Literature

मायारुपसृष्टिक्रमः नाम प्रकरणं नवमम्‌‌

मायारुप सृष्टिक्रम नववा अध्याय —

ब्रह्मास्मीति प्रवाहस्य मूलं ब्रह्मैव शाश्वतम्‌‌।।
विस्तारश्च जगद्रूपः विविधत्वेन भासते।।1।।
अर्थ—”ब्रह्मास्मि इति” मैं ब्रह्म हॅू, ”मी ब्रह्म आहे” ह्या विचार प्रवाहाचा मूल उद्‌‌गम म्हणजे ते शाश्वत्‌ परब्रह्मच आहे. आणि त्याचा विस्तार म्हणजे हे जगत्‌‌रुपच आहे. ते विधिवतेचे रुप घेवून नटलेले आहे. ।।1।।

विश्वाभिमुखता या सा प्रवृत्तिरिति संज्ञिता।।
ब्रह्माभिमुखता या सा निवृत्तिरिति संज्ञिता ।।2।।
अर्थ— जी जगत स्वरुपाकडे आकर्षित होते ती प्रवृत्ति म्हटली जाते आणि जी ब्रह्मतत्वाकडे आकर्षित होते, ती निवृत्ति म्हटली जाते. ।।2।।

गुणसाम्यात्मिकायां स मायायां बिम्बितो ह्यजः।।
आदिनारायणः साक्षी महेशो वा सदाशिवः ।।3।।
अर्थ—— त्रिगुणांची साम्यावस्था, म्हणजे समप्रमाणांत मिळवणी होते, मिसळ होते तेंव्हा ती ”माया” ही निर्माण होते. ह्या शक्ति मध्ये ”अज” म्हणजे ज्याचा कधीच आदि किंवा जन्म नाहीं, तो परमेश्वर प्रतिबिंबित होतो आणि तोच साक्षी म्हणजे आत्मततत्वरुप आदि नारायण, महेश किंवा सदाशिव आहे. ।।3।।

सा पुनर्विकृतिं प्राप्य सत्वोद्रिक्ताभवत्ततः ।।
अव्यक्ताख्या च तस्यां यो स ईश्वर इतीर्यते।।4।।
अर्थ— ती साम्यरुपधारी त्रिगुणात्मक प्रकृति जेंव्हा त्यांत केवळ सत्वगुणाचाच उद्‌‌‌भव होउन फोकावते, तेेंव्हा ईश्वरतत्व निर्माण होते. तो अव्यक्त असणारा त्याच मायारुपांत ”ईश्वर” म्हटला जातो.

मायोपाधिर्जगद्योनिः सर्वज्ञत्वादि लक्षणः।।
पारोक्ष्यशबलं ब्रह्म नामास्पष्ट वपुस्त्वयम्‌‌।।
अर्थ—— ”माया” या तत्वापासून जन्म म्हणजे उत्पन्न होणारा तो अयोनिज परमात्मा सर्वज्ञता आदि लक्षणांनी युक्त चित्र—विचित्र अदृष्यरुपाने अस्पष्ट अदृश्य अश्या शरीराने भासतो. ।।5।।

रजोद्रिक्ता महन्नाम्नि जाता साङकुरता ततः।।
अङकुरात्पूर्वरुपा च कापि बीजस्थितिस्त्वियम्‌‌।।6।।
अर्थ— रजोगुणांनी आधिक्य अश्या स्थितित तो आता (परब्रह्म रुप शक्तिमान परमेश्वर) अंकुरित होतो. आणि त्या अंकुरित होण्याच्या पूर्वी ही कोठली तरी एक स्थिति ही ”बीजरुपा” अशी नटली जातें. ।।6।।

एतस्यां बिम्बितो यत्सु स्वार्णगर्भः स एव हि।।
स्पष्टास्पष्टवपुश्चासी बहुस्यामिति तप्यते।।7।।
अर्थ— ह्या स्थिति मध्येच तो स्पर्णरुप गर्भधारक एक स्पष्ट आणि अस्पष्ट शरीरांनी ”बहु” अनेक रुपाने तळपू लागतो, प्रकाशित होतो. ।।7।।

महतस्तु तमोद्रिक्ता चाहंकारभिदाभवत्‌‌।।
अस्यां यो बिम्बितस्तस्त विराड्‌‌नामेति विश्रुतम्‌‌।।8।।
अर्थ—— महत्‌‌ तत्वामध्ये तमोगुणाचा विकास होवून अहंकार निर्माण होतो. आणि त्यांत जेंव्हां या तत्वाचा विराट्‌‌ असा प्रतिबिम्बित भाव उत्पन्न होतो, तोच विराट म्हणून म्हटला जातो. ।।8।।

इतो व्यक्तानि भूतानि त्रिगुणाः विश्वसृष्टये।।
जगत्कारणमेवैतत्प्रत्यक्षं भाव्यते बुधैः।।9।।
अर्थ—— ह्या प्रमाणे ह्या सत्व, रज तमांनी ही सृष्टि उत्पन्न झाली. जे त्रिुगुण व्यक्तरुपाने विद्यमान झाले असे विद्वान लोक मानतात. ।।10।।

विष्णुरस्याभिमानी च प्रधान पुरुषोत्तमः।।
इतो ब्रह्मायतः सृष्टीः सर्वेव सम जायत।।10।।
अर्थ—— मुख्य तत्व हे प्रधान तत्व विष्णुरुपच असून विष्णुतत्व आहे. ह्या प्रमाणे ही सृष्टि निर्माण झाली. आणि सर्वच ह्या प्रमाणे समरुपाने प्रकाशित झाले. ।।10।।

ललाटात्‌ ब्रह्मणो रुद्रः सञजात इति कथ्यते।।
एतो त्रिमूर्तयो ज्ञेया सृष्टिस्थित्यन्तकारिणः।।11।।
अर्थ—— ब्रह्मतत्वाच्या ललाटामधून रुद्र तत्व निर्माण झाले. असे सांगतात. ह्या पासूनच तीन तत्व निर्माण झाले. (1)उत्पत्ति (2) स्थिति (3) अन्त, असे म्हटले जाते. ।।11।।

विष्णु सत्वाभिमानी च विधिश्च रजस स्तथा।।
तमसो रुद्र इत्येव मता त्रिगुणदेवताः।।12।।
अर्थ——— विष्णु हे सत्वगुण सम्पन्न ब्रह्म हे (ब्रह्मदेव विधि) राजस्‌तत्व सम्पन्न, रुद्र हे तामस तत्व सम्पन्न असे त्रिगुण देवता मानले जातात. ।।12।।

विष्णुतः सूक्ष्मसृष्टिश्च स्थूला सा ब्रह्मणः स्मृता।।
विष्णुरात्मा हि विश्वस्य सर्वा सृष्टिरितः क्रमात।।13।।
अर्थ—— विष्णु पासून सूक्ष्मसृष्टि, ब्रह्मापासून स्थूल सृष्टि आणि सर्व सृष्टिचा आत्मा हा विष्णुच आहे. ह्या प्रमाणे सर्व सृष्टि निर्मित झाली. ।।13।।

