Literature

रामायणांतील एक विलक्षण प्रसंग

सकाळ होण्याचाच अवकाश. पट्टाभिषेकाची सर्व सिद्धता झाली होती. कोणाच्याहि ध्यान मनींहि नसलेली ही राम वनवासाची वार्ता एकदम सर्वत्र झाली. सर्वांच्या उत्साहावर विरजण पडले. श्रीरामाला पट्टाभिषेक होण्याऐवज त्याला वनवास प्राप्त झाला. अयोध्य नगरी शृंगारून श्रीरामाच्या राज्याभिषेका करितां टक लावून बसलेल्या नगर-जनांपुढून सीतालक्ष्मणासह श्रीराम मुनिवेष धारण करून वनवासास निघाले. तसा कोणताही विचार मनांत नसतां एकाएकी अनुभविण्यास भाग पाडणारी विषम परिस्थिति अकस्मात प्राप्त झाली, तर दैव म्हणून मानून समाधान करून घेण्यापलीकडे दुसऱ्या कोणत्याहि कल्पनेला त्या ठिकाणी वाव नाहीं.

home-last-sec-img