Literature

विषय विवेचन १३

‘माया तत्कार्य विलयें नेश्वरत्वं न जीवता ।’ माया व तिच्यापासून झालेली अविद्या नाहिशी झाली असतां ईश जीवांची उपाधि नष्ट होऊन त्यांच्यांतून दिसून येणारी ‘मी ही स्फुर्ति त्या परतत्त्वरूपब्रह्मांत विरघळून गेली म्हणजे त्याठिकाणी ईशभानहि नाही आणि जीवभावहि नाही. 

‘कार्योपाधिरयंजीव: कारणोपाधिरीश्वरः 1 कार्यकारतां हित्वा पूर्णबोधोऽवशिष्यते ॥ ( शु र १२ )

मायेचे कार्य असणाऱ्या विस्मृतिरूप अविद्येची उपाधि ज्याला आहे तो जीव व या विस्मृतिरूप अविद्येला कारण असणाऱ्या स्मृति रूप मायेची उपाधि ज्याला आहे तो ईश्वर केवल ज्ञानरूपतेच्या विस्मृतीस कारणीभूत होणारे, कारणकार्यरूपाने विद्या अविद्या अथवा माया अविद्या म्हणवून घेणारे या आपल्या उपाधीनी ईश जीवाच्या सर्वज्ञ किचिज्ञ इत्यादि विरुद्ध भावना प्रगटविणारे सारें हे भ्रामक, मूळरूपींच्या दृष्टीने निष्प्रयोजक म्हणून सर्वहि त्या सत्यस्वरूपांतून वगळले म्हणजे कारण कार्य सारेच मावळून पूर्ण ज्ञानरूप आनंदच आपल्या प्रकाशाने प्रकाशमान असा एकच एक चोहीकडे शिल्लक उरेल. या केवळ निज अस्तित्वांत माया कार्या दिकं नास्ति नास्ति मायाभयं न हि ।’ मायाहि नाही मायेचे कार्य असणारी अविद्याहि नाही, अविद्याच नसतांना अविद्यात्मक जीवा तून दिसून येणारी वासनेची किळसवाणी घाण तरी कुठली आढळ णार ? भय तरी कसले ? ‘ अभय वै ब्रह्म ।’ ब्रह्म अभय आहे. त्याची विस्मृति उत्पन्न करणारी माया आणि मायाकार्यातच भीति. ब्रह्मविदब्रह्मव’ ब्रह्मज्ञानी ब्रह्मच असतो,

भय व्यापिलें सर्व ब्रह्मांड आहे | भयातीत ते संत अनंत पाहे ।

जया पाहतां द्वैत कांही उरेना | भय मानसीं सर्वथाही असेना || ( मनाचे श्लोक)

“स्वात्मऱ्यारोपिता शेष भासवस्तु निरासतः । स्वयमेव परब्रह्म पूर्णमद्वयमक्रियम् ॥’ (अध्या. उ. २१) साया भावना निष्प्रयोजक दृष्टीने आपणास भासणाऱ्या नाहिशा करून या साऱ्या जगाला आणि साया भावनांना प्रकाशित करणारे आपणच आहोत असे शेवटी जाणून स्वस्थ राहिला की आपल्यावर आरोपित झालेल्या भ्रामक कार्याला आपल्यातून वगळू आपणच सत्यस्वरुपाने उरु. हेच पूर्णस्वरूप ! येथे दुसरेअसे काही उरत नसल्यामुळे हेच अद्वय.’ या आपल्या एकच एक अशा अद्वय स्वरूपांत इतरांपासून केव्हांहि कसलाहि काहीहि आनंद म्हणून मिळवावयाचा थोडासुद्धा शिल्लक उरत नाहीं. क्रिया, किये साधन, कर्तृत्व व त्याचे प्रयोजन असे काही त्यात भासत नाही. अस्ति, भाति, प्रिय भावनेनें दिसणाऱ्या या सा-या कार्यजातांतून मीच पूर्णस्वरूपाने भरून उरलो आहे असा येथे अनुभव येतो. यांतून व्यापून असणाऱ्या आपल्यालाच यापासून आपण वेगळे आहोत म्हणून ठसविण्याकरतां अमृत, जड, दुःखात्मक अशा या कार्याहून विलक्षण असे सच्चिदानंदात्मक आपण आहोत म्हणून श्रुति सांगते हे या अवस्थेत अनुभवाने खरे ठरतें. आपल्या या व्यापक स्वरूपाच्या निरवयवत्वामुळे सहजच या भूमिकेत आपले निष्क्रियत्व बांणतें.

