Literature

मोक्षविघ्न कराः नाम प्रकरणं षष्ठम

(मेक्षला विघ्नकारक असे तत्व, कारणे)

दारेषणा यथैव स्यात्‌थैव च सुतेषणा ।।
वित्तेषणा तथाप्येवं मोक्षविघ्नकरा मता ।।1।।
अर्थ—— पत्निप्राप्तीची इच्छा, पुत्रप्राप्ती ची इच्छा आणि धन संपदनाची इच्छा ह्या मोक्षप्राप्तीसाठी विघ्नकारकच आहेत. असे विद्वानांचे मत आहे. ।। 1।।

कामक्रोधी लोभमौहौ मदो मात्सर्यमेव च ।।
एते विकारां अरयो नारा एषां पर पदम्‌‌।।2।।
अर्थ—— काम,क्रोध मद मत्सरादि विकार म्हणजे परमपद परमेश्वराप्रत जाण्यासाठी (मार्गातील) शत्रुच आहेत. ।।2।।

यथा धूमावृतो वन्हिर्यथादर्शो मलावृतः।।
ब्रह्मज्ञानं परं पुंसां कामाधैरावृतं तथा ।।3।।
अर्थ—— ज्या प्रमाणे धूराने झांकलेला अग्नि, किंवा धूळी ने माखलेला आरसा असतो त्याप्रमाणे कामादि विकारांचा पडदा पडून ब्रह्मतत्व विषयक ज्ञान हे झांकले गेले आहे. ।।3।।

सर्व प्रथम कामोयं सर्वश्रेष्ठी महानरिः ।।
कामोहि नरकाग्नीनामिन्धनं चारु दारुणम्‌।।4।।
अर्थ‘—— सर्वात मुख्य आणि बलवान्‌ म्हणजे हा कामवासनामय शत्रु आहे. नरकरुपी अग्निमध्ये वरुन सगळयांत मोहक चारु दिसणारे पण फारच दाहक असे इन्धन जळण सरपण आहे. ।।4।।

विषमिश्रितमिष्ठान्नं यथा कर्षति स्वं प्रति।।
तथैव चारुतः कामः स्वं प्रत्याकर्षति स्वयम्‌।।5।।
अर्थ‘—— ज्या प्रमाणे (अजाणता) विषमिश्रित अमजे मोहक व मिष्ठान्न असते ते आपल्याला आकर्षित करते त्या प्रमाणे सुंदरतेने मोहित करुन हा काम विकार आपणांस स्वतःकडे आकर्षित करतो. ।।5।।

अयं मनसिजोनङगः प्रमाथा बलवत्‌‌रः।।
महाहठी महापाप्मा दुष्पूरो दुष्ट एव च।।6।।
अर्थ—— हा मनामधे उद्‌भवणारा अमूर्त अजेय, दुष्ट अत्यंत बलवान कधीही तृप्त न होणारा अधाशी, महान पापी महाहट्‌टी असा कामशत्रु आहे. ।।6।।

बलादाकृष्य सर्वान्हि नियक्तुं पापकर्मसु।।
यततेहर्निशं नीचो निर्लज्जो दर्पवान्‌ मलः।।7।।
अर्थ—— जोर जबरदस्तीने सर्वाना पापकर्मामध्ये ढकलून रात्रंदिवस नीच निर्लज्ज आणि घमेंडीनेयुक्त असा हा “काम“ म्हणजे जीवनाला एक कलंकच असतो. ।।7।।

सत्यविस्मारकं दुःखमपवित्रं जुगुप्सितम्‌।।
शोकमोहयुतं निन्द्यं जन्मद देहजं सुखम्‌‌।।8।।
अर्थ—— सतत्‌त्वाचे ब्रह्मरुपतत्वाचे विस्मरण करविणारा किळसवाण्या दुःखदायक अश्या अपवित्र शोक मोहकारक जन्मतः च शरीराबरोबर उत्पन्न होणार्‌‌या ह्या दहेज सुखाला धिक्कार असो. ।।8।।

विषर्सो यथा कश्चिद्‌‌दष्टुमायाति वेगतः।।
वृत्तिवेगन कामोयं याति दुष्टं तथैव च ।।9।।
अर्थ—— विषारी सर्प जसा आपणांस दंश करण्यास एकदम वेगाने येतो, दिसत नाही आणि नकळतच येतो त्या प्रमाणे हा काम विकार आपल्याला नकळतच एकदम येवून दूषित करतो. ।।9।।

