Literature

विश्वाचें दिव्य जीवन

वेदविहित निष्काम कर्म, एकांतिक भक्ति निर्विषय स्थिति, विश्वात्मभा भूतदया, स्वार्थत्याग, जनहितदक्षता, दुःखनिवृत्ति, जगदुद्धार, देहसुखाच् धातून सोडवून तत्त्वज्ञानाच्या पवित्र तीर्थांचें स्नान घालून, हिंसा नाहीं करून, रागद्वेष नष्ट करून, समत्वाचे धडे देऊन विशुद्ध आत्मतृप्ती चे जगन्मंगलकर दिव्य जीवन करण्याचे अखिल मानवजातीच्याच उन्नतीचें या आये संस्कृतीचे ध्येय आहे. या आये संस्कृतीच्या सात्त्विक समतावादाचे अनुकरण केल्यास कुठेच अशांति राहाणार नाहीं. समाजांतील दुष्कृत्ये आपोआपच यांबतील आणि समतेमध्ये असणारी विषमता पार विरघळून जाईल. अहिंसेत अनुभवास येणारी हिंसा तिथेच विलीन होईल. नागरिकतेच्या ठिकाणी दिसून येणारा रानटी वर्तनाचा प्रकार पुन्हां दिसून येणार नाही. सभ्यतेच्या पांघरुणाखालचे निंद्य आचरण पुन्हा शिल्लक उरणार नाही. दुसऱ्याचा घात करून आपण जगण्याची दृष्ट प्रवृत्ति समूळ नष्ट झालेली दिसेल. अॅटमबाँबसारख्या शोधाचे निष्प्रयोजकत्व मनास पटेल भय, दुःख, शोक यांचे वातावरण नाहींसें होऊन दिव्य आनंदाचें शांत वातावरण चोहोंकडे व्यापून राहील. समतेनें आत्मानंदाचें व निर्भयतेचें, निर्मल साम्राज्य आपल्या निरतिशय पावित्र्यानें चोहोंकडे पसरेल. भारतानें आपला हा वाडवडिलार्जित अधिकार पुनश्च असा संपादन केल्यास आज दिसून येणारा प्रक्षोभ, उत्पात, अशांति, असमाधान, परस्परद्धेप, कुटिल नीति, राक्षसी महत्त्वाकांक्षा, स्वार्थ, दुष्ट प्रवृत्ति, प्रांत-प्रांतीयता, फट, लुटालूट, अत्याचार व आपसांतली यादवी हें सर्वहि नाहीसे होऊन सुखशांतीचें दिव्य जीवन देशांत सर्वत्र पसरेल. दैवी संप त्तीच्या आत्मसुखाचें विश्वशांतकर अशा मंगलमय पावित्र्यानें विश्वमौलीभूत एकाविपत्यहि या राष्ट्राला प्राप्त होईल. ऐहिक सुखापेक्षां खरें निर्भेळ सुख निराळे आहे, या निश्चयाचा उदय झाला कीं, पापाची काळोखी रात्र मावळते. मरणकालीं सर्व सोडून येथून निघून जावें लागतें, या स्मृतीनें अत्याचाराचें बंड थांबतें. किळस उत्पन्न करणाऱ्या देहद्रव्याच्या स्मरणानें व तेंच तेंच पुन्हा पुन्हां अनुभविण्यांत येणाऱ्या निःसार विषयसुखाच्या वैयर्थ्यानें कुटिल नीतीचीं – कारस्थाने एकदम ओसरून जातात. सचेत्र असणाऱ्या मंगलमय परमात्म्याव्या आनंदवन अस्तित्वाचा प्रत्यय सर्व विश्वच आनंदमय करून टाकतो. आनंदरूपी परमात्म्याची प्राप्तीच जीवनाचें एकमेव ध्येय ठरलें, परमात्मप्राप्तीच्या साधनां परस्परांना साहाय्य करीत राहण्याचा जीवनक्रम एकदां आंखला गेला, त्यांत अखंड व्यापृत ( गर्क होऊन) राहणे हाच मानवी धर्म निश्चित झाला, अध्यात्मनिष्ठेचे उन्नत जीवन आपल्या पराकाष्ठेच्या उत्कर्षानें प्रकाशं लागले, अखिल विश्वांत आत्मतृप्तीच्या मंगल गुढ्या सर्वत्र उभारल्या गेल्या कीं, समता • आपोआपच प्रस्थापित होते. अनायासेंच सुखशांति नांदते. शांतिमय जीवन होते. नीति प्रत्येकाच्या हृदयांत घर करून राहाते. शुद्ध आचारविचार सर्वांगी बाणतो. सौहार्दाच्या उन्नतीचे साम्राज्य पसरतें. धर्माचा अधिकार चालतो. सर्वहि अनिष्टांचे निवारण होते व अभिष्टांची प्राप्ति होते; आणि त्याच वेळी हें। जग तृप्त होतें.

home-last-sec-img