येयं प्रेते विचिकित्सा मनुष्येऽस्तीत्येके नायमस्तीति चैके। एतद्विद्या मनुशिष्टस्त्वयाहं वराणामेष वरस्तृतीयः ( कठ. १-१-२०)
– पुनर्जन्माच्या बाबतीत “ येयं प्रेते ” ही श्रुति फार महत्त्वाची आहे. देहांत असणारें चैतन्य देहाहून विलक्षण असल्यामुळे तें चैतन्य देह पातानंतर देखील असतें असें कांही म्हणतात, तर देहाहून चैतन्य वेगळे नसल्यामुळे देहाबरोबरच तें नष्ट होतें असें कांहीं म्हणतात. यांतून कोणाचे खरें हें मी तुझ्या उपदेशानें जाणावें हाच एक सर्व वरांत मुख्य असा वर तं मला यावास ही प्रार्थना आहे. असें नचिकेतानें श्रीयमधर्मास विनविले आहे. यम हा मृत्यूचे अधिदैवत होय. जीवाच्या अस्तिनास्तित्वाबद्दल यालाच नचिकेतार्ने जो प्रश्न विचारला तो समर्पकहि आहे. यमाला त्याची माहिती असणारच. त्याचे विवेचन जन्ममरणाच्या बाबतीत विश्वसनीय नाही असे कोण म्हणेल ? वासनेच्या योगानें जन्म घेणारा जीव, देहाशिवाय, देहावेगळा राहातो किंवा नाही हा प्रश्न आहे.