Literature

मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा

श्रीदत्तांचा अवतार. दत्त हे नांव कसे पडले हे शांडिल्योपनिषदांत सांगितले आहे. *’ सुदश्चरं तपः तप्यमानाय अत्रये पत्रकामायारितरां तुष्टेन भगवता ज्योतिर्मयेन आत्मैव दत्तः | ‘* ब्रह्मा, विष्णु, महेश ही त्रिमुर्ती आपली मुले व्हावी अशी प्रबळ इच्छा धरून तपश्चर्या करीत असलेल्या अत्रि महर्षींना पाहून दिव्य, स्वयंप्रकाशित, ज्योतिर्मय परमात्मा तुष्ट झाले व त्यांनी त्यांची कामना पूर्ण करण्यासाठी स्वतःलाच दिले तोच ‘ दत्त ‘. परमात्म्याने स्वतःला अत्रिमहर्षींच्या स्वाधीन केले. तो त्यांचा पुत्र बनला म्हणजेच अत्रिमहर्षीत आविर्भूत झाला. शुध्द ह्रदय असणाऱ्या दांपत्याच्या पोटी परमात्म्याने अवतार घेतला. त्याच्या आई-वडिलांनी अनेक कष्ट भोगून, महाकीण अशा अनेक साधना करून, आपल्या सुशीलतेला पणाला लावून, कोणत्याही बिकट परिस्थितीत सत्याची कास धरून सच्चरित्र असे म्हणवून घेऊन मगच ते परमात्म्याच्या कृपेला पात्र झाले.

सत्व, रज, तम या तीन गुणांपासून सुटलेले, मुक्त असलेले तेच अत्रि महर्षी. अनुसया ही त्यांची पत्नी म्हणजेच असूया नसलेली. त्रिगुणात्मक सुखरूपाला प्राप्त करून घेण्यासाठी कठीण साधना करीत राहिल्याने साधकांच्या ठायी परमात्म्याने अवतार घेतला, परमात्मा अवतरला व ‘ दत्त ‘ म्हणून त्याने लोकाग्रह केला.

*’अवधूतचिंतन श्रीगुरूदेव दत्त ! ‘*

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img