‘ क्व गतं केन वा नीतं कुत्रलीनमिदं जगत् । अधुनेव मया दृष्टं नास्ति कि महदद्भुतम् ॥’ (अध्या. उ. ६६)

या स्थितीच्या पूर्वक्षणी दिसत असलेले हे जग मग कोठें गेलें ? कुणी नेलें व कशांत गडप झाले ? आतांच दिसत असलेले दृश्य एकदम नाहिसे झाले ना ! काय आश्चर्य !! अशी काही मनाची या आत्मज्ञानाने स्थिती होते. भ्रमकार्य सारेंच ओसरून जाऊन कोणी एक विलक्षण अशी आपली स्थितीच या अवस्थेत अद्वितीय उरते. कि हेयं किमुपादेयं किमन्यत् कि विलक्षणाणम् । अखण्डानन्द पीयुषपूर्णब्रह्म महार्णवे ।। (अ. उ, ६७)

सर्वहि आपल्यांतच विरघळून टाकून अखंड अद्वय, अनंत आनंद अमृतमहोदधीच आपण झालेल्या या ब्रह्मनिष्ठाला टाकण्यासारखं घेण्यासारखे, वेगळे असणारें, विलक्षण ठरणारे असे काहीच दिसत नाही. ऐसे नाना छंद करी । ती कल्पना जाणीव’ |इचे केलीया निर्मूळ| ब्रह्मप्राप्ति ॥ (दास) तीत हे कोठून असणार ? ही सारी माया तर ‘ स्वप्रकाशैकसंसिद्धे नास्ति माया परात्मनि ।’ स्वप्रका शाने स्वतः सिद्ध असणाऱ्या या अद्वितीय परमात्मरूप ज्ञान्यात माया कोठून डोकावील ?

‘ज्ञात्वा स्वमात्मनमथाद्वयो भवेत् ।’ (अ. रा.) आपल्याला ज्याने जाणलें तो अद्वयच.

स्वपूर्णात्मातिरेकेण जगज्जीवेश्वरादयः ।

न सन्ति नास्ति मायाच तेभ्याश्चाहं विलक्षणः ॥’

आत्मनिष्ठाला आपल्याहून निराळे कांहीं दिसत नाही, त्याच्यांत दुसरे व्हावयास कांहीं कारणहि त्याला आढळत नाही. त्याच्या ठिकाणी जीवेश्वर हा शब्दप्रयोग ‘दोरीलाच बघून सर्प’ म्हणण्यासारखा आहे. याला कारण होणाऱ्या भ्रमात्मक मायेतूनहि आपले स्वरूप वेगळे ठरवून, आपल्यांत या मायेला देखील तो जागा देत नाहीं. ज्ञाऱ्याप्रमाणेच आपल्यांतहि विचाराअंती दुसरें असें कांहीं दिसणेंच शक्य नाही. ‘घटद्रष्टाः घटाद्भिन्नः । या न्यायानें दिसतें तें वेगळेच असतें असें ठरले की दिसून येणाऱ्याहून आपण वेगळेच ठरून, आपल्यांत तें मुळीं नाहीच असें सिद्ध होऊन आपल्यांत दुसरे भासतें हा शब्दप्रयोग निरर्थक ठरतो.

