Literature

विषय विवेचन १२

यस्य सर्वे समारंभ: कामसंकल्प वर्जिताः। (भ.गी. ४|१९) • ज्ञानीत्वात्मैव मे मतम् ॥’ ‘आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥’ (भ.गी. ७|१२ ) इत्यादि इत्यादि. श्रीजाबाल दर्शनो पनिषदांत देखील एक वाक्य अशाच तऱ्हेचे आले आहे. ‘लोकत्रयेऽपि कर्तव्यं किम्चिनास्त्यात्म वेदिनाम् । (२४) यांत सुद्धा तिन्ही लोकांतून देखील आत्मज्ञान्याला कर्तव्य म्हणून कांहीं शिल्लक उरलेले नसतें अशी घोषणा स्पष्ट आहे.

‘यज्ज्ञाता न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव । येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥’ (भ.गीं. ४।३५) या वाक्यांत देखील ‘ मयि सर्वमिदं प्रोत: सूत्रे मणिगणा इव ।’ (भ.गी. ७/७) असा आपल्याप्रमाणेच सर्वात्मभाव अनुभवाला येतो असे भगवंतानें दर्शवून ‘ इदं ज्ञानमुपाश्रित्य मन साधर्म्यमागताः । सर्गेऽपि नोप जायन्ते प्रलये न व्यथन्ति च ॥’ (भ.गी. १४|२) ‘बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागताः’ इत्यादि वाक्याने ज्ञानामुळे आपल्यांत व ज्ञान्यांत भेद उरत नाहीं हें स्पष्ट कळविले आहे.

ज्ञानीत्वात्मैव मे मतम् । हे वाक्य तर भगवंताचे मत अगदीच स्पष्ट करते‘नात्र काचनभिदास्ति नैव तत्र काचनभिदास्त्यत्र.

हि भिदामि मन्यमानो शतधा सहस्रधाभिन्नो मृत्योः स मृत्युमाप्नोति ॥ (नू. उ. ता.) या श्रुतिवाक्याने जीवेश्वराचे एक व्यक्त करून दाखविले आहे. इतकेच नव्हे तर जन्ममरण प्रवाहातून ज्याला म्हणून मुक्त व्हावयाचे आहे त्यानें भेद मानू नये व भेद मानणाऱ्यास जन्ममरण परंपरा अनिवार्य आहे याचा डांगोरा पिटला आहे. या प्रमाणे श्रुतिस्मृति आधारानेंहि जीवेश्वरैक्य सिद्ध असता मी परमात्मा कसा होईन ? ही शंका बाधण्यास दुसरे काही कारण नसून जीवास स्वतःची विस्मृतीच कारणीभूत आहे. व विस्मृतीनेंच जीवाच्या ठिकाणी विलक्षणता भासून येतें हैं विचारांती कोणासहि नाकबुल करितां येणार नाही.

कल्पितेयमविद्येयमनात्मन्यात्मभावनात् ।’ (महो.) कार्यरूपी मी ब्रह्म या स्फूर्तीच्या उत्पत्तीला त्या केवळ चित्स्वरूप ब्रह्मांत कांही कारण आढळून येत नसल्यामुळे कारणरहित कार्य खोटेच म्हणून दर्शविण्यासाठी या स्फूर्ति मिथ्यावाचक माया असे म्हटले. तसेंच या दुसऱ्या विस्मृतिरूप जडदेहात्मभावनेने युक्त असणाऱ्या म्हणजे मी देहच मी ब्रह्म नव्हे अशा रितीने अनात्म स्वरूपाच्या ठिकाणी आत्मभावना उत्पन्न करणाऱ्या या निष्प्रयोजक भावनेला सुद्धां कोणचेंहि कारण दिसून येत नसल्यामुळे मायें प्रमाणेच यालाहि एक अनुरूप असे नांव देण्यांत येते, ते म्हणजे ‘अविद्या. ‘ ही ‘ न विद्यते सा अविद्या ‘ नसणारी म्हणून इच्या नांवानेंच मुळीं सिद्ध आहे. प्रथम ‘यतो वा इमानि भूतानि ‘ या श्रुतिअन्वयें ब्रह्मच या जगताचे सर्वकारण असे स्पष्ट होते. ब्रह्माला’ उपादान कारण’ म्हणावें की ‘ निमित्तकारण’ म्हणावें ? कां तें उभयात्मकहि असू शकेल ? खरेंच ते ब्रह्म या सर्वाचे कारण होऊ शकेल काय ? कां त्यांत या सर्वांची उत्पत्ति सयुक्तिक ठरत नसल्यामुळे त्याला अकारणच म्हणजे कशाचेंहि कारण होणारें तें नव्हें असें म्हणावे ? त्याला कारण आणि अकारणहि दोन्ही म्हटले तर योग्य होईल कां ? आपली उत्पत्ति कोठून ? कशामुळे आम्हीं जिवंत आहोत ? आमचे लयाधिष्ठान कोणचें ? काल, स्वभावनियति, यदृच्छा, पंचभूतें इत्यादि हीं कारणें म्हणून म्हणावी तर जगाच्या सापेक्षेनेंच यांचें अस्तित्व, कारण जग झालेच नाहीं असा काही ठिकाणी सिद्धांत दिसून येत असल्यामुळे या पैकी एक किंवा यांचा समुदायहि या सर्वांचे कारण होऊं शकत नाहीं. सुख-दुःखानी पीडित होणारा कर्माधीन, अस्वतंत्र हा जीव तरी याला कारण होऊं शकेल काय ? जगाच्या सापेक्षतेनें जीवाचें हें अस्तित्व, जग झालें नाही हा सिद्धांत थोडावेळ मनांत न आणतां जग झाले आहे असे गृहीत धरून याची समाधानकारक कारण व्यवस्था लागते काय ती पाहूं !

