Literature

विषय विवेचन १०

एकाकी नैव रेमे त्या आदिपुरुषाला एकटेपणामुळे करमेनासे झाले असे श्रुति सांगते. त्यामुळेच आतां देखील एकाकी रममाण होत नाही. वयांत आल्यानंतर स्त्रीची इच्छा झाल्या प्रमाणेच द्वितीयमेंच्छत् त्या मूळ पुरुषाला देखील दुसऱ्याची इच्छा झाली. याच्याहून अन्य नसल्यामुळे आपली शक्तिच भिन्न पणे पाहून आपल्या शक्तीचीच भिन्न भावनेनें याने इच्छा केली, असेच या द्वितीयम्शब्दानें स्पष्ट होते. ‘ इममेवात्मानं द्वेधा पातयत् प्रजोत्पादनार्थ म्हणजे आपल्याच बहुत्वाकरितां तो मूळपुरुष द्विविध झाला. हेच प्रकृतिपुरूष सरिता म्हणतां बायको भासे तेथे पाहता पाणीच असे विवेंकी हो समजा ऐसें प्रकृति पुरुष ( दास. १०) ‘ ततः पतिश्च पत्नीचा भवताम : या पासूनच पुढे हें स्त्रीपुरुषात्मक दंपत्य झालें. यावरूनआडांत असतें तेंच पोहऱ्यात येतेंया म्हणीप्रमाणे मूळ पुरुषाचीच वासना या सर्व प्राणिमात्रांतून दिसून येते.

द्वैत इच्छा होतो मुळीं तरी ते आली भूमंडळी भूमंडळी आणि मुळीं। रुजु पहावे।। (दास. १६४२)

‘नरनारी दोन्ही भेद |पिंडी असतों प्रसिद्ध |मुळीं नसतां विशद । होतील कैसी ॥’ (दास. १७|२।१५)

‘नरनारीचें बीजकारण| शिवशक्तिमध्ये जाण । देह धरता प्रमाण| कळों आलें । (दास. १७/२|२४)

मुळी शिवशक्ति खरें। जालीं वधुवरें। चौन्यांसि लक्ष विस्तारें। विस्तारली जे ॥ (दास. १७/२।३३) 

यदिदं किञ्च मिथुनापिपीलिकाभ्यस्तत्सर्वमसृजत| (बृ.१/४/४ )

स्त्रीसंगानेच पुरुषाला जसे संततीरूप बहुत्व प्राप्त होते तसेच प्रकृतिसंगानें मूळ पुरुषालाही बहुत्व प्राप्त होते, तसेच प्रकृतिसंगाने मूळ पुरुषालाही बहुत्व प्राप्त होते एकत्वात संतती अशक्यच म्हणून पुरुषाला जशी स्ववामांगवर्ती आपली शक्ति स्त्रीरूपाने वेगळी करावी लागते त्याप्रमाणे अभिन्न असणारी स्वशक्ति म्हणजे प्रकृति त्या मूळपुरुषाला कार्यार्थ भिन्नपणे मानावी लागते.

मुळी सूक्ष्म निर्माण झालें । पुढें स्पष्ट दिसोनि आलें । उत्पत्तिचें कार्य चालें । उभयता करता || ( दास १७ । २ । ३२ ) कार्यपरत्वें या युग्मांत भिन्नपणा जरी वाटला तरी तो नसून त्यांचे स्वरुप मूळरूपाने एकच आहे,

स्थूळाकरतां वाटे भेद । सूक्ष्मीं अवघेंच अभेद | “(दास. १६-७-३७) 

एकापासूनच यांची उत्पत्ति असल्यामुळे अथवा एकाचीच हीं -दोन रुपे असल्यामुळे

स्त्रीसी पुरुष पुरुषासी वधू । ऐसा आहे हा समंधु । कारणे सूक्ष्म संवादु | सूक्ष्मच आहे || (दास. १६-७-३९)

द्विधा कृत्य मुनिश्रेष्ठाः । अथवा दिवा विभज्य चात्मानं अर्धेन पुरुषोऽभवत् अर्धेन नारी तस्यां तु विराजमसृजत्प्रभु ॥ (सू. सं.) एकच आपल्या अर्ध्या अर्ध्या भागांनी स्त्री आणि पुरुष झाला आणि अगिभूत असणाऱ्या स्त्रीरूपी प्रकृतीपासून अनेक प्रजेची उत्पत्ति त्या परमेश्वराने केलो.