वेगळे दिसतेंच म्हणून गृहीत धरून चाललें तरी ज्याला दिसतें तो पूर्वीच असणार! दृश्य दिसेनासे झाल्यानंतरहि तो उरणार ! दृश्य मात्र आपल्या आदि अंती असू शकत नाहीं. जरी सूक्ष्म असते असे धरले तरी ते समजणारा ज्ञानरूप असा पूर्वीच असणार ! जड दृश्यापासून ज्ञानरूप पहाणाऱ्याची उत्पत्ति होणे शक्य नाहीं. ‘मी पाहिले’ या अनुभवांत देखोल ‘मी’ची उत्पत्ति अगोदर आहे. ‘मी पहातो ‘ हा शब्दप्रयोग सर्वांच्या परि चयाचा आहे. ‘दृश्य मला पहाते’ या शब्दांचा प्रयोग कोणाच्या परिचयाचाहि नाहीं आणि अनुभवालाहि पण पटणार नाहीं. दृश्यच पहाते असे जरी ठरलें तरी तें ज्याला समजतें तो तत्पूर्वीच असणार. दृश्याच्या आदि अंती असणारे स्वरूप सूक्ष्म तसेच स्थूलदृश्यहि होणार नाही. दृश्याच्या आदि अंती असणारें दृश्यरहित असे कोणचे तरी ज्ञानस्वरूप असणार ! !

दृश्य म्हणजे जड, मग तें स्थूल असो की सूक्ष्म असो. भाना शिवाय दृश्याचे ज्ञान होणे शक्य नाहीं, तें मानहि ज्ञानाशिवाय असू शकत नाही. या भानामुळेच दृश्याची उत्पत्ति असे ठरलें तर दृश्य। पूर्वीचें भान ठरून या भानास भासविणारे ज्ञान या पूर्वीचंच. भान म्हणजेच तें ज्ञान होऊ शकत नाहीं. प्रकाश्य कधी तरी प्रकाशक होऊं शकेल कां ? म्हणून या दृष्टीने भान आणि त्याच्या मुळे समजले जाणारें दृश्य हे दोन्हीहि याला भासविणाऱ्या, याच्या आदि-अंति असणाऱ्या त्या ज्ञानांत असणे शक्य नाही. तें ज्ञानहि पण असे होऊं शकत नाहीं. आदि-अंती वेगळ्या रूपानें जरी असले तरी मध्ये तेंच वेगळ्या रूपानें कां भासू नये ?

‘आदावन्ते च यन्नास्ति वर्तमाने च तत्तथा । आदावन्ते च यन्नास्ति वर्तमाने च तत्तथा ॥

आदि ही नसलेले मध्येहि नसते आणि आदि अंतीहि असलेले मध्ये असते. आदि वं अन्ती असलेले मध्ये भिन्नरूपाने होते असे म्हटले तर आदि अंति असणारे ज्ञानस्वरूप मध्ये जड होते असे म्हणावे लागेल आदि अंती झाले तर जड प्रकाशिले जाणार कोणाकडून ? पूर्वी असणारे ते कारण, नंतर झालेले तें कार्य. कार्याचे अस्तित्व कारणामुळेच. कारण जर कार्य झाले तर या कार्याचा आधार काय ? म्हणून केवळ ज्ञानस्वरूपांत अन्याची उत्पत्ति होणे संभवनीय नाही. ‘अघटित घटना पटीयसी’ अशी माया हे अन्य उत्पन्न करिते असे जरी म्हटले तरी ज्ञानाला माया म्हणणे शक्य नाही. मागचीच परंपरा पुढे उभी राहून त्या माये हुनहि ते ज्ञान वेगळेच ठरणार अगदीच वेगळे असणाऱ्या स्वमात्र अशा भानात अन्याची उत्पत्ति झाली हे कोणच्याच दृष्टीनें सिद्ध होत नाही. नसून दिसणारे भ्रमात्मकच. भ्रमाला सत्या चाच आधार. त्या सत्यांत भ्रम उत्पन्न झाला किंवा सत्यच भ्रम रूप म्हणणे शक्य नाही. माया अविद्येनी स्मृति विस्मृति झाली असे उगीच म्हटले जाते. या भ्रमातून जो ‘मी’ अविकारी असा असतो त्याहून विचाराने पाहिले असता वेगळे हे काहींच ठरत नसल्यामुळे माझ्या स्वरूपाला अयथार्थ ज्ञानामुळे ‘ जीवेश ‘ हे नांव देतात. हे जीवेश्वर नसून माझा मीच आहे. माझ्यावर या साऱ्या नांवाचा फुकट आरोप केला जातो.