उत्पत्तीच्या पूर्वी त्या कार्याचें कोणचें तरी कारण असावें. कार्याच्या पूर्वील स्वतःसिद्ध कारणवस्तूंत विलक्षण भास उत्पन्न करणारें हे कार्य कसें बरे उत्पन्न होईल ? त्याला प्रयोजन कोणते ? आतां जर सर्व व्यवहार ज्ञानात्मक दिसतो तर या सर्वापूर्वी केवल ज्ञानच होते, त्या केवळ ज्ञानांत हें ज्ञेयात्मक कार्य कसें होईल ? कार्याच्या पूर्वीचे म्हणून कार्यविलक्षण असणारे कारण आपणच कार्य कसें होईल ? तेंच जर कार्य होईल तर कार्य हें कशामुळे प्रकाशतें ? कार्याचा आधार कोणचा ? कारणच जर कार्याला आधारभूत असतें तर कार्याच्या उत्पत्तीनें आधारभूत असणाऱ्या कारणांत कोणचाहि विकार होत नाही. ते जसेच्या तसेंच असतें असें ठरलें तर सदाचेंच अविकारी म्हणून एकरूप असणाऱ्या

कारणांत त्याहून विलक्षण असे हे कार्य कशामुळे दिसते ? या सर्व प्रश्नांचा उलगडा होण्यास एक ब्रह्मसभा भरून त्या सभेत असणाऱ्या सर्व ऋषीनी शेवटी याचा निकाल ध्यानबळानेच लावण्याचे ठरविले असे ‘श्वेताश्वेतरोपनिषदांत दिसून येते.

‘ते ध्यानयोगानुगता अपश्यत् देवात्मशक्ति स्वगुणं निगुढाम्’ यः कारणानि निखिलानि तानि कालात्मयुक्तान्याधितिष्ठ त्यैकः ॥ (श्वेता. १|३ )

त्या सर्व ऋषीनी मग त्या ध्यानबळाने काय ठरविले ते या वाक्यांत श्रुति सांगते. पूर्वोस्त कालस्वभावादि सर्व कारणांचे अधिष्ठानभूत असणाऱ्या अद्वितीय परमात्म्याची या सर्व कार्य कारण परंपरेला त्याच्या बीजभूत स्थितीने आपल्यांत सांठवून त्या परमात्म्याकडूनच प्रकाशली जाणारी अस्वतंत्र कोणी एक शक्ति या साऱ्या वैचित्र्याला कारण आहे म्हणून त्या ध्यान-योगारूढ स्थितीत सर्व ऋषीनी पाहिले, हा या श्रुतिवाक्याचा अर्थ. या शक्तीलाच ‘माया’ असे नांव आहे. सांख्यशास्त्रात पुरुषाहून भिन्न म्हणून कल्पिलेली शक्ति निराधार आहे. ते श्रुतिमत नव्हे हे ‘ देवात्मशक्तिम्’ या पदावरून स्पष्ट होईल. या श्वेताश्वेरोप निषदांतच पुढे चौथ्या अध्यायांत ‘मायां तु प्रकृति विद्यान्मायिनं तु महेश्वरम् ।