आकृष्यान्य यथा दुष्टो दुःखगर्ते निपातयेत्‌‌।।
तथैव देहगर्ते च कामो पातयति क्षणांत ।।10।।
अर्थ—— दुष्ट मनुष्य ज्या प्रमाणे दुसर्‌याला फसवून खोल गर्तेमध्ये पाडतो त्या प्रमाणो काम विकार क्षणार्धात शरीरांत खोलवरपर्यंत दूषित वृत्ति रोपित करतो. ।।10।।

वपुःसमं नास्तिशोच्यं नीचं गुणविवर्जितम्‌‌।।
चर्भकुण्डं महाघोरं दुःखदौषैः समावृतम्‌।।11।।
अर्थ——शरीर समान दुःखदायक असे कांही नाहीं. हे एक घोर चर्मकुण्ड (चामड्‌याचे कुण्ड)दुःख आणि दोषांनी आवेष्टित असून गुणविहिन असे आहे. ।।11।।

त्वङमासरक्तरुपस्य दुर्गन्धेनावृतस्य च ।।
जुगुप्साधर्मशीलस्य कैव देहस्य रम्यता ।।12।।
अर्थ—— त्वचा मांस रक्तादिंनी युक्त असे असून दुर्गंधीने आवृत्‌‌ अश्या किळसवाण्या अधर्मप्रवृत अश्या शरीरात कोठली पवित्रता आहे. ।।12।।

क्षणभंङगूरमत्यन्त तडिद्वत शरदभ्रवत।।
निःसारं देहसौख्यं हि तस्मान्नेच्छेद्वितद्‌‌बुधः।।13।।
अर्थ— शरदऋुतुतील अत्यंत क्षणभंगूर आणि क्षणैक चमकणार्‌या वीजेप्रमाणे आणि अभ्राप्रमाणे ढगाप्रमाणे असणार्‌या अस्थित देहसुखाचा विचारवंत बुद्धजन विचार करीत नाहीं.।।13।।

निकृष्टाशुचिदेहस्य दुःखपर्यवसानतः।।
सुखं भवति दुःखं हि यथापथ्यस्य स्वादतः।।14।।
अर्थ— अत्यंत हीन आणि अमंगल अश्या शरीराचे सुख म्हणून जे पहावे ते दुःखस्वरुपातच बदलते. ही क्रिया अगदी तशीच आहे कीं एखाद्या रोग्याला पथ्य म्हणून एखादा पदार्थ खाऊ नको म्हणून मना केल्यावर तो जिव्हा सुखासाठी तो खातो आणि नंतर त्याला दुःखच परिणामी भोगावे लागते. ।।14।।

स्वचित्‌‌बिलसंस्थेन नानाविभ्रमकारिणा।।
बलात्कामपिशाचेन विवशः परिभूयते।।15।।
अर्थ—— स्वतःच्या चित्तामध्येच ज्याने घर बनवून बिल संस्थितेन नाना प्रकारचे विभ्रम निर्माण करणारा असा बलात्कारी कामविकार त्याला आश्रय दिला तर तो मनुष्य विवश होवून हतबळ होतो. ।।15।।

दैन्यदोषतयी दीर्घा नरे सम्भोगवासना।।
सर्वापदामेकसखी हृदिदाहप्रदायिनी ।।16।।
अर्थ—— मनुष्यामध्ये कामवासना जी असते ती, सर्वदोषांनी संपूर्ण दीनता उत्पन्न करणारी, सर्वसंकटाची एकमात्र सखी (अर्थात हिच्या संगामुळेच सर्व संकटे येतात. ही अत्यंत दाहक अशी हृदयाला पीडा पोहचविते।।16।।

मांसपाञचालिका यश्च यन्यलोलाङगपञजराः।।
स्नाय्वस्थिंग्रन्थिशालिन्यः तनवः किमु शोभनाः।।17।।
अर्थ—— मांसाची बाहुली, अस्थि पंजर ज्यामध्ये असते अशी अत्यंत चंचल त्याच प्रमाणे क्षणभंगूर अश्या स्नायू—अस्थि आणि वेगवेगळयासांठी यांनी निर्मित अशी ही शरीररुपी स्त्री काय पण मोहक असणार.।।17।।