‘अर्धो वा एष आत्मनो यत्पत्नी ‘ (तै सू) द्विधा भासते शरीर |वामांग दक्षिणांग विचार । तोचि अर्धनारी नटेश्वर | पिंडी ओळखावा ॥’ (दास. २०-९-२७)

दोन अंगे मिळून जशी एका देहाची पूर्णता त्याप्रमाणेच या स्त्री-पुरुषांचे देह मिळून पूर्णता. यामुळेच आपल्या पूर्णतेकरितां स्त्री पुरुषाची इच्छा करते व पुरुष स्त्रीची इच्छा करतो. जोपर्यंत एक मेकांना एकमेकांची प्राप्ति होत नाही. तोपर्यंत त्यांना आपल्या पूर्णत्वाची भावना येत नाही. ते आपल्याला तोपर्यंत अपूर्णच मानतात ‘तस्मादिदमर्ध वृगलमिव स्व इति । (बृह १२४-३) त्यामुळे स्त्रीपुरुषांचें देह म्हणजे वेळच्या अर्ध्या कांबीसारखे आहेत. एका हिरण्यगर्भापासूनच उत्पन्न झालेल्या प्रकृतिपुरूषांचे कर्म म्हणजे प्रजोत्पादन आणि त्याला अनुकूल असणारे सारे साधन म्हणजे त्यांचे वित्त. त्यापासून प्रकृतिपुरुषांना प्रजोत्पादनाचे कार्य सुर होत असल्यामुळे प्रजोत्पादनाकरतांच जीव धरून राहिलेल्या या प्रकृतिपुरुषांना हे वित्त म्हणजे अति आवश्यकच होय. अशा दृष्टीनें पुरुषाच्या ठिकाणी प्रथम प्रकृतीची इच्छा नंतर प्रजेची इच्छा नंतर अनुकूल साधनांची इच्छा व पुढे कर्माची इच्छा जशी होत आली आणि या साऱ्याचे बीज आपण बहु व्हावे या फलित कार्यातच जसे आहे त्याप्रमाणे ‘सोडकामयत् : जायामेस्यादथ प्रजायेयाथ वित्तमेस्यादथ कर्म कुर्वीथ इति’ या श्रुतीवरून

जीवाच्या ठिकाणीहि ही मालिका आलेली स्पष्ट दिसते. पूर्वी एकच असलेला पुरुष पुढे वयांत आल्यानंतर भार्येची इच्छा करतो. नंतर त्याला प्रजेची इच्छा होते. पुढे पोषणार्थ याला वित्त असावे असे वाटते. पुढे या सर्व अनुकुलतेने आपल्या बहुत्वाकरितां आव श्यक असणाऱ्या कर्माची इच्छा तो करतो. यांतील एकहि जो पर्यंत त्याला लाभत नाही तोपर्यंत तो आपल्याला अपूर्ण समजत असतो. प्रजा म्हणजेच जर संकल्पाचें पूर्णत्व तर याला आवश्यक असणाऱ्या एखाद्याच्या अप्राप्तीनेहि आपल्याला पूर्णत्व लाभत नाही असे जीवाला वाटणे साहजिकच झाले.