तस्यावयव भूतैस्तु व्याप्तं सर्वमिदं जगत् |१०|| हा श्लोक आला आहे. ‘मय्याध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् ।’ (भ.गी६।१० ) या श्री भगवंताच्या वाक्यावरूनहि ही शक्ति स्वतंत्र नाही हे सिद्ध होईल. ‘मायासम्बन्धतच्चेषो जीवोऽविद्यावशस्तथा ।’ माया संबंधान ईश्वर आणि अविद्या संबंधानें जीव याप्रमाणे या माया अविदयात्मक दोन उपाधीमुळे जीवेश्वर हा भेद हे या वाक्याने स्पष्ट होते. ‘रजस्तमोऽनभिभूत शुद्धसत्त्वप्रधाना माया || रज,

तम गुणांनी युक्त नसलेली शुद्धसत्त्वप्रधान अशी जी, ती माया. ‘अविद्या तु रजस्तमोऽभिभूता मलिनसत्वप्रधाना। रज, तम गुणांनी युक्त अशी मलिन सत्त्वप्रधान असणारी म्हणजे ‘अविद्या’. ‘मी’ या ज्ञानरूपतेच्या सामान्यतेने मायाऽ विद्योपाधियुक्त ईश जीवांतून भेद जरी नसला तरी मायारूप विद्योपाधीत जें ‘अहं स्फूरण’ होतें त्यांतउपाधीच्या शुद्धतेमुळे ‘परब्रह्मच मी’ असे शुद्ध स्वरूपाचे ज्ञान असते. अविद्योपाधीत जें ‘अहं स्फुरण’ होतें त्यांत मलीन उपाधीमुळे ‘देहच मो’ असे वाटू लागते. अज्ञानानें देहाच्या मलरुपतेंची आठवण या ठिकाणी होत नाही.

‘रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंग समुद्भवम् । तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसड़गेन देहिनम् ॥ (भ.गी. १४।७)

रजोगुण म्हणजे भोग प्रितीचा ओतींव पुतळा. भोगलालसेपासूनच याचा जन्म हा प्राणीमात्राला कर्माच्या जाळयांत अडकवून टाकतो. तमस्त्वज्ञानजं विद्धिमोहनं सर्वदेहिनाम्।’ (भ.गी. १४३८) तमोगुणाची उत्पत्ति अज्ञानापासूनच. सर्व प्राण्यांना अविवेक उत्पन्न करणे हे यांचे कार्य. ‘ज्ञानमावृत्य तु तमः प्रदेसंजयत्युत ।’ (भ.गी. १४/९) ज्ञान झांकून हा तमोगुण अयोग्य प्रवृत्ति उत्पन्न करतो. मलीन सत्वांत या दोहोंचेही साहचर्य. मग त्यांचा प्रभाव जाईल कोठे ? जीवेश्वरांत अभेद आहे तर जीवाला स्वरुपांचे अज्ञान का ? व ही प्रबल असणारी भोगासक्ति त्याला कशामुळे? या प्रश्नाचा उलगडा येथे झाला:

द्वे अक्षरे ब्रह्मपरे त्वनन्ते विद्याविद्ये निहिते यत्र गूढे (श्वेता ५।१ )

या श्रुतिवाक्याने विद्या अविद्यात्मक शब्द श्रुतीतून आले आहेत असे आढळेल. ‘क्षरं त्वविद्या’ विनाशशील जड नामरूपाचा अभिं मान या विद्येने होत नसल्यामुळे इचे स्वरूप इच्या कार्यांप्रमाणे हीहि विनाशशीलच. ‘अक्षरं तु विद्या’ अविनाशी ब्रह्मस्वरूपाचा अभिमान या विद्येने होत असल्यामुळे इचें स्वरूप इच्या कार्या प्रमाणेंच अविनाशी म्हणून म्हटले आहे. ‘अहं ब्रह्म स्फुरणच या जग दुत्पत्तीस कारण ठरले की तद्रूप असणारी ही विद्या जगत्कारण ठरून इजपासून झालेल्या कार्याच्यां नाशानें इचा नाश होत नसल्यामुळेहि इला ‘अक्षर’ असे म्हटले आहे. विद्यात्मवृत्तिश्च्मेति भण्यतें‘ मी ब्रह्म ही शेवटची आत्मीयवृत्ति व इलाच ‘विद्या’ असे म्हणतात, याला हे वाक्य प्रमाण आहे. परब्रह्मात ‘अहं ब्रह्म ‘हे स्फुरणात्मक मायेचें स्वरुप. या मायेलाच कुठेकुठे ‘विद्या’ म्हणून म्हटले आहे. तेव्हा विद्या आणि माया या शब्दात फरक नसून ते दोन्हीं शब्द एकाच अर्थाचे आहेत.