त्वङमांसरक्तबाष्पांम्बुपृथक्कृत्वा विलोचने।।
समालोयकतः कश्चिन्मोही न भवितुं क्षमः ।।18।।
अर्थ—— डोळयांपासून ज्यांत कीं रक्त, मांस, वाष्प आणि पाणी असते, हे जर वगळले तर त्यांस नजर मिळवितांना (विलोयतः) कुणाचा मोह क्षम्य ठरेल. ।।18।।

केशकज्जलधारिण्यः दुःस्पर्शा लाचनप्रियाः ।।
तनवोग्निशिखेवात्र दहन्ति तृणवद्‌‌भृशम्‌।।19।।
अर्थ— काळेभोर केस आणि काजळ धारण केलेल्या, ज्यांचा स्पर्श हा असह्‌य असतो, अश्या नयनाकर्षक (स्त्रियां) अश्या शरीरधारी अग्निची ज्वाळा ज्याप्रमाणे गवताला त्वरित जाळून भस्म करते, त्याप्रमाणे दाहक असतात. ।।19।।

दूरतश्च नगो रम्यो दूरतःकण्टकं वनम्‌।।

दूरतोग्निशिखा रम्या तनू रम्या च दूरतः।।20।।
अर्थ—— दूरुनच डोंगर साजरे दिसतात, दूरुनच वन सुंदर दिसते आणि दूरुनच अग्निच्या ज्वाळा रम्य दिसतात. त्या प्रमाणे स्त्रीशरीर पण दुरुनच रमणीय दिसते. ।।20।।

नैवालिंङग्नयोग्या च सुन्दराग्निशिखा यथा।।
नैवालिङग्नयोग्या च ज्वलत्कामतनुस्तथा।।21।।
अर्थ— ज्या प्रमाणे अग्निज्वाला ह्‌या अलिंगन देण्यास योग्य नाहींत, त्याच प्रमाणे कामाग्निने पेटलेले शरीर अलिंगन देण्यास योग्य नाहीं. ।।21।।

जन्मपल्वलमत्स्यानां चित्‌कर्दमचारिणाम्‌।।
जीवानां वासनारज्जुस्तनुर्वडिशापिण्डिका ।।22।।
अर्थ—— छोट्‌या तळयांत पल्वल उत्पन्न झालेल्या आणि त्याच चिखलांत वळवळणार्‌या माशांचा देह हा (वर उडणार्‌या) पक्ष्यांच्या वासनेला (भक्ष्य) म्हणून असतो. ।।22।।

सर्वेषां दोषरत्नानां वासना स्वर्णगुम्फिता।।
सुन्दराकर्षिकाप्येवं तनुःस्याद्‌दुःखशृङखला।।23।।
अर्थ—— सर्वच वास दोषाना वासना ही रत्नांना सुवर्णाने गुंफावे तशी गुंफून टाकते. सुंदर आणि आकर्षक असली तरी ही तनु म्हणजे शरीर एक दुःखाची श्रृंखला, बेडीच आहे. ।।23।।

कामनाम्ना किरातेन विकीर्णेयमितस्ततः।।
तनुर्जीवविहङगानामङगबन्धनवागुरा।।24।।
अर्थ—— काम नामक पारध्याने इतस्ततः फेकलेले जाळे हे शरीररुपी विहंगांना बंधक बनविते.(पारधी म्हणजे पक्षी जाळयांत पकडणारे बहेलिया.)।।24।।

अन्तर्निलीन एवायं भोगासक्तिं वृथैव हि।।
जनयित्वा मोक्षमार्गे परिपन्थी भवेत्यिपि।।25।।
अर्थ—— आपल्या अंतचित्‌ामध्ये दडून बसलेली ही वासनांची आसक्ति व्यर्थच आमच्या मोक्षमार्गंतील बाधादायक शत्रु होते. ।।25।।

अन्नोदाहरणीयानि गीतावाक्यानि कानिचित्‌।।
प्रसङगतो हितार्थाय बोधनाय मुमुक्षुणाम्‌।। 26।।
अर्थ—— येथे कांही गीतेतील वाक्यें उदा0 दाखल देत आहे. ते वेळप्रसंगी मुमुक्षुजनांच्या हितासाठी आणि बोध होण्यासाठी कामास पडतील।।26।।