‘मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन्गर्भ दधाम्यहम्। संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥ (भ.गी. १४-३ )

‘सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः | तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता ॥ (भ.गी.१४- ४) 

‘मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् ॥ ( भ. ग. ९.१० )

पुरुष प्रजाकामाने जसा स्त्रीशी ऐक्य पावून स्त्रीगर्भात आपले बीज टाकतो, स्त्री त्या बीजाची आपल्या देहाच्या धातूंनी वाढ करून गर्भ पूर्ण होईपर्यंत त्याला आपल्यातच अव्यक्त स्थितींत ठेवून पुढे तो व्यक्त स्थितीस प्राप्त झाल्यानंतरहि स्त्रीच जशी त्यांच्या वाढीस कारणीभूत होते त्याचप्रमाणे प्रजाकाम असा प्रथम पुरुष स्वशक्तिरूप अशी प्रकृतींशींहि त्या जगद्योनींत आपले संकल्परूप बीज टाकतो. प्रकृति आपल्या विचित्र शक्तीने तें संकल्परूप बीज वाढीस लावते. हा गर्भ पूर्ण होईपर्यंत त्याला आपल्यांतच अव्यक्त अशा स्थितींत ठेवून त्याच्या व्यक्ततेकरतां अनेक साधनें निर्मून पुढे तो गर्भ व्यक्त झाल्यानंतरहि त्याच्या पोषणास ती प्रकृतीच त्या साऱ्या साधनांनीशी कारणीभूत होतें.

त्रिगुण, पंचभुते, पंचापंचीकृत स्थूल सूक्ष्म शरीरें, अज्ञान, अविद्या, आवरण, विक्षेप, आत्म्याचे, परोक्षज्ञान, अपरोक्षज्ञान, शोक, भोग, निरंकुश तृप्ति वगैरे हीच ती साधने होत. शिशुसंगोपनाचे कामी जसे स्त्रीसच प्राधान्य त्याप्रमाणे या साच्या जगताच्या पोषणाच्या कामी प्रकृतिसच प्राधान्य ! ‘ कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृति रुच्यते।’ हें सारें प्रकृतीचेंच साम्राज्य. स्त्री-पुरुष आपल्या संततीतून आपलें एकत्व पाहून जसे संतोष मानतात त्याचप्रमाणे प्रकृति-पुरुषहि आपल्या जगद्रूपी अनेक संततींतून आपले एकत्व संतोष मानतात.

आत्ममये महति पटे विविधजगच्चित्रमात्मना लिखितम् । स्वयमेव केवलमसौ पश्य प्रमुदं प्रयाति परमात्मा || ,

ईश्वर हा प्रकृतीपासूनच सृष्टि निर्माण करतो. या सृष्टीचा लय पुन्हा प्रकृतीतच होतो. ही सर्व सृष्टी ईश्वराच्या संकल्पा पासूनच झाली, वगैरे विधानांना वर उधृत केलेल्या गीतेच्या वाक्याशिवाय ही आणखी गीतेची वाक्य आधारभुत आहेत… ‘ बीजं मां सर्वभूतानां विद्धिपार्थ सनातनम् ।’ (७|१०)

‘सर्वभूतानि कौन्तेय प्रकृति यान्ति मामिकाम् ।

कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् || (९।७)

‘प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः ॥ (९।८)

‘अहमादिहि देवानां महर्षीणां च सर्वशः’ (१०|१२)

अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्व प्रवर्तते ॥ ‘ (१०-८) 

‘क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत ।’ (१३।२) 