मायोपाधिर्जगद्योनिः सर्वज्ञत्वादिलक्षण: ‘ (अ. रा.) ‘शक्तिशक्तिरविद्याकारेण सम्बन्ध जीवसंज्ञितम् । परजीवोपाधी मायाऽ विद्ये ।’ इत्यादि वाक्यांच्या आधाराने सर्वज्ञत्व किचिज्ञत्वादि जीवेशांच्या भेदाला माया अविद्याच कारणीभूत आहेत हे सिद्ध होईल. पांढऱ्या व काळ्या रंगाच्या खिडकीतून आलेला सूर्यप्रकाश कधी विकार पावत नाही, भेद कांचेच्या रंगावरच अवलंबून असतो त्या कांचा असतांना अगर नसतांनाहि सूर्यप्रकाश जसाच्या तसाच त्यात कांही भेद होत नाही. तो ज्याप्रमाणे या दोन्ही माया अविद्येतून अविकारी मूळ प्रकाश तो एकच. त्यांत म्हणजे माया विद्योपाधियुक्त असणाऱ्या जीवेशांतून भासत असलेल्या त्या आत्मीय प्रकाशांत कधीहि स्वरूपताभेद होत नाही.

‘एक: सन्नबहुधा विचचार ।’ या श्रुतिच्या आधाराने जीवाच

अनेकत्व स्वरूपाच्या दृष्टीने एकत्वच आहे. एकच बहुविध होतो म्हणणे एकच उपाधीने अनेकविधसा भासतो. अविद्यया भिन्नत्वा त्स्थितः ।’ ती उपाधी म्हणजे ही अविद्या सर्व भेदाला कारण ती

होच. इच्यामुळेच भेद वाटतो इच्यामुळे जीवेशांनी अथवा एकाहून दुसऱ्या जीवकोटीत भेद भासतो.

‘देहोऽहमिती या बुद्धिः सा चाविद्येति भण्यते ।’ ‘देहच मी अशा या निश्चयालाच अविद्या म्हणावयाचे. अद्वितीय अशा पर मात्म्यांत हे अविद्याकृत भिन्नत्व ‘देहच मी’ म्हणून मानल्यामुळे भासते हे यावरून स्पष्ट होईल. अनेकत्व या दृश्यातच मोडते. भिन्न भिन्न असणाऱ्या अनेक दृश्यरूपी शरीराच्या अभिमानानेच अनेकत्वाचा संकल्प तडीस जातो व तो संकल्प तडीस नेण्यासच आपल्या संकल्पाने अनेक देह निर्मुन त्यांत आपल्या प्रवेशाची भावना करून असणाऱ्या परमेश्वरालाच ‘देह मी’ अशी भावना उत्पन्न होते असे मानावे लागते.

‘देहोऽहमिति यज्ज्ञानं तदेवाज्ञानमुच्यते ।’ हा देहाभिमानच जगांत विविधतेनें दिसून येणाऱ्या भेदात्मक द्वैताचे मूळ. अज्ञान तें हेच ! ‘या तदभिमानं कारयतिं साऽविद्या | पुर्वीचे स्वरूप जसेच्या तसेंच कायम ठेवून जी कोणी एक शक्ति ‘मी ब्रह्म’ या ज्ञानांत क्रमानें पुढे ‘मी देह’ असा भास उत्पन्न करते ती शक्ति म्हणजेच अविद्या सुषुप्तीत बुद्धि लीन झालेली असते. तीच पुन्हा प्रगट ल्यानंतर स्वप्न-जागृतीचे भान होऊन त्यातून ‘मी देह’ ही भावना येते. असे झाले की अशा विपरीत भावनेला कारण सुषुप्तीच होऊन इथूनच हा देहाभिमान उत्पन्न होतो असे होईल. असे झाले असता सुषुप्ती हीच अविद्येचे स्वरूप होईल. हा प्रत्ययहि येणारा अनुभव अविद्येचे स्वरूप चांगले पटवून देईल.

