधाम्यहम् । संभवः सर्व भूतानां ततो भवति भारत ॥ ” या गीतावाक्याची आठवण होते. कामाच्या उत्पत्तनें प्रकृतिपुरुषाचा संगम झाला. कामाला ‘ मनसिजः’ असे म्हणतात. मनापासूनच त्याची उत्पत्ति होते. प्रकृतिपुरुषांच्या संगमानें प्रजा निर्माण झाली. तेच हें विश्व.
मायां तु प्रकृति विद्यान्मायिनं तु महेश्वरम् ।
तस्यावयवभूतेस्तु व्याप्तं सर्वमिदं जगत् ॥
सतीपतींच्या संगमापासूनच प्रजा. भूमीत बी पेरून अनेक बियांची उत्पत्ति होते, तद्वत पुरुषाचें रेतच बीज आणि स्त्री अथवा प्रकृतिं भूमि आणि त्यापासून झालेले बहुत्वाचे पीक म्हणजे प्रजा. पुमान रेतः सिंचाति योवि तायां बह्वीः प्रजाः पुरुषात्संप्रसूताः । ( मुंडक ६-२-१) इतर प्राणी स्थूलदेहधारी म्हणून त्यांच्याकडून प्रजेचें कार्य स्थूल क्रियेनें होतें; व सृष्टि कर्त्या परमेश्वराच्या ठिकाणीं सूक्ष्म मनोमयच अथवा केवल संकल्पात्मकच कार्य मन, मनाची शक्ति म्हटल्याप्रमाणेच पुरुषप्रकृतीचे रूप सुक्ष्म असते. यश्चित्तस्तन्मयो भवति । कल्पनेशीं तादात्म्य पावण्याच्या स्वभावाप्रमाणे, पुरुषपरमात्मा प्रथम मनोमय, संकल्परूप होतो. मनोमयः । ऋतुमयः पुरुषः । आणि मग मनाच्या शक्तीनें म्हणजे संकल्पानें तो जग निर्माण करतो. यत्र संकल्पनं तत्र मनोस्तीत्यवगम्यताम् ॥ (महोप.) संकल्प असल्या ठिकाणी मन असते असे समजावें. सतीपतीच सतीपतीतून होणाऱ्या स्थूल क्रियेचे मुळरूप म्हणून विद्वान महात्म्यांनी समजलेले असते. कामाच्या प्रादुर्भावाने म्हणजे प्रजेच्या इच्छेने प्रकृतीशी संयोग होऊन तीत पुरुष एकोsहं बहु स्यां” मी बहु व्हावे, या संकल्पाचे रेतःसिंचन करतो व नंतर मी मी म्हणून वावरणारी बहुनामरूपात्मक प्रजा निर्माण होते. माया अथवा प्रकृति ही असदूप होय. पुरुष हा सत्य होय. सत्यानृते मिथुनभवतः । सत्यानृतरूपी शवलमाया अथवा पुरुषप्रकृति यांच्या मिथुनानें चराचर विश्वाची उत्पत्ति अंतःकरण व प्राण यांच्या कमीअधिक स्पंदाने विश्वांत चेतनाचेतन व्यवहार घडतो. अनेक कमांच्या फलाकरितां व बहुवाच्या निर्वाहाकरितां सृष्टि अशी उत्पन्न झाली. अनेक देह निर्माण करून त्यांत परमात्म्याने प्रवेश केला. प्रवेशानंतर जीवसृष्टि, ईशसृष्टि, जीवेश हा कल्पित भेद उत्पन्न झाला व यामुळेच जगाचे गाडें चालू झाले. त्या प्रकृतिपुरुषाचे रूपच सतीपतीरूपाने व त्यांच्या मुलांमुलींच्या रूपानें व्यक्त झालें. सर्वांत असणाऱ्या एका ‘ अहं‘ या स्फुरणानें “ एकोऽहं बहु स्यां । ” या संकल्पाचें व्यक्त रूप स्पष्टपणें दृग्गोचर झालें. सूर्यप्रकाश आणि मृगजला प्रमाणे असाच कांहीं अनुभव या सत्यमिय्या प्रपंचाच्या बाबतीत महात्म्याला असतो.