अयं विष्णुर्हि सम्प्रोक्तः श्रीनारायण इत्यपि।।

हेमगर्भोप्ययं ज्ञेयो निजपूर्वस्वरुपतः।।14।।
अर्थ—— हा विष्णुनारायण ह्या नावाने पण जाणला जातो. आणि आपल्या पूर्वस्वरुपावरुन पण त्यास ”हेमगर्भ” हे पण म्हटले जाते. ।।14।।

सृष्टिकामायमाकाशं सृष्ट्‌‌वा प्रथममेव हि।।
ततो वायुस्ततो ह्यग्निस्ततो निरञच भूस्ततः।।15।।
अर्थ—— ह्‌या प्रमाणे सृष्टि उत्पत्ति करण्याच्या कामनेने ह्‌या विष्णुने प्रथम आकाशाची निर्मिती केली तद्‌नंतर वायु, अग्नि, जल आणि भूमि निर्माण केली. ।।15।।

पञचतन्मात्र भूतानि त्रिगुणाश्च तथैव सः।।
प्रथमं सृष्टवान्देवः सूक्ष्मदेहविसृष्ट ये।।16।।
अर्थ—— हे पंचतन्मात्र भूत निर्माण करुन त्रिगुणांचे सृजन करुन नंतर देवाने प्रथम सूक्ष्म देह, निर्माण केले. ।।16।।

तन्मात्ररुपा आसन्‌‌ ये पञचभूतांश्च तांस्ततः।।
तमोगुणमधिष्ठाय स्थूलीकर्तू स ऐक्षतः ।।17।।
अर्थ—— हे पंचमहाभूत प्रथम ह्या—त्या तन्मात्रेच्या रुपांत प्रकाशित झाले. तमोगुणाच्या अधिष्ठानाने ते स्थूलरुपांत प्रथम दृश्यरुप झाले. ।।18।।

आकाशः शब्दगुणको शब्दस्पर्शात्मिकोनलः।।
शब्दस्पर्शस्तथा रुपं रसो नीरं चतुर्गूणम्‌‌।।18।।
अर्थ——आकाशपासुन शब्द तन्मात्राची उत्पत्ती झाली. शब्द,स्पर्शात्मक अग्नि उत्पन्न झाला. शब्द स्पर्श तथा रुपात्मक त्रिगुणांनीयुक्त अग्नि उत्पन्न झाला. ।।18।।

शब्दस्पर्शस्तथा रुपं रसो नीरं चतुर्गूणम्‌‌।।
शब्दस्पर्शस्तथा रुपं रसो गंधश्च पञच भूः।।19।।
अर्थ—— शब्द,स्पर्श,रुप तथा रस ह्‌यांनी युक्त जल उत्पन्न झाले. हे चार गुणांनी युक्त झाले. शब्द,स्पर्श,रुप,रस आणि गंध ह्या पांच तन्मात्रे सहित ”भूमि” उत्पन्न झाली.

स पञचभूतसत्वांशन्‌‌ रजोशांश्च तथैव हि।।
कृत्वा चतुर्धा तत्पश्चात्‌‌ क्रमेणानेन सृष्टवान्‌‌।।20।।
अर्थ—— पंचमहाभूतांना आणि रजोगुणाला क्रमशः चार—चार भागांत त्याने विभाजित केले. आणि क्र्रमाने निर्मित झाली. त्यांच्या मिश्रणाने सृष्टि ची निर्मिती झाली. ।।20।।

भूत सत्वांशत्रितयादन्तः करणपञचकम्‌‌।।
मनो बुध्दिश्च चित्‌‌ञच तथाङहंकार एवच।।21।।
अर्थ—— शरीरांतील सत्वांशाच्या तीन भागाने अंतःकरण उत्पन्न होते. त्यांत मन बुध्दि चित्त अहंकार ह्‌‌या गुणांचा समावेश असतो. ।।21।।

भूत सत्वतुरीयांशाज्ज्ञानेन्द्रियाणि पञच च।।
श्रोत्रं त्वकृचक्षुरित्येव जिव्हा घ्राणं निबोधत।।22।।
अर्थ——आणि शरीरांतील भूत सत्वांशात्‌‌‌, सत्वांशाच्या चौथ्या भागापासून ज्ञानेन्द्रिय पंचक (नेत्र,कर्प,जिव्हा,स्पर्श,घ्राणोन्द्रिय) उत्पन्न झाले.।।22।।

स्फुरणञचानुसंधानं ज्ञानं विषयोस्तरस्य च।।
संङकल्पश्च विकल्पश्च मनोविषय एव च ।।23।।
अर्थ—— स्फूरण आणि ज्ञान हे अंतःकरणाचे विषय आहेत. संकल्प— विकल्प हे मनाचे विषय आहेत. ।।23।।

निश्चयश्च भवेद्‌‌बुध्देः चित्तस्य स्मरणं तथा।।
विषयाहङ कृतेस्तद्वदभिमानोवगम्यताम्‌‌।।24।।
अर्थ—— बुध्दिचा विषय म्हणजे निश्चय हा आहे. आणि चित्ताचा विषय स्मरण आहे. अहंकाराचा विषय अभिमान हा होय. हे जाणावे. ।।24।।

मनःस्थानं गलान्तञच बुध्देर्वदनमेव च।।
अहङकारस्य हृदयं नाभिश्चित्तस्य च स्थलम्‌‌।।25।।
अर्थ—— मनाचे स्थान गळयामध्ये, बुध्दिचे स्थान वदन(मुख) येथे आहे. अहंकाराचे स्थान हृदयामध्ये आणि चित्ताचे स्थान नाभिमध्ये आहे. ।।25।।

मूलाधारं स्फुरणतो भ्रूमध्यं ज्ञानतस्तथा।।
अनुसन्धानतस्त्वैवमन्तः करणस्य वा स्थलम्‌।।26।।
अर्थ— मूलाधारामध्ये स्फुरणाचे (उत्साह) स्थान, भ्रूमध्यांत म्हणजे दोन्ही भूवयांमध्ये ज्ञानाचे स्थान आणि अंतःकरणाचे स्थान अनुसंधानामध्ये आहे. ।।26।।

अन्तरस्य च कूटस्थो मनसश्चन्द्रमास्तथा।।
बुध्देश्चतुर्मुखो ज्ञेयो बृहस्पतिरथापि वा।।27।।
अर्थ—— अंतराचा (मनाचा) देवता कूटस्थ (आत्मा) आहे. मनाचा देवता चन्द्रमा म्हटला जातो. बुध्दिचा देवता चतुर्मुख म्हणजे ब्रह्मदेव असुन ब्रहस्पति सुध्दा मानला जातो. ।।27।।