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।।
कामःक्रोधास्तथा लोभस्तस्मादेतत्‌ त्रयं त्यजेत्‌।।27।।
अर्थ—— आत्मनाश करणारी ही तीन प्रकारची द्वारे येथे आहेत. काम, क्रोध, लोभ ही तीन द्वारे असून त्यांचा नेहमी त्याग करावा. ।।27।।

एवैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः।।
आचारत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्‌।।28।।
अर्थ—— हे अर्जुन ! ह्‌या तमोगुणांनी युक्त अश्या अंधःकारमय दारांनी अर्थात्‌ मार्गानी न जाता त्या तिन्ही मार्गाचा त्याग करुन, जो मनुष्य ‘‘श्रेयस‘‘ ह्‌या मार्गाने जातो, त्याला परम गति मिळते. ।।28।।

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्‌ ।।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्‌‌।।29।।
अर्थ—— काम, क्रोधरहित झालेल्या ज्ञानी योग्यांच्या प्रयत्नशीलत्वाने पवित्र अश्या चित्तांचा ब्रह्मतत्वाकडे लय होतो. ।।29।।

शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात्‌।।
कामक्रोधोद्‌भवं वेगं स युक्तः स सुखी नरः।।30।।
अर्थ—— ह्‌या एैहिक शरीराचा त्याग करण्यापूर्वीच इह एव येथेच ते योगी त्या काम क्रोधाचा आवेग सहन करण्यास समर्थ होवून सुखी होतात. ।।30।।

यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः।।
विगतेच्छाभयक्रोधी यः सदा मुक्त एव सः।।31।।
अर्थ—— मोक्ष इच्छु असे मुनि मन आणि बुद्धिला त्याच विषयाकडे (मोक्षेच्छेकड)े लावून भय व इच्छारहित होतात आणि तेसदा मुक्तच होत.

ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते।।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः।।32।।
अर्थ—— ज्याही भोगांच्या संपर्कात आपण येतो ते सर्व दुःखालाच कारण होतात. कारण ते आदि आणि अंत सहित असल्यामुळे क्षणिक नश्वर असतात. म्हणून पंडित लोक त्यांत रममाण होत नाहित.।।32।।

इत्युक्त्वा भगवान्‌ कृष्णो ह्यन्ते च समुपादिशत्‌।।
ज्ञानं वैराग्यमेवं च कामनाशाय साधनम्‌।।33।।
अर्थ—— असे म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी असा उपदेश केला आहे कि, ‘‘हे ज्ञान आणि वैराग्यच कामाचा नाश करणारे आहेत. तेच कामनाशाचे साधन आहे.‘‘।।33।।

इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते।।
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनाम्‌‌।।34।।
अर्थ—— इंद्रिय मन आणि बुध्दि हेच त्या कामविकारांच्या आश्रयाचे स्थान आहे. माणसाचे ज्ञान झांकून टाकून त्याला ते मोहित करतात. कामशत्रु भुरळ पाडतात.।।34।।

तस्मात्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।।
पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्‌‌।।35।।
अर्थ—— म्हणून हे अर्जना! त्ूा या इन्द्रिय आदि निर्बल स्थानांना नियंत्रित करुन ह्या पापी अश्या कामाला जो की आमच्या ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करतो त्याला पराभूत कर ! 35।।

इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः पर मनः।।
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धं परतस्तु सः।।36।।
अर्थ—— इन्द्रिय हे श्रेष्ठ आहेत. इन्द्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे. आणि बुध्दिपेक्षा जो श्रेष्ठ आहे, तोच आत्मा आहे. ।।36।।

एवं बुद्धेःपरंबुद्‌ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना।।
जहि शत्रुं महाबाहो कामरुप दुरासदम्‌।।37।।
अर्थ—— ह्‌या प्रमाणे बुद्धिहुन ही श्रेष्ठ असे त्या ”आत्मतत्वास” जाणून त्यातच स्वतः आत्मतत्वामध्ये स्थिरचित्त करुन कामरुपी महान्‌ व अजेय अश्याशत्रूवर विजय मिळव. ।।37।।

