Literature

यमाचे नचिकेतास उत्तर

हन्त त इदं प्रवक्ष्यामि गुह्यं ब्रह्म सनातनम् । 

यथा च मरणं प्राप्य आत्मा भवति गौतम ॥(कठ. २-२-६)

-देहाला मरण आल्यानंतर अतिगृह्यतम असे सनातन ब्रह्म रूपानें कसें शिल्लक राहतें तें मी तुला विवरून सांगणार आहे, अशी प्रतिज्ञा सा मंत्रांत यमधर्माने केली आहे. यांत देहाहून विलक्षण असे अविनाशी ब्रह्मच आपले स्वरूप असें जाणून निष्काम होण्यास शिकविलें आहे.

योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः । 

स्थाणुमन्येऽनुसंयन्ति यथाकर्म यथाश्रुतम् ॥ (कठ. ६-७ ) 

केलेल्या कर्माप्रमाणें व संपादिलेल्या ज्ञानाप्रमाणे जीवाला गति होते. निषिद्ध पापाचरणाच्या जीवाला अंत। नरकाची प्राप्ति होऊन तो नंतर स्थावर योनीत पण जन्म घेतो. आंतून भूमि भेदून वर येणारे वृक्षगुल्मलतादि सर्व स्थावर म्हणवून घेतात. अशा स्थावर जन्माला नाही गेला आणि त्याहून पुण्यवान असला तर तो चेतन म्हणजे हालचालींच्या प्राण्यांतून जन्म पावतो. पापाधिक्यानें स्थावर व तिर्यगू योनींतून जन्म घेतो व अधिक पुण्यानें देव लोकीं देवतारूप देह धारण करतो व पापापुण्याच्या समप्रमाणानें जीव मनुष्य होतो. या सर्व योनी कर्मरूप आहेत. मोक्ष हा कर्माधीन नाहीं. तो निष्कर्म आत्मरूपाच्या आनंदघनतेच्या परिज्ञानानें मात्र लाभतो आणि असा हा मोक्ष का एकदां लाभला, म्हणजे मग त्याला जन्ममरण कांहीं प्राप्त होत नाही. अनादि अनंत चित्सुखरूपच तो होतो. असा या मंत्राचा भावार्य आहे. अपरोक्ष ज्ञान्यांना देहपातानंतर जन्म येत नाहीं. ते निष्काम असतात. निष्काम नसलेल्याला मात्र विषयसुखाची इच्छा करून, केलेल्या त्या त्या कर्मास अनुरूप असें तें तें फळ अनुभविण्याकरितां त्या त्या स्थावरजंगमात्मक योनींतून जन्म घ्यावा लागतो. त्यांनी त्यांनी केलेलें कर्म आणि मिळविलेलें ज्ञान हेंच त्यांच्या त्यांच्या त्या त्या स्थित्यंतराला कारणीभूत होतें. यथाप्रज्ञ हि संभवाः । ज्ञानाच्या तारतम्याप्रमाणें जीव उच्च नीच योनीमध्ये जन्म घेतो. ज्ञानाच्या तारतम्याप्रमाणेंच कर्माचें तारतम्य व कर्माच्या तारतम्याप्रमाणें जन्माचें तारतम्य दिसून येतें. अथैकयोर्ध्व उदानः पुण्येन पुण्यं . लोकं नयति पापेन पापमुभाभ्यामेव मनुष्यलोकम् ॥ ( प्रश्नो. प्र. ३-७. ) देहपातानंतर पंचप्राणांपैकी एक उदानच पुण्यवंतांना पुण्यलोकीं व पापी लोकांना पापलोकी नेतो; पापपुण्य समान असलें तर मात्र त्याला मनुष्यलोकींच पुन्हां घेऊन येतो. असे प्रश्नोपनिषदांत सांगितले आहे. उत् अनतीति उदानः । वर वाहणाराच उदानवायु. त्यामुळे लोकांतरगमन यामुळे होते हैं ओघानेंच प्राप्त होते.

न सांपरायः प्रतिभाति वालं प्रमाद्यन्तं वित्तमोहेन मूढम् । अयं लोको नास्ति पर इति मानी पुनः पुनर्वशमापद्यते मे ॥ ( कठ अं. १ व २)

वैभवाची लालसा ठेवून कामानें कामिनीवश होऊन मोहांत गटंगळ्या खाणाऱ्या अज्ञ तशा तज्ज्ञालाहि मोक्षमार्ग गोचर होत नाही. दिवांधाप्रमाणें त्याला ज्ञानवैराग्याचे महत्त्व कळून येत नाही. हाच एक लोक असून यांतच सारें सांठविलें आहे. येन केन प्रकारेण पराकाष्ठेचें विषयसुख संपादून ते मनमुराद अनुभविणें म्हणजेच मोक्ष म्हणणारे अशा तऱ्हेचा हा प्राणी मिय्या सुखावर विश्वसून पापपुण्यानें मिळणारे दुसरे लोक नाहीतच व ज्ञानानें मिळणारा मोक्षहि नाही, अशी भावना करून माझ्या हातांत पुनः पुनः पडतो, म्हणजे जन्ममरणाच्या चक्रांत सांपडतो, गुरफटतो. असें हें नास्तिकांना मिळणाऱ्या गतीचे उद्घाटन करून यमानें दाखविले आहे.

home-last-sec-img