चित्तस्य विष्णुर्विज्ञेयो नारायणः स इत्यपि।।
अहंङकारस्य रुद्रोसावेतेन्तः करणाधिपः।।28।।
अर्थ——चित्ताचा देवता विष्णु आणि तोच म्हणजे नारायण हा कर्ताधर्ता आहे. अहंकारचा अधिष्ठाता रुद्र(महादेव) असून तेच सर्वोंचे मुख्य साधनाधिकारी आहे. ।।28।।

श्रवणस्य दिग्‌ ‌त्वचो वातश्चक्षोः सूर्यस्तथेव च।।
जिव्हाया वरुणः प्रोक्तो घ्राणस्याविश्वकुमारकौ।।29।।
अर्थ—— श्रवणेन्द्रियांची देवता दिशा, त्वक्‌‌—स्पर्शेन्द्रियाची देवता वायु, नेत्रेन्द्रियांचा देवता सूर्य, जिव्हा रसेन्द्रियाचा देवता वरुण आणि घ्राणेन्द्रिया चा देवता अश्विनीकुमार हे मानले गेले आहेत. ।।29।।

शब्द श्रोत्रस्य विषयस्त्वचः स्पर्शस्तथैव च ।।
अक्ष्णौरुपं रसश्चैव जिव्हायास्तु निबोधत।।30।।
अर्थ——श्रोत्राचा विषय शब्द, स्पशेन्द्रियाचा विषय—स्पर्श, नेत्रेन्द्रियांचा विषय—रुप, जिव्हेचा विषय—रस, ह्‌या प्रमाणे म्हटले गेले आहे.।।30।।

घ्राणस्य विषयो गन्धः सर्वेषां स्फुट एव हि।।
जीवानां बाधकं प्रोक्तं चैतद्‌विषयपञचकम।।31।।
अर्थ——नाकाचा विषय—गंध, असून सर्व इंद्रियांचे विषय वेगळे—वेगळे आहेत. आणि हे सर्व विषय पंचक जीवांना बाधकच आहेत. ।।31।।

भूतरजोंशत्रितयाद्विज्ञेयं प्राणपञचकम्‌‌।।
प्राणोपानः समानश्च व्यानश्चोदान इत्यपि।।32।।
अर्थ——पंचप्राण हे रजोगुणी भूतातील (तिन्हींंची युति होवून) निर्माण झाले, ते म्हणजे प्राण,अपान,व्यान,उदान आणि समान हे होय.।।32।।

भूतरजस्तुरीयांशात्पञचकर्मेन्दियाणि वै।।
वग्‌हस्तौ च पादौ च पायुश्चोपस्थ एव च ।।33।।
अर्थ—— रजोगुणी भूतांच्या चौथ्या भागापासून पंचकर्मेन्द्रिय निर्माण झाले. वाक्र्‌‌‌,हाथ,पाय,वायु,उपस्थ हे ते होतांत. ।।33।।

सत्वं समष्टि तस्त्वै वं सृष्टाश्चेन्द्रियपालकाः।।
एभिरेवेन्द्रियाणीत्थं स्वे स्वे कर्माणि कुर्वंतें।।34।।
अर्थ——सत्वगुणापासुन समविष्टतत्वरुपी इन्द्रियपालक निर्माण होवून त्या—त्या इन्द्रियांचे कार्य त्या—त्या कर्मात सम्पन्न झाले. ।।34।।

नाग कूर्मश्च कृकरो देवदत्तो धनञजयः।।
उपवाताश्च पञचै ते प्रोक्ता उपनिषत्सु हि ।।35।।
अर्थ—— नाग,कूर्म,कुकर,देवदत्त, धनंजय, हे पांच उपप्राण वायु उपनिषदां मध्ये सांगीतले आहे. ।।35।।

एषु प्राणादयः पञच मुख्याःपञचसू तेष्वपि।।
प्राणसंज्ञस्तथापानः श्रेष्ठः प्राणस्तयोर्हि सः ।।36।।
अर्थ— ह्‌या पंचप्राणांमध्ये प्राण आणि अपान वायु हे मुख्य सांगितले आहेत. त्यांत प्राण का विशेष श्रेष्ठ सांगितला आहेत. ।।36।।

स्थिते यस्मिंश्च स्थास्यामि चोत्क्रान्तोहं तथैव च ।।
इति मत्वासृजत्प्राणं भगवान्‌‌ भूतभावनः।।37।।
अर्थ—— भूतभवन प्रजोत्पादक भगवान विष्णुने या मध्ये प्रविष्ट होवून सतत उत्क्राप्त होवून प्राण तत्व उत्पन्न केले. ।।37।।

वायुष्वेतेषु सर्वेषु मुख्यश्चैकोभवततः।।
श्रेष्ठो ज्येष्ठश्च प्राणो हि जीवात्मानं विभर्तियः।।‌।।38।।
अर्थ—— सर्व वायुंमध्ये त्या वेळेस एकच वायु मुख्य रुपाने उद्‌‌भवला. ज्येष्ठ श्रेष्ठ असे प्राणतत्व सर्व जीवात्म्यांमध्यें प्रविष्ठ झाले. ।।38।।

आस्य नासिकयोर्मध्ये हृदयं नाभिमण्डलम्‌।।
पांदाङगुष्ठमिति प्राहुः प्राणस्थानानि च क्रमांत।।39।।
अर्थ—— तोड आणि नाकामध्ये, हृदयात आणि बेंबीत, पायाच्या अंगठ्‌‌यामध्ये ह्‌या प्रमाणे क्रमाने प्राण असण्याचे स्थान आहे.।।39।।

अपानो वर्तते नित्यं गुदमेण्ढोरुजानुषु।।
उदरे सकले कट्‌‌यां नाभौजङघे च वा तथा।।40।।
अर्थ—— अपान वायु हा नित्य गुदाद्वारी, शिश्नाग्रांत, गुडघे तथा मांडी ह्या ठिकाणी स्थित असतो. संपूर्ण उदरांत पोटांत आणि कटिस्थानी तथा नाभीमध्ये आणि जांघेमध्ये पण हा त्या प्रमाणेच असतो. ।।40।।

व्यानः श्रोत्रोरुकट्‌यांच ककुद्‌‌भ्यां गुल्फयोरपि।।
प्राणस्थाने गलेक्ष्णोश्च व्याप्त सर्वत्र तिष्ठति।।41।।
अर्थ—— व्यान हा वायु कान मांड्‌या, कमर—नितंब घोटाद्वयांमध्ये स्थित आहे. प्राणस्थानामध्ये गळा, डोळे, ह्‌यांत असून, सर्वत्र व्यापला आहे. ।।41।।

एदानः सर्वसन्धिस्थ पादयोर्हस्तयोरपि।।
नाभौ समानो विज्ञेयः सर्वत्रापि प्रवर्तंते।।42।।
अर्थ—— हातापायांच्या सर्व सांध्यांमध्ये उदान हा वायु स्थित असून नाभि मध्ये समान हा वायु असून तो सर्वत्र भ्रमण करतो. ।।42।।

