Literature

मार्गशीर्ष शुद्ध एकादशी

मंगलरूप असलेले अतिपवित्र असे जे चैतन्य तेच गुरूरूप धारण करते असे समजावे. गुरू आराधनेने सर्वांची आराधना होऊ शकते. या रहस्येद् घाटनासाठी ‘ दत्तावतार ‘ आहे त्यास ‘ अवधूत ‘ असेही म्हणतात. अवधूत शब्दाच्या प्रत्येक अक्षरात अर्थ भरलेला आहे.

*’अक्षरत्वात् वरेण्यवात् धूत संसारबन्धनात् |*
*’तत्वमस्यादिलक्षत्वात् अवधूत इतिर्यते |’*

गुरूपेक्षा श्रेष्ठ असे या जगात इतर काहीही नाही *’न गुरोरधिकम् | न गुरोरधिकम् |’* असे वचन आहे. इहपरसौख्यासाठी परागतीसाठी गुरूची आराधना मुख्यत्वे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व देवता तृप्त होतात. सद्गुरू तत्त्वमस्यादि लक्षणयुक्त आहेत हे सुचविण्यासाठीच त्यांना दत्त हा अवतार आहे.
गुरूविषयी शंका धरू नये. ज्यांनी गुरूपद प्राप्त केलेले आहे. ते गुरूपदास योग्यच असतात. कारण ब्रह्मस्वरूपी विराजमान झालेलेच गुरू होत. अशा गुरूंचीच आपण खात्रीपूर्वक निवड केली पाहिजे. पाणी नेहमी गाळूनच प्यावे लागते. गीतादि प्रमाणग्रंथामधून स्थितप्रज्ञांची लक्षणे सांगितली आहेत. ज्याच्यासाठी ती लक्षणे आढळतात. त्यांनाच गुरू म्हणता येईल. अशांना संसारिक कल्पना किंवा वैषयिक लोभ स्पर्शही करू शकत नाही. तो अखंड सत्-चित् सुखसंसाराचा आस्वाद घेणारा असतो.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img