  • ब्रह्मैव केवलं शुद्धं विद्यते तत्त्वदर्शने |

नच विद्या न चाविद्या जगच्च न चापरम् ॥ हा श्रुतियुक्त अनुभवच ‘माया विद्या यांनी स्मृति विस्मृति जाहली असें म्हणती । यामधि जो मी भासे त्याला जीवेश नांव हे देती ॥’

या चौदाव्या आयेतून प्रगट झाला आहे.

  • यदन्यदन्यत्र विभाव्यते भ्रमादध्यास मित्याहुरमं विपश्चितःअसर्पभूतेऽहि विभावनं यथा रज्वादिके तद्वदमीश्वरे जगत् ॥(अध्या. रामायण)

सर्पाहून भिन्न अशा दोरीच्या ठिकाणी भ्रमानें सर्वांची भावना उत्पन्न झाल्याप्रमाणेच एका वस्तूच्या ठिकाणी त्याच्या अगदी विरुध्द असणाऱ्या दुसऱ्या एका वस्तूची भावना होणे म्हणजेच अध्यास. निसर्गतः सत्यबोधे विमूढा मानवीमतिः । (ब्रह्म सिध्दांतमाला) जन्मापासून या मानवी मनाला सत्याचा परिचय नाही. अध्यासच सर्व प्राण्यांचा निसर्ग झाला आहे. अध्यास म्हणजे ‘अहं ममेति यो भावो देहादाक्षावनात्मनि ।’ ‘अध्यासोऽयम् । आपल्याहून भिन्न असणाऱ्या देहेद्रियांच्या ठिकाणींहि ‘मी’ अथवा ‘माझे’ म्हणून जे वाटते त्यालाच ‘अध्यास’ म्हणतात.

‘नामरूपद्वारा स्थूलोऽमिति मिथ्याध्यासवशाज्जीवः । नामरूपाच्या भावनेनें देहच मी म्हणून मिथ्याध्यास ज्या जाणि

वेत दिसून येतो त्या या विपरीत भावनेने युक्त असणाऱ्या या जाणिवेलाच ‘जीव’ असे म्हणतात. केवळ जाणिवेंत ही भावना निष्प्रयोजक ठरतें तशीच मिथ्याहि पण वाटते. ‘मी देह’ यांत ‘मी’ याची व्याप्ति देहांत आहे हे स्पष्ट कळून येईल. व्यापणारा पदार्य व्यापल्या जाणाऱ्या पदार्थापेक्षां पूर्वीच असून याहून तो वेगळाच असतो. ‘मी देह’ म्हणण्यात ‘मी’ हे पूर्वीचेच ठरलें की याच्याकडून व्यापल्या जाणाऱ्या देहाची भावना यांत अनाठायी व निष्प्रयोजकच होते. व्यापणारे व्यापिलें जाणाऱ्यापेक्षां अतिसूक्ष्म असते, या दृष्टिनें व्यापक आपल्या सूक्ष्मतेने व्याप्य पदार्थापेक्षां विशालच असावयास पाहिजे. व्याप्य पदार्थांच्या योगानें व्यापक पदार्थ व्यापला जात नाही म्हणूनच व्याप्य पदार्थांच्या दृष्टीनें व्यापक अनंत असतो. आपल्या अनंततेने स्वतःपूर्ण असणाऱ्या वस्तूस व्याप्य म्हणून असणाऱ्या स्वतःहून अन्याची अपेक्षा कधी नसावयाचीच.