नागादि यायवः पञच त्वगस्थ्यादिषु संस्थितः।।
कर्मांणि दशवायूनामित उर्ध्व प्रचक्षतें.।।43।।
अर्थ—— त्वचा आदि मध्ये नाग नामक वायु स्थित असून एकंदर दहा प्रकारचे वायु वर सांगीतले गेले आहेत आणि त्यांची कर्म पण उधृत केली गेली आहेत. ।।43।।

निःश्वासोर्च्छैांसकासाश्च प्राणकर्माणि प्रोच्यते।।
अपानख्यस्य वायोश्च विण्मुत्रादि विसर्जनम्‌‌।।44।।
अर्थ—— श्वास निश्वास आदि प्राणवायुची कर्मे आहेत. अपानादि वायुंचे मलमूल विसर्जन हे काम आहे. ।।44।।

समानः सर्वसामीप्यं करोति तनुपोषणम्‌‌।।
उदान उर्ध्वगमनं देहस्थोज्जीरणं तथा। ।।45।।
अर्थ—— ”समान” वायु हा सर्व शरीरांत भ्रमण करुन सर्वत्र सामीप्य प्राप्त करुन शरीर पोषण करतो. उदान हा वायु उर्ध्व गतीस जाउन शरीराचे शेवट करण्याचे कार्य करतों. ।।45।।

व्यानो विवादकृत्‌‌प्रोक्तश्चालनं सर्वसन्धिषु।।
पञचवायुक्रियाः प्रोक्ता उपवायुक्रिया इतः ।।46।।
अर्थ—— ”व्यान” वायु हा सर्व सांध्यामध्ये भ्रमण करणारा असून सांध्यांचे वळणे,चालणे सम्पुर्ण शरीरात फिरणारा आहे. ह्‌या प्रमाणे पंच वायुंच्या क्रिया सांगीतल्या गेल्या आहेत. आता उपवाचयुं च्या क्रिया बघु।।46।।

उग्दारादिकरो नागः कूर्म उन्मीलनादिकृत ।।
निद्रादिकृद्देवदत्तः कृकरः क्षुत्करस्तथा।।47।।
अर्थ—— ढेकराचा उद्‌‌गार आदिकरणरा वायु ”नाग” नामक आहे. कूर्म नामक वायु उन्मीलन कारक (डोळयांची उघड झांप होते)देवदत्त वायुमुळे निद्रासमयी जांभई येते, ”कृकर” नामक वायुमुळे शिंका वगैरे येतात. ।।47।।

धनञजयस्य शोभादि कर्मप्रोक्तं महात्मभिः ।।
न जहाति मृतं वापि शरीरञच धनञजय।।48।।
अर्थ—— महात्मा लोकांनी, असे म्हटले आहे की —धनंजय नामक वायु हा शरीरास पुष्टी देउन शोभाकारक आहे. आणि मृत्यु नंतर ही हा शरीरास फुगवतो आणि सोडीत नाहीं. ।।48।।

अथ वर्णास्तु पञचानां प्राणादीनामनुक्रमात।।
अमृतनादाख्योपनिषद्‌‌ वक्ति मन्या महेधूना।।49।।
अर्थ— प्रजादि पंचप्राणांचे असे अनुक्रमाने वर्णन ”प्राणोपनिषदांत”(अमृतनाद नामक उपनिषदात) आहे. असे मानले जाते.।।49।।

रक्तवर्णो मणिप्रख्यः प्राणवायुः प्रकीर्तितः ।।
अपानस्तस्य मध्ये तु इन्द्रगोपसमप्रभः ।।50।।
अर्थ—— रक्तवर्ण अर्थात लालमण्याप्रमाणे हा प्राण वायु प्रसिध्द आहे. ”अपान” वायु त्यांत इन्द्रगोप ह्‌या लाल मखमली कीड्‌या प्रमाणे दिसतो. ।।50।।

समानस्तुद्वयोर्मध्ये गोक्षीरधवलप्रभः।।
अपाण्डुर उदानश्च व्यानो ह्यर्चिसमप्रभः।।51।।
अर्थ—— गोदुग्ध वर्णाचा म्हणजे गाईच्या दुधासारखा शुभ्ररंगाचा त्या दोघांमध्ये समान वायु हा असतो. उदान वायु हा अपांडूर म्हणजे भूरकट रंगाचा असून व्यान हा वायु एकाद्या किरणा प्रमाणे चमकतो. ।।51।।

अपानस्य विधिर्यद्वत्प्राणस्य हरिरुच्यते।।
उदानस्य यथा रुद्रः समानस्य तथेश्वरः ।।52।।
पान वायुचे अधिपति विधि अर्थात ब्रह्मदेव हे म्हटले जातात. आणि प्राणवायुचे अधिपति विष्णु भगवान हे सून उदान वायुचे रुद्र हे अधिपति समान वायुचे ईश्वर हे अधिपति आहे.।।52।।

व्यानस्य भवतीत्यत्र त्वभिमानी सदाशिवः।।
एवं प्रोक्तानि पञचानां पञचाधिपतयः क्रमांत।।53।।
अर्थ—— व्यान ह्यया वायुचे धिपति अभिमानी सदाशिव हे म्हटले जातात. आणि ह्‌या प्रमाणे हे पांच देव पंचाधिपति म्हणून म्हटले गेले आहेत. ।।53।।

रजस्तुर्यंशभागेन कर्मेन्द्रियाणि चाभवत्‌‌।।
वाग्घस्तो चरणावेवमुपस्थः पायुरेव च ।।54।।
अर्थ——रजोगुणाच्या चौथ्या भागापासून कर्मेंन्द्रियांची उत्पत्ति झाली. वाक्‌‌ (वाणी) हस्त,पाद,गुदा आणि जननेन्द्रिय ही ती होत. ।।54।।

वाचोग्निर्हस्तयोरिन्द्रः पादयोश्च त्रिविक्रमः।।
प्रजापतिरुपस्थस्य पायोर्मृत्युस्तथैव च ।।55।।
अर्थ—— वाणीचा अग्नि, हातांचा इन्द्र, पायांचा त्रिविक्रम, जननेन्द्रियाचा प्रजापति, गुदा इन्िउद्रयाचा मृत्यु (यम) हे देवता होय. ।।55।।

इमे कर्मेन्द्रियाणान्तु सन्त्यभिमानिनः क्रमांत्‌‌।।
दानादाने तथा स्पर्शो हस्तयोः कर्मतत्स्फुडम्‌‌।।56।।
अर्थ—— ह्या कर्मेन्द्रियांच्या क्रमाने दान प्रदान करणे, स्पर्श करणे ह्‌याचे हाताद्वारे स्फुरण झाले.