तिरश्चीनो विततो रश्मिरेषामधः स्वीदासीदुपरि स्विदासीत् ।
रेतोधा आसन् महिमान आसन् स्वधा अवस्तात् प्रयतिः परस्तात् ॥ ५॥
मृगजलाच्या भासांत सूर्यप्रकाशच असल्याप्रमाणे किंवा वस्त्रामध्ये सूत असल्याप्रमाणे परमात्म्यापासून झालेल्या या जगांत परमात्म्याचा प्रकाशच वर खाली अंतर्बाह्य चोहोकडे भरला आहे. कर्ता भोक्ता म्हणून स्वतःला मानणारे देहोपावीच्या दृष्टीनें भिन्न भिन्न असे अगणित जीव उत्पन्न झाले. प्रवृत्ति निवृत्त्यात्मक धर्म प्रचारांत आले. जीवांना उच्चोच्च साधनांनी मोठमोठे महत्त्व प्राप्त झालें. परमात्मप्रकाशाच्या कांहीं किरणांवर त्या विचित्र माया शक्तिद्वारां कर्तृत्वभोक्तृत्वाच्या संस्काराने विविध कर्मफलरूप उपाधींचा आश्रय करून अनेक देह व तद्जीवांचीं रूपें धारण केल्याचा आरोप आला. आणखी कांही किरणांवर या जीवांना भोग्यरूप असणाऱ्या दृश्य पदार्थाची रूपें धारण केल्याचा आरोप आला. अनेक देहोपाधींनी अनेक जीव दिसू लागले व ते विविध कर्मानी, विविध वैभवसंपन्न झाले. जगानें विस्तृत रूप धारण याप्रमाणें परमात्म्याचा प्रकाशच विचित्र मायेच्या शक्तीनें युक्त होऊन आश्चर्य • जनक अशा जडचेतनात्मक सृष्टीने नटला. परमात्म्याची चित्शक्ति अखिल प्रपंचालाच व्यापून राहिली आहे. तिनेंच दोन रूपें धारण केली आहेत. जीवांच्या संसाराला कारणीभूत होऊन, त्याच्या पलीकडे असणाऱ्या मोक्षालाहि तीच कारणीभूत होते. दोरीच्या अज्ञानानें झालेला, तिथे नसलेला व केवल कल्पनेनेंच भासणारा सर्प कसा झाला हे कोणालाहि सांगतां येणे शक्य नाही. त्या दोरीचे अज्ञान कोणत्या रूपानें आहे, कोठे आहे, कसे आहे हे दाखविणेंहि कोणास शक्य नाही. भ्रम झाल्यावरच त्या भ्रांत मनुष्याला दोरीवर नसून दिसणाऱ्या सर्पाची भावना होते. परमात्म्याच्या अज्ञानाने झालेला, तिथे नसलेला व केवळ कल्पनेनेच भासणारा हा प्रपंच कसा झाला हे कोणालाहि सांगतां येणे शक्य नाही. त्या परमात्म्याचे अज्ञान कोणत्या रूपाने आहे, कोठे आहे, कसे आहे हे दाखविणेहि कोणास शक्य नाहीं. भ्रम झाल्यावरच मनुष्याला परमात्म्यांत नसून भासणाऱ्या प्रपंचाची भावना होते; जगज्जीवाची भावना येते. झालेल्या जगत्कार्यांत अंतर्भूत होणाऱ्याला जगाच्या पूर्वीचे काय सांगतां येणार? या अखिल जीवांच्याहि पूर्वी या भ्रमाची उत्पत्ति झाली असल्यामुळे जीवांना त्यांचा परिचय असू शकत नाहीं. ( जन्मापूर्वी ) हा भ्रमच या जीवाच्या अज्ञपणाला कारण झाला आणि या भ्रमानेच जग आकारास आले. तें सृष्टिकारण अज्ञान आणि अज्ञानजन्य भ्रम यांच्या उत्पत्तीपूर्वी व यामुळे झालेल्या या सर्व जगाची व या साऱ्या जीवांची उत्पत्ति कितीतरी अलीकडची मातापित्यांचा जन्म मुलांना जसा पाहून माहीत नसतो त्याप्रमाणेच या अज्ञानाचे आणि श्रमाचे मूळ कारण जीवांना पाहून माहीत नसते व त्याची कल्पनाहि करण्यास त्यांना अशक्य होते. या अज्ञानाचे मूळ शोधणे व तें अमूकच ( आहे ) म्हणून ठरविणें कोणासहि शक्य नाहीं. रोग झालाच कसा म्हणून त्याच्या शोधांत काळ घालवून रोग तोंपर्यंत वाढवून घेण्यापेक्षां औषधोपचारांनी तो होईल तितक्या लवकर बरा करून घेणें हें हिताचे झाल्याप्रमाणेच या अज्ञानाच्या व भ्रमाच्या मूळशोधनांत वेळ घालवून तोपर्यंत त्याला बळकटी आणण्यापेक्षां त्याच्या निवृत्तीकरितां ब्रह्मस्वरूपाचा निश्चय होईल तितक्या लौकर करून घेऊन यांतून मुक्त होणें हेंच अगदी रास्त व अत्यंत हिताचें
दोरीवर सर्प दिसून येण्याला त्यांत दिसून येणारे सदस्य म्हणजे स्पर्श, बारीकपणा, नागवळणी वक्रता सर्पभासाला कारणीभूत होते. सर्पभासाला कारण होणारी तीच त्याची शक्ति असे जसे मानावें त्याप्रमाणे त्या परमात्म्यावर जगाचा भास होण्याला, त्याच्यांत दिसून येणारी सादृश्य सचि दानंदात्मक अस्तिभातिप्रियता जगाच्या आभासाला कारणीभूत होते व अशा जगद्भासाला कारणीभूत होणारी तीच त्याची शक्ति म्हणून मानावी लागते. जगांतल्या नामद्वारा दिसणारे त्याचे अस्तित्व, भातित्व व प्रियत्व ही परमात्म्याच्या सद्रूप, चिद्रूप व आनंदरूप यांच्याशी अभिन्न आहेत.