यदनुविद्धं यद्भासते तत्तत्र परिकल्पितम् । ज्याच्याकडून जे व्यापले जातें तें व्यापक वस्तूंत नुसतें कल्पितच असते म्हणजे नसतेच, त्या अखंड अशा अद्वितीय वस्तूंत त्याहून वेगळे भासणे म्हणजे केवळ भ्रमच. याप्रमाणे मी देह, मी इंद्रिये, मी प्राण, मी मन, मी अहंकार अथवा मो अज्ञानी म्हणण्यांत मी च्या विरुध्द असणाऱ्या यांचा हा अध्यास या मी तून झालेला दिसून येतो. हा नुसता आरोपच. याप्रमाणे मीयातून भासणारे पिंडब्रह्मांड, जीवेश, विद्या अविद्या सारेच – ” मीयांत अध्यारोपित अपवादानी मी यांत कांहीच नाही हे सिध्द होते.

देहेन्द्रियप्राणमनो हमादया: सर्वे विकारा विषयाः सुखादयाः । व्योमादि भूतान्यखिलं च विश्वमव्यक्तपर्यन्तमिदं ह्यनात्मा ||

(विवेक चूडामणि) 

देह इंद्रिये, प्राण, गज, अहंकारादि इतर अंतःकरण, काम कोधादिविकार, स्त्रीपुरुषादि सर्व भावना, सर्व विषय विषयद्रियान होणारे सारे सुखोपभोग, आकाशादि पंचमहाभूत, या योगाने झालेलें विश्व याला कारण असणारा अहंकार, यालाहि कारण असणारे महत्त्व यांत दिसून येणारे प्रकृति पुरुष, ‘बहु उहावे हा संकल्प या साऱ्याना धरून त्या अन्यनतापर्यंतचे कार्य व या सर्वांना कारणी भूत असणारे अन्यवतहि अनात्मपन आत्मस्वरूप हे अनात्म वर्गात मोडत नाही. आत्मा नाम सुराः स्वेन भासा यो भांति सन्ततम् । (सू. सं.) केव्हा आपल्याच प्रकाशाने प्रकाशमान असणाऱ्या वस्तूस आत्माअसे म्हणतात. अन्वते प्रकाशत

इत्यामा’ या व्युत्पत्तीनेंहि हाच अर्थ स्पष्ट होतो. ‘शुद्धोऽबाध्य. स्वरूपो बुद्धः सुखस्वरुप आत्मा। अति पवित्र त्रिकालाबाधित ज्ञानरूप सुख म्हणजेच आत्मस्वरूप. हे आत्मस्वरूपच ब्रह्म ‘सत्य मात्मा ब्रह्मवनात्र विचिकित्स्यम् ।’ ( न. उ. ता. ) या ठिकाणी कोणी संशयच घेऊं नये असे श्रुतीचे सांगणे आहे. हें आत्मस्वरूप ‘मी’ अशा भानानिशी प्रत्येक देहांत वास करते. आत्मा ब्रह्म म्हणून म्हटल्याप्रमाणे ‘अहं ब्रह्म’ म्हणूनहि श्रुति सांगते. यावरून ‘अहमात्मा ब्रह्म’ या वाक्याचा अर्थ कोणालाहि स्पष्ट होईल. हे आत्मस्वरूप अनात्मपदार्थाहून वेगळे म्हणूनच त्याला असंग असेंच असणार. ‘ असङगो ह्ययमात्मा ।’ (बृ.) ही आपली वस्तु स्थिती लक्षांत आणून विवेकानें अनात्म पदार्थाचा अध्यास नाहिसा झाला पाहिजे. या सर्वांना प्रकाशित करणारे आपले असंगत्व सदोदित उराशी बाळगणे हेच याला साधन..

अश्वत्थ मेनं सुविरूढमूलमसङगशस्त्रेण दृढेन छित्वा ॥(भ.गी. १५/३)

‘ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन्गता न निवर्तन्ति भूयः ।(भ.गी. १५|४ )

‘ब्रह्मसंस्थोऽमुतत्यमेति । (छा.)