कर्मेन्द्रियाणि प्रोक्तानि यन्त्राणीव जडानि हि।।
वाण्येकैव हि सम्प्रोक्ता ज्ञानकर्मोभियात्मिका ।।57।।
अर्थ— कर्मेन्द्रिय हे जड यंत्राप्रमाणे झाले. पण वाणी हीच एक ज्ञान आणि कर्म ह्‌या दोन्हींची वाहक झाली. दोघांना प्रकट करती झाली. ।।57।।

उद्‌गीरणं कर्म यस्याः यैव ज्ञानैकसाधना।।
नराणां भूषणं तर्दैंज्जीवनं लक्षणञच वा।।58।।
अर्थ— ”उद्‌‌गीरणं” ध्वनि स्पष्ट करणे, स्पष्ट बोलणे, म्हणजे ज्ञान प्राप्तीचे साधन आहे. मनुष्यांचे एकमेव भूषण आणि मानवी जीवनाचे लक्षण आहे. ।।58।।

परा पश्यन्ति मध्यमां वैखरी च चतुर्विधा।।
वाणीयं वर्तंते देहे ज्ञातव्यांत्र मुमुक्षुभिः ।।59।।
अर्थ— परा— पश्यन्ति— मध्यमा आणि वैखरी ह्‌या चार प्रकार च्या वाणी शरीरांत असतात. हे मुमुक्षु साधकाने समजून घेतले पाहीजे.।।59।।

परायामङकुरी भूय पश्यन्त्या द्विदलीकृता।।
मध्यमायां मुकुलिता वैखर्यां विकसीकृता।।60।।
अर्थ—— ”परा” वाणी मध्ये ती अंकुरित होवून, ”पश्यन्ति” मध्ये ती द्विदलीत होते नंतर ”मध्यमा” वाणीमध्ये ती उन्मीलित होवून ”वैखरी” मध्ये ती पूर्ण विकसित होते. ।।60।।

विदितं पादयोःकर्म गमनागमनादिकम्‌‌।।
उपस्थस्य च पायोश्च मूत्रविष्ठाविसर्जनम्‌‌।।61।।
अर्थ—— पायांमुळे जाणे—येणे आदि कर्म होते. उपस्थ द्वारा मल, गूदाद्वारे मूत्र मल विसर्जन क्रिया होते. ।।61।।

पंचविंशतितत्वाख्यं सुक्ष्मं चैवातिवाहिकम्‌‌।।
लिङगशरीरमित्यवं वासनावासित जगुः ।।62।।
अर्थ—— पंचवीस तत्वांनी ह्‌‌या जडशरीरांत सूक्ष्म शरीर, आणि सुक्ष्म रुपाने लिंग शरीर म्हणून हे वासना स्थानी विराजमान असते.।।62।।

द्विधा विभज्य चैकैकं स्थाप्यैकन्तु तथैव च।।
द्वितीयञच पुनश्चैवं चतुर्धा कृतवान्‌ प्रभुः ।।63।।
अर्थ—— त्याचे दोन—दोन विभाग करुन, त्याचे पुर्नस्थापन करुन अर्ध्या उरलेल्या विभागाचे चार भाग प्रभुने केले. (पंचीकरण) अर्थात पंचमहाभूतांचे विशिष्ट संम्मिश्रण.।।63।।

तत्तद्‌‌भूते प्रधानांशमेकं संस्थाप्यनन्तरम्‌‌।।
तदन्येषु चतुर्भागान्‌‌ संयोज्य पञच—पञच तें।।64।।
अर्थ—— त्या—त्या भूतांचे अर्धे भाग घेवून, बाकीच्यांचे एक—एक पाव हिस्से त्यास जोडून त्याचे पुनाः पाच प्रकार केले. ।।64।।

पञचभूतेभ्य एवं च तत्वानि पञचविंशति।।
आकारोदीक्षणादेव देवः स्वाचिन्त्यशक्तितः ।।65।।
अर्थ—— पंच महाभूतांपासून हे पंचवीस तत्वांचे आकार देवून देवाने स्वशिाक्तने त्यांत चैतन्य ओतले.।।65।।

अन्तःकरणं व्यानः श्रोत्रं वाक्शब्दो नभ एव च ।।
मनः समानस्त्वग्धस्तौ स्पर्शश्चेत्यनिलस्तथा ।।66।।
अर्थ— अंतःकरणामध्ये व्यान, श्रोत्र आणि वादी मध्ये शब्दरुप, नभ, मनामध्ये समान हा वायुरुप आणि त्वचे मध्ये वायुरुप स्पर्श निर्माण केला. ।।66।।

बुध्दिरुदानश्चक्षुषी पादौ रुपं तथानलः।।
चित्तं प्राणश्च जिव्हैवं चोपस्थस्य रसोजलम्‌‌।।67।।
अर्थ— बुध्दिमध्ये उदान, डोळयांना रुप आणि पायांना अग्निदेवता, चित्तामध्ये प्राण, जिव्हा व जननेन्द्रिय ह्‌यांत रसरुपी जलदेवता प्रकट झाल्या।।67।।

अहङकारस्तथापानो घ्राणं गंधस्तथैव भूः।।
पञचविंशति तत्वानि सूक्ष्मदेहस्य सन्त्यथ।।68।।
अर्थ— अहंकार, अपान, घ्राण गंध तसेच भू—पृथ्वी (गंधवती) हे पंचवीस तत्व सूक्ष्म देहाचे सांगीतले आहेत. ।।68।।

पञचीकृत हि भूतांना लेशानादायचेश्वरः।।
व्यष्टिः समष्टिः स्थूलानि शरीराणि विनिर्मंमे।।69।।
अर्थ—— ईश्वराने पंचीकृत अश्या महाभूतांच्या मिश्रणांतून त्यांचे लेश (अंश) घेवून भूतें प्राणी उत्पन्न केलीत. ती व्यष्टि समष्टि रुपाने स्थूल शरीरे उत्पन्न केली. ।।69।।

कामक्रोधौ लोभमोहौ भयं नभः इतीर्यते।।
चलर्नवलनञचैव प्रसारश्च निरोधनम्‌‌।।70।।
अर्थ——— काम. क्रोध, लोभ, मोह, भय हे आकाशतत्वांत तसेच चालणे वळणे, प्रसार, थांबणे, रोकणे हे पण त्यातच आहे. ।।70।।

तथैवाकुञचनं त्वैवं देने पवनः ईदृशः।।
क्षुत्तृष्णालस्य निद्रा च मैथुनं चा निलस्तनौ।।71।।
अर्थ———त्याच प्रमाणे आकुंचन होणे, मिटणे हे पण कार्य देहामध्ये आहे. ते पवन म्हणजे वायुचेच आहे. त्याच प्रमाणे भूक, तहान, आळस, निद्रा, मैथुन हे तेजतत्व अग्नितत्वा द्वारेच शरीरांत क्रियाशील होतात.