या सर्व विवेचनावरून स्त्री-पुरुषात्मक ‘मी ‘चे मूळ लक्षांत आले. एका ‘मी’त स्त्री-पुरुषात्मक विभाग होण्याचे कारण काय हेहि पण कळले. स्त्री-पुरुषांतून दिसून येणारा धागा मुळांतून येथ. पर्यंत कसा आला हेहि पण उमगले. प्रकृति पुरुष आणि स्त्री-पुरुष यांचा ठोकळ मेळ जरी जमला तरी विकाररूप कालाच्या प्रवाहातून कोणाच्या तरी शक्तीच्या कलाटणीनें यांतून प्रस्तुत कोठे काहीं भेद आढळतो की काय ? ते पाहूं. त्या शक्तीस कोणचे नांव आहे ? वगैरे विषयांच्या ओघानें थोडासा विचार करू मूळ प्रकृति-पुरुष स्वबोधानें ज्ञानमात्र असतात. स्त्री-पुरुष हे मात्र मूळ ज्ञानस्वरूप न ओळखतां देहमात्रच झालेले असतात. मूळ प्रकृति-पुरुषांना परस्परांचे भान अद्वय ब्रह्मस्वरूपतेच्या एक त्वानेच असते. स्त्री-पुरुषांना मात्र आपल्या यथार्थ स्वरूपाच्या म्हणजे अद्वय ब्रह्मस्वरूपतेच्या अज्ञानानें परस्परांना परस्परांचे • मी स्त्री ‘ अथवा ‘मी पुरुष ‘ म्हणून देहाचेच भान असते. मूळ प्रकृति-पुरुषांना आपली योनी म्हणजे जन्मठिकाण चिन्मय ब्रह्मच वाटते. स्त्री-पुरुषांना मात्र स्वरूपज्ञानाने आपली योनी म्हणजे हे चिन्मय ब्रह्मच आहे असे न वाटतां परस्परांच्या देहाला कारणीभूत असलेली देहयोनींच आपले जन्मस्थान असे वाटते. मूळ प्रकृति पुरुष परस्परांच्या ऐक्याने मूळच्या त्या ब्रह्मस्वरूपांत आत्मज्ञानाने अभिन्न होऊन स्मृति विसरतात. ही स्त्री-पुरुष मात्र परस्परांच्या ऐक्याने मूळच्या त्या आपल्या ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाने स्त्री-पुरुषांच्या देहात्मक भावनेतच ऐक्य पावून स्मृति विसरतात. मूळ प्रकृति पुरुष परस्परांच्या ऐक्याने लाभणाऱ्या पूर्ण सुखाकरितां परस्परांत परस्परास कारण असणाऱ्या ब्रह्मयोनीचेंच चिंतन करतात. त्याचीच इच्छा करितात, त्यांतच लीन होतात आणि तेथेच जन्म पावतात. हे स्त्री-पुरुष मात्र मूळस्वरूपाच्या अज्ञानानें परस्परांच्या ऐक्यापासून लाभणाऱ्या पूर्ण सुखाकरितां परस्परांना कारणीभूत असणाऱ्या चिन्मय ब्रह्मयोनीचे चितन न करता, त्यांतच लीन न होता, तिथेच जन्म न घेतां, देहात्मबुद्धीने परस्परांच्या देहाला कारण असणाऱ्या योनीचेच चितन करतात, त्याचीच इच्छा करितात, त्यांतच लीन होतात आणि तिथेच जन्म पावतात, प्रकृत्ती-पुरुष आपल्या बहु भवनासाठी परस्परांत ऐक्य पावून पुढे होणारे संततिरूप सर्व कार्य आपल्या चिन्मय ब्रह्मरूपतेच्या एकत्वाचे द्योतक मानून आपल्यापासून झालेल्या प्रजेलासुद्धा आपले चिन्मय ब्रह्मरूपच समजतात. स्त्री-पुरुष मात्र बहुत्वाच्या संकल्पाने कामाविष्ठ होऊन परस्परांत ऐक्य पावतात व पुढे होणाऱ्या संततीतूनहि आपल्या चिन्मय ब्रह्मरूपतेची जाणीव आणून न घेतां स्थूल देहाच्या संभोगानें झालेल्या ऐक्य सुखाचें फल म्हणून मानून त्या संततीच्या ठिकाणीं ब्रह्मभावनेऐवजी मलमांसादि अन्नविकारानी युक्त अशा आपल्या देहाप्रमाणेच देहबुद्धी ठेवतात. मूळ प्रकृति-पुरुष परस्परांचे जीवन सर्वकारणरूप असणाऱ्या ब्रह्मसुखानेंच घालवितात. स्त्री पुरुष मात्र परस्परांचे जीवन सर्वकारणरूप असणाऱ्या ब्रह्मसुखाने न घालवितां कार्यरूप अशा जड विषयसुखानेच घालवितात. अशाप्रमाणे प्रकृति-पुरुषांत व स्त्री-पुरुषांत मूलत जरी भेद नसला तरी उपाधीवशांत स्मृति-विस्मृति-रूपाने दिसून येणाऱ्या अति ठोकळ भेदांचे दिग्दर्शनार्थच थोडेसें विवेचन केलें. 