को अद्धा वेद क इह प्रयोचत कुत आजाता कुत इयं विसृष्टिः । अर्वाग्देवा अस्य विसर्जनेनाऽथ को वेद यत आवभूव ॥ ही सृष्टि कुठे, कशी निर्माण झाली हे कोणाला ठाऊक आहे ? कोण ही अशीच सृष्टि झाली म्हणून जाणतो ! कोण ही अशी अशी झाली म्हणून खात्रीने सांगतो ! हैं निश्चयानें कोणाला बरें सांगतां येईल ? हे असेच म्हणून कोणास बरे ठरवितां येईल ! देवसुद्धां सृष्टि झाल्यावरच उत्पन्न झाले असल्यामुळे त्यांनाहि त्या पूर्वीपासून असलेली ही सृष्टि कोठून कशी झाली हे जर सांगतां येत नाहीं तर इतरांचा पाढ काय ! देवांनाच जर अशक्य होते तर कोणा मानवाला हे शक्य होईल ! कोठून ही सृष्टि झाली म्हणून कोण सांगेल |
इयं विसृष्टियेत आबभूव यदि वा दधे यदि वा न यो अस्याध्यक्षः परमे व्योमन सो अंग बेद यदि वा न वेद ॥ ही सृष्टि कोठून, कशी, कां अशी झाली ! ही स्वतःला आपल्या आपणच कारण आहे की नाही, हे या बाह्याकाशाच्या पलीकडे असणाऱ्या आपल्या मनापासून सृष्टि निर्माण करणाऱ्या त्या प्रजाध्यक्षाला तरी माहीत आहे की नाही कोण जाणे ! मनांत आल्याप्रमाणे कृति घडते; पण मनांत कोठून, कसें व कां येतें हैं कोणालाच कळत नाही. पुन्हां ब्रह्मदेवाला सृष्टि निर्माण करण्याकरितां आवश्यक अशा ज्ञानरूप वेदाची प्राप्ति परमात्म्यापासूनच झाली असे दिसून येते. यः सर्वज्ञः सर्ववित् । ( मुंडक. १-९) इत्यादि वाक्यांच्या आधारे त्या परमात्म्याला मात्र हे सर्व माहीत असणे साहजिक आहे. हे सर्व सांगणारा एक परमात्माच आणि त्याच्यापासून उत्पन्न झालेले वाकूरूपी एक वेदच होत.
यः सर्वज्ञः सर्ववित् । (मुं. १-८) या वचनावरून ज्या परमात्म्याने ब्रह्मदेवाला अथवा विराटाला वेदज्ञान सृष्टिउत्पत्तीकरितां दिलें त्याला ते एक माहीत असणे स्वाभाविक झाले. हे सर्वहि यथार्थपणे जाणणारा एक सर्वज्ञ
परमात्मा व त्याच्यापासून उत्पन्न झालेली सृष्टीची श्रुतिमाता; तिसऱ्या कोणाचा एकच इथे रीच होणे शक्य नाही. उपनिषदांत आत्मतत्त्वाचे प्रतिपादन आहे, वेदांत ते नाही, असा आक्षेप घेणाऱ्यांना हे ऋग्वेदांतर्गत ‘नासदीय सूक्त’ उत्तर देईल. नावेदविन्मनुते तं बृहन्तम् तमेतं वेदानुवचनेन विविदिषन्ति । न ह्यनात्मवित्कश्चिद्वेदार्थ ज्ञातुमर्हति ॥ ही वेद, उपनिषदें व स्मृती यांची बचनेहि त्याला आपले अनुमोदन देतील. वेद न जाणणारा ब्रह्मस्वरूपाचे योग्य आकलन करूं शकत नाही. वेदवचनांनी त्या ब्रह्मतत्त्वाला जाणूं इच्छितात. अनात्मज्ञानी, मग तो कितीहि बुद्धिमान असो, वेदार्थ उमगण्यास समर्थ होत नाहीं, हा या वाक्यांचा अर्थ. ही वाक्य दृष्टीखालून गेल्यानंतर तत्त्वज्ञानाच्या प्राप्तीकरितांच वेदांचा अभ्यास आणि वेदार्थ तत्त्वज्ञाखेरीज कोणी जाणूं शकत नाही. असे झाल्यास वेदांत तत्त्वज्ञान नाही म्हणून कोण बरें म्हणू शकेल ?