मूत्र लाला तथा रक्तं शुक्रं स्वेदो जलं मतम्‌‌।।
अस्थि चर्मच नाडी च केशा मांसञच भूस्तनो।।72।।
अर्थ—— मूत्र लाल रक्त घाम शुक्र हे सर्वत्र जलतत्वाचेच कार्य असून हाडे, कातडे, चर्म, नसा, केस मास हे सर्व भूततत्वापासूनच होतात. ।।72।।

पञचभूतात्मक्रो देहो स्थूलः सूक्ष्मस्तथैव च ।।
आनन्दघन आत्माहं विनिश्चित्य विमुच्यते।।73।।
अर्थ—— हा पंचभूतात्मक देह स्थूल आणि सूक्ष्म रुपात आहे. आत्मा मात्र आनंदाचा कंद असून तो त्या देहास विसर्जित करतो. ।।73।।

अहिंसासत्यमस्तेय ब्रह्मचर्यांपरिग्रहः।।
अक्रोधो गुरुशुश्रूषा शौच सन्तोष आर्जंवम्‌‌।।74।।
अर्थ—— ह्‌या निम्नलिखित सर्व अंतरमुख नित्य अश्या स्थिति आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, अक्रोध, गुरुशुश्रुषा, शौच, संतोष सरलता असते.।।74।।

शमो मनानिग्रहञच दमश्चेन्द्रियसंयमः।।
कर्मत्यागश्चोपरतिर्नित्यमन्तर्मूखा स्थितिः ।।75।।
अर्थ— शम,दम,मनोनिग्रह, संयम, कर्मत्याग,उपरति ह्‌‌या सर्व आंतरिक प्रवृत्ति च्या स्थिति आहेत.।।75।।

तितिक्षा द्वन्द्वसहनं श्रध्दा विश्वास एव हि।।
तुष्टिरेव समाधानं पूर्णानन्द स्वरुपतः।।76।।
अर्थ—— तितिक्षा सहनशक्ति द्वंद्व द्विधामनःस्थिति श्रध्दा, महणजे विश्वासच आहे. तुष्टी म्हणजे समाधान पूर्ण आनंदस्वरुपाचे ते समाधान आहे. ।।76।।

आत्मनित्वमदम्भित्वमास्तिकत्वमहिंसता ।।
एते सर्वे गुणा ज्ञेयाः सात्विकस्य विशेषतः।।77।।
अर्थ—— अमानवित्वं आपल्याकडे मान सम्मान न घेणे, अदाम्भिकत्व, ढोंगीपणा न करणे, अस्तिकता म्हणजे परमेश्वरावर श्रध्दा न ठेवणे. अहिंसा कोणत्याही प्रकार ची हिंसा न करणे ही सर्व सावित्वकगुणांची लक्षणें आहेत. ।।77।।

अहं कर्तास्म्यहं भोक्तस्म्यहं वक्ताभिमानवान्‌‌।।
एते गुणा राजसस्य प्रोच्यन्ते ब्रह्मवादिभिः।।78।।
अर्थ—— मीच कर्ता आहे, मीच भोगण्याचा अधिकारी आहे, वक्तृत्वाचा अभिमान असणे, हे गुण राजस्‌‌ प्रवृत्ति चे लक्षण आहेत. असे ज्ञाते लोक मानतात. ।।78।।

निद्रालस्यमोहरागौ भ्रैथुनं चौर्यमेव च ।।
एते गुणास्तामसस्य प्रोच्यन्ते ब्रह्मवादिभिः।।79।।
अर्थ—— निद्रा, आळस, आसक्ति, मोह, मैथुन आणि चोरी करणे, ही अवगुण तामस्‌ प्रवृत्ति ची आहेत. असे ब्रह्मविद्‌‌ साधकांचे मत आहे. ।।79।।

उर्ध्व गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः।।
जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसः ।।80।।
सत्वगुणी लोक उच्चलोकांत जातात. राजस प्रवृत्तिचे लोक मध्यम लोकांत जातात, तामस प्रवृत्ति चे लोक निम्न लोकांत जातात. ।।80।।

बुध्दिकर्मेन्द्रियप्राणपपञचकैर्मनसा धियाः।।
शरीरं सप्तदशभिः सुसूक्ष्मं लिंङगमुच्यते।।81।।
अर्थ—— बुध्दि,कर्मेन्द्रिय, प्राणपंचक (पंचकर्मेन्द्रिय, पंचप्राण, पंचउपप्राण, मन आणि बुध्दि ह्‌या प्रमाणे सतरा तत्व मिळून सूक्ष्म शरीर बनते.।।81।।

मनोबुध्दिरहङ्‌कारः स्वानिलाग्निजलानि भूः।।
एताः प्रकृतस्यत्वष्टौ विकाराः षोडशोपचारे ।।82।।
अर्थ—— मन, बुध्दि, अहंकार स्व—अहंकारतत्व अनिल (वायु) अग्नि, जल आणि पृथ्वी मिळून हे आठ विकार सोळा तत्वांच्याही पलीकडचे आहेत. ।।82।।

श्रोत्रं त्वक्चक्षुषी जिव्हा घ्राणं चैव तु पञचकम्‌‌।।
पयूपस्थौ करौ पादौ वाक्चैव दशमी मता।।83।।
अर्थ—— श्रोत्र,चक्षु,त्वचा, जिहृा, व घ्राण हे पंचेद्रिय आणि पांच कर्मेन्द्रिय हात,पाय,वाणी,वायु,उपस्थ हेमिळून दहा आहेत. असे सांगीतले गेले आहे. ।।83।।

शब्दस्पर्शश्च रुपञच रसो गन्धस्तथैव च ।।
त्रयोविंशतिरेतानि तत्वानि प्राकृतानि तु.।।84।।
अर्थ—— शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध हे मिळून प्राकृतिक तेव तत्व आहेत.

जाग्रत्स्वप्नः सुषुप्तिश्च त्रयावस्थाभिमानिनः।।
विश्चश्च तेजसश्चैव प्राज्ञश्चेति च ते त्रयः।।85।।
अर्थ—— जाग्रत स्वप्न, सुषुषि ह्‌या आत्मतत्वाच्या तीन अवस्था मानल्या गेल्या आहेत. आणि वि्‌श्व तेजस आणि प्राज्ञ हे तीन ते रुप आहेत.।।85।।

विराड्‌‌ हिरण्यगभंश्च ईश्वरश्चेति ते त्रयः।।
ब्रह्माण्डं चैव पिण्डाण्ड लोका भूरादयः क्रमात्‌‌।।86।।
अर्थ——विराट्‌‌ हिरण्यगर्भ आणिा ईश्वर असे ते तीन आहेत. ब्रह्माण्ड पिण्डाण्ड आणि भूलोक असे ते क्रमाने आहेत. ।।86।।

स्वस्वोपाधिलयादेव लीयन्ते प्रत्यगात्मनि।।
अण्डं ज्ञानग्निना तप्तं लजीयतें कारणे सह।।87।।
अर्थ—— प्रत्यगात्मा ह्‌या अवस्थेत ते आपआपली स्वउपाधी लीन करुन ज्ञानाग्निने तप्त होवून अण्डकारणासहित विलीन होते. ।।87।।