‘ज्ञात्वा त्वं प्रत्यगात्मानंबुद्धि तद्वृत्तिसाक्षिणम् । सोऽहमित्येव तद्वृत्या स्वान्यवात्मचमति त्यजेत् ॥(अ. उ. २)

सर्वांहून विलक्षण असून आपल्याच प्रकाशानें या सवीना उजळीत बुद्धि आणि तिच्या वृत्तीलाहि तटस्थपणें आपल्या अविकारी प्रकाशानें प्रकाशित, आपल्यांत दुसऱ्याची उरी न ठेवतां जें सदाचेंच अद्वितीय तें आपलें आत्मस्वरूपच जीवाने ‘मी’ म्हणून जाणून नित्य निरतिशय अशा आपल्याहून भिन्न सुखाच्या लाभार्थं अस लेली भ्रामक कल्पना समूळ नष्ट केली पाहिजे, परतत्वबोधक स्फुरणच जर या जिवाच्या ठिकाणी सदोदित मी म्हणून स्फुरत आहे तर त्या ज्ञानस्वरूपाहून अगदी विरुद्ध असणारें हे जड नाम रूप तो कसे होईल? मीपणाच्या भानाने जर तो चिद्रूप आहे. तर भानरहित सारेंच हैं जड कार्य तो प्रकाशित स्वतःप्रकाशानें या सर्व कार्यजाताहून विलक्षणच ठरणार, तो कधीहि दृश्याचा विषय होणार नाही. आणि नामरूपात्मक पदार्थाप्रमाणे तो कधी समजूहि पण येणार नाही. आपल्याला आपण दिसणे अथवा आपल्यालाच आपण समजून घेणे म्हणजे स्वस्कंधारोहणाचा न्याय! दिसणारे आणि समजून घेणारे हें सारे वेगळेच असते. जे दिसून अथवा समजून येत नाहीं, जे सर्व प्रकाशतें व ज्यांत हें कांहीच नसून जे केवळ ज्ञानस्वरूप आहे तेच आत्मस्वरूप म्हणजे आपण.

दिसणारें व समजून येणारे सारे आपल्याहून वेगळे, आपल्या कडूनच प्रकाशित होत असल्यामुळे स्वतंत्र प्रकाश नसलेलें जडच, हे मागे सिद्ध झाले आहे. ज्या आपल्या भानानेंच हे सारें प्रकाशित होतें तेंभान आपल्यांत लीन झाले असतां कांहीच नसतें. या अन्वय व्यतिरेकानें हे सारें आपल्याकडूनच भासतें असे झाले की आपण सारेच स्वयंप्रकाशरूप, स्वतः सिद्ध असें तें अद्वितीय ज्ञानस्वरूपच आहोत हें स्पष्ट होईल. सर्व प्रकाशक ज्ञान कोणाकडून प्रकाशिले जाणार? प्रकाशिले जाणारेंच जाणले जातें, जे स्वत प्रकाशरूप ते ज्ञान कसें जणलें जाईल? तें ज्ञानस्वरूप स्वतःला ओळखण्याला ज्ञेयरूप कसे होईल ? केवळ ज्ञानच ते! ! ‘ अवेद्यते सत्य परोक्ष: ‘ जाणावयाचें ते वेगळे असल्यामुळे, न जाणले गेल्यामुळेच ते आपले ज्ञानरूप आत्म स्वरूप. आत्मस्वरूप वेद्य ही भ्रांति की आपणच ज्ञानस्वरूप. तिथे वेद्य आलि वेद्यक, भोग्य आणि भोक्ता, दृश्य आणि द्रष्टा यांची लुडबुड पार कुठे नाहिशी होऊन निःशब्द असे आत्मस्वरूपच उरते. तर्कतश्च प्रमाणाच्च चिदेकत्व व्यवस्थिते ।’ चिदेकत्व परिज्ञानें न शोचति न मुह्यति ।’ अद्वैतं परमानन्दं शिवं याति तु फेवलम् ।‘ इत्यादि वाक्यांनीहि सहज सिद्ध होणारे अद्वितीय चिन्मस्वरूप आपण, असे को एकदां ठरले आणि तसाच मी या आपल्या अनुभवांतून भासू लागले की शोक-मोहाचा ठावच मुळी पुसला गेला. स्वरूप जाणणारा जीव अद्वय अशा परमानंदरूपाने सर्वमंगलरूप असे ते परतत्त्व म्हणजे ब्रह्मच होतो. मात्र अध्यासोऽयं निरस्तव्यं:’ स्फटिकांतून दिसून येणाऱ्या अन्य पदार्थाच्या रंगाप्रमाणे माझ्यांत दिसून येणारे हे सारे स्थूल-सूक्ष्म देह माझ्या विचित्र शक्तीचा विलास ! मला याचा संबंध थोडासुद्धा नाही. मी ही माझी स्मृति, अविकारी असे माझे ज्ञानस्वरूपच आपला विषय करते असे ज्याने जाणले, मायाशक्ति आणि तिचें कार्य वगळून जो निर्विकारी असा उरला त्याला भिन्नत्वाचे भानहि मावळून जाते आणि एकत्वाचे मानहि पण शिल्लक उरत नाही. निर्विकल्प असा ज्ञानमात्रतेनें तोच उरतो.