एकंदरींत या परमात्म्याला बहुत्वाचा संकल्प होऊन याप्रमाणेंच अनेक दृश्यरूपानें हें विविधत्व उत्पन्न करून याला चेतना आणण्यास त्यात आपणच प्रविष्ठ होऊन त्या त्या स्थूलदेहाचा अभिमान बाळगल्याशिवाय अनेकाचा संकल्प पूर्ण होणार नाही. या भावनेने स्थूलाचा अभिमान होऊन ‘मी देह’ म्हणून मानल्यानंतरच ही अविद्या कार्यपर दिसून येते. ईश्वराची सृष्टी, त्यात होणारा प्रवेश आणि ईश्वर, त्याहून कसा वेगळा आहे हे स्पष्ट कळून यावयाचें झालें तर स्वप्नांचा दृष्टांत त्याची कल्पना आणून देईल. स्वप्नावस्थेत एकच आपल्या मनाने झालेल्या स्थिरचरात्मक काल्पनिक प्रपंचाला पहात आपणच सर्वरूपानें नटून त्यांना चेतविण्यास आपणच त्यांत प्रवेश करून आपल्या मूळस्वरूपाने या सर्वाहून भिन्न असून सर्वहि तिथलें कर्म करतो म्हणजे मनाच्याच कल्पनेचा जसा तो व्यवहार असतो त्याचप्रमाणें ईश्वराच्या बाबतीतहि समजावे.

अभेददर्शनं ज्ञानम् ।’ ब्रह्मैकत्वाच्या निश्चयाचा अनुभव म्हणजेच ज्ञान. हें ज्ञान परमात्म्याच्या ठिकाणी स्पष्ट असतें. अविद्यो पाधीनें युक्त अशा जीवांच्या ठिकाणी मात्र हें ज्ञान झांकलेले असतें. ‘शरीराभिमानेन जीवत्वं ।’ याला शरीर अभिमानच कारण. जीवाला या शरीर अभिमानाच्या बंधनांतून मुक्त होण्याची इच्छा असणें हें निसर्गतःच प्राप्त आहे. ‘देहोऽहमितियज्ज्ञानं तदेव नरकं स्मृतम् । गलभांडरुपीं या देहाला ‘मी’ मानणे म्हणजेच नरक यातना. देहोऽहमिति सकड्.ल्पं तत् दुःखम् ।’ अशा देहाचे वास्तव्य कोणाला म्हणून सुख देईल. ‘अनित्याशुचि दुःखाना:त्मसुनिःयत्शुचिसुखात्म ख्यातिरविद्या ।’ (पातं यो. सू.) प्रतिक्षणाला विकार पावून शेवटी नाश पावणारे म्हणजे अनित्य गर्भात आईबापाच्या मळ रूप अशा रजरेंतांनी जन्म पावलेले म्हणून जें अपवित्र किळस आणणाऱ्या अशा अनेक घाणेरड्या पदार्थांच्या एकत्रतेने व जन्म जरादि रोगादिकांनी जे अति दुःखरुप अशा या शरीराच्या ठिकाणी नित्य, शुचि व सुखाची भावना होणे, माझें म्हणून म्हटले जाणारे, वेगळेपणेंच दिसणारे, अन्नविकाराने उत्पन्न झालेले तें हे शरीर. दुःखाने हे शरीर पडले तर बरे, असे वाटत असल्या मूळे मुत्रमलरक्तादि देहाचे घटकावयव शरीरातून बाहेर पडून गेले असता ‘मी बाहेर पडून गेलो’ असे वाटत नसल्यामुळे, तिन्ही अवस्था ज्याच्याकडून अनुभविल्या जातात तो तिन्हीं अवस्थेत असून हे शरीरमात्र तसे केव्हाही दिसून येत नसल्यामुळे, शरीर हे जड असून ‘मी’ हे स्फुरण ज्ञानात्मक अस्तित्वाचे द्योतक असल्यामुळेहि अनात्म म्हणजे वेगळे असतांना या ठिकाणी आत्म बुद्धि होणे म्हणजे हे शरीरच ‘मी’ असें वाटणे हे अविद्येचे कार्य, असे पातंजल योगसूत्र सांगते.