परमात्कनि लीनं तत्परं ब्रह्मैव जायते।।
ततः स्तिमित गम्भर न तेजो न तमस्ततम्‌‌ ।।88।।
अर्थ——परमात्म्या मध्ये लींन झाल्यावर फक्त ब्रह्म हेच तेथे विराजित राहते. आणि विस्मित होवून अशी स्थिती निर्माण होते कीं त्या ठिकाणी न अधःकार राहतो न तेजस्‌रुप राहते. अर्थात एकमेव अद्वैत ब्रह्मानन्दच अनुभूत होतो. ।।88।।

अनाख्यमनभिव्यक्तं सत्किञिचदवशिष्यते।।
ध्यात्वामध्यस्थमात्मान कलशान्तरदीपवत्‌‌।।89।।
अर्थ——सत्‌तत्व असे काही शांत व तेजस्वी रुपांत शिल्लक राहते की ज्या प्रमाणे एकाद्या घटामध्ये स्थीर रुपाने ज्योती दीपक प्रकाशित रहाते. अर्थात कोठलेही कंपन नसून एक सारखे ती ज्योत स्थिरपणे प्रकाशित राहते अर्िात आपल्या मधील आत्मतत्वाचा स्वयंप्रकाशित अल्याच्या अनपुभूतिचा आनन्द घेतो. ।।89।।

अङगुष्ठमात्रमात्मानमधूमज्योतिरुपकम्‌‌।।
प्रकाशयन्तमन्तस्थं ध्यायेत्कूटस्थमव्ययम्‌‌।।90।।
अर्थ——— अधूमज्योतिस्वरुप म्हणजे अर्थात कोठल्याही प्रकारचा धूर त्या ठिाकाणी नसून स्वच्छ प्रकाशच आहे, अश्या स्थिति ते आत्मतत्व आपल्या अंतरंगात जे सत! तत्व कुटथ्थ आहे जो अविकारी आहे, त्याला कोठल्याही प्रकार संशय किंवा अज्ञानाचा धूर वेष्टिला गेला नाही. अशा निर्मळ तत्वाचा अनुभव घेते. ।।90।।

विज्ञानात्मा तथा देहे जाग्रत्स्वप्नसुषुप्तितः।।
मायया मोहितः पश्चाद्‌बहुजन्मान्तरे पुनः ।।91।।
अर्थ—— विज्ञानात्मा (पंचकोशात्मक देह) जाग्रत स्वप्न सुषुप्ति ह्‌या तीन अवस्थांनी माया शक्तिमुळे वेढला जातो, आणि पुन्हा बहुत जन्मांना प्राप्त करतो.

सत्कर्मंपरिपाकात्तु स्वविकारं चिकीर्षति।।
कोहं कथमयं दोषः संसाराख्य उपागतः।।92।।
अर्थ—— सत्कर्म करीत राहयल्यामुळे हा आत्मा स्वविकारांना विसर्जित करीत—करीत पुढे प्रगति पथावर जातो. अर्थात कोहं मी कोण आहे ? आणि ”कथं अयं” हे कसे आहे? हे सर्व विचार त्याला सतत पडतात आणि त्यामुळे त्या संसाररुपी दोषांपासून तो सुटत जातो. ।।92।।

जाग्रत्सवप्ने व्यवहरस्त्सुषप्तौ क्व गतिर्मम।।
इति चिन्तापरो भूत्वा स्वभासा च विशेषतः।। 93।।
अर्थ—— जाग्रत स्वप्न आणि सुषुप्ति ह्‌या तिन्ही अवस्था मला कश्या प्राप्त होतात ?त्यांत माझी काय गति आहे? आणि हा आपला आपल्यालाच काय आभास आहे? असा तो विचार करतो.।।93।।

अज्ञानात्तु चिदाभासौ बहिस्तापेन तापितः।।
दग्धं भवत्येव तदा तूलपिडमिवाग्निना।।94।।
अर्थ—— बाह्‌य तापामूळे तप्त होवून (दुःखाने दुःखी होवून) अज्ञानामुळे पोळल्सारखे विदित होते. ज्या प्रमाणे अग्निमुळे तूल कापूस जळावा तसे होते. ।।94।।

दहरस्थः प्रत्यगात्मा नष्टेज्ञाने ततःपरम्‌‌।।
विततो व्याप्यविज्ञानं दहत्येव क्षर्णन तु।।95।।
अर्थ—— सूक्ष्म दहर प्रत्यगात्मा हा अज्ञान नष्ट झाल्यामुळे ज्ञानरुपे सर्वत्र व्यापक स्वरुपी होवून तो क्षणभरांत प्रज्वलित होतो. ।।95।।

मनोमय ज्ञानमयान्त्सम्यग्दग्ध्वा क्रमेण तु।।
घटस्थ दीपवत्स्वच्छः स्वदन्तेव प्रकाशते ।।9।।
अर्थ—— मनोमय ज्ञानमय कोशास क्रमाने दग्ध समाप्त करुन तो घटस्थ दीपाप्रमाणे स्वान्तःकरणांत शान्तपणे तेवत राहतो. ।।96।।

स्वर्गेमृत्यौ च पाताले यत्किंञिचत्स चराचरम्‌‌।।
पञचभूतात्मकं सर्वं षष्ठं किञिचन्न विद्यते।।97।।
अर्थ— स्वर्ग, मृत्यु, पाताल, आणि जे कांही चराचर जगत आहे ते पंचभूतात्मक असून त्याशिवाय सहावे कांहीही नाहीं.

ईक्षणात्सृष्टवान्देवः पृथ्व्यप्तेजोनिलो नभः।।
स्थलसूक्ष्मशरीराणि चैतेरेवासृजत्‌‌ प्रभु।।98।।
अर्थ—— ईक्षण दृष्टिक्षेप केवळ दृष्टिपात करुन परेमेश्वराने पृथ्वि, आप, तेज, वायु आकाश ही पंचमहाभूते निर्मित केली. स्थूल आणि सूक्ष्म भूते प्राणी ही हयांपासूनच देवाने ने निर्मित केली. ।।98।।

पञचतन्मात्रतः सूक्ष्मं स्थूलं तत्स्थूलभूततः ।।
पञचभूतात्मके देहे स्त्री का सा कश्च पुरुषः।।99।।
अर्थ—— पंचतन्मात्रापासून सूक्ष्म देह आणि स्थेूल देह हे स्थूल भूतांपासून उत्पन्न केलीत. आणि ह्‌या पंचमहाभूतातम्क देहांत काय पुरुष देह आणि काय स्त्रीदेह ? अर्थात सर्व एउकच प्रकार आहे. ं।।99।।

सुषिरं व्योमयद्‌‌देहो प्रचारो वायुसंज्ञकः।।
उष्णताग्निर्द्रवं चापः पृथ्वी काठिन्यमित्यपि।।100।।
अर्थ—— शरीरांत आकाशरुपाने पोकळी रिक्त स्थान वायुरुपाने चलन—वलन, अग्निमुळे उष्णता, जलामुळे द्रवता पातळपणा, पृथ्वीमुळे कडकपणा हाडे वगैर निर्मित झाली. ।।100।।