श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतस्तौ संपरीत्य विविनक्ति धीरः । श्रेयो हि धीरोऽभि प्रेयसो वृणीते प्रेयो मन्दो योगक्षेमाद् वृणीते ॥'(कठ. १।२।२)

श्रेय आणि प्रेय ही दोन्हींहि एकदमच मनुष्याला त्याच्या आयुष्यांतून आढळतात. अविचार सुंदर प्रपंच्याचा भ्रामक मोह जिंकण्याचे धैर्य ज्याच्या ठिकाणी असते असा बुद्धिमान त्या दोहींचे पृथक्करण करून सत्यमुखाच्या विचाराने प्रेयाकडे पाठ फिरवून श्रेयाचेंच अवलंबन करतो. पण भ्रामक संस्काराच्या खाली पिचला गेलेला अल्पबुद्धींचा मात्र, शक्य न वाटल्यामुळे, नदीचा प्रवाह तोडून जाण्यापेक्षां प्रवाहाबरोबरच वाहून जाणे सोईचेच, पुढे कांहीतरी तरणोपाय ईश्वरसंकेताने असेल या आशेने प्रवाहा बरोबरच जातो; म्हणजे ऐहिक सुखोपभोगाचा मार्गच सुलभ ठरवून प्रेयाचें अवलंबन करतो. एकंदरीत जीवाला या जगांत आपले जीवन घालविण्याचे हे दोन मार्ग. पहिला स्वरूपभूत निरनिशय आनंदानुभवाचा ‘ निवृत्ति मार्ग’ यालाच ‘श्रेयोमार्ग’ म्हणतात. दुसरा देहाभिमानानेच टवटवीत असणारा विषयानंदानुभवाच्या पालवीनें गोजिरवाणा दिसणारा हा ‘ प्रवृत्तिमार्ग! यालाच ‘प्रेयोमार्ग’ म्हणतात. यांतूनहि निवृत्ति साधणें प्राणिमात्रांचें ध्येय असले पाहिजे.

‘लोके व्यवायामिषमद्यसेवा नित्यास्ति जन्तोनं हि तत्र चोदना व्यवस्थितिस्तेषु विवाहयज्ञ सुराग्रहेरासु निवृत्तिरिष्टा । ( भागवत)

ज्याच्या योगानें आब्रह्मस्तंबपर्यंतचे हे सारे कार्यजात सुखरूप म्हणून भासतें तें आपणच असें ज्यानें श्रुतियुक्तिप्रमाणानी, विशेषत: गुरुकृपेनें जाणलें व सुखाची दृष्टी ज्याने आत्मस्वरूपींच खिळवून टाकली, वान्त्याशनाप्रमाणे पुन्हा जो विषयसुखाकडे ढुंकूनह पहात नाही तोच निवृत्तिमार्गी अथवा श्रेयोमार्गी. त्या मूळसुखा हून जें भिन्न ते सारें वगळले की आपण सारे त्या सुखाशीं अभिन्न होऊ. सुखाहून वेगळे पडले असतां दुःख अपरिहार्य होत असल्यामुळे, केवळ सुखरूप असणाऱ्या त्या परब्रह्मांत, त्या आपल्या यथार्थ मूळस्वरूपांत, ज्याने ‘ मी ‘ हे भान विरघळून टाकले तोच निवृत्तिमार्गी या स्वतःपूर्ण अशा केवळ आत्मस्वरूपाच्या आनंदानें, या स्वरूपभूत आनंदाच्या आत्मतृप्तीनें जो या जगांतले आयुष्य घालवितो तोच धीर म्हणजे धैर्यशाली, असे श्रुतीचे सांगणे आहे. ‘कश्चिद्धीर: प्रत्यगात्मनमैक्षत।’ (कठ. २०१।१ ) या अशा नरकुलभूषणांना परमार्थी, श्रेयोमार्गी मोक्षमार्गीअथवा निवृत्ति मार्गी असे म्हणतात.’ मोक्ष एव परम पुरुषार्थः ।’