व्यावहारिकदृष्ट्यं विद्याऽविद्या न चान्यथा | तत्वदृष्ट्या तुनास्तेव तत्त्वमेवास्ति केवलम् ॥’

विद्या अथवा अविद्या म्हणून जे म्हणावयाचे ते हे

केवळ व्याव हारिक दृष्टींनेच. तत्त्वदृष्टीने पाहूं गेलें असतां त्या तत्त्वाशिवाय कांहीं आढळणार नाही; या ठिकाणी विद्या आणि अविद्या नाहीतच असें अनुभवाला येतें, असें श्रुतीचे मत आहे. स्वतः सिद्ध अशी वस्तु अद्वितीयच असते. या केवळ स्थितीत कशाचाहि मागमूस असणार नाहीं. कोणच्याहि चांचल्याची झुळूकसुद्धा येथे वाहत नाही सर्वाकर्ष शांत अशी एकच एक वस्तु निरावलंबी अशी आपल्या आप णच सदोदित असतो. सूर्याच्या विचित्र शक्तीनें उत्पन्न झालेला शरदकालीन अथवा वर्षाकालीन मेघ आपल्या विरल अथवा घन आवरणाने जसा सूर्याला आच्छादू शकत नाही. त्याचा थोडाहि संपर्क जसा सूर्याला नसतो त्या प्रमाणेच परतत्त्वाच्या विचित्र शक्तीने होणाऱ्या विद्या-अविद्या आपल्या विरल-घन आवरणाने त्या परतत्त्वाला भासण्याजोगें अथवा न भासण्याजोगें आच्छा दिल्यासारखे वाटलें तरी तें त्यांच्यामुळे मुळीच आच्छादिले जात

नसून चुकून देखील त्याचा थोडा संपर्कसुद्धा त्या परतत्त्वाला लागत नाही. तें परतत्त्व सदांचेच आपल्या अविकारी स्वरूपाने जशाच्या तसे स्वमात्र असते. सूर्याच्या ठिकाणी ढग उत्पन्न करण्याची शक्ति त्याच्या ठिकाणी नसलेल्या ढगरूप कार्याच्या दृष्टीने अनुमानिली गेली तरी उद्देशपूर्वक या क्रियेच्या अभावी शक्तींचा प्रत्यक्ष संबंध सूर्याला जसा नसतो, त्याप्रमाणे जीवेश्वरांची भावना उत्पन्न करणारी अविद्या मायाशक्ति त्या परतत्त्वाच्या ठिकाणी नसलेल्या किंचि सर्वज्ञ, बद्ध-मुक्त, संसारी असंसारी, कर्तृ-अकर्तृ अशा या भावनात्मक कार्यदृष्टीने जरी अनुमानली गेली तरी या शक्तीचा धडासुद्धा परत त्त्वाला नाही. स्वरूपी नसलेले कार्य उत्पन्न करणारी शक्ति सहज आपले कार्य करीत असतांनाहि इचा अथवा इच्या संबंध कार्याचा संबंध त्या परतत्वाला कसा लागेल ? ते परतत्त्व स्वतःपूर्ण असल्या मुळे, या शक्तिमुळे त्यात कोणताहि फरक होत नसल्यामुळे त्यांत कोणताहि फरक होत नसल्यामुळे त्या निर्विकार परतत्त्वाच्या दृष्टिनें ही शक्ति नाहींच असे ठरले की या शक्तीचा आणि इच्याया साऱ्या पिडब्रह्मांडात्मक कार्याचा त्या परतत्त्वाला •संबंध लागेल कुठून ? जीवेश्वरांच्या संबंधांची भावना येथें फोलच ठरणार ! दोरी दुसऱ्याच्या ठिकाणी भासणाऱ्या आपल्या ज्ञाता ज्ञाततेहून जशी वेगळीच असतें त्या प्रमाणेच तें परतत्त्वहि माया अविद्येमुळे ईश-जीवांतून भासणाच्या ज्ञाताज्ञाततेहून वेगळेच आहे. ते परतत्त्व या ज्ञाताज्ञाततेचा संबंध लावून न घेतां, या ज्ञाता ज्ञाततेनें ते यथार्थ प्रकाशले न जातां आपल्या केवळ ज्ञानमात्र तेनें कोणच्याहि भानाविरहित असे ते सदाचेंच अद्वितीय आहे.

home-last-sec-img