प्राणोत्क्रमणतश्चोर्ध्व शवरुपात्तनुर्भवेत्‌‌।।
पृथ्व्यंश एक एवात्र वतते शवरुपतः।।101।।
अर्थ——प्राणोत्क्रमण झाल्यावर शरीर उर्ध्व गतिस जाऊन मृतरुपाने शव बनून राहते. पृथ्वीचा जो जड अंश असतो तो. तेव्हडा येथे जमीनीवर राहतो. तो. शिल्लक राहतो. ।।101।।

पृथिव्यां स लयं गत्वा मृत्तिकैव क्रमाद्‌‌वेत्‌।।
अवशिष्ठं किमत्र स्यात्‌को देहः कस्य सोभवत्‌‌।।102।।
अर्थ—— पृथ्वीमध्येच त्याचा विलय होता आणि त्याची मुत्तिका बनते. नंतर काय रहते ? कसचा देह आणि कोचा तो रहायला ?।।102।।

आकाशाद्‌‌वायुरुत्पन्नस्ततोग्निः समजायत।।
अग्नेरापस्ततः पृथ्वी पृथिव्योन्नं प्रजायते।।
अन्नाद्रेतो रजश्चैव ताभ्यां देहा इमे क्रमांत्‌‌।।103।।
अर्थ—— आकाशंत वायु उत्पन्न झाला त्याच्यापासून अग्नि उत्पन्न झाला. अग्निपासून पाणी आणि पाण्यापासून पृथ्वी उत्पन्न झाली. पृथ्वी पासून अन्न, त्यापासून रेत आणि रज उत्पन्न झाले. त्या पासून देह निर्मित झाला. ह्‌या क्रमाने सर्व उत्पन्न झाले. ।।103।।

घटो यद्वन्मृत्तिकायाः पुल्लिङगत्वेन बुध्यते।।
स्त्रीलिंङगत्वेन सा स्थाली मुत्तिकेकैव तत्र तु।।104।।
अर्थ—— घटरुपाने जे निर्मित झाले ते पुरुषलिंग आणि स्थाली रुपाने जे उत्पन्न झाले ते स्त्रीलिंग. मात्र एकाच मातीचे सर्वकाहीं बनले आहे. ।।104।।

तथैव स्त्री पुमान्देहो जडो मृण्मात्र मृद्‌‌भवः।।
का च नारी नरः कः स्याद्‌‌ भ्रममात्रमिदं जगत्‌‌।।105।।
अर्थ—— त्या प्रमाणेच सर्व स्त्री—पुरुष देह हे जड आणि एकाच मातीचे बनलेले आहेत. म्हणून त्यांत काय नारी आणि काय नर हा भेद भ्रममात्रच आहे. हे जग भ्रम मात्रच आहे. ।।105।।

रजोधिक्याच्च यो देहः स्त्रीलिंङगत्वेन बुध्यते।।
रेतोधिक्याच्च यो देहः पुल्लिङगत्वेन बुध्यते।।
अर्थ—— रजतत्वाच्या आधिक्याने म्हणजे बहुमात्रेने तो देह स्त्रीलिंग म्हटला जातो आणि रेत तत्वाच्या आधिक्याने पुरुष देह म्हटला जातो. ।।106।।

अन्ने हि नरनारीति व्यवहारः प्रतीयते।।
नापि भूमौ न नीरे च नाग्नौ वायो न खे तथा ।।107।।
अर्थ—— ह्‌यामुळेच व्यवहारात हा भेद नर नारी रुपाने गणला जातो. त्या प्रमाणे हा भेद त्या पंचमहाभूतांमध्ये नाही की ज्यापासून आपले मानवी शरीर मिश्रितरुपाने बनले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही तत्वें सर्व शरीरांत सारख्याच प्रमाणांत असतात. ।।107।।

अज्ञानोत्थ भ्रमाज्जाता वासनायासदात्मिका।।
तस्यां पुंस्त्रीवदाभाति स्वप्ने मिथ्या यथा तथा।।108।।
अर्थ—— अज्ञानामुळे भ्रम उत्पन्न होवून आणि असत्‌ तत्वाषियी वासना उत्पन्न झाल्यामुळे हा नर नारी भेद जाणवतो पण तो ज्या प्रमाणे स्वप्न हे मिथ्या असते तद्वतच आहे. स्वप्न तेवढयापूरते खरे वाटते. पण जागृत अवस्था प्राप्त झाल्यावर ते सर्व मिथ्या (खोटे) होते हे पटते. ।।108।।

अनेनैवां हिजीवत्वं बन्धो दुःखं जनिर्मृतिः।।
नात्मा नैव च भूतानि नान्प्नं नारी निरोपिच ।।109।।
अर्थ—— ह्‌या अज्ञानजन्य भ्रमामुळेच जीवत्व आणि त्याचे बन्धन तसेच जन्म आणि मृत्यु हे प्राप्त होते. अन्यथा हे नर नारी भेद नाहीत. आणि आत्मा आणि जीव हे भेद नाहित. ।।109।।

जन्मदुःखाथमेवेयं भावना निर्मिता भवेत्‌‌ ।।
हीनमसय भवेन्मोक्षो ग्रहणं बन्ध एक हि ।।110।।
अर्थ—— जन्म—दुःख ह्‌या साठीच ही भावना निर्मित होते आणि ह्‌या अज्ञानजन्य भ्रमरुपी अवस्थे पासून जो सुटला त्यास मोक्षप्राप्ती होते आणि ह्‌या भावनेत जो बांधला गेला त्याला संसार बंधन प्राप्त होते. ।।110।।

न चर्मणो न रक्तस्य न मांसस्य न चास्थिनः।।
यतो नैव ततो ज्ञानं स्वात्मरुप तनुजंडा ।।111।।
अर्थ——त्या भ्रमामुळे चर्म, रक्त, मांस, अस्थि रुप देहांमध्येच मीपणा वाटतो. ते सर्व जडरुप आहे. स्वआत्मरुपाचे ज्ञान म्हणजे भ्रमरहित ज्ञान आहे. । । 111।।

यथा भानुः स्वप्रकाशस्तथा ह्यात्मा स्वयं प्रभः।।
चकास्ति सर्वदेहेषु निजानन्दस्वरुपतः।।112।।
अर्थ—— ज्या प्रमाणे सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे, त्याच प्रमाणे आत्मा पण स्वयं प्रकाशी आहे. तो सर्व शरीरांत जीवमात्रांत स्वतःरुपाने आनंद रुपाने प्रकाशित होतो. ।।112।।

इति श्रीसमर्थरामदासासानुगृहित श्रीरामपदपंङ्‌‌कजभृङगायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे मायारुपसृष्टिक्रमः नाम नवमं प्रकरणं सम्पूर्णम्‌‌।

home-last-sec-img