Literature

मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी

धर्म या शब्दाचा समानार्थी शब्द कोणत्याही भाषेत नाही. धर्म शब्द अत्यंत व्यापक आहे. समाजधर्म, स्त्रीधर्म, पुरूषधर्म, वर्णधर्म, आश्रमधर्म, पतिधर्म, पत्नीधर्म, पिताधर्म, माताधर्म, पुत्रधर्म, कन्याधर्म, मित्रधर्म, बंधुधर्म, भगिनीधर्म, स्वामीधर्म, सेवकधर्म, राजधर्म, प्रजाधर्म,गुरूशिष्टधर्म, देहधर्म, अवस्थाधर्म, पदार्थधर्म, प्रवृत्तिधर्म, निवृत्तीधर्म, संसारधर्म, मोक्षधर्म इत्यादि पुष्कळ प्रकारचे भाव धर्म शब्दात समाविष्ट होतात. ईश्वरभक्तीचाही अंतर्भाव या धर्मशब्दात होतो. ब्रह्मनिष्ठ अर्थात आत्मनिष्ठ असणेही धर्मच म्हटला जातो.

स्वप्रणीत नियमांच्या पालनाद्वारे जीवांना विषयवासनेपासून संपूर्ण निर्मूक्त करणे आणि निर्विषय आत्मसुखाची अभिरूची क्षणाक्षणाने वाढवित रहाणे हे वैदिक धर्माचे मुख्य ध्येय होय. प्राणिमात्रांचा मुख्य धर्म स्वरूपाच्या निश्चयाने रहाणेच होय. भगवंताच्या अनुग्रहामुळेच इह-पर-कल्याण तसेच अद्वैतनिष्ठा पूर्णपणे संपादित होते. म्हणून भगवंताच्या पूर्णकृपेच्या प्राप्तीसाठी त्याची आराधना करणे हासुध्दा स्वहित साधणाऱ्यांचा धर्मच होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img