आत्मज्ञानवशाच्चापि देहात्मप्रत्ययादपि।।
नरो नारीति भानाद्धा कामोत्पत्तिः प्रजायते।।38।।
अर्थ—— आत्मज्ञान वश (प्राप्त) झाल्यावर सुद्धा देहात्माचा प्रत्यय आल्यावर सुद्धा नर आणि नारी असे भान उत्पन्न होवून कामविकार उत्पन्न होवू शकतो. ।।38।।

मैथुनोत्पत्तिसंङकल्पात्‌ पुत्रवासनयापि च ।।
समीचीन दृशावापि कामोत्पत्तिः प्रजायते।।39।।
अर्थ—— मैथुन करण्याची इच्छा आणि त्यापासून पुत्र उत्पत्तिची इच्छा सुध्दा केवल दृष्टी मिळविल्याने पण उत्पन्न होवूं शकते.।।39।।

अनेक जन्म संस्काराद्देहतारुण्यतोपि च ।।
विषयीजनसंसर्गात्‌ कामोत्पत्तिः प्रजायते।।40।।
अर्थ—— अनेकानेक जन्मसंस्कारांमुळे देह तारुण्यावस्थेत आल्यावर कामी जनांच्या सान्निध्यांत आल्यावर कामविकाराची उत्पत्ति होते. ।।40।।

रजसो रेतसश्चैव मिश्रणं देहकारणम्‌।।
तनोर्कथुनजातत्वात्‌ कामासक्तिः प्रजायते।।41।।
अर्थ—— रजस्‌ आणि रेतस्‌ ह्‌यांच्या मिश्रणामुळे देह प्राप्त होतो. आणि शरीरांचे मैथुन झाल्यावर कामवासनेची आसक्ति (अनिवार्य सतत इच्छा)निर्माण होते.।।41।।

पितप्रकृतितश्चैवमुष्णपानान्नसेवनात्‌।।
पाकर्मभिरप्येवं कामवृध्दिः प्रजायते।।42।।
अर्थ—— पित्त प्रकृतिने तथा उष्ण पेय व अन्न सेवनाने तथा पापकर्माने कामविकारांची वृध्दि होते. ।।42।।

रजोधिक्येन स्त्रीदेहो रेतोधिक्येन पुंस्तनुः।।
अन्योन्य देयोनी च ह्यन्योन्यच्छाततो भवेत्‌।।43।।
अर्थ—— रज कण अधिक प्रमाणांत असल्यास स्त्रीदेह आणि रेत कण अधिकता असल्यास पुरुष देह उत्पत्तिस कारण होतात. आणि वेगवेगळया योनीमध्ये देह उत्पत्ति झाल्यानंतर परस्पर स्त्री—पुरुष देहामध्यें आकर्षणाची उत्पत्ती होते. ।।43।।

सुखस्वरुप ज्ञानेन नष्टा देहात्मधीर्यदा।।
देहबुद्धौ विनष्टायां कामात्पत्तिर्न सम्भवेत्‌।।44।।
अर्थ—— सुखाचे जे अक्षर रुप, अक्षय आनंदरुप त्याचे ज्ञान झाल्यावर आणि देहबुध्दि नष्ट झााल्यावर अर्थात्‌‌ ”मी देह आहे” ही अहं बुध्दि नष्ट झाल्यावर काम विकार उत्पन्न होत नाहीं. ।।44।।

देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनि।।
यत्रयत्र मनो याति तत्रतत्र परामृतम्‌‌ ।।45।।
अर्थ—— देह अभिमानाचा अस्त झाल्यावर परमात्मज्ञानाचा उदय होवून ज्या ज्या ठिकाणी मन जाते, त्या त्या ठिकाणी परमात्मतत्वामृत प्राप्त होतो. ।।45।।

।। ह्या प्रमाणे श्रीसमर्थरामदासांनी अनुग्रह दिलेले श्रीरामाचे पदकमलावरी भृंगरुपाने गुंजन करणारे परमहंस परिव्राजकांचे आचाय भगवान्‌ श्रीधरस्वामी ह्‌यांनी रचलेले मोक्षविघ्नकराः हे सहावे प्रकरण समाप्तः।।

home-last-sec-img