आतापर्यंत महत्त्वापर्यंतचे विवेचन झाले. याहून थोडेसे आपण आता पुढे जाऊन पाहूं !

‘महतोऽव्यक्तत्तमम् । ‘ सर्व जीवांचे आद्य स्थूळरूप असणाऱ्या व सर्व नामरूपात्मक विश्वच ‘मी’ म्हणून मानणाऱ्या ब्रह्मांड – स्थूलदे हाभिमानी विराटापेक्षां, सर्वभूतांच्या आद्यलिंगदेहाचा अभिमान धरून सर्वांत दिसून येणाऱ्या अहंस्फूर्तीचे एकवटलेलें हिरण्यगर्भाचे स्वरूप जसें श्रेष्ठ तसेंच बहु व्हावे म्हणून

स्वसं कल्पानें अनेकविध सृष्टी निर्माण करणाऱ्या या हिरण्यगर्भा पेक्षा पूर्वीची, याला कारणीभूत असणारी ‘अव्यक्त ‘ या नावाची एक उपाधी आहे ती सहजच याहून श्रेष्ठ असणार. या उपाधीमुळे ‘ मी बहु व्हावे ‘ अशा रीतीचा संकल्प महत्तत्त्वाभिमानी हिरण्यगर्भात उत्पन्न होतो. ही म्हणजे कार्याच्या संकल्पाची बीजभूतस्थिती मायेची अव्यक्त उपाधि. मायिनन्तु महेश्वरम |’ या अव्यक्त उपाधीचा अभिमानी ईश्वर, या सर्वांपूर्वीचा. यालाच ‘स विश्वकृत विश्वविदात्मयोनिः ।’ असे म्हटले आहे. हाच जगकर्ता हाच सर्वज्ञ. जगत्कारणत्व याच्याकडेच. ब्रह्मांडकारण देहाचा अभिमानी हा ईश्वर पिंडाच्या कारण देहाचा अभिमान धरून ‘प्राज्ञ ‘ होतो. हाच जो महत्वाचा अभिमान घेऊन ‘हिरण्यगर्भ’ होतो, तोच पिंडात पिंडाच्या सूक्ष्म देहाचा अभि मानी ‘तैजस ‘ म्हणून म्हटला जातों. बहुस्यां प्रजायेय ।’ हा संकल्प विविध नामरूपानी युक्त असणाऱ्या या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीनें तडीस गेल्यानंतर हा जो ब्रह्मांडस्थूलदेहाभिमानी ‘विराट’ बनतो तोच एका पिंडाच्या अभिमानाने विश्व’ म्हटला जातो. हे सर्व मायेच्या इंद्रजालाचें भ्रामक दृश्य ओसरून गेल्यानंतर सर्वकारण अशा अव्यक्त उपाधीहूनहि श्रेष्ठ, ज्याच्याहून श्रेष्ठ असे दुसरे कांहीं नसून जी सर्वोत्कृष्ठत्वाची पराकाष्ठा, असें एक आपलें सत्य स्वरूप उरतें. यालाच ‘पूर्णत्वात पुरुष: ।’ याच्या पूर्णत्वामुळे ‘पुरुष’ असें नांव आहे. ‘पुरुषान्न परं किञ्चित्सा काष्ठा सा परागतिः । या पुरुषस्वरूपाहून श्रेष्ठ असे दुसरें कांहीं नाही. हीच शेवटची पराकाष्ठेची स्थिति इच्या प्राप्तीनेंच कृतकृत्यता. निरतिशय सुखाची सर्वोत्कृष्ठ स्थिति ती हीच.