‘सरड्याची धाव कुंपणापर्यंत’ या म्हणीप्रमाणे ज्यांची सुखाची कल्पना इह्परलोकाच्या वैषयिक सुखाची मर्यादा ओलांडून जात नाहीं, तेच आपले जीवन म्हणून जे मानतात अशा देहाभिमान्यांना श्रुतीने ‘मूढ ‘म्हणून म्हटले आहे. ‘दंद्रम्यमाणाः परियान्ति मूढाः || (कठ. १।२|५) असे हे मूढ जरामरणरोगादि अनेक दुःखानी वेष्ठित होऊन अपरोक्षज्ञान न संपादिल्यास अनेक योनीत जन्म पावतात. हेच संसारिक श्रेय, प्रेय या दोन्हीतून सुरक्षित व खऱ्या सुखाचा कल्याणकारक मार्ग कोणचा या प्रश्नाचे श्रुतीनें उत्तर दिले आहे.

श्रेय आददानस्य साधुर्भवति । हीयतेऽर्थाथ उ प्रेयो वृणीते || (कठ) जो श्रेयाचे अवलंबन करतो त्याचे निरतिशय आत्मीय सुखलाभाने कल्याण होते. जो अदूरदर्शी प्रेयाचेंच अवलंबन करतो तो अर्थात खऱ्या सुखाला पारवा होऊन दृश्य सुखाच्या संस्काराने जन्ममरणाच्या भोवऱ्यात सारख्या गिरक्या घेत स्वतःचे अकल्याण करून घेतो, हा या श्रुतीचा भावार्थ.

‘दूरमेते विपरीते विषुची अविद्या या च विद्ये ज्ञाता ।’ (कठ, १|२|४)

विद्या आणि अविद्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या या दोन, पर स्पराहून अति विलक्षण असून भिन्न फल देणाऱ्या आहेत. या च विद्या प्रयोविषया| (शंकरभाष्य) ‘अविद्या विषयो जीवः प्रेय आणि श्रेय हे अनुक्रमे अविद्या आणि विद्या यांचे विषय आहेत. तम-प्रकाशाप्रमाणें परस्पर विरुद्ध असे हे दोन मार्ग आपल्या आश्रितांनां संसार आणि मोक्ष अशी भिन्न फळे देतात. पूर्व पश्चिम दिशांच्या टोकाला असणाऱ्या गांवाप्रमाणें हे दोन्ही मार्ग परस्पराहून दूर आहेत. दोघांनाहि माहित नसलेली, उंचसखल व त्यातूनहि कांटेरी असणारी, दोन्हीकडे अत्यंत खोल असणाऱ्या

कड्यातून गेलेली, एखादी फार कठीण चिंचोळी पायवाट एखादा आंधळघाने जन्मांधाच्या सहाय्याने जसे चालून जाण्याचे ठरवावे त्याप्रमाणेच गृहसुतालयदाराद्रव्यादिकांच्या मोहानें अंध होऊन, परमात्मसुखाची दृष्टी जन्मापासून या अविद्येचे नेतृत्व या संसाराचा विषयमार्ग ओलांडून जाण्याचे प्रयोमार्गीयांचे धाडस होय.

‘न सांपरायः प्रतिभाति बालं प्रमाद्यन्तं वित्तमोहेन् मूढम् । अयं लोको नास्ति पर इति मानो पुनः पुनर्वशमापद्यते मे ||

(कठ. १|२|६)

home-last-sec-img