अव्यक्तात्तु परः पुरुषो व्यापको लिंङ्ग एवच । यज्ज्ञात्वा मुच्यते जन्तुरमृतत्वं च गच्छति ।’

अव्यक्ताहून श्रेष्ठ आणि मनबुद्धींद्रियांच्या कक्षेबाहेरचे असल्यामुळे जे अमुक म्हणून कोणच्याही लक्षणांनी सांगता येणार नाही, जे आपले यथार्थ स्वरूप म्हणून जाणले असतां प्राणी या संसारातून मुक्त होतो तेच हें सर्वभूतांचे पूर्ण स्वरूप. यालाच ‘ पुरुष ‘ असे म्हणतात. हें माया अविद्येच्या उपाधीने भासणाच्या जीवेशांतून व्यापक असून त्याचे यथार्थ स्वरूप होय.

यच्छेद्वाड्.मनसी प्राज्ञस्तद्यच्छेज्ज्ञान आत्मनि । ज्ञानमात्मनि महत्ति नियच्छेत्तद्यच्छेच्छान्त आत्मनि ॥’

(कठ. १/३/१३) या वाक्याने देहांतच व्यापून अति एकदेशीय झालेली ‘मी’ ही भावना देहांतून काढून त्या सत्यस्वरूप परम पुरुषाच्या ठिकाणी तिचा लय करण्याचा उपदेश श्रुति करिते. केव्हांहि बहिर्मुख वृत्तीनें बाह्यविषयांकडे वाहवत असलेल्या इंद्रि यांना मनाच्या वासनेचा प्रवाह मुख्य कारण म्हणून समजून इंद्रियांना त्यांच्या पूर्वीच्या मनांत विरघळून टाकावें. मन सुद्धा ” मी’ या आपल्या भानानेंच दिसून येत असल्यामुळे हे मन याच्या पूर्वी असणाऱ्या ‘मी’ या भानांत नाहिसे करावे. हे ‘मी’ पणाचे भान विश्वांत चोहीकडे व्यापून आहे हें बधून, अग्निपासून ज्या प्रमाणे विस्फुलिंग म्हणजे ‘ठिणग्या, त्याप्रमाणे देहोपाधीने विविध भासणारे हें ‘मी’ ज्याच्या ‘मी बहु व्हावे’ या संकल्पाचें कार्य होय त्या सर्वाद्य, अद्वितीय ‘मी’त म्हणजे हिरण्यगर्भात जिरवून टाकावे. स्फूर्तिरहित निर्विकल्प अशा ज्ञान स्वरूप परब्रह्माची ‘मी’ ही स्मृति होय हैं जाणून हें समष्ट्यात्मक ‘मी’ स्फूर्ति कार्यरहित विकारशून्य आणि केवळ अशा त्या शुद्ध-बुद्ध स्थितीत विरखून स्वयंप्रकाशित अशा स्वरूपानें आपणच ‘ एकमेवाद्वितीय उरणें म्हणजे निजस्थिति, असे श्रुतीचे प्रत्येक प्राणीमात्राला सांगणे आहे. प्राणीमात्राची सत्य स्वरूपस्थिती ती हीच.

‘अशब्दमस्पर्शमरूपमव्ययं तथाऽरसं नित्यमगन्धवच्च यत् । अनाद्यनन्तं महतः परं ध्रुवं निचाय्य तन्मृत्युमुखात्प्रमुच्यते॥

(कठ. १।३।१५)

home-last-sec-img